Blood Donation Slogans in Marathi
रक्त आपल्या शरीराकरता किती उपयोगी आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे मनुष्याला अनेक आजारांना सामोरं जाव लागतं, कित्येकवेळा तर मनुष्याचा मृत्यु देखील ओढवतो. एखाद्या अपघातात मनुष्य जख्मी झाल्यास किंवा गंभीर आजार झाल्यास माणसाच्या शरीरात रक्ताची कमतरता मोठया प्रमाणात निर्माण होते.
ही कमतरता भरून काढण्याकरता मनुष्याला आवश्यक त्या रक्तगटाची गरज भासते, अश्या वेळी एका व्यक्तीच्या शरीरातुन रक्त काढुन दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात देण्याने ही कमतरता कमी होऊ शकते.
रक्त केवळ मनुष्याच्या शरीरातच तयार होते याला कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगशाळेत तयार करता येत नाही.
आपण देखील रक्तदान करून एखाद्या गरजवंताची निकड पुर्ण करण्याकरीता पुढे यावं या करीता येथे रक्तदाना करीता काही स्लोगन्स् देत आहोत. यामुळे तुमची रक्तदान करण्याची भावना वाढीस लागेल व आपण रक्तदान करून एखाद्या गरजवंतांची गरज पुर्ण करू शकाल. हे महादान करून पुण्य पदरात पाडुन घेउ शकाल.
अश्या पध्दतीचे स्लोगन्स आपण सोशल मिडीया साइट्सवर देखील शेयर करू शकता जणेकरून जास्तीत जास्त लोक या पुण्यकर्माकडे वळायला हवेत आणि रक्तदान करून रक्तपेढयांमधे होणाऱ्या रक्ताच्या कमतरतेला पुर्ण करण्याकरीता आपला सहयोग देउं शकतील जेणेकरून एखाद्या गरजवंत किंवा निराधार व्यक्तीला त्याचा उपयोग होऊ शकेल.
रक्तदान जीवनदान नारे – Blood Donation Slogans in Marathi
तुमचे रक्त दुसऱ्याचे जीवन आहे.
रक्तदान सर्वश्रेष्ठदान.
मंदीरात जाऊन करता ईश्वरसेवा,रक्तदान करून करा समाजसेवा.
रक्तदान ही जन सामान्यांची सेवा, यालाच मानुया ईश्वरसेवा.
रक्त हे केवळ शरीरातच तयार होतं हे माहीतीये नं? मं वाट कसली पहाताय? चला रक्तदान करूया!
दानात दान रक्तदान, समाजात वाढेल मान!
रक्तदान श्रेष्ठदान मानुया,चला रक्तदान करूया.
रक्ताला कुठली जात भाषा, रक्तदान करा झटका निराशा.
रक्ताचा थेंब् न थेंब् मनुष्याकरता वरदान, उठा चला करूया रक्तदान.
आपल्या वाढदिवसाला वाचवु एखाद्याचे प्राण, अनमोल भेट देऊया करूया रक्तदान!
रक्तदानाला पर्यायी समजु नकारक्तदान करणे अनिवार्य समजा.
रक्तदान करून जोडा नविन नाते, असे केल्याने आपले काय जाते?
पुण्यक्षेत्री दान धर्म करत बसण्यापेक्षा, रक्तदान करून आपल्या शरीरालाच मंदिर बनवुया.
रक्ताची गरज कुणाला आहे, तुलाही आहे मलाही आहे.
रक्त कधी कारखान्यात बनेल का? नाही नां, आपल्याला रक्तदान करावेच लागणार!
जसा पाण्याचा थेंब् न थेंब धरणात साठायला हवा, तसा रक्ताचा थेंब् न थेंब रक्तपेढीत साठवायला हवा.
रक्तदान करूया… राष्ट्रीय एकात्मता वाढवुया.
रक्तदान आहे जीवनदान, कारण यामुळेच वाचतात अनेकांचे प्राण.
मनी असेल मानवसेवेचा भाव, रक्तदाना सारखा दुसरा नाही उपाय.
आता सगळे मिळुन मानवहितार्थ कार्य करूया, चला आपण सगळेजण रक्तदान करूया.
\रक्तदान केल्याने येत नाही कमजोरी, ही कुठुन आणलीत मजबुरी?
रक्तदानासारखे नाही दुसरे कुठले पुण्य, तरीही त्याचे प्रमाण का आहे नगण्य?
तुम्ही आज करा रक्तदान, उद्या पुढची पिढी ठेवेल तुमचा मान.
गंगेचे पाणी कधीही आटणार नाही, रक्तदान करणे आम्ही सोडणार नाही.
सेवाधर्म पुण्य आहे, रक्तदान महापुण्य आहे.
रक्ताची गरज कुणालाही पडु शकते, रक्तदानाकरीता नेहमी तत्पर राहा.
रक्तदाता हा जिवनदाता असतो.