Crossing the Border to Go to School in the US
लहानपणी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या शाळेत गेला असेलच, मग ती शाळा कोणतीही असो गावातील किंवा गावापासून थोडीशी दूर, प्रत्येकाला आपल्या शाळेतील काही ना काही आठवणी तर लक्षात असतीलच, कि कशाप्रकारे आपले शिक्षक आपल्याला शिकवत आणि चुकले तर शिक्षा करत.
अश्याच बऱ्याच आठवणी आपल्याला माहिती असतील, पण आपल्याला शाळेत जाण्यासाठी एखाद्या देशाच्या सीमेत जाऊन शिकावे लागले नसेल, पण जगात असेही काही ठिकाणे आहेत जेथे लहान मुलांना आपल्या सीमेतून दुसऱ्या देशात जाऊन शिक्षण घ्यावे लागते,
तर आजच्या लेखात आपण या ठिकाणाविषयी माहिती पाहणार आहोत कि हे कोणते ठिकाण आहे, जेथे मुलांना शाळेत जाण्यासाठी सीमा पार करून जावे लागते. तर चला जाणून घेऊया…
बोर्डर पार करून जातात शाळेत, दप्तरात ठेवावा लागतो पासपोर्ट – Crossing the Border to Go to School in the US
पोर्तो पालोमास हे या गावचे नाव आहे, हे ठिकाण अमेरिकेच्या आणि मेक्सिकोच्या बोर्डर वर आहे, या गावातील मुलांचा जन्म जरीही अमिरिकेत झाला असेल तरी सुद्धा ते पोर्तो पालोमास या गावाचे आहेत, आणि हे ठिकाण मेक्सिको मध्ये येत, त्यामुळे या गावातून ज्यांना सुद्धा अमेरिकेमध्ये जायचे असते त्यांना पासपोर्ट दाखवून जावे लागते.
विना पासपोर्ट तेथील लोकांना अमेरिकेत जाण्याची परवानगी नाही आहे, सीमेवर गेल्यानंतर त्यांना सर्वप्रथम तेथील गार्ड पासपोर्ट विचारतात, आणि त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जातो.
शाळेच्या मुलांना सुद्धा ठेवावे लागते जवळ पासपोर्ट – Crossing Borders to get to School
येथील मुलांना शाळेची बॅग भरताना सर्वप्रथम त्यांच्या बॅगेत पासपोर्ट ठेवावा लागतो. त्या नंतर ते त्यांची पुस्तके ठेवतात, त्यांना सीमेपर्यंत सोडायला एक बस येते, त्यानंतर सिक्युरिटी गार्ड सर्व मुलांचे पासपोर्ट चेक करतो, आणि जे मुल आपले पासपोर्ट घरी विसरली असतील त्यांना तेथून परत घरी पाठविल्या जात.
पण असे खूप कमी वेळा झाल्याचे समजते. यानंतर बोर्डर च्या दुसऱ्या बाजूला त्यांना शाळेची बस घायला येते, ते त्या शाळेच्या बस मध्ये बसून त्यांच्या शाळेला जातात, आणि परत शाळा सुटल्यावर याच पद्धतीने परत वापस येतात.
ते ज्या शाळेत जातात त्या शाळेचे नाव कोलंबस एलीमेंट्री स्कूल असे आहे, याच शाळेच्या स्कूल बस त्यांना ने-आण करण्यासाठी असतात,
सीमेच्या पलीकडे मुले का जातात शिकण्यासाठी? – Why Childrens Crossing Borders to get to School
सुरुवातीला मला सुद्धा हा प्रश्न पडला होता कि या मुलांच्या गावाला शाळा नसेल म्हणून हे सीमेपलीकडे शिकण्यासाठी जातात, पण असे काहीही नाही त्यांच्या गावात सुद्धा शाळा आहे, मग आता आपण म्हणणार कि मग एवढ्या दूर सीमेपलीकडे हे मुल जातात तरी का शिकायला?
तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे, आपल्या माहिती साठी या मुलांच्या गावाला शाळा आहे पण समस्या अशी आहे कि त्या शाळेत स्पेनिश भाषा शिकविली जाते. कारण त्या मुलांचे गाव मेक्सिको मध्ये येते आणि मेक्सिको मध्ये स्पेनिश भाषेला जास्त प्राधान्य दिल्या जात.
तेच अमेरिकेमध्ये मुलांना इंग्रजी भाषेत शिकविल्या जात. आणि मेक्सिको च्या लोकांचे असे मानणे आहे कि स्पेनिश भाषे पेक्षा इंग्रजी भाषेमध्ये मुलांचे भविष्य चांगले आहे, आणि जर मुलांना इंग्रजी शाळेत पाठविले तर त्यांना इंग्रजी बोलता येईल, आणि त्यांचे भविष्य उज्वल होईल म्हणून मुलांचे आईवडील त्यांना सीमेपार अमेरिकेच्या शाळेत शिकायला पाठवतात.
तर अश्या प्रकारे त्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी सीमेच्या पलीकडे जावे लागते. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!