Naralachi Mahiti
भारताच्या संस्कृतीत व परंपरेत नेहमीच असलेले श्रीफळ म्हणजे नारळ. नारळाचे भारतात एक आगळेवेगळे महत्व आहे हे तुम्ही जनता. तसेच ते मानवी शरीरासाठी देखील तेव्हडेच उपयुक्त आहे.
नारळ या फळाचे उपयोग बरेच आहेत ,पण त्यापेक्षा हि महत्वाचे म्हणजे नारळ पाणी.
नारळाच्या झाडाविषयी माहिती मराठी – Coconut Tree Information in Marathi
हिंदी नाव : | नारीयल |
इंग्रजी नाव : | Coconut |
नारळाची झाडे सर्वसाधारणपणे ५० ते ६० फूट उंच असतात. नारळाच्या जातीवर झाडाची उंची अवलंबून असते. सिंगापुरी जातीच्या नारळाचे झाड उंचीने कमी असते; परंतु फलधारणा लवकर होते. काही नारळाच्या झाडांना दहा वर्षांनी फलधारणा होते. हे झाड सरळ व उंच वाढते.
नारळाच्या पानांना झावळ्या म्हणतात. पाने हिरव्या रंगाची असतात. एका लांब टणक दांड्याला दोन्ही बाजूंनी लांब लांब पात्या असतात. टणक दांड्याला हिरकूट म्हणतात.
या झाडांना प्रथम बारीक फुले येऊन नंतर फलधारणा होते. ही फले झुपक्यांनी येतात. ही फळे घडांनी येतात. हेच नारळ होत. कच्चे फळ हिरवे असते, तयार झाल्यावर त्याला तपकिरी पांढरट रंग येतो.
जाती –
संकरित जाती टी × डी (केरासंकरा) ,टी – डी (चंद्रसंकरा), श्रीलंकेतील कोलंबस, वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली), लक्षद्वीप ऑर्डिनरी, प्रताप, फिलिपिन्स ऑर्डिनरी इत्यादी अश्या अनेक जाती प्रकार नारळाच्या झाडाची आढळतात.
लागवड –
कोंब आलेला नारळ हेच नारळाचे बी होय. या झाडाच्या वाढीसाठी विषम हवामान, रेताड जमीन लागते. जास्तीत जास्त लागवड हि समुद्रकिनारी केली जाते, तिथे या झाडांच्या वाढीसाठी योग्य ती जमीन व हवामान तेथे मिळते.
विशेषत:
महाराष्ट्रात कोकणकिनारपट्टीवर नारळाची भरपूर झाडे आढळतात.
वैशिष्ट्य :
नारळाच्या झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही, म्हणून या झाडाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात.
धार्मिक महत्त्व :
आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक मंगलकार्यात, प्रत्येक पूजेच्या वेळी तसेच कोणत्याही व्यक्तींचा सत्कार करताना, सवाष्ण बाईची ओटी भरताना नारळ हे फळ लागते.
औषधी उपयोग :
हे फळ औषधी म्हणून उपयोगी असते. हिरव्या नारळाचे (शहाळ्याचे) पाणी शक्तिवर्धक असते. नारळाचे पाणी पिऊन १० ग्रॅम खोबरे खाल्ल्याने पोटातील जंत, कृमी नाहीशा होतात. तहान भागवण्यासाठी तसेच पित्तशामक म्हणून हे पाणी वापरले जाते. ग्वोतन्याचे तेल काढले जाते हे तेल डोक्याला लावल्याने केस गळणे थांबते. केसांना चमक येते. त्वचारोगांवर हे तेल उपयोगी पडते.
नारळ पाणी चे उपयोग – uses of coconut water
नारळपाणी यामध्ये उपयुक्त गुणधर्मांचा समावेश आहे, जसे खनिज, विटामिन सी, जीवनसत्वे, कॅल्शियम, मिनरल्स, सोडियम, फायबर, लोह, फोलेट, प्रथिने, इलेक्ट्रोलाईट इत्यादी बरेच शरीरात उर्जा टिकून ठेवणारे घटक आहेत.
नारळ पाण्याचे फायदे – Benefits of Coconut Water
- रोगप्रतिकार शक्ती वाढवतो .
- रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
- मधुमेह दूर ठेवण्यास मदत होते .
- गरोदरपणात स्त्री ला व तिच्या बाळाला उर्जा मिळते .
- अशक्तपणा दूर होतो.
- वयस्कर लोकांचा थकवा व कमजोरी जाण्यासाठी उपयुक्त
- केसांसाठी व चेहर्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. त्वचा टवटवीत राहते.
- मूतखडा त्रासापासून आराम मिळतो .
नारळ पाण्याचे तोटे –
नारळपाणी जास्त पिल्यास जुलाब होतो, किवा कोणाला मळमळणे होऊ शकते. ज्यांना सर्दी – खोकला सतत असतो, किवा पोटफुगी किवा पोटदुखी हा त्रास असेल तर त्या लोकांनी नारळ पाणी पिण्याचे टाळावे.
ओल्या नारळाची मलाई :- about coconut cream
या मलाई ला कोकोनट मिट सुद्धा म्हणतात .हि मलाई तुम्ही कच्ची किवा शिजवून खाऊ शकता.यात फायबर, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए तसेच फॅटी अॅसिड (fatty-acid) असल्याने पोटावरील चरबी लवकरच कमी होते व भूक सुद्धा कमी लागण्यास मदत होते. मलाई खाल्याने उर्जा शक्ती वाढते, अशक्तपणा कमी होतो.
सुखे नारळ फायदे – Benefits of dry coconut
कॉलेस्ट्रॉल HDL, फाइबर, मैग्नीशियम, कॉपर तसेच पोषणतत्वें सुद्धा भरपूर आहेत.
- रोगप्रतिकार शक्ती वाढवते .
- अल्जाइमर या आजारापासून वाचवतो.
- कॅन्सर या रोगापासून वाचवतो.
- थॉइरॉइड असलेल्या लोकांना सुखे खोबरे खाणे उपयुक्त ठरते .
- मुळव्याधी आजार दूर ठेवते .
- सुखे खोबऱ्याचे तेल केसांना लावल्याने केस गळती थाबते.
इतर उपयोग : ओल्या खोबऱ्यापासून नारळी भात, वड्या, करंज्या, मोदक इत्यादी खाद्यपदार्थ बनवतात. ओल्या खोबऱ्याची चटणी तसेच सारही करतात. सके खोबरे मसाल्यात वापरतात. नारळाचे दूध पौष्टिक असते. पोहे, उपीट, भाजी, आमटी वगैरेमध्ये दाटपणा येण्यासाठी, सजावटीसाठी खोबऱ्याचा कीस वापरतात.
इतर माहिती : नारळाच्या झावळ्यांपासून केरसुण्या, तसेच पात्या चटईप्रमाणे विणून त्याचे झाप तयार करतात. या झापांचा उपयोग मांडवावर किंवा घरांवर छत म्हणून होतो. खोडापासून पन्हाळे, नारळाच्या शेंडीपासून काथ्या तयार करतात; त्यांना सुंभ म्हणतात.
नारळाच्या वरच्या टणक भागाला करवंटी म्हणतात. या करवंट्या स्वच्छ करून त्यापासून शोभेच्या वस्तू, बटणेही तयार करतात.
समुद्रकिनारपट्टीच्या भागात नारळाचे उत्पादन येते. पण त्यातील पाणी मात्र गोड असते.
एकाच ठिकाणी अनेक नारळांची झाडे लावलेल्या ठिकाणाला नारळाच्या बागा म्हणतात.
बाजारपेठेत नारळाच्या झाडापासून तयार केलेल्या वस्तूंना भरपूर मागणी आहे.
नारळा बद्दल काही प्रश्न – Quiz about Coconut
उत्तर: करवंटी
उत्तर: कोकण समुद्र किनारपट्टी,यात रायगड, रत्नागिरी, पालघर, सिधदुर्ग हे जिल्हे समाविष्ट होतात.
उत्तर: संकरित जाती टी × डी (केरासंकरा), टी – डी (चंद्रसंकरा), श्रीलंकेतील कोलंबस, वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली), लक्षद्वीप ऑर्डिनरी, प्रताप, फिलिपिन्स ऑर्डिनरी इत्यादी अश्या अनेक जाती प्रकार नारळाच्या झाडाची आढळतात.