Chaitanya Mahaprabhu
महानकवी चैतन्य महाप्रभू एक बंगाली आध्यात्मीक अध्यापक आहेत. ज्यांनी गुडिया वैष्णविश्वाची स्थापना केली होती. त्यांचे भक्त त्यांना भगवान विष्णुंचा अवतार मानतात. ते आपल्या अनुयायांना भक्ती आणि जीवनाच्या खऱ्या सत्याचा पाठ शिकवतात. त्यांना श्रीकृष्णांची पवित्र छवी मानल्या जाते.
चैतन्य महाप्रभु यांचा जीवन परिचय – Chaitanya Mahaprabhu in Marathi
चैतन्य महाप्रभुंचे जीवन चरित्र – Chaitanya Mahaprabhu Biography in Marathi
महानकवी चैतन्य वैष्णव भक्ति योग स्कूल चे संस्थापक पण होते जे भागवत पूराण आणि भागवत गीतेच्या आध्यात्मिक शिक्षणावर आधारीत होते. भगवान विष्णूंच्या अनेक अवतारांपैकी त्यांना एक मानले जाते त्यांना लोक मुख्यतः श्रीकृष्णाचा अवतार मानतात. त्यांचा ‘‘हरे कृष्णा हरे रामा ” हा मंत्रजाप आज जगभर मानला जातो.
ते संस्कृत मधील श्रीकृष्णाचे भक्तीगीतही गातात. चैतन्य प्रभुंना भक्तगण गौरंग आणि गौरा या नावानेही संबोधतात. लिंबाच्या झाडाखाली जन्म घेतल्यामुळे त्यांना निमाई सुध्दा म्हंटले जाते. आपल्या युवावस्थेत ते फार बुध्दिमान होते. त्यांचे खरे नाव विश्वंभर दास होते. ते एक आदर्श विदयार्थी होते त्यांचे आडनाव निमाई होते.
लहानपणापासुन श्रीकृष्णांची भक्ती व विद्वत्ता त्यांच्यात होती. त्यांच्या धार्मिक आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घेण्यास बरेच लोक जमा व्हायचे.
चैतन्य महाप्रभुंचे आरंभीक जीवन – Chaitanya Mahaprabhu Life History
महानकवी चैतन्य म्हणजे ज्ञानानूभूतीदायक असा होतो व महाप्रभू म्हणजेच ईश्वर असा त्यांच्या नावाचा अर्थ होतो. त्यांच्या व्दारा मिळालेले ज्ञान भक्तांचे कल्याण करते असा त्यांच्या अनुयायांचा विश्वास आहे. ते स्वतःस श्रीकृष्णाचे परमभक्त मानतात.
चैतन्य महाप्रभु यांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी १८ फेब्रृवारी १४८६ ला झाला होता. त्यांच्या वडीलांचे नाव जगन्नाथ मिश्रा व आईचे नाव साची देवी होते. ते ढाका येथील श्रीहत्ता गावातील दखिण खेडयात जन्मास आले. त्यांचे बालपणीचे नाव विश्वंभर होते.
ढाका हे आता बांग्लादेशात आहे. चैतन्य महाप्रभूचे बालपण योगपीठातच व्यतीत व्हायचे. त्यांच्या आध्यात्मीक बलाची महती सर्वांना बालपणीच कळुन चूकली होती. त्याचे संस्कृत ज्ञान व श्रीकृष्णाप्रतीची भक्ती पाहुन सर्वांमध्ये सात्विक भाव निर्माण व्हायचा.
गोपाल ईश्वर पूरी हे त्यांचे आध्यात्मिक गुरू होते त्यांच्या कडूनच त्यांनी हरे कृष्णा हरे रामा चा जपमंत्र घेतला होता. या मंत्राने चैतन्य महाप्रभूस श्रीकृष्णांच्या अधिक जवळ आणले होते. त्यांचा वैष्णव संप्रदायात समावेश झाला आणि त्यांचे अनुयायीहि त्यांना विष्णु अवतार मानू लागले होते.
त्यांच्या मंत्रमुग्ध आध्यात्मिक ज्ञानाचा फायदा सर्व भक्तगण घेतात. त्यांनी आपल्या तारूण्याचे व युवावस्थेचे एकुण २४ वर्ष पुरी येथेच व्यतीत केले ते महान जगन्नाथपुरी मंदीरात वास्तव्यास होते. मैसूरचे राजा गजपती राजा प्रतापरूद्र देव हे चैतन्य महाप्रभूस श्रीकृष्णाचा अवतारच मानतात. उतार वयात समाधी घेवून ते श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन झाले.
चैतन्य महाप्रभुंचे आध्यात्मिक ज्ञान – Chaitanya Mahaprabhu Spiritual Knowledge
चैतन्य महाप्रभूंना संस्कृत भाषेचे गाढे ज्ञान होते. त्यांचे आध्यात्मिक, धार्मीक मनमोहक विचार बालपणापासुन सर्वांना आकर्षित करत असे. त्यांच्या काही विचारांपैकी
- कृष्ण हाच परमसत्य आहे.
- श्रीकृष्ण सर्व उर्जेचा निर्माता आहे.
- श्रीकृष्णातूनच सर्व जीवनरसांचा उगम होतो.
- सर्व जीव श्रीकृष्णांचे अंश आहेत.
- जीवाच्या तटस्थ स्वभावामूळेच अनेक समस्या निर्माण होतात.
- पुर्णश्रध्दा व विश्वास आपणास ईश्वराच्या अगदी जवळ नेते.
- जीवाने कर्माच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती करायचे ठरविले असेल तर सत्कर्म हा सर्वोत्तम मार्ग आहे.
- कृष्णाची भक्ती हा जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असावे.
चैतन्य महाप्रभुंच्या मते भक्तीमुळेच आपणांस मुक्ती मिळते. त्यांच्या मते जीवांचे दोन प्रकार आहेत प्रथम नित्य मुक्त आणि नित्य संसारी.
नित्य मुक्त जीवांवर मायेचा प्रभाव नसतो तर नित्य संसारी जीवाचे जीवन मोहमायेने भरलेले असते.
चैतन्य महाप्रभु कृष्ण भक्तीचे धनी होते. न्यायशास्त्राचे ते प्रसिध्द पंडीत मानले जातात. त्यांनी आयुष्यभर एका सन्याशासारखेच जीवन व्यतीत केले.
चैतन्य महाप्रभु यांचा महामंत्र – Chaitanya Mahaprabhu’s Mahamantra
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे ।।
हा त्यांचा महामंत्र सर्व कृष्ण भक्तांना उर्जा प्रदान करतो.
तर हि माहिती होती चैतन्य महाप्रभूंची आपल्याला कशी वाटली आम्हाला कळवा,
तसेच आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद !