Daulatabad Fort Information in Marathi
महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांची भूमी. येथे अनेक प्रसिद्ध किल्ले पाहायला मिळतात. उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रात सुमारे ३०० पेक्षा जास्त किल्ले आहेत. यांमध्ये अजिंक्यतारा, शिवनेरी, पन्हाळगड, रामशेज गड आणि इतर किल्ल्यांचा समावेश होतो.
याच प्रसिद्ध किल्ल्यांमध्ये आणखी एक नाव म्हणजे दौलताबादचा किल्ला. याला देवगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखतात. औरंगाबाद जिल्ह्यात असणारा हा किल्ला इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. चला तर पाहू या दौलताबाद किल्ल्याची माहिती –
इतिहासाचा साक्षीदार असलेला दौलताबादचा किल्ला – Daulatabad Fort Information in Marathi
दौलताबाद किल्ल्याचा इतिहास – Daulatabad Fort History in Marathi
दौलताबादचा किल्ला यादव साम्राज्यातील महान राजे राजा भिल्लामराज यांनी हा ११८७ साली बांधल्याचे समजते. तेव्हा त्याचे नाव देवगिरी असे होते. १३२७ साली मुहम्मद बिन तुघलक याने आपली दिल्लीची राजधानी देवगिरी येथे हलविली आणि देवगिरीचे नाव दौलताबत असे बदलण्यात आले.
दौलताबाद किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे – Places to see on Daulatabad Fort
किल्ल्याची बांधणी भक्कम असून त्याला तीन पदरी सुरक्षात्मक घेरा आहे. या घेऱ्याला कोट असे म्हणतात. ज्यामध्ये कालाकोट, महाकोट आणि अंबरकोट यांचा समावेश आहे.
किल्ल्याचे प्रवेशद्वार भव्य असून त्यावर मोठ अनिदार खिळे पाहायला मिळतात. हत्तींनी दरवाज्याला धडाका मारून तोडू नये, यासाठी लढवलेली ही शक्कल. किल्ल्यावर आपल्याला वेगवेगळ्या तोफा बघायला मिळतात. ज्यामध्ये मेंढा तोफ खूप प्रसिद्ध आहे. ही तोफ म्हणजे भारतातील दुसरी सर्वात मोठी तोफ मानली जाते. मेंढीच्या आकाराचे तोंड असल्याने तिला मेंढा तोफ संबोधल्या जाते.
अल्लाउद्दिन बहमनी याने १४३५ साली हा किल्ला ताब्यात घेतला. आपल्या या विजयाची निशाणी म्हणून त्याने किल्ल्यावर चांद मिनार बांधले होते. हे मिनार अजूनही शाबूत आहे.
किल्ल्यावर चीनी महाल आहे. चीनी महाल म्हणजे औरंगजेबाचा कैदखाना. अतिशय मजबूत अशी ही इमारत सध्यस्थितीत मात्र काही प्रमाणात ढासळलेली दिसते.
दौलताबादची वास्तुकला – Daulatabad Fort Architecture
वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे दौलताबादचा किल्ला. गडाच्या भिंतींपासून ते प्रवेशद्वार आणि तोफखाना या सर्वांवर आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळते. किल्ल्यावरील बुरुज आणि चांद मिनार हे देखील त्याकाळातील वास्तुकलेच्या सौंदर्याचे दर्शन घडवितात.
दौलताबाद जवळपासची प्रसिद्ध ठिकाणे : Near places to visit
१. बीबी का मकबरा, औरंगाबाद
२. अजंठा आणि एल्लोरा लेणी
३. घृष्णेश्वर महादेव मंदिर
दौलताबादला कसे जाल – How to reach Daulatabad Fort
औरंगाबाद पर्यंत बस, रेल्वे किंवा हवाई मार्गाने पोहोचल्या नंतर, येथून दौलाताबादसाठी बस, खाजगी वाहने उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून सुमारे १६ किमी च्या अंतरावर दौलताबाद किल्ला आहे.
दौलताबाद किल्ल्या सुरु असण्याची वेळ – Daulatabad Fort Timings
हा किल्ला सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत. पर्यटकांसाठी खुला असतो. तसेच किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला काही प्रवेश शुल्क भरावा लागतो.
दौलताबाद किल्ल्याबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Questions about Daulatabad Fort
उत्तर: देवगिरी.
उत्तर: यादव साम्राज्यातील महान राजे राजा भिल्लमराज.
उत्तर: औरंगाबाद.
उत्तर: सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
उत्तर: मुहम्मद बिन तुघलक.