Buffalo chi Mahiti
आपल्याकडे आपण पुष्कळ प्रकारचे प्राणी पाळतो; त्यापैकी म्हैस हा एक पाळीव प्राणी आहे.
म्हैस विषयी माहिती – Buffalo Information in Marathi
हिंदी नाव : | भैंस |
इंग्रजी नाव : | Buffalo |
म्हशीला चार पाय, दोन डोळे, दोन शिंगे व दोन कान असतात. म्हशीला एक लांब शेपटीही असते. म्हशीचा रंग फक्त गडद काळा असतो. कपाळावर पांढरा भागही असू शकतो.
जाती : म्हशींच्या अनेक जाती आहेत. जाफराबादी, सुरती, नागपुरी अशा प्रकारच्या प्रचलित जाती आहेत.
वयोमर्यादा : म्हशींची वयोमर्यादा सर्वसाधारण १५ ते २० वर्षांपर्यंत असू शकते.
म्हशीचे वजन – Buffalo Weight
जास्त दूध देणाऱ्या, सशक्त म्हशीचे वजन साधारणपणे २५० ते ३०० किलोग्रॅमपर्यंत असू शकते.
उपयोग : म्हशीपासून आपणास दूध मिळते. म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्या करतात. तसेच गोबरगॅससाठी, घर सारवण्यासाठी आणि शेणखत म्हणून शेतासाठी उपयोग होतो. सडा मारण्यासाठी, सुद्धा शेणाचा उपयोग होतो.
म्हशीचे अन्न – Buffalo Food
म्हैस ही पूर्णपणे शाकाहारी आहे. ती गवत खाते, कडबा खाते. तसेच इतर अन्नपदार्थही खाते.
इतर माहिती :
म्हशीला पाण्यात बसायला आवडते. म्हैस ही गायीपेक्षा अंगाने स्थूल असते. म्हशीच्या वासराला ‘रेडकू’ म्हणतात, म्हशीच्या दुधापासून खवा, बासुंदी, दही, लोणी, तूप वगैरे पदार्थ बनवतात. म्हशी आपल्या शेपटीचा उपयोग अंगावर बसलेल्या माश्या उठवण्यासाठी करतात. म्हशीच्या ओरडण्याला ‘रेकणे’ असे म्हणतात.
शेतकऱ्यांना तसेच गवळी लोकांना म्हशी पाळण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. प्रत्येक गावात एक पशुवैद्यकीय दवाखाना असतो. त्याच्यातर्फे म्हशींची वेळोवेळी तपासणी केली जाते. तेथे म्हशींना नेऊन त्यांना लसीकरण केले जाते.
म्हशींनी दूध जास्त द्यावे यासाठी बाजारातून अनेक प्रकारचे खाद्य मिळते. त्याचा वापर अनेक शेतकरी व गवळी लोक आपल्या म्हशींसाठी करतात.
म्हशी पालनाचा व्यवसाय अनेक गवळी व शेतकरी लोकांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देतो.
म्हशीच्या घराला ‘गोठा’ म्हणतात. गवळी लोक म्हशीला फार आस्थेने पाळतात .