Vangi chi Mahiti
बाराही महिने सदाबहार मिळणारी भाजी म्हणजे वांगे ही भाजीची चव … जवळपास सर्वांना आवडणारी अशी आहे.
या भाजीचे वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली जाते. लहान मुलांपासून हे वृद्धांपर्यंत सर्वांना आवडते गरिब श्रीमंत शाकाहारी मांसाहारी सर्व जाती धर्मातील लोक खातात. कमी उष्मांक, पाणी जादा अशा वांग्यात तंतू, कॅल्शियम, फॉस्फरस, फोलेट आणि न्हिटॅलिन ‘बी’ आणि ‘सी. असते.
वांग्याची संपूर्ण माहिती, फ़ायदे, उपयोग – Brinjal Information in Marathi
हिंदी नाव | बैंगन |
इंग्रजी नाव | Brinjal |
आयुर्वेदात वांगे हे मधूमेह, रक्तदाब आणि वजन कमी करण्यासाठी गुणकारी असल्याचे मानले जाते. भारतीय खाद्य संस्कृतीचा अभेद्य भाग झालेल्या वांग्याचा उल्लेख लोकसंगीतात, म्हणी, वाक्प्रचारातही आढळतो. भारतात सुमारे ५.५ लाख हेक्टर जमिनीत वांग्याचे पिक घेतले जाते. चीन नंतर भारत हा सर्वात मोठा वांगी उत्पादक देश आहे.
जगातील एकूण उत्पादनापैकी २.६ टक्के वांगी भारतात होतात. १४ लाख लहान-मध्यम शेतकरी वांग्याचे पिक असावेत. देशात सर्व प्रांतात वांगी पिकवली जातात. सरासरी उत्पादन हेक्टरी १५.६ टन इतके आहे. हिरव्या व जांभळ्या रंगाचे वांगे भाजी मंडईत मुबलक प्रमाणात असतात.
वांग्यामध्ये प्रामुख्याने काळी व पांढरी असे दोन प्रकार आहेत. काळी वांगी अधिक गुणकारी असतात. जेवढी कोवळी तेवढी ती अधिक गुणयुक्त व शक्तिवर्धक मानली जातात. कफ प्रकृतीच्या व समप्रकृतीच्या लोकांनीही हिवाळ्यात वांग्याचे सेवन करणे, गुणकारी ठरते. लहान कोवळे वांगे कफ व पित्तनाशक असते.
वांगी आणि टोमॅटोचे सूप बनवून प्याल्याने मंदाग्नी दूर होतो व न पचलेल्या अन्नाचे पचन होते. कोवळी वांगी विस्तवावर भाजून मधात कालवून संध्याकाळी चाटून खाल्ल्याने झोप चांगली येते. ज्या स्त्रियांना मासिक पाळी साफ होत नाही त्यांनी वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी व गूळ यांचे सेवन केल्यास मासिक पाळी साफ होते; पण उष्णप्रकृतीच्या लोकांनी हा प्रयोग करू नये.
वांग्याची भाजी खाल्याने लघवीचे प्रमाण वाढते व मूत्रमार्गातील सुरुवातीचा मूतखडा विरघळून जातो. वांग्याचे प्रमाण वाढते. व मूत्रमार्गातील सुरुवातीचा मूतखडा विरघळून जातो. वांग्याचे पोटीस गळूवर बांधल्याने गळू जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असल्याने भाजीत देठांचा उपयोग होतो.