Cricket Information in Marathi
स्वास्थ्यपुर्ण आणि आनंदी जीवनाकरता सतत काही ना काही खेळत राहाणे फार आवश्यक आहे त्यातही बैठया खेळांपेक्षा मैदानी खेळांमुळे आपल्यातला उत्साह आणि आनंद फार काळ पर्यंत टिकुन राहु शकतो.
काही खेळ हे खेळण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद तो खेळ पाहाण्यात देखील मिळतो. आजच्या आधुनिक काळात तर विस्तारत गेलेल्या सोयी सुविधांमुळे आपल्या आवडत्या खेळांचे थेट प्रसारण घरबसल्या पाहाणे अत्यंत सोपे झाले आहे.
प्रत्येक देशाचा स्वतःचा असा एक राष्ट्रीय खेळ असतो त्या खेळाची सुरूवात त्या देशापासुन झालेली असते परंतु काही खेळ असेही आहेत की त्या खेळांची लोकप्रियता ही फक्त त्या देशापुरती मर्यादित न राहाता तो खेळ सर्वच देशांचा अत्यंत आवडता खेळ झाला आहे आणि अश्या खेळांमध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेला खेळ म्हणजे क्रिकेट!
क्रिकेट आवडणारे क्रिकेटप्रेमी आपल्याला सगळीकडेच आढळतात भारताबद्दलच बोलायचं झाल्यास क्रिकेट प्रती भारतियांचे प्रेम कुणापासुनही लपुन राहीलेले नाही. याच कारणांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांव्यतिरीक्त भारतिय प्रेक्षकांकरता रणजी आणि आयपीएल सारख्या मालिका देखील सुरू करण्यात आल्या.
क्रिकेट प्रेमींना ज्याप्रमाणे स्टम्प, बॅट, बाॅल, ओव्हर्स याबद्दल माहिती आहे त्याचप्रमाणे या खेळाच्या इतिहासाबद्दल सुध्दा माहिती असायला हवी.
क्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास – Cricket Information in Marathi
क्रिकेटचा इतिहास – Cricket History in Marathi
क्रिकेट या खेळाची सुरूवात 16 व्या शतकात इंग्रजांनी केली होती. क्रिकेट खेळायची सुरूवात इंग्लंड मधील ग्रामिण भागात सुरू झाली होती त्याठिकाणी दोन लहान मुलं हा खेळ पहिल्यांदा खेळले. पुढे कित्येक वर्ष हा खेळ लहान मुलंच खेळत होती त्यावेळी या खेळाचे कुठलेच नियम अस्तित्वात नव्हते.
17 व्या शतकात हा खेळ तरूण मंडळी देखील खेळायला लागली त्या वेळी क्रिकेट खेळण्याकरता ही मंडळी कृषी अवजारांचा उपयोग करीत असत कारण हा खेळ त्याकाळात जंगलांच्या आसपास अधिकतर शेतकरी किंवा जनावरं चरायला नेणारी मंडळी खेळत होती.
1611 या वर्षी दोन व्यक्तिंना चर्च ला जाण्याऐवेजी क्रिकेट खेळल्यामुळे अटक करण्यात आली आणि त्या वेळी ही घटना आणि हा खेळ प्रकाशात आला पुढे हा खेळ लोकांच्यात तर लोकप्रिय झालाच शिवाय सट्टाबाजारात आणि जुगार खेळणारयांच्यात देखील आकर्षणाचा विषय ठरला. 17 व्या शतकाच्या अखेरपर्यंत या खेळात जुगार आणि सट्टा मोठया प्रमाणात वाढला.
या सर्व घटनांमुळे प्रसारमाध्यमांचे देखील लक्ष या खेळावर केंद्रित झाले आणि त्यांनी देखील यावर बातम्या आणि इतर बाबी छापणे सुरू केले त्यामुळे या खेळाला प्रसिध्दी मिळत गेली. या दरम्यान जुगार आणि सट्टेखोरांनी मिळुन काउंटी क्रिकेट ची सुरूवात केली. हा खेळ तोवर सुध्दा केवळ इंग्लंड मधेच खेळला जात होता.
18 व्या शतकात मात्र हा खेळ जगातील इतर भागांमध्ये देखील पोहोचला. वेस्टइंडिज मध्ये या खेळाची सुरूवात कोलोनिस्टांनी केेली तर भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे नाविक स्वतःच्या मनोरंजनाकरता हा खेळ खेळत असत.
1788 पर्यंत हा खेळ आॅस्ट्रेलियात देखील पोहोचला कारण आॅस्ट्रेलिया सुध्दा ब्रिटीशांच्या गुलामगिरीतील एक देश होता.
काळाच्या ओघात न्युझीलंड आणि अफ्रिकेत हा खेळ खेळण्यास सुरूवात झाली या दरम्यान क्रिकेट मधे बदल देखील होत गेले.
पुर्वी क्रिकेट खेळतांना बॅट म्हणुन काहीही वापरले जायचे पण नंतर बॅट चे माप निश्चित करण्यात आले.
शिवाय पुर्वी एका ओव्हर मध्ये 8 बाॅल टाकले जायचे पण 1979 80 दरम्यान इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात 6 बाॅल टाकण्यात आले त्यानंतर अवघ्या विश्वात 6 बाॅल ची एक ओव्हर झाली.
क्रिकेट संबंधीत महत्वपुर्ण गोष्टी – Cricket Facts
टेस्ट क्रिकेट ची सुरूवात 1909 साली झाली त्यावेळी इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया हेच सदस्य होते पुढे भारत देखील सदस्य झाला आणि स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान व त्यानंतर श्रीलंका सदस्य झाले.
आयसीसी एकदिवसीय विश्वकप स्पर्धेची सुरूवात 1975 साली झाली.
आयसीसी ने 2000 साली टेस्ट चॅंपियनशिप आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चॅंपियनशिप ची सुरूवात केली होती. यात आॅस्ट्रेलिया 2007 पर्यंत क्रमांक एक वर राहिला.
क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे परंतु आजपर्यंत ते विश्वकप प्राप्त करू शकलेले नाहीत 2019 चा विश्वकप मात्र इंग्लंडने आपल्या नावावर केला.
सर्वात जास्त विश्वकप जिंकण्याचा बहुमान आॅस्ट्रेलियाच्या नावावर आहे यांनी आजपर्यंत 5 वेळा विश्वकप जिंकला आहे.
भारताने आतापर्यंत 2 वेळा विश्वकप जिंकला आहे.
आयसीसी ने 2007 साली क्रिकेटची टी20 मालिका सुरू केली ही मालिका सर्वात आधी भारताने जिंकली.
भारतातील क्रिकेट – India Cricket
क्रिकेट हा खेळ भारतात ब्रिटिशांनी आणला पण आज क्रिकेट चे चहाते सर्वात जास्त भारतात पहायला मिळतात. भारतात इंडियन प्रिमीयर लिग ची सुरूवात 2008 साली झाली होती. भारताने पहिला आयसीसी एक दिवसीय विश्वकप 1983 साली कपिल देव च्या नेतृत्वात जिंकला होता.
या शिवाय भारतीय क्रिकेट बोड बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड समजल्या जाते. भारतात भारतीय क्रिकेट टिम च्या एका खेळाडु चा पगार 50 लाख ते 2 करोड या दरम्यान आहे.
Read More:
आशा आहे की आपणास “क्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास – Cricket Information in Marathi” याविषयी हा लेख उपयुक्त वाटेल. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कृपया फेसबुकवर शेअर करा.
टीपः आम्ही अचूकतेसाठी प्रयत्न करतो. कृपया आम्हाला सांगा की आपल्याला या लेखात क्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास योग्य दिसत नसेल किवां आपल्याकडे क्रिकेट या खेळाबद्दल अधिक माहिती असल्यास आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवा ती योग्य असल्यास आम्ही या लेखात नक्कीच अपडेट करू.