Shampoo and Conditioner
आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आणि आपलं शरीर सुशोभित ठेवण्यासाठी आवश्यक असलेला अंग म्हणजे आपले केस होत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या केसांची काळजी घेत असतो, कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या धुळीतील लहान लहान कंणापासून आपले केस खराब होण्याची संभावना असते सोबतच त्यामध्ये धूळ जमा होऊन ती धूळ केसांमध्ये डैंड्रफ निर्माण करू शकते.
म्हणून आपण नेहमी केसांना स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू किंवा कंडिशनर चा वापर करतो. पण या शॅम्पू आणि कंडिशनर मध्ये नेमका फरक काय आहे, हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसेल. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की शॅम्पू आणि कंडिशनर यांच्यात नेमका फरक काय असतो? तर चला जाणून घेऊया या छोट्याश्या लेखातून.
शॅम्पू आणि कंडिशनर मध्ये काय फरक आहे – Difference Between Shampoo and Conditioner in Marathi
शॅम्पू म्हणजे नेमकं काय असत? – What is Shampoo?
शॅम्पू एक हेयर केयर प्रोडक्ट आहे जे आपल्या डोक्यातील केसांमध्ये असलेली धूळ, प्रदूषण, तेल, आणि डोक्यातील त्वचेच्या मेलेल्या पेशी यांना बाहेर काढण्याचे कार्य शॅम्पू करते. प्रदूषण आणि धूळ ह्या आपल्या केसांसाठी हानिकारक गोष्टी आहेत. ते आपल्या केसांना कमजोर बनवू शकतात.
म्हणून केसातील धूळ काढण्यासाठी शॅम्पू चा वापर केल्या जातो. शॅम्पू ह्या वेगवेगळ्या ब्रँड च्या असू शकतात.
कंडिशनर म्हणजे नेमकं काय असतं? – What is Conditioner
कंडिशनर म्हणजे सुध्दा एक हेयर केयर प्रोडक्ट आहे. जे आपल्या केसांना मुलायम, मजबूत ठेवण्यासाठी सहकार्य करत असत.
बाजारामध्ये बरेचश्या ब्रँड चे कंडिशनर उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाचा वापर वेगवेगळ्या रीतीने आपण करू शकतो. केसांना मुलायम तसेच मजबूत ठेवण्यासाठी आपण याचा वापर करू शकता.
शॅम्पू आणि कंडिशनर मधील फरक – Difference Between Shampoo and Conditioner
- शॅम्पू ज्या घटकांनी बनविल्या जाते त्यामध्ये साबणामध्ये वापरले जाणारे घटक सुध्दा वापरतात, आणि कंडिशनर मध्ये प्रोटीन आणि केसांना मुलायम करण्यासाठीचे मॉइश्चरायझर सुध्दा वापरले जाते.
- शॅम्पूचा Ph आणि कंडिशनरचा ph वेगवेगळा असतो.
- शॅम्पूचा वापर डोक्यावरील कातडी स्वच्छ करण्यासाठी केला जातो, आणि कंडिशनरचा वापर डोक्यावरील केसांची मुलायमता आणि मजबुती टिकून
- ठेवण्यासाठी केला जातो.
- शॅम्पूला लावल्यानंतर आपण शॅम्पूला धुवून घेतो. आणि कंडिशनरला लावण्यासाठी आधी केसांना शॅम्पूने धुवून किंवा पाण्याने धुवून लावू शकतो,
- कंडिशनरला आपण धुवू पण शकतो आणि तसेही राहू देऊ शकतो.
तर हा होता शॅम्पू आणि कंडिशनर मधील अंतर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला हा लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत,
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!