Saving Account vs Current Account
सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट या विषयी आपण ऐकलेलंच असेल, आपण जेव्हा बँकेत नवीन खाते उघडायला जातो तेव्हा आपल्याला विचारलं जाते की आपल्याला कोणत्या प्रकारचे खाते उघडायचे आहे. मग त्यामध्ये दोन प्रकारची खाती आपल्याला पाहायला मिळतात एक सेविंग अकाउंट (जमा खाते) आणि एक करंट अकाउंट (चालू खाते) आणि आपल्याला हवं असणारे खाते आपण उघडून घेतो, पण काही मंडळी अशी असेल की त्यांना या दोन खात्यांमधील फरक माहिती नसेल, काळजी करू नका मला सुध्दा सुरुवातीला माहिती नव्हत, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट या खात्यांमधील फरक. तर चला पाहूया..
बँकेतील खात्याबद्दल माहिती – Difference Between Saving and Current Account in Marathi
सेविंग अकाउंट (जमा खाते) म्हणजे काय? – What is Saving Account?
सेविंग अकाउंट ला मराठी मध्ये बचत खाते म्हणतात, हे खाते सामान्य नागरिकांसाठी असते, आपल्या कामातून कमावलेल्या पैशातून जो पैसा वाचतो त्या पैशाला सामान्य नागरिक आपल्या बचत खात्यात जमा करतो आणि प्रत्येक सामान्य नागरिकांचे बचत खाते असणे आवश्यक आहे. या खात्यावर आपल्याला व्याज सुध्दा मिळते. व्याजाचा दर ३% ते ६% पर्यंत मिळतो. आणि प्रत्येक बँकेचे वेगवेगळे व्याजदर असतात. तर ही माहिती होती सेविंग अकाउंट ची आता पुढे पाहूया, करंट अकाऊंट विषयी माहिती.
करंट अकाउंट (चालू खाते) म्हणजे काय असते? – What is Current Account?
Current अकाउंटला मराठी मध्ये चालू खाते म्हणतात.
आणि सामान्य नागरिकांचे हे खात उघडत नाही, ज्यांना बँकांमध्ये दररोज चे ट्रांझेक्शन करावे लागतात.
आपल्याला जर दररोज चे अनेक ट्रांझेक्शन करायचे असल्यास तर आपण या खात्याला उघडू शकता.
करंट अकाउंट हे मोठं मोठे उद्योगधंदे असणारे उद्योगपती, कंपन्या आणि संस्था यांचे जास्त करून हे खाते असताना पाहायला मिळतात.
ज्यांचे दिवसाला मोठमोठे ट्रांझेक्शन होत असतात.
करंट आणि सेविंग अकाउंट मध्ये काय फरक आहेत – Difference Between Current and Savings Account
- सेविंग अकाउंट हे सामान्य नागरिक, जॉब करणारे व्यक्ती आणि विध्यार्थी यांच्यासाठी योग्य असते, आणि करंट अकाउंट हे उद्योग, व्यापार करणारे व्यक्ती मोठया कंपन्यांच्या साठी योग्य असते.
- Savings अकाउंट मध्ये आपल्याला ३% – ६% व्याज दर मिळतो. आणि करंट अकाउंट ला कोणत्याही प्रकारचे व्याज मिळत नाही.
- सेविंग अकाउंटला ट्रांझेक्शन ची ठराविक मर्यादा असते,आणि करंट अकाउंट ला ट्रांझेक्शन ची कोणतीही मर्यादा नसते.
- सेविंग अकाउंट ला पास बुक मिळत असते आणि करंट अकाउंट ला पासबुक मिळत नाही.
तर आपल्याला या लेखाच्या द्वारे दोन अकाउंट मधील फरक लक्षात आला असेल, आशा करतो आपल्याला हा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!