Dhirubhai Ambani in Marathi
धीरजलाल हिरालाल अंबानी हे नाव आपल्या परिचयाचे आहे नं ? बरं ते जाऊ द्या, ते नाव सांगतो ज्या नावाने ते केवळ भारतातच नव्हें तर संपुर्ण विश्वात ओळखले जातात. ‘‘धिरूभाई अंबानी’’ बिजनेस जगतातील बेताज बादशाह !
धिरूभाई अंबानींचे नाव अश्या व्यावसायिकांमध्ये समाविश्ट आहे ज्यांनी काही स्वप्नं बघितली आणि स्वबळावर त्या स्वप्नांना सत्यात उतरवत संपुर्ण जगासमोर आदर्श स्थापीत केला की जर स्वतःवर विश्वास असेल तर निश्चितच यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं.
धिरूभाईंचा विश्वास होता. . .
‘‘जे स्वप्नं पाहाण्याची हिम्मत ठेवतात ते अवघ्या विश्वावर राज्य करू शकतात’’.
धिरूभाई अंबानी आपल्या भारतातील असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी केवळ व्यावसायिक क्षेत्रात स्वतःचे नाव केले असे नव्हे तर अवघ्या भारताला उद्योग क्षेत्रात नवी ओळख निर्माण करून दिली. गरीब कुटूंबात जन्माला आलेल्या धिरूभाईंनी मोठा उद्योगपती होण्याचं स्वप्नं पाहिलं आणि आपल्या दृढसंकल्प आणि परिश्रमाच्या बळावर त्या स्वप्नाला सत्यात उतरवलं.
आज या लेखातुन मोठे उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या प्रेरणादायी जीवनाशी संबंधीत काही गोश्टी माहिती करून घेऊया.
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती धिरूभाई अंबानींचा जीवन परिचय – Dhirubhai Ambani Information in Marathi
धिरूभाई अंबानींच्या जीवनावर थोडक्यात – Dhirubhai Ambani Biography
पुर्ण नाव (Name): | धीरजलाल हिरालाल अंबानी |
जन्म (Birthday): | 28 डिसेंबर 1932, चोरवाड़, गुजरात |
वडिल (Father Name): | श्री हिराचंद गोवर्धनभाई अंबानी |
आई (Mother Name): | श्रीमति जमनाबेनजी |
भाऊ (Brother): | रमणिकलाल अंबानी, नटवरलाल |
बहिण (Sister): | त्रिलोचना बेन, जसुमतिबेन |
पत्नी (Wife): | श्रीमती कोकिलाबेनजी |
मुलं (Children Name) : | मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीता कोठारी, दिप्ती साळगांवकर |
शिक्षण (Education): | मॅट्रिक पास |
मृत्यु (Death): | 06 जुलै 2002, मुंबई भारत |
पुरस्कार (Awards): | 2016 साली पद्मविभुषण ( मरणोत्तर) |
धीरूभाई अंबानींचा जन्म, प्रारंभिक जीवन आणि शिक्षण – Dhirubhai Ambani History
गुजरात मधील जुनागढ़ जवळ चोरवाड़ या छोटयाश्या गावी एका सामान्य शिक्षकाच्या घरात 28 डिसेंबर 1932 ला धिरूभाईंचा जन्म झाला.
धिरूभाईंची आई जमनाबेन एक सामान्य गृहीणी होती तर वडिल गोवर्धनभाई अंबानी एक सामान्य शिक्षक होते. इतक्या मोठया कुटंुबाचे पालन पोशण करणे त्यांच्या करीता बरेच आव्हानात्मक होते. मिळणाऱ्या उत्पन्नातुन परिवाराचा
घरखर्च सांभाळणेच त्यांच्या करता कठीण होते अश्यात चार बहिण-भावंडांमध्ये धिरूभाईंचे शिक्षण होणे फार कठिण होते.
अश्या परिस्थीतीत धिरूभाई अंबानी यांना आपले शालेय शिक्षण अर्धवट सोडुन आपल्या कौटुंबिक जवाबदारीकरता वडिलांसमवेत भजे आणि इतर लहान-सहान गोश्टी विकण्याकरता धडपड करावी लागली.
धिरूभाई अंबानींचा विवाह आणि वैय्यक्तिक जिवन – Dhirubhai Ambani Marriage
धिरूभाईंनी गुजरात येथील कोकिलाबेन यांच्याशी विवाह केला त्यांच्या अपत्यांची नावं मुकेश अंबानी, अनिल अंबानी आणि दोन कन्या नीना कोठारी आणि दिप्ती साळगांवकर अशी आहेत.
व्यवसायात आलेल्या अपयशानंतर नौकरीची सुरूवात – Dhirubhai Ambani Career
धिरूभाई अंबानींनी आपल्या कुटूंबाचा आधार होत सुरूवातीला फळं आणि नाश्ता विक्री करण्यास सुरूवात केली. परंतु यात त्यांना हवा तसा फायदा झाला नाही.
त्यानंतर गावानजिक असलेल्या धार्मिक आणि पर्यटन स्थळावर पकोडे विकण्यास सुरूवात केली परंतु हे काम देखील तेथे येणाÚया भाविकांवर आणि पर्यटकांवर अवलंबुन होते त्यामुळे ते संपुर्ण वर्शभर करता येईल असे काम नव्हते.
अखेरीस नाईलाजास्तव त्यांना हे काम बंद करून वडिलांच्या सल्ल्यानुसार एका ठिकाणी नौकरी पत्करावी लागली.
नौकरी सांभाळुन गिरवीले व्यवसायाचे धडे आणि केला व्यवसाय:
अनेक अपयशानंतर धिरूभाई अंबानींनी आपल्या मोठया भावाच्या मदतीने यमन येथे नौकरी करण्याचा निर्णय घेतला.
शेल कंपनीच्या पेट्रोल पंपावर त्यांची नौकरी सुरू झाली जवळजवळ 2 वर्श नौकरी केल्यानंतर आपल्या कार्यकुशलतेच्या आणि योग्यतेच्या जोरावर ते मॅनेजर पदापर्यंत पोहोचले.
नौकरी करत असतांना देखील धिरूभाई नेहमी व्यवसायाच्या संधी शोधत राहायचे. अगदी सुरूवातीपासुनच ते व्यवसायाची कुठलीही संधी हातातुन गमावु इच्छित नव्हते. त्यांच्या याच ध्येयामुळेच ते जगातील सर्वात यशस्वी उद्योगपतींमधील एक ठरले.
धिरूभाई अंबानींना व्यवसाय करण्याची केवढी तिव्र ईच्छा होती याचा अंदाज एका छोटयाश्या उदाहरणावरून आपल्याला येईल
ज्यावेळी ते अवघ्या 300 रूपये प्रति माह या मासिक उत्पन्नावर शेल कंपनीच्या पेट्रोल पंपावर नौकरी करीत होते. त्या दरम्यान तेथील कर्मचाÚयांना अवघ्या 25 पैशात चहा मिळत असे परंतु धिरूभाई हा चहा न घेता ज्या ठिकाणी 1 रूपयात चहा मिळत असे त्या मोठया रेस्टाॅरंट मध्ये जाऊन चहा घेत असत.
धिरूभाईंच असं करण्यामागे खास कारण होतं, अश्या मोठया रेस्टाॅरंट मध्ये जाऊन तिथे आलेल्या मोठमोठया व्यावसायिकांच्या गोश्टी त्यांच्या कानावर पडत असत धिरूभाई ते बारकाईने ऐकत आणि व्यवसायातील बारकावे लक्षात घेण्याचा प्रयत्न करीत असत.े धिरूभाईंनी आपलं बिजनेसमॅन होण्याचं स्वप्नं पुर्ण करण्याकरताअश्या तऱ्हेने बिजनेस मॅनेजमेंट चे शिक्षण घेतले.
या व्यतिरीक्त धिरूभाईंच्या आत एक यशस्वी उद्योजक होण्याचे गुण मोठया प्रमाणात अस्तित्वात होते याचा अंदाज यावरून देखील येऊ शकेल की धिरूभाई यमन येथे प्रचलित चांदीची नाणी लंडन येथील एका कंपनीत वितळवीत असत कारण त्यांच्या लक्षात आले होते की चांदीच्या नाण्यांपेक्षा मिळणाऱ्या चांदिचे मुल्य अधिक आहे.
जोवर यमन सरकारला या गोश्टीची माहिती मिळाली तोपर्यंत तर धिरूभाई अंबानींनी भरपुर कमाई केली केली होती.
धिरूभाई अंबानींच्या जीवनातील उतार-चढाव – Dhirubhai Ambani chi Mahiti
आपल्या जीवनातील अनेक चढ-उतार आणि कठिण अश्या संघर्शांना पार करत धिरूभाईंनी आपल्या जीवनात व्यवसायातील ही उंची प्राप्त केली होती.
धिरूभाई अंबानी ज्यासुमारास यमन येथे नौकरी करीत होते त्यावेळी यमनच्या स्वातंत्र्याकरता आंदोलनांनी पेट घेतला होता. परिस्थीती एवढी बिकट झाली होती की यमन येथे नौकरी करीत असलेल्या भारतियांना आपले काम सोडावे लागले. अश्यात धिरूभाईंना नौकरी सोडुन भारतात परतावे लागले.
उद्योगपती होण्याचं स्वप्न उरी बाळगलेल्या धिरूभाईंनी त्यावेळी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पण कोणत्याही व्यवसायाची सुरूवात करण्याकरता चांगल्या भांडवलाची आवश्यकता होती आणि धिरूभाईंजवळ व्यवसाय सुरू करण्याकरता त्यावेळी पैश्यांची तरतुद नव्हती.
पुढे त्यांनी आपला भाऊ त्र्यंबकलाल दामाणी यांच्या समवेत पाॅलिस्टर धागे आणि मसाल्यांच्या आयात-निर्यातीचा व्यापार सुरू केला.
धिरूभाई अंबानींच्या औद्योगिक प्रवासाची सुरूवात:
आपण कधी विचार करू शकतो का की एक भजे पकोडे विकणारा मोठा उद्योजक होऊ शकतो म्हणुन? पण हो धिरूभाई अंबानींनी आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीला गिरनार पर्वतावर येणाÚया भाविकांकरीता भजे आणि पकोडे विकले होते.
त्याआधी फळ आणि नाश्ता विक्रीचा व्यवसाय देखील त्यांनी केला पण त्यात त्यांना पुरेसा नफा न मिळाल्याने गिरनार पर्वत हे भाविकांकरीता आणि पर्यटकांकरीता चांगले ठिकाण असल्यामुळे येथे व्यवसाय चांगला चालेल या विचाराने त्या ठिकाणी भजे आणि पकोडे विकण्यास सुरूवात केली.
परंतु हा व्यवसाय पुर्णतः पर्यटकांवर अवलंबुन असल्याने विशिश्ट काळातच चालत असे इतर वेळी त्यात चांगला फायदा मिळत नसल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय बंद केला.
या व्यवसायांमध्ये यश न मिळाल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना नौकरी करण्याचा सल्ला दिला आणि धिरूभाई नौकरीकरता यमन येथे निघुन गेले त्यावेळी त्यांच वय अवघं 16 वर्शांचं होतं.
धिरूभाईंची पहिली नौकरी एडेन शहरात ‘A. Besse’ नामक कंपनीत केवळ 300 रूपये प्रति माह पगारावर सुरू झाली होती. 2 वर्शात ‘A. Besse’ कंपनी ‘Shell Products’ ची डिस्ट्रीब्युटर झाली आणि धिरूभाई प्रमोशन झाले. ते त्या कंपनीत फिलिंग स्अेशन चे मॅनेजर बनले.
रिलायंस कंपनीची सुरूवात – Reliance Group of Companies
यमन येथे नौकरी सुरू असतांना तेथे तेथील स्वातंत्र्यप्राप्तीकरता आंदालनाने उग्र रूप धारण केले होते त्यामुळे भारतियांना यमन येथील नौकऱ्या सोडुन भारतात परतावे लागत होते अश्यात धिरूभाई देखील तिथल्या चिघळलेल्या आंदोलनामुळे 1962 ला भारतात परतले.
हा तो काळ होता ज्यावेळी धिरूभाई अंबानींनजवळ नौकरी देखील नव्हती आणि व्यवसायाकरता भांडवल देखील नव्हते. अश्यात त्यांनी आपला भाऊ चंपकलाल दमाणींसोबत मिळुन पाॅलिस्टर धागे आणि मसाल्यांच्या आयात निर्यातीचा व्यवसाय सुरू केला.
केवळ 15000 रूपयांमध्ये धिरूभाईंनी मस्जिद बंदरच्या नरसिम्हा स्ट्रीटवर रिलायंस कमर्शियल काॅर्पोरेशन ची सुरूवात केली. आणि येथुनच रिलायंस कंपनीचा उदय झाला. त्यावेळी धिरूभाई अंबानी आणि त्यांचा परिवार भुलेश्वर येथील जय हिंद इस्टेट मधल्या एका लहानश्या अपार्टमेंटमध्ये राहात होते.
सुरूवातीला धिरूभाई अंबानींची इच्छा पाॅलिस्टर यार्न आयात करणे आणि मसाल्यांची निर्यात करणे ही होती.
रिलायंस काॅर्पोरेशन चे पहिले आॅफीस नर्सिनाथन स्ट्रीट येथे सुरू झाले होते. हे आॅफिस म्हणजे केवळ 350
ेस्क्वेअर फिट ची एक लहान रूम होती ज्यात फक्त एक टेबल, 3 खुच्र्या होत्या. सुरूवातीला त्यांच्याजवळ केवळ दोन सहकर्मचारी होते जे त्यांच्या कामात त्यांना मदत करीत असत.
तसं पाहाता धिरूभाई अंबानी आणि चंपकलाल दमानी यांचा स्वभाव आणि व्यवसाय करण्याची पध्दत अगदीच भिन्न होते आणि यामुळेच धिरूभाई अंबानी यांनी 1965 ला चंपकलाल दमाणी यांच्या समवेतची आपली भागिदारी संपुश्टात आणली. आणि स्वबळावर स्वतःच्या व्यवसायाची सुरूवात केली.
खरंतर चंपकलाल दमाणींच्या व्यवसाय करण्याच्या पध्दतीत एक सावधानता आणि सतर्कता होती. सुत बनविण्याकरता जो कच्चा माल लागतो त्या व्यवसायात त्यांना अजिबात रूची नव्हती आणि या विपरीत धिरूभाई अंबानींना व्यवसायात जोखीम पत्करणारा व्यापारी म्हणुन ओळखले जायचे. पुढे धिरूभाईंनी सुत व्यवसायात उतरून सकारात्मक दिशेने पाऊलं उचलली.
आपल्याजवळ असलेल्या मालाची किंमत वाढण्याची शक्यता असल्याची धिरूभाईंना आधीपासुन अपेक्षा होती आणि त्यामुळे त्यात त्यांना जो फायदा झाला त्यामुळे त्यांच्या व्यवसायाची चांगलीच वाढ होत गेली.
धिरूभाई अंबानींनी केली रिलायंस टेक्सटाईल्स ला सुरूवात – Dhirubhai Ambani launches Reliance Textiles
हळुहळु कापड व्यवसायात धिरूभाईंचा चांगलाच जम बसु लागला होता. त्यात चांगल्या संधी मिळाल्याने 1966 च्या दरम्यान त्यांनी अहमदाबाद मधील नैरोड़ा येथे एका कापड मिल ची स्थापना केली. याठिकाणी कापड बनवितांना पाॅलिस्टर धाग्यांचा वापर होऊ लागला. या ब्रांड चे धिरूभाईंनी ‘विमल’ असे नामकरण केले.
‘विमल’ हे नाव धिरूभाईंचे मोठे बंधु रमणिकलाल अंबानींच्या मोठया मुलाच्या नावावरून (विमल अंबानी) ठेवण्यात आले होते. या ब्रांड चा प्रचार-प्रसार फार मोठया प्रमाणात करण्यात आला आणि हळुहळु विमल ब्रांड भारतातील लहान मोठया सगळया जागी, घरोघरी प्रसिध्द झाला.
1975 मध्ये विश्व बॅंकेच्या टेक्नीशियन टिम ने रिलायंस टेक्सटाईल्स कंपनीचा निरीक्षण दौरा केला आणि विकसीत देशांच्या मानांकनापेक्षा देखील ही कंपनी चांगली असल्याचे सांगितले.
1980 च्या दशकात धिरूभाई अंबानींनी सरकारकडुन पाॅलिस्टर फिलामेंट यार्न निर्मीतीचे लायसन मिळविले. पुढे धिरूभाई यशाची एकएक पायरी चढत गेले, आणि त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या व्यवसायात कधीही मागे वळुन पाहिले नाही.
रिलायंस आणि स्टाॅक मार्केट – Reliance Industries Share
भारतात इक्विटी कल्ट सुरू करण्याचे श्रेय देखील धिरूभाई अंबानींना जाते. 1977 ला ज्यावेळी रिलायंस ने आईपीओ प्रसारीत केले त्यावेळी 58,000 पेक्षा अधिक भागधारकांनी त्यात गुंतवणुक केली. धिरूभाई गुजरात आणि दुसऱ्या राज्यातील ग्रामीण जनतेचा विश्वास संपादन करण्यात देखील यशस्वी ठरले. जो त्यांच्या कंपनीत गुंतवणुक करेल त्याला त्याचा चांगला फायदा होईल हा भरोसा जनसामान्यांमध्ये रूजवण्यात त्यांना यश मिळाले.
धिरूभाई अंबानींनी रिलायंस इंडस्ट्री चा विस्तार केला – Reliance Industries Expansion
आपल्या आयुश्यात धिरूभाईंनी रिलायंस चा विस्तार अनेक क्षेत्रामंध्ये केला. यात प्रामुख्याने पेट्रोरसायन, दूरसंचार, सूचना प्रौदयोगिकी, ऊर्जा, विज, कापड/टेक्सटाईल, मुलभुत सुविधा सेवा, शेअर मार्केट, आणि प्रचालन-तंत्र यांचा समावेश आहे.
आज धिरूभाई अंबानींचे दोन्ही मुलं मिळालेल्या संधीचा उपयोग करीत रिलायंस इंडस्ट्रीला आणखीन पुढे घेऊन जात आहेत.
तुम्हाला हे वाचुन आश्चर्य वाटेल की आज रिलायंस चा दिसत असलेला वटवृक्ष अगदी थोडया गुंतवणुकीत सुरू झाला होता.
एका छोटया खोलीत सुरू झालेल्या रिलायंस कंपनीत साल 2012 पर्यंत जवळजवळ 85 हजार कर्मचारी कार्यरत होते. केंद्र सरकारला मिळत असलेल्या एकुण करात 5 टक्के कर केवळ रिलायंस कडुन प्राप्त होत होता आणि 2012 या वर्शानुसार संपुर्ण जगातील सर्वात श्रीमंत अश्या 500 मोठया कंपन्यांमध्ये रिलायंस ला देखील समाविश्ट करण्यात आले होते.
या व्यतिरीक्त एशियातील मोठया व्यावसायिकांच्या यादीत धिरूभाईंचे नाव देखील समाविश्ट आहे.
अनेक आरोपांचा देखील करावा लागला सामना – Dhirubhai Ambani also caught many accusations
या उंचीवर पोहोचतांना धिरूभाईंना अनेक आरोप-प्रत्यारोपांना देखील सामोरे जावे लागले. मुल्यांमधील फेरबदल आणि अनैतिक मार्गांचा अवलंब केल्याचा देखील आरोप त्यांच्यावर लागला, एवढेच नाही तर आपल्या गरजेनुसार सरकारी धोरणांमध्ये बदल केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला.
आपल्या व्यवसायातील प्रतिस्पध्र्यांना सरकारी धोरणांचा आधार घेत मात दिल्याचा देखील त्यांच्यावर आरोप होता. परंतु धिरूभाईंवर या आरोपांचा कोणताही परिणाम झाला नाही. ते आपल्या मार्गाने पुढे जात राहीले.
धिरूभाई अंबानींचा मृत्यु – Dhirubhai Ambani Death
महान उद्योगपती धिरूभाई अंबानींना 24 जुन 2002 ला हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रिच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांनतर मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि 6 जुलै 2002 रोजी भारतातील या थोर व्यक्तिमत्वाने अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचा व्यवसाय त्यांचा थोरला मुलगा मुकेश अंबानी यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळला आणि इतकेच नव्हें तर आज भारतातील सर्वात श्रीमंत आणि विश्वातील यशस्वी उद्योजकांच्या यादीत त्यांचे नाव आहे.
धिरूभाई अंबानींचा झालेला गौरव आणि प्राप्त पुरस्कार – Dhirubhai Ambani Awards
- 1998 साली धिरूभाई अंबानींना पेनसिल्वेनिया युनिव्हर्सिटी तर्फे ‘‘व्हार्टन डीन मेडल’’ देण्यात आले.
- 1996, 1998, आणि 2000 मध्ये एशिया विक या पत्रिकेने ‘पाॅवर 50-मोस्ट पावरफुल पीपल इन एशिया’ यादीत धिरूभाईंचे नाव समाविश्ट केले होते.
- 1999 ला धिरूभाईंना बिजनेस इंडिया-बिजनेस मैन ऑफ द ईयर सन्मानाने गौरविण्यात आले.
- 2000 मध्ये भारतातील केमिकल उद्योगाच्या विकासात महत्वपुर्ण योगदान दिल्यामुळे ‘केमटेक फाउंडेशन अण्ड केमीकल इंजिनियरींग वल्र्ड’ तर्फे ‘मैन ऑफ द सेंचुरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 2000 साली ‘इकाॅनाॅमिक टाईम्स अवाॅर्डस् फाॅर काॅर्पोरेट एक्सीलंस’ यांच्या वतीने ‘लाईफटाईम अचीवमेंट अवाॅर्ड’ ने त्यांचा गौरव करण्यात आला.
- 2011 या वर्शी एशियन बिज़नेस लिडरशिप फोरम अवाॅर्डस् तर्फे ‘एबीएलएफ ग्लोबल एशियन अवाॅर्ड’ हा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला.
- 2000 साली धिरूभाईंना फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ काॅमर्स अड इंडस्ट्री (फिक्की) व्दारे ‘मॅन ऑफ 20जी सेंचुरी’ म्हणुन घोशित करण्यात आले.
- व्यापार आणि उद्योगातील त्यांच्या महत्वपुर्ण योगदानाकरीता 2016 साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरीकाच्या रूपात ‘पद्मविभुषण’ या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.
धिरूभाई अंबानींनी ज्या प्रमाणे अनेक संघर्शांचा सामना करीत आपल्या जिवनात अभुतपुर्व यश प्राप्त केले आणि इतरांकरीता एक आदर्श निर्माण केला तो खरोखर वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल. त्यांचं कार्य पाहाता प्रत्येकाने त्यांच्याकडुन प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.
‘‘स्वप्नं कायम मोठी पहायला हवीत, समर्पणाला पर्याय नाही आणि प्रयत्न नेहमी महान असायला हवेत’’.
अश्या तऱ्हेने व्यावसायिक जगतातील बेताज बादशहा धिरूभाई अंबानींनी रिलायंस इंडस्ट्रीची स्थापना करून केवळ यश संपादन केले असे नाही तर अखिल विश्वासमोर एक उदाहरण कायम केले. . .
लक्ष्य दया: तुमच्या जवळ धिरूभाई अंबानीं बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्