Most Dangerous Countries for Tourists
पृथ्वीच्या पाठीवर जवळ जवळ १९० च्या वर देश उपस्थित आहेत. आणि प्रत्येक देश स्वतःच एक वेगळं अस्तित्व घेऊन राहत आहे, कोणी पैशाने जगातून मोठे तर काही लोकसंख्येने जगातुन मोठे, प्रत्येक देशाची आपली स्वतःची एक ओळख आहे. त्याच प्रमाणे काही असेही देश आहेत जे संपूर्ण जगातून खतरनाक आहेत, आजच्या या लेखात आपण असे १० देश पाहणार आहोत ज्या देशांना त्यांच्या परिस्थिती वरून आणि सुरक्षितते वरून त्यांचे आकलन करण्यात आले आहे. जेथे माणसांच्या जीवाच्या किमतीला काहीही अर्थ नाही तर चला जाणून घेऊया असे काही देश जे संपूर्ण जगातून खतरनाक मानले जातात.
विदेश यात्रा करत आहात सावधान हे आहेत जगातील खतरनाक देश – Dangerous Countries in World
अफगाणिस्तान – Afghanistan
अफगाणिस्तान हा देश आशिया खंडात येतो या देशाला या यादीमध्ये प्रथम स्थान मिळाले आहे. ह्या देशांमध्ये तालिबान आणि आतंकी संघटन असल्यामुळे या देशात खूप भीतीचे वातावरण आहे. आणि यामुळे या देशाला जगातून प्रथम क्रमांकाचा खतरनाक देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
सीरिया – Syria
आपल्या या खतरनाक देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सीरिया हा देश आहे, सीरियामध्ये सुध्दा आतंकी संघटन ISIS तसेच तेथील काही तुकड्यांच्या युद्धांमुळे या देशाचे बरेच हाल आहेत, आणि या कारणांमुळे या देशाचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
यमन – Yemen
यमन मध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा होते, सोबतच तेथेही काही आतंकी संघटन कार्यरत आहेत, आणि या देशामधील दैनंदिन वातावरण या गोष्टींमुळे खराब झालेलं आहे. ह्या देशातील जनता विविध प्रकारच्या बिमाऱ्यांनी त्रस्त आहे, आणि त्यामुळे या देशाची स्थिती सुध्दा गंभीर आहे, म्हणून या देशाला या यादीत तिसरा क्रमांक लागतो.
दक्षिण सुडान – South Sudan
दक्षिण सुडान ची स्थिती बाकी देशांसारखी नसली तरीही येथील राजनैतिक व्यवस्थित नाही, या देशात जातीविरोधी संघर्ष जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. सोबतच येथील येथे मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पाहायला मिळतो, यामुळे या देशाची स्थिती गंभीर मानली जाते. म्हणून या देशाचा या यादीमध्ये चौथा क्रमांक लागतो.
इराक – Iraq
खतरनाक देशांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे इराक, या देशाचं या यादीमध्ये नाव तेथील स्थितीमुळे आले आहे या देशात बरेचदा आतंकवादी आणि सैन्यात होत असलेल्या संघर्षामुळे तेथील परिस्थिती विचलित झालेली आहे आणि या काही छोट्या निवडक गोष्टींमुळे इराक ला या यादीत क्रमांक पाच वर ठेवल्या गेले आहे.
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक – Central African Republic
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशाला यादीत सहावा क्रमांक मिळाला आहे, जवळ जवळ सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशाची स्थिती यमन सारखी आहे, ज्याप्रमाणे यमन मध्ये सुध्दा तेथील काही जनता बिमाऱ्यांनी त्रस्त आहे, आणि तेथेही राजनैतिक वादविवाद आहेत, सोबतच तेथे गृहयुद्ध सारखी स्थितीही निर्माण होत असते ज्यामुळे त्या देशाचे हाल होत आहेत, या कारणांमुळे या देशाला यादीत सहाव स्थान देण्यात आले आहे.
सोमालिया – Somalia
सोमालिया हा देश या यादीत सातव्या क्रमांकावर आहे, सोमालिया या देशातील वातावरण हे थोडस चिघळले आहे,
येथील सैन्यात आणि आतंकवादी संघटना मध्ये नेहमी संघर्षाचे वातावरण निर्माण झालेल असते,
आणि या देशाची स्थिती या मुळे कमजोर होत आहे. म्हणून या देशाला या यादीत सातवा क्रमांक आहे.
लिबिया – Libya
लिबिया या यादीत आठव्या क्रमांकवर आहे, या देशामध्ये देशातील काही तुकड्यांमध्ये संघर्षाचे वातावरण पाहायला मिळते,
या देशामध्ये अपराधाला वाचा फोडणारे अनेक लोक पाहायला मिळतात त्यामुळे ह्या देशाची स्थिती खराब होताना दिसते आणि या देशाला यादीत आठवा क्रमांक मिळतो.
रिपब्लिक ऑफ काँगो – Republic of the Congo
रिपब्लिक ऑफ काँगो मध्ये नैसर्गिक आपत्ती तसेच बऱ्याच प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात,
येथे लँडमाईन सारख्या गोष्टींना सुध्दा सामोरे जावे लागते, या सर्व गोष्टींच्या एकत्रिकरणामुळे या देशाची स्थिती खराब होत चालली आहे.
आणि या यादीत हा देश नवव्या क्रमांकावर आहे.
रशिया – Russia
रशिया ह्या देशाला रुस सुध्दा म्हटलं जातं या देशाला या यादीत शेवटचा आणि दहावा क्रमांक मिळाला आहे,
या यादीत रशिया कसा हा विचार आपल्याला पडला असेल तर रशिया सुध्दा बऱ्याच काही गोष्टींना सामोरे जात आहे,
जसे की राजनीतीतील आतंकवाद आणि देशातील आंतरिक संघर्ष या गोष्टींशी झुंजत आहे.
यामुळे या देशाला या यादीत दहावा क्रमांक लाभला आहे.
तर आजच्या लेखात आपण पाहिले असे कोणते देश आहेत जे संपूर्ण जगातून खतरनाक आहेत आणि त्यांची आंतरिक स्थिती गंभीर आहे.
आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
सोबतच आणखी अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!