CID vs CBI
आपण मीडियावर किंवा चित्रपटांमध्ये पाहिले असेल CBI किंवा CID विषयी, काही चॅनेल वरती तर हे विभाग कशा प्रकारे काम करतात हे सुध्दा दाखविले जाते. काही जणांना प्रश्न पडला असेल की CBI आणि CID मध्ये नेमक काय अंतर आहे? तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की CBI आणि CID मध्ये काय फरक असतो, तर चला पाहूया या छोट्याश्या लेखाच्या माध्यमातून.
सर्वात आधी आपल्याला सांगू इच्छितो CID आणि CBI ह्या दोन्ही भारतातील तपासणी करणाऱ्या एजन्सी आहेत, CID ही एजन्सी एखाद्या राज्यापर्यंत सीमित असते म्हणजेच एखाद्या राज्यात एखादी घटना घडली तर त्या घटनेचा तपास हा CID कडे दिला जातो, म्हणजेच CID ही तपासणी एजन्सी राज्य सरकार च्या मार्गदर्शनामध्ये कार्य करते. आता पाहूया CBI विषयी CBI ही सुध्दा CID सारखी एक तपासणी एजन्सी असून CBI ही संपूर्ण देशात होणाऱ्या घटनांचा तपास करते आणि CBI ही एजन्सी केंद्र सरकार, हायकोर्ट, आणि सुप्रीम कोर्ट यांच्या दिलेल्या निर्देशांवर कार्य करते. तर आता पाहूया सविस्तर माहिती….
सीबीआय आणि सीआयडी यांच्यातील फरक काय – Difference Between CID and CBI in Marathi
CBI म्हणजे नेमकं काय? – What is CBI?
CBI सुध्दा एक गुन्हेगार तपासणी एजन्सी पैकी एक आहे. CBI Full Form (Central Beuro Of Investigation) सीबीआय एक तपासणी एजन्सी असून या एजन्सीची स्थापना सन १९४१ ला झाली होती, परंतु ह्या एजन्सी ला १९६३ मध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन नाव देण्यात आले. सीबीआयचे मुख्यालय दिल्लीला आहे आणि सीबीआय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे गुन्हे, भ्रष्टाचार, आणि खून यांचा तपास करण्यासाठी सीबीआयला नियुक्त केल्या जाते, आणि सीबीआयला देशातील सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारच्या आदेशांचे पालन करावे लागते.
CID म्हणजे नेमकं काय ? – What is CID?
CID म्हणजे गुन्हा तपासणे विभाग आणि CID Full Form (Crime Investigation Department) हा होय. CID एक गुन्हेगार तपासणी विभागांपैकी एक आहे जे राज्यातील दरोडे, खून, आणि वाढते गुन्हे यांचा शोध घेते, सीआयडी ची स्थापना ब्रिटिश काळात पोलीस आयोगाच्या शिफारशी मुळे १९०२ मध्ये करण्यात आली होती. या तपासणी संस्थेमध्ये भरती करणाऱ्या कर्मच्याऱ्यांना सुरुवातीला योग्य ते प्रशिक्षण देऊन भर्ती केल्या जाते. या संस्थांना फक्त राज्य सरकार आणि त्या राज्याचे हायकोर्ट आदेश देऊ शकते, आणि त्यांच्या आदेशावर CID च्या टीम ला आपली तपासणी करावी लागते.
सीबीआय आणि सीआयडी मधील अंतर – Difference between CID and CBI
- सीबीआय केंद्र सरकारच्या आधीन राहून कार्य करते तर सीआयडी राज्य सरकारच्या आधीन राहून कार्य करते.
- सीबीआयला केंद्र सरकार आदेश देत असते, तर सीआयडीला राज्य सरकार आदेश देत असते.
- सीबीआय ची स्थापना १९४१ ला झाली होती तर सीआयडीची स्थापना १९०२ ला झाली होती.
- सीबीआय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्ह्यांची चौकशी करते, आणि सीआयडी राज्यातील स्थानीय गुन्ह्यांची चौकशी करते.
तर आशा करतो या लेखाच्या द्वारे आपल्याला माहिती झालं असेल की सीबीआय आणि सीआयडी मध्ये काय अंतर असते, आणि आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank you So Much And Keep Loving Us!