Kali Miri in Marathi
आपल्याला सर्वांना परिचित असणारी स्वयंपाकात स्त्रियांना पदार्थ चविष्ट होण्यास मदत करणारी वनस्पती म्हणजे मिरी होय, मिरीचा अनेक गोष्टीसाठी वापर केला जातो. तसेच मिरी याचा औषधीसाठी सुद्धा वापर केला जातो. अशी मिरी विषयची बरीच काही माहिती आहे की जे आपण समोर पाहणार आहोत.
काळीमिरी ची माहिती आणि फायदे – Black Pepper in Marathi
शास्त्रीय नाव : | (पायपर् नायग्रम्) Piper nigrum |
इंग्रजी नाव : | (ब्लॅक पेपर) Black pepper |
हिंदी नाव : | काली मिर्च |
मिरी ही वेली वर्गात मोडते. याचा वेल हा कोणत्याही मोठ्या झाडांचा आधार घेऊन वाढतो. या वेलाची पाने हिरवीगार, आकाराने विड्याच्या पानाप्रमाणे असतात. पानांच्या पृष्ठभागावर ३ ते ५ शिरा असतात. या वेलाला लहान लहान फुले येतात. ती झुपक्याने येतात. फळे आकाराने गोल व छोटी छोटी असतात, तीच मिरी होय. ही फळे कच्ची असताना प्रथम हिरवी दिसतात व पिकल्यावर लाल रंगाची आणि वाळल्यावर काळ्या रंगाची दिसतात. अश्या प्रकारे याच मिरीत रूपांतर होते.
काळी मिरी लागवड – Kali Miri Lagwad
मिरीची लागवड करण्यासाठी उष्ण व दमट हवामानाची गरज लागते. याची लागवड करताना भुसभुशीत, फार काळ पाणी साठून न राहणारी जमीन लागते. याची लागवड केल्यानंतर सर्वसाधारणपणे ३ ते ४ वर्षांत फळे येतात, तसेच २० ते २५ वर्षांपर्यंत एका वेलाला फळे येतात, तसेच याची लागवड गाठी असलेल्या फांदया घेऊन केली जाते. ग्रीष्म ऋतूत फूले व वर्षा ऋतूत फळे येतात.
सर्वसाधारणपणे जुलै महिन्याच्या सुरुवातीला फुले येतात. ती झुपक्याने येतात, त्याला फळे लागतात आणि तीसुद्धा घडानेच येतात. मार्च महिन्यात ही फळे तयार होतात, तसेच श्रीलंका, मलेशिया, भारतातील केरळ, कर्नाटक, आसाम व कोकण येथे याचे उत्पन्न घेतले जाते.
मिरीचे औषधी उपयोग – Black Pepper Benefits
बाहेरून वापरण्यासाठी व पोटात घेण्यासाठी मिरीचा उपयोग केला जातो. वेदनाशामक, कफनाशक, पाचक, जंतुनाशक, कृमिनाशक म्हणून मिरीचा उपयोग केला जातो. शरीरावर सूज आली असता बाहेरून लेप देण्यासाठी मिरीचा उपयोग केला जातो. रांजणवाडी, चेहऱ्यावरील मुरुमे यांवरसुद्धा मिरी उगाळून लावतात. तसेच दात किडणे, दात दुखणे यांवर मिऱ्याच्या चुर्णाने मंजन करावे; तसेच त्याच्या काढ्याने गुळण्या कराव्यात तेने सुद्धा आराम मिळतो. सर्दी, कफ, दमा, बेशुद्ध पडणे या रोगांत मिरी उपयोगी पडते.
सर्दी, अजीर्ण झाले असल्यास तसेच भूक लागत नसल्यास मिऱ्याचे चुर्ण वापरतात. त्याचबरोबर सुंठ, पिंपळी, मिरी यांचे चूर्ण करून योग्य प्रमाणात घेतल्यास खोकला, सर्दी, कफ कमी होतो. सर्दी-खोकल्याने आवाज बिघडला असेल तर तूप व मिरपूड यांचे मिश्रण घ्यावे म्हणजे आराम मिळतो. खोकला येत असेल तर मिऱ्याची पूड मधात कालवून घ्यावी. त्याने सुद्धा आराम मिळतो.आयुर्वेदात सुद्धा मिरीचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे त्रिकूट चूर्ण, मरिच चूर्ण अशा प्रकारे अनेक कल्प बाजारात उपलब्ध आहेत. थंडीच्या दिवसांत अंगाला खाज सुटत असेल तर मिऱ्याचे चूर्ण साजूक तुपात मिसळून खावे. त्याने सुद्धा छान असा आराम मिळतो.’
काळ्या मिरीचे विविध उपयोग – Black Pepper Uses
काळ्या मिरीचा उपयोग रोजच्या स्वयंपाकात करतात. मिरी चवीने तिखट असते. मसाला करताना मिऱ्याचा उपयोग करतात. मिऱ्याची पूड करून ठेवली जाते. तसेच भाजी, आमटीला चव येण्यासाठी मिऱ्याची पूड वापरली जाते; तर आंब्याचा रस पिताना पाचक म्हणून याचा उपयोग केला जातो. मसाले भात, पुलाव यांसारख्या पदार्थात नुसते मिरे फोडणीत घालतात, त्याने छान अशी चव येते. चिंचेचे, आमसुलाचा सार करताना मिऱ्याचा वापर करतात. मिऱ्याची पूड स्वयंपाकात स्वादासाठी वापरतात, तसेच मेतकूट तयार करताना पण मिरीचा वापर केला जातो.
इतर माहिती :
काळी मिरी व पांढरी मिरी असे मिरीचे दोन प्रकार आहेत; परंतु काळ्या मिरीचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. या वेलाला फळे लागल्यावर ती पिकल्यावर म्हणजे लाल रंगाची झाल्यावर तोडून ती उन्हात वाळवतात. नंतर उन्हात त्याचा रंग काळा होईपर्यंत वाळवतात. म्हणजे त्याची मिरी तयार होते, अश्या प्रकारे आपल्याला इथे मिरी विषयची बरीच काही माहिती मिळाली.
मिरी विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ About Black Paper
उत्तर – मिरीचे शास्त्रीय नाव (पायपर् नायग्रम्) Piper nigrum हे आहे.
उत्तर – मिरीचे उत्पन्न श्रीलंका, मलेशिया, भारतातील केरळ, कर्नाटक, आसाम व कोकण येथे घेतले जाते.
उत्तर – काळी मिरी व पांढरी मिरी असे मिरीचे दोन प्रकार आहेत.