देश कोरोना संकटाशी लढत असताना सोबतच बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत आहे, कधी समुद्रातील चक्रीवादळे, आतंकवाद, तर कधी सीमा विवाद. गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या उत्तरेकडील सीमांच्या विवादामुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एकीकडे नेपाळ च्या सीमेचा वाद तर दुसरीकडे चीन. चीन मुळे संपूर्ण जगाला कोरोना सारख्या महामारीचा सामना करावा लागत आहे. पण चीन ला या गोष्टीचे जराही दुःख नाही आहे. उलट तो इतर देशांशी विनाकारण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे उगाच वाद निर्माण करत आहे. चीन ने भारताच्या सीमेवर कोरोना काळात वाद निर्माण केला. आणि या विवादामुळे आपल्या देशाच्या २० जवानांना मरण पत्करावे लागले.
चीन वर भारताचा डिजिटल हमला, बॅन झाले चीनचे हे ५९ अँप्स तेही या कारणामुळे – Chinese Apps Banned in India
या सर्व विवादानंतर देशात आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते, बरेच ठिकाणी चीन च्या विरोधात प्रदर्शने करण्यात आली. सोबतच चिनी मालाच्या काही वस्तू रस्त्यावर जाळण्याचे व्हिडीओ समोर आले, एवढेच नाही तर देशातून चिनी मालाला बॅन करण्याची मागणी लोकांकडून येऊ लागली होती, पण २९ जून ला केंद्र सरकार च्या माहिती आणि प्रसारण खात्याने चीन चे ५९ अँप बॅन करण्याचे आदेश जारी केले, आता प्रत्येकाला या विषयी पुरेसी माहिती नसेल की कोणत्या कारणांमुळे या चिनी अँप्स ना भारतात बॅन करण्यात आले आहे.
भारतात चिनी अँप्स ना बॅन करण्यासाठी चीन च्या काही गोष्टी कारणीभूत तर आहेतच पण या आधी आपल्याला सांगू इच्छितो की देशातील काही तज्ज्ञांच्या मते चिनी अँप्स देशातील अँड्रॉइड तसेच आय ओ एस वापरणाऱ्या व्यक्तींची वैयक्तिक माहिती चोरी करत आहे.
एवढंच नाही तर ह्या सर्व अँप चे मुख्य सर्व्हर हे देशाच्या बाहेर आहे, ज्या सर्व्हर वर ही माहिती जमा होते. यामुळे देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करता भारत सरकार ने हा निर्णय घेतला आहे. या आधी सुध्दा बरेचदा भारताच्या तसेच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी चिनी अँप कश्या प्रकारे लोकांच्या वैयक्तिक माहितीचे हरण करत आहे, हे सांगत होते पण तेव्हा या कडे एवढे लक्ष दिल्या गेले नव्हते पण चीन ने सीमेवर केलेल्या कृत्यामुळे देशात अनेक गोष्टींना वाचा फोडली. पण चायनिस अँप मुळे लोकांचा वैयक्तीक डेटा सुरक्षित नसल्यामुळे सरकार ला हे पाऊल उचलावे लागले.
यामुळे देशातील नवीन स्टार्टअप ला मदत मिळू शकते सोबतच देशातील जनतेचा वैयक्तीक डेटा बाहेर जाण्यापासून रोख लागेल. या सर्व गोष्टींचा चीनला मोठ्या प्रमाणात धक्का बसणार आहे, कारण भारत जगाच्या पाठीवर कोणत्याही देशासाठी एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आणि जगाच्या मोठ्या बाजारपेठेतून चीन चा व्यवसाय संपुष्टात येत असेल तर धक्का तर लागणारच.
आता पाहूया की कोणते ते अप्लिकेशन आहेत ज्यांना भारतात पूर्णपणे बॅन घोषित केल्या गेलेलं आहे. त्यामध्ये जर सर्वात वरच्या क्रमांकावर पाहिले असता आपल्याला दिसेल, टिकटॉक नावाचे एक मोबाईल अप्लिकेशन ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ बनवल्या जात होते. अश्याच प्रकारच्या आणखी ५८ अप्लिकेशन ची यादी खाली दिलेली आहे.
- टिकटॉक- TikTok
- शेयरइट- Shareit
- यूकैम मेकअप- YouCam makeup
- कवाई- Kwai
- बायडू मैप- Baidu map
- शेन- Shein
- क्लैश ऑफ किंग्स- Clash of Kings
- डीयू बैटरी सेवर- DU battery saver
- यूसी ब्राउजर- UC Browser
- सीएम ब्राउजर- CM Browers
- आपुस ब्राउजर- APUS Browser
- हेलो- Helo
- लाइकी- Likee
- एमआई कम्युनिटी- Mi Community
- वायरस क्लिनर- Virus Cleaner
- रोमवी- ROMWE
- क्लब फैक्ट्री- Club Factory
- न्यूजडॉग- Newsdog
- ब्यूटी प्लस- Beutry Plus
- क्यूक्यू मेल- QQ Mail
- वीचैट- WeChat
- यूसी न्यूज- UC News
- वीबो- Weibo
- जेंडर- Xender
- क्यूक्यू म्यूजिक- QQ Music
- क्यूक्यू न्यूज फीड- QQ Newsfeed
- सेल्फीसिटी- SelfieCity
- बिगो लाइव- Bigo Live
- मेल मास्टर- Mail Master
- पैरलल स्पेस- Parallel Space
- एमआई वीडियो कॉल- Mi Video Call–Xiaomi
- वीसिंक- WeSync
- ईएस फाइल एक्सप्लोरर- ES File Explorer
- वीवा वीडियो- Viva Video–QU Video Inc
- मीतू- Meitu
- वीगो वीडियो- Vigo Video
- क्लिन मास्टर- Clean Master– Cheetah Mobile
- न्यू वीडियो स्टेटस- New Video Status
- डीयू रिकॉर्डर- DU Recorder
- वॉल्ट हाइड- Vault- Hide
- डीयू क्लिनर- DU Cleaner
- डीयू ब्राउजर- DU Browser
- हगो प्ले विद न्यू फ्रेंड्स- Hago Play With New Friends
- कैम स्कैनर- Cam Scanner
- वंडर कैमरा- Wonder Camera
- बायडू ट्रांसलेट- Baidu Translate
- कैशे क्लिनर- Cache Cleaner-DU App studio
- फोटो वंडर- Photo wonder
- वी मीट- We Meet
- स्वीट सेल्फी- Sweet Selfie
- वीमैट- Vmate
- क्यूक्यू लॉन्चर- QQ Launcher
- क्यूक्यू इंटरनेशनल- QQ International
- वी फ्लाई स्टेटस वीडियो- V fly Status Video
- क्यूक्यू सिक्योरिटी सेंटर- QQ Security Center
- यू-वीडियो- U Video
- मोबाइल लिजेंड्स- Mobile Legends
- डीयू प्राइवेसी- DU Privacy
तर ही यादी होती ५९ बॅन झालेल्या चिनी अँप ची. अँप्स ना बॅन केल्यावर देशातून भारत सरकार च्या या निर्णयाला लोकांचा एक चांगला प्रतिसाद मिळत आहे, सोबतच सोशल मीडियावर या निर्णयाचे स्वागत केल्या जात आहे. तर आशा करतो आपल्याला वरील लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन माहितीच्या विश्लेषणासाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत,
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!