Mineral Water Vs Package Drinking Water
पाणी हे जीवन आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे, पण कोणते पाणी किती शुद्ध आणि कोणते खनिजांनी भरपूर आहे हे कसं ओळखायचं? आपण पितो ते पाणी किती योग्य आहे, हे कसं ओळखायचं सोबतच अश्याच अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या आजच्या लेखातुन पाहायला मिळतील, आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की मिनरल वाटर आणि पॅकेज ड्रिंकिंग वाटर यामध्ये नेमका काय फरक आहे तर चला पाहूया. सर्वात आधी आपण पाहणार की नेचुरल मिनरल वाटर आणि पॅकेज ड्रिंकिंग वाटर काय आहे तर..
नेचुरल मिनरल वाटर आणि पॅकेज ड्रिंकिंग वाटर मध्ये काय फरक आहे – Difference Between Natural Mineral Water and Packaged Drinking Water in Marathi
नेचुरल मिनरल वाटर म्हणजे नेमकं काय? – What is Mineral Water?
नावावरूनच आपल्याला कळते की नेचुरल मिनरल वाटर म्हणजे जे पाणी खनिज तत्वांनी भरपूर आहे आणि जे पाणी नैसर्गिक स्रोतांपासून घेतल्या जातं त्याला नेचुरल मिनरल वाटर म्हणतात. नेचुरल मिनरल वाटर हे आपल्याला झरे, नदी, यांच्यामार्फत मिळते सोबतच नेचुरल मिनरल वाटर मध्ये आपल्याला खनिज तत्व पाहायला मिळतात, जसे सल्फर आणि अन्य काही आवश्यक खनिज. आपल्या घरामध्ये येणाऱ्या नळाचे पाणी आणि नेचुरल मिनरल वाटर यांच्या मध्ये खूप फरक असतो, सोबतच दोन्ही पाण्याची चव ही वेगवेगळी असते.
पॅकेज ड्रिंकिंग वाटर म्हणजे नेमकं काय असते? – What is Package Drinking Water?
पॅकेज ड्रिंकिंग वाटर म्हणजे जे पाणी नळाला येत आणि नळाला आलेलं पाणी वेगवेगळ्या कंपनी फिल्टर करून रिव्हर्स ओसमोसिस करून त्या पाण्याला मार्केट मध्ये विकल्या जाते त्या पाण्याला पॅकेज ड्रिंकिंग वाटर असे म्हणतात.
आपण विचार करत असणार की आपल्या घरामध्ये येणार पाणी हे सुध्दा मिनरल वाटर असेल तर आपल्याला सांगू इच्छितो आवश्यक नाही की ते मिनरल वाटरच असेल ते मिनरल वाटरही असू शकते आणि नसुही शकते. कारण प्रत्येक ठिकाणची माती आणि जमीन ही वेगवेगळी असते.
बॉटल वरून ओळखा मिनरल वाटर आहे की पॅकेज ड्रिंकिंग वाटर – Identify from Bottle whether it is Mineral Water or Package Drinking Water
मग प्रश्न येतो की बाजारात विकल्या जाणाऱ्या पाण्याला कसे ओळखायचं की ते मिनरल वाटर आहे की पॅकेज ड्रिंकिंग वाटर. किंवा त्या पाण्याचा दर्जा कसा आहे? तर यासाठी भारतामध्ये एक संस्था कार्य करते आणि त्या संस्थेने काही गोष्टी जारी केलेल्या आहेत ज्यामुळे पाण्याचा प्रकार तसेच त्याचा दर्जा आपल्याला माहीत होईल. त्या संस्थेचं नाव हे BIS आहे.
या संस्थेने मिनरल वाटर आणि पॅकेज ड्रिंकिंग वाटर साठी काही वेगवेगळे स्टॅंडर्ड ठरविले आहेत ज्या द्वारे आपण ओळखू शकतो की कोणते पाणी मिनरल वाटर आहे आणि कोणते पॅकेज ड्रिंकिंग वाटर.
जेव्हा आपण एखादी पाण्याची बाटली विकत घेतो तेव्हा त्या बाटलीवर जर IS १४५४३ असेल तर याचा अर्थ आहे की ते पॅकेज ड्रिंकिंग वाटर आहे. आणि जर बाटलीवर IS १३४२८ हा मार्क असेल तर ते पाणी मिनरल वाटर आहे समजून जायचं.
आता या पुढे जेव्हा जेव्हा पाणी विकत घ्याल, तेव्हा पाण्याच्या बाटलीवर हा मार्क नक्की तपासून पाहा. आणि आशा करतो हा लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!