Dattatreya Aarti
नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून भगवान दत्त यांना प्रसन्न करण्यासाठी पठन केल्या जाणाऱ्या आरतीचे लिखाण करणार आहोत. तसेच प्रभू दत्त यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देखील जाणून घेणार आहोत.
दत्त मार्गीय बांधव प्रभू दत्त यांची नियमित पूजा अर्चना करून त्यांची नियमित आरती करत असतात.
श्री दत्ताची आरती – Dattachi Aarti
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा।
नेति नेति शब्द नये अनुमाना। सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।। १ ।।
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव ।।धृ ।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त। अभाग्यासी कैची कळेल हे मात।
पराही परतली तेथे कैचा हा हेत । जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। जय ।। २ ।।
दत्त येउनिया उभा ठाकला भावे सांष्टागेसी प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। जय ।। ३ ।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हारपले मन झाले उन्मन ।
मी तू झाली बोळवण। एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ।। जय देव ।। ४ ।।
प्रभू दत्तात्रय कथा – Dattatreya Story
प्रभू दत्त यांच्या जन्माबद्दल ठराविक पुरावा नसला तरी त्यांच्या जन्माबद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत.
हिंदू धार्मिक पौराणिक कथेनुसार प्रभू दत्त आणि त्यांचे बंधू सोम आणि दुर्वास हे भगवान विष्णू, ब्रह्मा आणि महेश यांचे अवतार आहेत अशी लोकांची धारणा आहे.
मुळातच विष्णूचा अवतार असणारे प्रभू दत्त यांनी उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णू, आणि महेश या त्रीमुर्तीच्या रुपात स्वत:ला सामावून घेतल आहे.
या त्रीमुर्तींचा उल्लेख मल्लिनाथ, बाण, कालिदास आणि शुद्र्काने केला आहे.
भगवान दत्त यांना योगसिद्धी प्राप्त करणारे देवता मानले जाते.
भगवान दत्त त्रीदेवांचे अवतार असल्याचे मार्कंडेय पुराणातील सतराव्या आणि अठराव्या अध्यायात प्रभू दत्त यांच्या अवताराचा उल्लेख करण्यात आला आहे.
दत्त मार्गीय बांधव भगवान दत्त यांच्या नावाचा उल्लेख गुरुदेव असा करतात.
तसचं, दत्त यांच्या जन्माबद्दल पौराणिक कथा आहे की, अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्याकडे पुत्र प्राप्तीसाठी आराधना केली.
ब्रह्मा-विष्णू-महेश त्यांच्यावर प्रसन्न होवून त्यांना आपली इच्छा प्रकट करण्यास सांगितली.
तेव्हा त्यांनी त्या त्रीमुर्तीला नमस्कार करून विनंती केली की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याची देखील प्राप्ती व्हावी.
या त्रीमुर्तीच्या आशीर्वादाने अत्री ऋषीस दत्तात्रेय, सोम आणि दुर्वास नावाचे तीन पुत्र प्राप्त झाले आणि शुभात्रेयी नावाची एक कन्या प्राप्ती झाली.
अश्या प्रकारची पौराणिक कथा प्रचलित आहे.
तसचं, दत्त जयंतीनिमित्त भाविक आपल्या घरी पूजेचे आयोजन करीत असतात.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी भगवान दत्त यांचा जन्म झाला आहे अशी भाविकांची मान्यता आहे.
म्हणून दरवर्षी या मुहूर्तावर भाविक दत्त जयंती साजरी करीत असतात.
दत्त मार्गीय भाविक या दिवशी आपल्या घरी पूजेचे आयोजन करीत असतात.
दत्तांचा जन्म संध्याकाळी झाला असल्याने ही पूजा रात्रभर चालते.
पूजेच्या शेवटी आरती देखील म्हटली जाते. तसचं,पूजेच्या दुसऱ्या दिवशी प्रसादाचे आयोजन देखील करण्यात येते.
मित्रांनो, आरती म्हणजे केवळ आरती नसून देवाची केलेली एका प्रकारची स्तुती होय.
आरतीच्या रूपाने आपण भगवंताचे एका प्रकारे संपूर्ण वर्णन करीत असतो.