AC vs DC Current
विजेचा शोध लागण्या पूर्वी सगळीकडे कंदिलांचा, किंवा दिव्यांचा वापर केला जात असे, पण आता सर्वांच्या घरात इलेक्ट्रिसिटी चा वापर होतो, लाईट जर पाच मिनिटांसाठी गेली ना, तर करमत नाही!
माझ्या मते तर मायकेल फॅरेडे (Michael Faraday) यांनी विजेचा शोध लावला नसता तर काय झाले असते? पण या विजेच्या शोधानंतर मनुष्य भयंकर प्रमाणात विजेवर अवलंबून झालेला आहे. आजच्या काळात बाजारात विजेवर चालणारे सगळेच उपकरणे उपलब्ध आहेत, पण आपल्याला माहिती आहे का? या वीज उपकरणात जो करंट येतो त्या मध्ये सुध्दा वेगवेगळे प्रकार असतात.
आपल्या घरात जो करंट येतो तो कोणत्या प्रकारचा आहे? किंवा करंट चे किती आणि कोणकोणते प्रकार आहेत? माहिती नसेल तर काळजी करू नका या लेखात आम्ही आपल्यासाठी करंट चे प्रकार कोणते आहेत आणि त्यांच्या मध्ये काय फरक असतो ह्या विषयी माहिती पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडणार. तर चला पाहूया AC आणि DC करंट मध्ये कोणता फरक असतो.
जाणून AC आणि DC करंट मधील फरक – Difference Between AC and DC Current in Marathi Language
सुरुवातीला आपण AC आणि DC या दोन्ही करंट चा Full Form काय आहे ते पाहूया.
- AC current full form: Alternet Current.
- DC current full form: Direct Current.
यानंतर आपण यांना यांच्या व्याख्यांमधून समजून घेऊया कि AC आणि DC करंट म्हणजे नेमकं काय?
AC करंट म्हणजे नेमकं काय – What is AC Current?
AC करंट म्हणजे करंट चा असा प्रकार जो काही वेळानंतर दिशा (Direction) आणि करंट चे प्रमाण (Values) बदलतो. या करंट ला आपण AC करंट म्हणतो. आपल्या माहिती साठी Alternate करंट च्या साहाय्याने आपण मोठ्या प्रमाणात विजेचे निर्माण करू शकतो. जवळपास ३०,००० ते ३३,००० Volt विजेची निर्मिती Alternate करंट च्या साहाय्याने केली जाऊ शकते.
या करंटला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरीत्या घेऊन जाता येते. सोबतच या करंट ला ट्रांसफार्मर च्या सहाय्याने आपण कमी जास्त करू शकतो. म्हणजेच आवश्यकतेनुसार कमी जास्त करता येण्यामुळे या करंट चा वापर घरातील पंखे, मोटर, कपडे धुण्याची मशीन, फ्रीज इत्यादी उपकरणांसाठी केला जातो.
DC करंट म्हणजे नेमकं काय – What is DC Current?
DC करंट हा AC करंट च्या बिलकुल विरुद्ध काम करतो असेही म्हणायला काही हरकत नाही, DC करंट म्हणजे करंट चा असा प्रकार जो काही वेळानंतर आपली दिशा (Direction) आणि करंट चे प्रमाण (Value) बदलत नाही. त्या करंट ला आपण DC करंट म्हणू शकतो. आपल्या आजूबाजूला बहुतेक ठिकाणी AC करंट चा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे.
पण काही गोष्टी अश्याही आहेत, जेथे AC करंट चा वापर करू शकत नाही. आपल्याला एखादी बॅटरी चार्जिंग करून ठेवायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला DC करंट चा वापर करावा लागेल. त्यांनंतर DC करंट चा वापर इलेक्ट्रोप्लेटिंग सारख्या कामांसाठी केला जातो. घरातील टेलिव्हिजन, मोबाईल, यांचा वापर करण्यासाठी आपल्याला DC करंट ची मदत घ्यावी लागते.
वरील लेखात थोडक्यात आपण विजेच्या दोन प्रकारांना पाहिले, आशा करतो आपल्याला वरील लिहिलेली माहिती आवडली असेल आपल्याला लिहिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!