Mileage and Average
आजच्या युगात जवळजवळ प्रत्येकाजवळ दोन चाकी किंवा चार चाकी गाडी पहायला मिळते, गाडी आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल टाकावेच लागते, आणि प्रत्येक गाडीचा एव्हरेज आणि मायलेज हा वेगवेगळा असतो. आणि बरेच लोकांचा या दोन गोष्टींमध्ये गोंधळ होतो, की एव्हरेज कशाला म्हणतात आणि मायलेज कशाला म्हणतात तर आजच्या लेखात आपण एव्हरेज आणि मायलेज मध्ये काय अंतर आहे हे पहाणार आहोत.तर चला पाहूया..
एव्हरेज आणि मायलेज मध्ये काय अंतर असते – Difference Between Average and Mileage
सर्वात आधी मायलेज विषयी पाहणार आहोत.
मायलेज म्हणजे नेमकं काय असत? – What is Average?
काही नियम आणि शर्त लागून गाडीने डिझेल च्या किंवा पेट्रोल च्या प्रमाणात किती अंतर पार केले त्याला गाडीचा मायलेज म्हणतात किंवा आपण असेही म्हणू शकतो की काही नियम पाळत गाडीने एका लिटर पेट्रोल किंवा डिझेल मध्ये किती अंतर पार केले त्याला सुध्दा आपण मायलेज म्हणू शकतो.
कोणतीही कंपनी नेहमी मायलेच विषयी दाव्याने सांगू शकते तेही काही नियम आणि अटी लावून. त्या नियम आणि अटींमध्ये काही नियम आणि अति अश्या असतात, जसे रस्ता हा प्लेन असून सरळ असावा,
सोबतच गाडी ही एका स्पीड मध्ये चालू असावी. म्हणजेच गाडीचा वेग हा एकसारखा असावा.
मायलेज ला जास्त करून Mpg मध्ये मोजल्या जात असते, जर गाडीचा मायलेज मोजायचा असेल तर दोन प्रकारे मोजल्या जाते,
पहिला शहरात आणि दुसरा महामार्गावर आणि शहराच्या तुलनेत महामार्गावर नेहमी जास्तच मायलेज निघतो.
आणि कोणतीही गाड्यांची कंपनी फक्त मायलेज चा दावा करत असते.
एव्हरेज म्हणजे नेमकं काय? – What is Mileage?
विना कोणत्या नियम आणि अटीं शिवाय गाडीने डिझेल किंवा पेट्रोल च्या प्रमाणात किती अंतर पार केले त्याला गाडीचा एव्हरेज म्हणतात.
आपण असेही म्हणू शकतो की नियम आणि अटीं शिवाय एका लिटर पेट्रोल किंवा डिझेल मध्ये गाडी किती अंतर पार करते त्याला एव्हरेज म्हणतात. यामध्ये कोणत्याही नियम आणि अटी नसतात जसे रस्ता प्लेन किंवा सरळ असणे आवश्यक नसते, जेव्हा एखादी नवीन गाडी विकत घेतल्या जाते तेव्हा त्या गाडीला शहरातून असलेल्या रस्त्यावर प्रति युनिट इंधनाने जेवढी चालेल त्याला त्या गाडीचा एव्हरेज म्हटल्या जात.
तर या लेखातून आपल्याला समजलं असेल की एव्हरेज आणि मायलेज कश्या प्रकारे वेगवेगळे आहेत, आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!