Digital India Slogan
आपल्या आजूबाजूला सर्वच गोष्टी डिजिटल होताना आपल्याला दिसत आहेत, त्यामध्ये मग ऑनलाईन पेमेंट करणे असो कि, शिक्षणात भारत डिजिटल होणे असो, प्रत्येक गोष्टीत आज भारत पूर्णपणे डिजिटल होताना आपल्याला दिसून येत आहे.
याच डिजिटल इंडियामुळे देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अश्या अपेक्षा प्रत्येक नागरिकाला शासनाकडून आहेत. डिजिटल इंडिया हा भारताचा एक प्रेरणादायी कार्यक्रम ठरेल असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे.
“डिजिटल इंडिया” विषयी काही घोषवाक्ये – Digital India Slogan in Marathi
करूया डिजिटल भारतसाठी काही घोषवाक्ये – Slogans For Digital India
तर चला पाहूया काही घोषवाक्ये जे आपल्याला डिजिटल इंडियाचे महत्व जाणून घेण्यास मदत करतील.
- कागदाचे काम पडेल खूपच कमी, जेव्हा डिजिटल इंडिया येईल कामी.
- डिजिटल इंडियाच्या पसरलेल्या विस्तारामुळे, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात मिळे.
- करा आता पेमेंट ऑनलाईन, नका लाऊ लांब लाईन.
- देशाचे लोक डिजिटल झाले, जेव्हा डिजिटल काम व्यवहारात आले.
- सगळे कार्ड्स व्यवहारात आणा, मिळून सगळे डिजिटल बना.
- नका आणू कार्ड्स वापरावर बंदी, हीच आहे अर्थव्यवस्था सुधारण्याची संधी.
- घ्या आता एकच ध्यास, डिजिटल युगात करू भारताचा विकास.
- दैनंदिन वापरात आणू थोडीशी पुष्टी, वापरून सर्व डिजिटल गोष्टी.
- होईल स्वप्न प्रत्येकाचे साकार, येईल डिजिटल इंडियामुळे त्याला आकार.
- डिजिटल इंडिया चा एकच उद्देश, डिजिटल हो आपला देश.
- डिजिटल इंडिया चा विस्तार, घेऊन येईल एक वेगळाच चमत्कार.
- डिजिटल इंडिया लागू होईल फर्स्ट, तेव्हाच होईल भारत श्रेष्ठ,
- कागद येईल संपुष्टात, जेव्हा डिजिटलतेची वाढ होईल भारतात.
- कळेल प्रत्येकाला एक एक अक्षर, जेव्हा देश होईल डिजिटल साक्षर.
- होऊनी डिजिटल साक्षर, गिरवू उन्नतीचे एक एक अक्षर.
- देशातून काढू बाहेर भ्रष्ट, डिजिटल करून आपले राष्ट्र.
- विकासाकडे जाण्याची आपली बारी, डिजिटल सेवा येईल आपल्या घरी.
- डिजिटल भारत, समृध्द भारत.
- सुरुवातीला होतील बऱ्याच चुका, डिजिटल इंडियामुळे बऱ्याच जनांना मिळेल शिकण्याचा मोका.
- भारत डिजिटल असेल, तर साक्षरता वाढेल.
डिजिटल इंडिया मुळे आपल्याला खूप काही गोष्टींमध्ये नवीन शिकायला मिळत आहे, आज पूर्ण भारतामध्ये सगळीकडे डिजिटल देवाण-घेवाण सुरु झालेली असून प्रत्येक नागरिक हा जास्त करून डिजिटल व्यवहाराचा समाजात वापर करत आहे.
काही जण या गोष्टीमुळे सहमत नसतील कि डिजिटल इंडिया फक्त नावापुरतेच आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो कोणताही बदल घडण्यासाठी वेळेची मागणी हि जास्त असते, देशाच्या विकासामधेच आपला विकास आहे हे नेहमी लक्षात ठेवून चलावे.
तर आशा करतो आपल्याला ह्यापैकी काही घोषवाक्ये आवडली असतील, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका. आणि आमच्या माझी मराठी ला अवश्य भेट.
Thank You So Much And Keep Loving Us!