Chandra Shekhar Azad Marathi Mahiti
शक्तिशाली व्यक्तीमत्वांचा विचार मनात येताच सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येतं चंद्रशेखर आझाद याचं व्यक्तिमत्व. चंद्रशेखर आझाद- एक महान युवा क्रांतिकारी, ज्यांनी भारताच्या रक्षणाकरता आपल्या प्राणांची आहुती दिली. आझाद आपल्या देशाचे वीर सुपुत्र होते, आपल्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा त्यांनी स्वतः लिहिली आहे.
आपल्या मातृभूमीची दुर्दशा पाहून जर तुमचे रक्त सळसळत नसेल तर ते रक्त नव्हे, पाणी आहे… अगदी बालवयातच चंद्रशेखर आझाद यांच्यात देशभक्तीची भावना ओतप्रोत भरलेली होती. भारताच्या स्वातंत्र्यात त्यांचे अमुल्य योगदान आहे.
क्रांतिकारकांचे स्मरण जेंव्हा ही केले जाते तेंव्हा सर्वप्रथम चंद्रशेखर आझाद यांचं स्मरण होत.
ते म्हणायचे मी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी शत्रूशी लढत राहील. मरेपर्यंत इंग्रजांच्या हाती न लागण्याची त्यांनी शपथ घेतली होती, आणि ती त्यांनी पाळली. ते आपल्या नावाप्रमाणे शेवटपर्यंत आझाद राहिले आणि देशाकरता प्राणांची आहुती दिली.
चंद्रशेखर आझाद यांचा जीवनपरिचय – Chandra Shekhar Azad Information in Marathi
चंद्रशेखर आझाद यांचा अल्पपरिचय – Chandra Shekhar Azad Biography
नाव (Name) | चंद्रशेखर आझाद |
घरचे नाव (Real Name) | पंडित चंद्रशेखर सिताराम तिवारी |
जन्म (Birthday) | 23 जुलै 1906 |
जन्मस्थान (Birthplace) | भाभरा (मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील गाव) |
वडील (Father Name) | पंडित सिताराम तिवारी |
आई (Mother Name) | जागरानी देवी |
शिक्षण (Education) | वाराणसी येथील संस्कृत पाठशाळा |
संस्था (organization) | हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) पुढे नाव बदलून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) असे करण्यात आले. |
मृत्यू (Death) | 27 फेब्रुवारी 1931 |
मृत्युस्थळ(Deathplace) | अलाहाबाद येथील अल्फ्रेड पार्क |
आंदोलन (Movement) |
|
राजनीतिक विचारधारा (Political Ideology) | उदारवाद, समाजवाद, अराजकतावाद |
धर्म (Religion) | हिंदू धर्म |
स्मारक(Monument) | शेखर आझाद मेमोरियल (शहीद स्मारक),ओरछा, तिकमगढ, मध्यप्रदेश |
चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी माहिती – Chandra Shekhar Azad History in Marathi
चंद्रशेखर आझाद हे एक महान क्रांतिकारी होते. आपल्यातील देशभक्तीची भावना आणि अद्वितीय साहसाने त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आणि अनेक लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याकरता प्रेरित केले.
मातृभूमीच्या या महान सुपुत्राने आपल्यातील शौर्याच्या बळावर काकोरी ट्रेन लुटली आणि वाइसरायच्या ट्रेनला उडवण्याचा देखील प्रयत्न केला.
इतकेच नव्हे तर महान क्रांतिकारी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी सोंन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या, शिवाय भगतसिंग, सुखदेव, आणि राजगुरू यांच्यासमवेत हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र सभेची स्थापना केली. चंद्रशेखर आझाद हे भगतसिंग चे सल्लागार होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
चंद्रशेखर आझाद यांचे प्रारंभिक जीवन – Chandra Shekhar Azad Information
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्यप्रदेशातील भाभरा गावी झाला. चंद्रशेखर सिताराम तिवारी हे त्यांचे मूळ नाव.त्यांचे वडील अत्यंत प्रामाणिक, स्वाभिमानी, आणि दयाळू वृत्तीचे होते. दुष्काळ पडल्याने आपले बदरका हे मूळ गाव सोडून आपल्या कुटुंबासह ते भाभरा या गावी स्थायिक झाले.
भिल्ल वस्तीत चंद्रशेखर आझाद याचं बालपण गेल्यानं त्या मुलांसारखं यांना देखील धनुष्यबाण उत्तम रीतीनं चालवता येऊ लागला. बालपणा पासून विद्रोही स्वभावाच्या चंद्रशेखर आझाद याचं मन अभ्यासात रमलं नाही. खेळणं मात्र त्यांना फार आवडे. त्यांना आणि त्यांचा भाऊ सुखदेव याला शिकविण्याकरता त्यांच्या वडिलांचे मित्र मनोहरलाल त्रिवेदी घरी येत असत.
आझाद यांच्या आईला त्यांना संस्कृतचा विद्वान बनविण्याची इच्छा होती त्यामुळे आझाद यांना संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथील काशी विद्यापीठात पाठविण्यात आलं.
महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनात आझाद यांचा सहभाग – Non Cooperation Movement
महात्मा गांधीजीनी 1921 साली असहकार आंदोलनाची घोषणा केली. त्यावेळी चंद्रशेखर आझाद केवळ 15 वर्षांचे होते, अगदी तेंव्हापासून त्यांच्यात देशभक्तीची भावना उचंबळत असल्याने ते गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभागी झाले. परिणामी त्यांना कैद करण्यात आले. न्यायालयात न्यायाधीशांनी नाव विचारल्यावर त्यांनी “आझाद” असे सांगितले, वडीलांचे नाव “स्वतंत्र” आणि निवासस्थान “तुरुंग” सांगितलं.
आझादच्या उत्तराने न्यायाधीश संतापले आणि त्यांनी 15 फटक्यांची शिक्षा सुनावली. आपल्या निश्चयावर ठाम राहणाऱ्या आझादने शिक्षा सहन केली आणि प्रत्येक फटक्यानिशी “भारत माता की जय” चा नारा दिला. या घटने नंतर पंडित चंद्रशेखर तिवारी, आझाद नावाने प्रसिद्ध झाले.
चंद्रशेखर आझाद यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील कार्यकर्तुत्वाचा महत्वपूर्ण उल्लेख – About Chandrashekhar Azad
- 1922 साली महात्मा गांधीजींनी आझाद यांना असहकार चळवळीतून काढून टाकले. त्याचे आझाद यांना फार वाईट वाटले. त्यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वतंत्र करण्याची शपथ घेतली. पुढे त्यांची भेट हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन चे संस्थापक राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली.
- ही एक क्रांतिकारी संस्था होती, यात सर्वांचा अधिकार समान होता आणि कुणाशीही भेदभाव केला जात नसल्याने या गोष्टीमुळे आझाद फार प्रभावित झाले.
- चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात या संस्थेनी इंग्रजांच्या तिजोऱ्या लुटून संस्थेकरता निधी गोळा केला.
- 1925 साली चंद्रशेखर आझाद यांनी तडीस नेलेल्या काकोरी कांडाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे.
संस्थेच्या एकूण 10 सदस्यांनी इंग्रजांचा खजिना जात असलेल्या काकोरी ट्रेनला लुटून इंग्रजांपुढे तगडे आव्हान उभे केले होते. काकोरी प्रकरणात चंद्रशेखर आझाद यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. याशिवाय महान क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खां, राजेंद्र नाथ लाहिडी, ठाकूर रोशन सिंह यांना या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
चंद्रशेखर आझाद यांच्यापुढे पुन्हा नव्याने संस्थेला उभारी देण्याचे आव्हान उभे राहिले.
ओजस्वी, विद्रोही, आणि तापट स्वभावाचे चंद्रशेखर आझाद इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन दिल्लीला निघून गेले.
त्याठिकाणी त्यांनी क्रांतीकारकांची एक सभा आयोजित केली. येथे त्यांची भेट भगतसिंग यांच्याशी झाली.
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ने पुन्हा एकदा क्रांतिकारी आणि गुन्हेगारी मार्गांचा अवलंब केल्याने इंग्रज चंद्रशेखर आझाद यांच्या मागावर होते. आझाद यांनी लाला लजपत राय यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी1928 साली सांडर्स ची हत्या केली. चंद्रशेखर आझाद म्हणायचे…
“संघर्षाच्या मार्गावर हिंसा ही मोठी गोष्ट नाही”
पुढे इंग्रजांच्या असेम्ब्लीत बॉम्ब फोडण्याच्या घटनेत चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग यांना पुरेपूर मदत केली. भगत सिंग यांना अटक झाल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी देखील आझाद यांनी भरपूर प्रयत्न केलेत परंतु इंग्रजांच्या सैन्य बलापुढे त्यांचा नाईलाज झाला.
परंतु नेहमीप्रमाणे इंग्रजांना चकमा देण्यात ते यशस्वी ठरले.
अलाहाबाद येथील अल्फ्रेड पार्क मधे या महान क्रांतीकारकाने केले आत्मबलिदान… – Chandra Shekhar Azad Death
इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरू, आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दुसरीकडे चंद्रशेखर आझाद ही शिक्षा कमी करून जन्मठेप व्हावी याकरता खूप प्रयत्न करत होते. आणि त्यासाठी ते अलाहाबादला आले आले होते.
परंतु याचा सुगावा इंग्रजांना लागल्याने त्यांनी अल्फ्रेड पार्क मधे चारी बाजूंनी चंद्रशेखर आझाद यांना घेरले.
दोन्ही बाजूनी चकमक आणि गोळीबार सुरु झाला, एक क्षण असा आला की आझाद यांच्या बंदुकीत केवळ एक गोळी उरली होती.
त्यांना परिस्थितीचा अंदाज आला होता, त्यामुळे इंग्रजांच्या हातून मरण्यापेक्षा त्यांनी स्वतःवर गोळी झाडणे पसंत केले.आणि अश्या तऱ्हेने भारतमातेचा वीर सुपुत्र अमर झाला आणि त्यांची अमरगाथा इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेली.
आओ झुक कर सलाम करे उनको
जिनके हिस्से में ये मुकाम आता है
खुशनसीब होते है वो लोग,
जिनका लहू इस देश के काम आता है…
या महान क्रांतीकारकाला माझी मराठी चा प्रणाम!!!
Check Out: Chandra Shekhar Azad T shirt