Diwali Wishes in Marathi
दिपावली सण आठवला की दिव्यांच्या पणत्या सगळीकडे पणत्यांचा उजेडच उजेड, सगळीकडे फटाक्यांचा आवाज आणि घराघरात महालक्ष्मी मातेची पूजा या सगळ्या गोष्टी आठवल्या शिवाय राहत नाहीत, प्रसादात बत्ताशे आणि लाह्या त्यांचा स्वादच वेगळा, तसेच प्रत्येक घराला आंब्यांच्या पानांचे तोरण, नवीन कपडे परिधान करणे, या सगळ्या गोष्टी दिवाळी म्हटलं की आठवतातच, लहानांपासून मोठ्यांपर्यंत फटाके फोडणे सर्वदूर एक आंनदाचे वातावरण निर्माण झालेले असत.
आयुष्यातील प्रत्येक दिवस त्या दिवसासारखा असावा असं वाटतं, घरावर आकाश कंदील लावणे, तसेच लहान मुलांचा छंद किल्ला वगैरे बनविणे, दिवाळी निमित्त ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या परिवारासोबत करत असतो. याच दिवाळी निमित्त आजच्या लेखात आपण काही Quotes पाहणार आहोत ज्या आपल्याला दिवाळी निमित्त परिवारातील सदस्यांना तसच नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी कामी येतील, तर चला पाहूया काही दिवाळी निमित्त काही Quotes.
मराठी दिवाळी संदेश – Diwali Shubhechha in Marathi

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.
Diwali Greetings Messages in Marathi

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली, जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा.
उत्सव प्रकाशाचा अवतरला नवं साज घेऊनी आता द्या नी घ्या प्रेमच प्रेम भरुनी.
Diwali Message in Marathi

आज आकाशात पुन्हा नव्याने पाहूया आकाशातले रंग वेगळे डोळ्यात नव्याने साठवूया नव्या या वाटेने सुरू होईल प्रवास नवा नवा, सण दिवाळीचा आला नव्याने प्रत्येकाला हवा हवा.
दिव्या पणतीची रास अंगणात प्रकाश लक्ष्मी आली घरी सुख घेऊनि सावकाश.
Diwali Quotes in Marathi
हिंदू संस्कृतीत दिवाळीला विशेष महत्व लाभलेलं आहे, प्रभू रामचंद्र जेव्हा रावणावर विजय मिळवून सितामातेला रावणाच्या लंकेतुन सोडवत अयोध्येत परतले तेव्हा अयोध्या वासीयांनी त्यांच स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी सजवली होती, तेव्हापासून हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. याच दिवाळी निमित्त आपण आजच्या लेखात काही आणखी Quotes पाहणार आहोत, तर चला पाहूया दिवळीवर काही Quotes.

नवा सण नवा प्रकाश नव्या या दिवशी उजळू दे आकाश नवी चाहूल नवी आशा प्रेममय होउदे प्रत्येक दिशा.
सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला एकच देवाकडे करतो प्रार्थना सुख समृद्धी लाभू दे तुम्हाला.
Diwali Shubhechha in Marathi

नवं गधं, नवा वास ,नव्या रांगोळीची नवी आरास स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला भरभरून शुभेच्छा.
फुलांची सुरुवात कळी पासून होते जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते आणि आपल्या माणसांची सुरुवात तुमच्या पासून होते.
Diwali Shubhechha Marathi SMS

तुमच्या दारी सजो स्वर्ग सुखांची आरास, लक्ष्मी नांदो सदनी धन धान्याची ओसांडो रास.
जिवंत जोवर मानवजाती जिवंत जोवर मंगल प्रीती, अखंड तोवर राहील तेवत दिपावलीची मंगल पणती.
Diwali Shubhechha Marathi

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्कर्षाची वाट उमटली विरला कालचा गर्द काळोख, क्षितिजावर पहाट उगवली घेऊनिया नवं उत्साह सोबत.
Diwali Shubhechha

दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
फुलांची रास चंदनाचा सुवास दिव्यांच्या रांगा अंगणी रांगोळीचे सडे नवे पर्व विचार नवे आली दिवाळी आली पसरण्याचा नवं आकांक्षाचे घडे.
Diwali Whatsapp Messages in Marathi

लक्ष्य दिव्यांचे तोरण ल्याली उटण्याचा स्पर्श सुगंधी, फराळाची लज्जत न्यारी रंगावलीचा शालू भरजरी आली आली दिवाळी आली.
पुढील पानावर आणखी…