Guarantee Vs Warranty
आपण बाजारात काही वस्तूंना विकत घ्यायला गेल्यावर आपल्याला गॅरंटी आणि वारंटी हे शब्द ऐकायला मिळतात, आणि ज्या वस्तूची गॅरंटी किंवा वारंटी जास्त असेल, त्याच प्रोडक्ट्स ना आपण जास्त करून खरेदी करतो. गॅरंटी आणि वारंटी हे दोन्ही ही शब्द जवळ जवळ ऐकायला सारखेच वाटतात. पण या दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. काही लोक दोन्ही शब्दांना एकच समजतात, कारण या शब्दात समानता आहे. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की गॅरंटी आणि वारंटी मध्ये काय फरक असतो, गॅरंटी आणि वारंटी चा फायदा घेण्यासाठी दुकानदारांकडून आपल्याला वारंटी कार्ड आणि गॅरंटी कार्ड ची आवश्यकता असते. पाहूया तर चला …
तुम्हाला माहिती आहे का गॅरंटी आणि वारंटी काय आहे – Difference Between Guarantee and Warranty
गॅरंटी म्हणजे नेमकं काय असते? – What is Guarantee?
एखादी वस्तू दुकानातून विकत घेतल्यावर त्या वस्तूच्या एका ठराविक मुदतीच्या वेळेत (समजा एका वर्षात) ती वस्तू खराब झाल्यास दुकानदार किंवा कंपनी आपल्याला त्याच प्रकारची दुसरी वस्तू पहिल्या खराब झालेल्या वस्तूच्या मोबदल्यात देत असते याला आपण गॅरंटी म्हणत असतो. म्हणजेच एखादी जुनी वस्तू खराब झाली असल्यास त्याच्या मोबदल्यात नवीन वस्तू दिल्या जाणे म्हणजे गॅरंटी होय. गॅरंटी चे काही नियम आणि अटी असतात.
वारंटी म्हणजे नेमकं काय असते? – What is Warranty?
वारंटी म्हणजे दुकानातून एखादी गोष्ट विकत घेतल्यावर त्या वस्तूवर आपल्याला ऑफर दिल्या जाते की विकत घेतलेली वस्तू जर मुदतीच्या वेळात खराब झाली तर त्या वस्तूला दुरुस्त करून किंवा करवून दिल्या जाईल या दुरुस्त करून देण्याच्या कामाला वारंटी म्हटल्या गेलं आहे.
वारंटी चे सुध्दा काही नियम आणि अटी असतात.
यामध्ये आपल्याला जुनी वस्तू खराब झाल्यास नवीन वस्तू मिळत नाही, उलट त्याच वस्तूला दुरुस्त करून दिल्या जाते.
गॅरंटी आणि वारंटी मधील फरक – Difference Between Guarantee and Warranty
- वारंटी मध्ये विकत घेतलेल्या वस्तूला परत दुरुस्त करून मिळते पण तेच गॅरंटी असलेली वस्तू विकत घेतल्यास आणि खराब झाल्यास नवीन वस्तू मिळते.
- गॅरंटी मध्ये घेतलेल्या वस्तू ची कालमर्यादा कमी दिवस असते, आणि वारंटी मध्ये घेतलेल्या वस्तूची कालमर्यादा जास्त दिवस असते.
- वारंटी ला थोडेशे जास्तीचे पैसे देऊन वाढविल्या जाते, पण गॅरंटीच्या बाबतीत असे होत नाही.
- वारंटी ही जवळ जवळ बऱ्याच गोष्टींना दिल्या जाते परंतु गॅरंटी काहीच वस्तूंवर दिल्या जाते.
- गॅरंटी आणि वारंटी ची एक ठराविक मुदत असते, आणि या दोन्ही गोष्टींसाठी नियम वेगळे असतात.
तर आजच्या लेखात आपण पाहिले की गॅरंटी आणि वारंटी मध्ये नेमका काय काय फरक असतो, आशा करतो आपल्याला समजला असेल आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपण आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करू शकता, सोबतच अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!