Anokhe Gav Anokhe Niyam
शीर्षक वाचल्यानंतर आपल्याला कळेनासं झालं असेल की अशी कोणती गोष्ट असेल जी केल्यामुळे सर्व गावाला मटणाची पार्टी द्यावी लागते, तर आपण योग्यच वाचलं आहे आपल्या देशात अनेक ठिकाणी काही अशा प्रथा आहेत ज्यामध्ये अश्या गोष्टींचा आपल्याला समावेश दिसतो. पण या गोष्टीमागे कोणत्याही प्रकारची रूढी किंवा परंपरा नसून हा या गावासाठी बनलेला एक नियम आहे, तर चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊया की असे कोणते कारण आहे की ज्यामुळे गावातील सर्व मंडळींना मटणाची पार्टी द्यावी लागते. तर चला पाहूया..
सावधान! मद्यपान कराल तर संपूर्ण गावाला दयावी लागेल पार्टी – Darubandi Sathi Anokhe Niyam
ही गोष्ट आहे गुजरातच्या बनासकाठा जिल्ह्यातील खाटीसीतारा गाव येथे एक वेगळाच नियम बनविण्यात आलेला आहे, या गावांमध्ये दारूबंदीसाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. कुठलीही व्यक्ती दारू पिताना आढळल्यास त्या व्यक्तीला गावातील सर्व लोकांना मटणाची पार्टी द्यावी लागते आणि सोबतच २००० रुपये दंड हि भरावा लागतो. गावामध्ये जर एखादी व्यक्ती दारू पिऊन गोंधळ करत असेल तर त्या व्यक्तीला ५००० रुपयांचा दंड भरावा लागतो.
आता आपण विचार करत असणार की असा नियम बनविण्याची काय आवश्यकता पडली, आपल्याला सांगू इच्छितो की हा नियम एवढ्यात सुरू केलेला नसून हा नियम २०१३-१४ मध्ये सुरू केला गेला आहे. या गावांमध्ये अगोदर मोठ्या प्रमाणात लोक मद्यपान करत होते. मद्यपान करून गावामध्ये गोंधळ करणे आणि भांडण करणे एवढेच नाही तर एकमेकांच्या जीवावर सुध्दा उठले होते, या परिस्थितीला पाहता येथील सर्व गावकऱ्यांनी मिळून या नियमांना येथे लागू केले आहे. सरपंच खिमजी दुंगीयसा यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना या सर्व नियमांचा उल्लेख केला होता.
या नियमांच अवलंबन केल्या पासून गावामधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे असेही सांगण्यात येत आहे, मद्यपान करण्याच्या आधी गावातील मंडळी हा विचार करतात की ७००- ८०० लोकांच्या जेवणाचा खर्च २० हजार रुपये आणि २००० रु. ते ५००० रुपये दंड भरण्यापेक्षा मद्यपान न केलेलं बर !
गावातील सरपंचानी वृत्तपत्राशी संवाद साधताना सांगितले की सुरुवातीला काही ३-४ लोक सापडलेच मग त्यांच्यासोबत या नियमांच काटेकोर पणे पालन करण्यात आले आणि तेव्हापासून गावामध्ये कोणीही मद्यपान करताना आढळले नाही. याच प्रकारे प्रत्येक ठिकाणी दारूबंदीसाठी असे नियम सरकार लागू करू शकते.
आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. आणि सोबतच असल्याचं नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!