Christmas Essay in Marathi
भारत हा असा देश आहे जिथे सर्व धर्मांचे लोक सलोख्याने राहतात, प्रत्येक धर्माचे सन वेगळ्या विशेषतेने साजरे केल्या जातात, आणि भारताचे हीच एक विशेषता आहे कि येथे सर्व धर्म समभाव याला जास्त मान्यता आहे. आजच्या लेखात आपण क्रिसमस विषयी एक छोटासा निबंध पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला क्रिसमस विषयी सुद्धा माहिती मिळणार.
नाताळ किंवा क्रिसमस या सणाच महत्व सांगणारा छानसा निबंध – Christmas Essay in Marathi
चला तर सुरु करूया क्रिसमस विषयी एक छोटासा निबंध – Christmas Nibandh
२५ डिसेंबर ला संपूर्ण जगात क्रीसमस ला मोठ्या उत्साहाने साजरे केल्या जाते, आणि या दिवशी क्रिसमस च्या ट्री ला छोटे लाईट्स लाऊन सजविल्या जातं, केक ला कापल्या जातो, तसेच चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून एकमेकांना क्रिसमस च्या शुभेच्छा दिल्या जातात.
क्रिसमस चा सन का साजरा करतात – Why Christmas is Celebrated
ख्रिश्चन धर्मामध्ये क्रिसमस ला एक विशेष उत्सव म्हणून साजरा केल्या जातो. या दिवसाला ख्रिश्चन धर्मामध्ये येशू चा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा केल्या जातो.
ख्रिश्चन धर्मामध्ये अशी मान्यता आहे कि याच दिवशी येशु क्रिस्ती यांच्या आई मेरी ने त्यांना जन्म दिला होता, परंतु बऱ्याच विद्वानांचे भगवान येशूच्या जन्मा विषयी वेगवेगळे मत आहे.
भगवान येशूने आपले संपूर्ण जीवन हे लोक कल्याणासाठी खर्च केले. सोबतच लोकांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच बऱ्याच लोकांना मुक्ती देण्याचे काम त्यांनी केले, त्यांनी त्यादरम्यान काही चमत्कार सुद्धा केले. म्हणून लोक त्यांना भगवंताचे दूत न म्हणता देव म्हणू लागले, आणि पुढेही त्यांनी बऱ्याच लोकांना कष्टातून मुक्ती दिली होती,
त्यांनी स्वतःचे जीवन हे दुसर्यांच्या भलाई साठी खर्ची केले, आणि एका महान व्यक्तिमत्वाचा आदर्श जगासमोर ठेवला.
तेच २५ डिसेंबर क्रिसमस च्या दिवशी सर्व सरकारी कर्मचारी, स्कूल कॉलेज, सर्व बंद असतात, सोबतच क्रिसमस च्या दिवसापासून तर पुढील बारा दिवसांचा एक उत्सव साजरा केला जातो त्याला क्रिसमसटाइड असे म्हणतात.
क्रिसमस चे महत्व – Importance of Christmas
क्रिसमस या दिवसाचे एक विशेष महत्व आहे, या सणाला एकमेकांमधील प्रेम, सद्भावना, आणि बंधुता या सर्व गोष्टींचे प्रतिक म्हणून साजरे केले जातात. या सणाला ख्रिश्चन लोक खूप उत्साहाने साजरे करतात. या सणाला आधीच्या काही दिवसापासूनच तयारीला लागलेले असतात.
सांता आणि क्रिसमस चे कनेक्शन – Santa Claus Story
क्रिसमस आणि सांता यांच्या मध्ये एक असे विशेष गोष्ट जुळलेली आहे, आणि बरेचशे लहान मुले लाल कपड्यांमध्ये येणाऱ्या सांता ची वाट पाहतात कि सांता येणार आणि आपल्याला गिफ्ट देऊन जाणार, या सांता च्या मागे एका संत पुरुषाची कथा आहे,
ते संत म्हणजे संत निकोलस, संत निकोलस यांची येशू वर आस्था होती, आणि येशू ला खूप मानत असत, सोबतच त्यांना लहान मुलांवर त्यांचे विशेष प्रेम होत, तर ते लहान मुलांना गिफ्ट देत असत,
त्यांचे येशू च्या जन्माशी कोणताही संबंध नाही पण त्यांची भेटवस्तू वाटण्याच्या प्रथेला क्रिसमस ला आठवल्या जातं, आणि लहान मुलांना क्रिसमस च्या दिवशी गुपचूप त्यांचे आई वडील त्यांना भेटवस्तू देतात, आणि त्यांना सांता ने दिल्याचे सांगितल्या जाते, तर अश्या प्रकारे सांता चे क्रिसमस सोबत कनेक्शन आहे,
तर हा होता क्रिसमस विषयी काही शब्दांचा निबंध. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा निबंध आवडला असेल, आपल्याला लिहिलेला हा निबंध आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच आणखी नवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!