आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला ह्या पुरुषांपेक्षा मागे आहेत. आधीप्रमाणे महिला ह्या आता फक्त चूल आणि मूल बस एवढ्यापुरत्याच सीमित नाहीत, तर त्या आता घराच्या बाहेर निघून आपली एक ओळख निर्माण करत आहेत, तसेच बाहेरच्या जगासमोर त्या आपल्या प्रतिमेचे प्रदर्शन करत स्वत:ला सिद्ध करत आहेत.
याच बरोबर आजकाल महिलांबद्दल समाजामध्ये मानसिकता पण खूप बदलली आहे, आणि महिलांच्या शिक्षणाकडे पण भर दिल्या जात आहे. यामुळे महिलांना आपल्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यास मदत होत आहे.
जर आपण करियर ऑपशन्स आणि जॉब्स च्या संभाव्यता बद्दल बघितल तर महिलांसाठी खूप करियर ऑपशन्स available आहेत. आणि ह्याच कारणामुळे आता महिला ह्या कामावर जात आहेत आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत पण करत आहेत.
महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन – Career Options for Women
जर तुम्ही पण अश्या वेगवेगळ्या करियर ऑपशन्सच्या शोधात असाल जेणेकरून तुम्ही स्वत:च्या प्रतिमेला जगासमोर प्रदर्शित करू शकाल आणि चांगलं वेतन मिळवू शकाल, तर आम्ही तुम्हाला या सर्व करियर ऑपशन्स बद्दल माहिती देत आहोत जी कि तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
Career opportunities for women
या लेखामध्ये आपण महिलांसाठी असणार्या वेगवेगळ्या करियर ऑपशन्स बद्दल डिस्कशन करणार आहोत ते खालील प्रमाणे:
- एयरहोस्टेस
- जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन
- फॅशन डिसाइन
- सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
महिलांसाठी एयरहोस्टेस एक खूप सुंदर करियर ऑप्शन – Career in Airhostess
महिलांमध्ये आजकाल एयरहोस्टेस हा कोर्स खूप लोकप्रिय आहे, तसेच जर तुम्हाला बाहेर फिरणे आवडत असेल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या लोकांसोबत बोलायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एयरहोस्टेस हा खूप चांगला करियर Option आहे.
तसेच एयरहोस्टेस ला वेतन पण खूप चांगले आहे, याच बरोबर वेगवेगळ्या जागी जाण्याची आणि मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये राहण्याची आणि नवीन नवीन लोकांसोबत संवाद साधण्याची संधी सुद्धा येथे मिळते.
एयरहोस्टेस बनण्यासाठी आपल्याजवळ धैर्य, संयम, साहस, आणि समर्पण सोबतच मेहनत करण्याची जिद्द असणे खूप महत्त्वाचे आहे.
एयरहोस्टेस साठी शैक्षणिक पात्रता – Airhostess Eligibility
एयरहोस्टेस साठी १२ वी पास असणे आवश्यक आहे, त्यानंतर कोणत्याही मान्यता प्राप्त इन्स्टीटयूट मधून एयरहोस्टेस कोर्स करू शकतो.
एयरहोस्टेस साठी skills – Air Hostess Skill
- जवाबदारी
- आत्मविश्वासू आणि स्मार्ट
- सुंदर, आकर्षक आणि पोलाईट Personality
- शारीरिक दृष्ट्या प्रबळ
- पॉसिटीव्ह अटीट्युड
- गुड कम्युनिकेशन स्किलस
- गुड सेन्स ऑफ ह्यूमर
एयरहोस्टेस साठी वयोमर्यादा – Air Hostess Age Limit
एयरहोस्टेस साठी वय मर्यादा ही १८-२५ वर्ष एवढी ठेवण्यात आली आहे.
एयरहोस्टेस साठी जॉब ची संभाव्यता – Air Hostess Job Vacancy
या क्षेत्रात डोमेस्टिक पासून तर इंटरनॅशनल आणि private एयरलाइंस मध्ये खुप जॉब ची संभाव्यता आहे, यामध्ये एयर इंडिया, सहारा इंडिया, इंडियन एयरलाइंस, टाटा, जेट एयरवेज सोबत खूप एयरलाइंस चांगल्या सॅलरी पॅकेज वर एयरहोस्टेस ला जॉब ऑफर करतात.
भारतामध्ये एयरहोस्टेस ला मिळणारे वेतन – Air Hostess Salary
डोमेस्टिक एयरलाइंस ची एयरहोस्टेस ची सॅलरी जवळजवळ ३५ ते ५० हजार पासून सुरु होते, आणि तेच इंटरनॅशनल एयरलाइंस च्या एयरहोस्टेस ची सॅलरी हि डोमेस्टिक एयरहोस्टेस पेक्षा जास्त असते. तसेच वर्क एक्सपेरियन्स नुसार एयरहोस्टेस च्या सॅलरी मध्ये वाढ सुद्धा केली जाते.
एयर होस्टेस कोर्स साठी इंस्टीट्यूट – Institute of Air Hostess
भारतामध्ये खूप इंस्टीट्यूट आहेत जे एयरहोस्टेस कोर्स करून घेतात, त्यामधील काही प्रसिद्ध इंस्टीट्यूट ची नावे खाली दिलेली आहेत,
- फ्रँकफिन इंस्टीट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग
- बॉम्बे फ्लाईंग क्लब कॉलेज ऑफ एव्हिएशन
- यूनिवर्सल एव्हिएशन अॅकॅडेमी
- जेट एअरवेज ट्रेनिंग अॅकॅडेमी
- इंडिगो ट्रेनिंग सेंटर
- इंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स
- सिव्हिल एव्हिएशन ट्रेनिंगसाठी केंद्र
ह्याव्यतिरिक्त आणखी पुष्कळ इंस्टीट्यूट आहेत ज्याबद्दल तुम्ही बघू शकता.
Journalism आणि Mass Communication मध्ये करियर बनवण्याची उत्तम संधी – Careers in Journalism and Mass Communication
Journalism चे क्षेत्र हे खूप मोठे क्षेत्र असल्यामुळे येथे खूप सारे करियर ऑपशन्स उपलब्ध आहेत. या फील्ड मध्ये फक्त लोकांना पैसे कमवण्याचीच संधी मिळत नाही तर मोठमोठ्या लोकांसोबत संवाद साधण्याची संधी आणि आपली ओळख बनविण्याची संधी सुद्धा येथे मिळते.
Journalism हे खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे, पण जर्नालिस्ट ची नोकरी खूप सन्मानाची नोकरी आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात करियर करायचं असेल आणि अंजना ओमकश्यप आणि बरखा दत्त यांच्यासारख नाव कमवायचं असेल तर आपल्याजवळ चांगल्या कम्युनिकेशन स्किल सोबतच, सर्व विषयाची माहिती, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि सेन्स ऑफ ह्यूमर असणे खूप आवश्यक आहे, तेव्हाच आपण या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करू शका.
जर्नलिझम साठी शैक्षणिक पात्रता – Eligibility for Journalism
या क्षेत्रामध्ये डिग्री, मास्टर डिग्री नाहीतर डिप्लोमा कोर्सेस पण करू शकतो. मास कम्युनिकेशन च्या डिग्री किंवा डिप्लोमा साठी १२ वि पास होणे आवश्यक आहे. आणि मास्टर इन मास कम्युनिकेशन साठी बॅचलर इन मास कॉम्युनिकेशन ची डिग्री असणे आवश्यक आहे.
आपल्याला हे पण माहित असायला पाहिजे कि, खूप इन्स्टिटयूट हे ग्रॅजुएशन नंतर पीजी डिप्लोमा कोर्स सुद्धा ऑफर करतात.
जर्नालिज्म साठी आवश्यक स्किल्स – Journalism Skill
- गुड कम्युनिकेशन स्किल
- गुड राइटिंग स्किल
- आत्मविश्वास
- आकर्षक पर्सनॅलीटी
मास कम्युनिकेशन आणि जर्नालिज्म चे प्रमुख कोर्सेस – Journalism and Mass Communication Courses
- बॅचलर डिग्री इन मास कम्युनिकेशन
- पीजी डिप्लोमा इन ब्रॉडकास्ट जर्नलिझम
- एमए इन जर्नलिझम
- डिप्लोमा इन जर्नलिझम
- जर्नलिझम अँड पब्लिक रिलेशन
- पीजी डिप्लोमा इन मास मिडिया
जर्नलिझम च्या अभ्यासासाठीचे इन्स्टिटयूट – Institute for Journalism and Mass Communication
- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन
- AJK MCRC जमिया मिलिया इस्लामिया, नई दिल्ली.
- माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता व संचार विश्वविद्यालय
- सिंबायोसिस इंस्टिट्यूट ऑफ मीडिया एंड कम्युनिकेशन
- मणिपाल इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन
- एशियन कॉलेज ऑफ जर्नलिजम
- झेव्हियर इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन
Journalism आणि Mass Communication मध्ये नौकरीची संधी – Journalism and Mass Communication Job Opportunities
या क्षेत्रामध्ये राइटर, एंकर, स्क्रिप्ट राइटर, प्रोड्युसर, बुलेटिन प्रोड्युसर नाहीतर मॅनेजर म्हणून न्यूज एजेंसी, प्रायव्हेट किंवा सरकारी न्यूज चॅनेल, न्यूजपेपर, प्रोडक्शन हाऊस, फिल्म मेकिंग, प्रसार भारती, पब्लिकेशन डिझाइन सोबतच वेगवेगळ्या मिडिया संस्था मध्ये नोकरी करू शकता. याचसोबत या क्षेत्रात फ्रीलान्सिंग करून सुद्धा पैसे कमवता येतात.
फॅशन डिसाइन मध्ये करियर बनवणे एक उत्तम पर्याय – Careers in Fashion Designing
आजकाल फॅशन डिसाइन हा कोर्स खूप लोकप्रिय कोर्सेस मधून एक कोर्स आहे. आजकाल मॉडर्न आणि ग्लॅमरस दुनियेमध्ये लोकांचं आणखीनच लक्ष याकडे वेधत आहे. जर तुम्ही क्रिएटीव्ह असाल आणि तुमची रुची लाइफस्टाइल आणि फॅशन मध्ये आहे, आणि याच बरोबर तुम्हाला लेटेस्ट ट्रेंड आणि फॅशन स्टाइल बद्दल माहिती आहे तर तुमच्यासाठी हा एक उत्तम करियर ऑपशन साबित होऊ शकतो.
फॅशन डिसाइन साठी शैक्षणिक पात्रता – Eligibility for Fashion Designing
फॅशन डिसाइन साठी १२ वी पास असणे आवश्यक आहे.
फॅशन डिसाइन साठी आवश्यक स्किल्स – Skills for Fashion Designing
- क्रिएटिव्हिटी
- विचार करण्याची क्षमता
- गुड कम्युनिकेशन स्किल
- विजुअलायझेशन ची क्षमता
- आर्टिस्टिक व्यू-प्वाईंट
- लेटेस्ट ट्रेंड, फॅशन आणि लाइफ स्टाइल बद्दल माहिती
फॅशन डिझाइन साठी काही इंस्टीट्यूट – Institute for Fashion Designing
- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी.
- आर्मी इंस्टीट्यूट ऑफ फैशन आणि डिझाइन
- पर्ल अकॅडमी.
- जेडी इंस्टीट्यूट ऑफ फैशन टेक्नॉलॉजी
फॅशन डिझाइन मध्ये जॉब ची संभाव्यता – Fashion Designer Jobs for Freshers
फॅशन डिझाइन या फिल्ड मध्ये जॉबची खूप संभाव्यता आहे, तुम्ही कुठल्याही फॅशन हाऊस मध्ये जाऊन फॅशन डिझायनर चे काम करू शकता. तसेच फिल्म आणि टीव्ही च्या जगामध्ये कॉस्ट्यूम आणि फॅशन डिझायनर ला खूप डिमांड असते.
या कोर्स नंतर सुरुवातीला तुम्ही २०-२५ हजार रुपये कमवू शकता, नंतर एक्सपेरियन्स नुसार सॅलरी मध्ये वाढ होत जाते, तसेच तुम्ही या कोर्स नंतर स्वत:चा बिजनेस सुद्धा सुरु करू शकता.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये करियर – Careers in Software Development
कॉम्पुटर आणि टेक्नॉलॉजी मध्ये आवड असणार्या महिलांसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये करियर बनवण्यासाठी खूप ऑपशन्स उपलब्घ आहेत. या क्षेत्रात गूगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम सारख्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जॉब करून महिला आपले भविष्य सांभाळू शकतात.
कॉम्पुटर आणि टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात रोज नवीन नवीन प्रयोगांमुळे या क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर प्रोफेशनल ची डिमांड वाढतच चालली आहे, तुम्ही सुद्धा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनयर बनून आपले भविष्य उज्वल करू शकता.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट साठी शैक्षणिक पात्रता – Eligibility for Software Development
- सायन्स स्ट्रीम मधून १२ वि पास असणे गरजेचे.
- इंजिनयर चा कोर्स करणे आवश्यक
- बीई, बीटेक, एमई, एमएस, एमटेक डिग्री नंतर तुम्ही सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग किंवा डेव्हलपमेंट च्या क्षेत्रात करियर करू शकता.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट साठी प्रमुख इन्स्टिटयूट -Software Development Institute in India
- इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नई दिल्ली.
- एनआयटी वारंगल – नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी
- बिट्स पिलानी – बिरला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड सायन्स
- डीटीयू – दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी
याबरोबरच महिला बँकिंग, टीचिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, इंजिनियरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, इंटिरियर डिसायनिंग सोबतच मेडिकल क्षेत्रात गायनेकोलॉजिस्ट आणि ऑब्स्ट्रॅटिशियन, पिडिएट्रिशियन, फिजिशियन आणि फार्मासिस्ट अश्या विविध क्षेत्रात काम करून चांगले करियर निर्माण करू शकतात.