Bipin Chandra Pal Mahiti
भारताच्या इतिहासातील एक महान क्रांतिकारक तसचं, ‘क्रांतिकारी विचारांचे जनक’ म्हणून बिपिनचंद्र पाल यांचे नाव घेतले जाते. ते राष्ट्रीय नेत्याबारोर एक शूरवीर क्रांतिकारक आणि इतिहासातील प्रसिद्ध असणाऱ्या त्रिमुर्तींपैकी “लाल-बाल-पाल” मधील एक होतं. ही त्रिमूर्ती म्हणजेच लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या राष्ट्रीय नेत्यांच्या जोडी होय.
या त्रीमुर्तीला इंग्रज सुद्धा घाबरून जात असतं. त्याचं बरोबर बिपिनचंद्र पाल यांची ओळख एक प्रसिद्ध राजकारणी, पत्रकार, शिक्षक आणि प्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांची कीर्ती जगभर पसरली होती.
बिपीनचंद्र पाल या क्रांतीकारी राष्ट्रीय नेत्याने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरता खुप संघर्ष केला.
तसचं त्यांनी, आपले संपूर्ण जीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी देशातील जनतेच्या मनात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची पायाभरणी करण्याची महत्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळेला त्यांनी अनेक प्रभावशाली नेत्यानं सोबत काम केलं होतं. याच बरोबर सन १९०५ साली इंग्रजांनी बंगालची फाळणी केली होती.
या फाळणीच्या विरोधात विभाजन रद्द व्हावं याकरता त्यांनी इंग्रजांना विरोध केला होता.
Freedom Fighter Bipin Chandra Pal
बंगालच्या विभाजनाच्या वेळेला त्यांनी इंग्रज शासनाविरुद्ध आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनात त्यांना देशातील जनतेची मोठ्या संख्येने साथ मिळाली होती.
महात्मा गांधी यांच्या द्वारा सुरु करण्यात आलेलं “स्वदेशी आंदोलना” मध्ये बिपिनचंद्र पाल यांनी देखिल सहभाग घेतला.
“स्वदेशी आंदोलनात” त्यांनी भागच नाही घेतला तर, संपूर्ण देशभर ते पसरविण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली. या आंदोलना दरम्यान त्यांनी देशातील नागरिकांना फक्त देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूच वापरायचा संदेश दिला.
तसेच, इंग्लंडमध्ये उत्पादित मालाचा त्यांनी बहिष्कार केला होता. बिपिनचंद्र पाल यांनी मॅनचेस्टरच्या गिरण्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या कपड्यांचा पूर्णपणे बहिष्कार करून औद्योगिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या ठिकाणी संप करून इंग्रज सरकारची झोप उडवून टाकली होती.
‘राष्ट्रीय चळवळी” दरम्यान बिपिनचंद्र पाल यांनी आपल्या भाषणातून देशातील जनतेच्या मनात नविन चेतना संचारण्याचे महत्वपूर्ण काम केलं. शिवाय, देशातील सामान्य जनतेला जागरूक करण्याचे महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी पार पाडली.
बिपिनचंद्र पाल यांची अशी धारणा होती की, इंग्रज शासना विरुद्ध शांततेने चळवळी, मोर्चे काढून काहीच फरक पडणार नाही. अश्या प्रकारचे कितीही आंदोलन केली तरी इंग्रजांच्या मानवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल तर इंग्रज शासनावर जोरदार हल्ला करायला पाहिजे.
स्वातंत्र्य सेनानी बिपिनचंद्र पाल यांच्या याच विचारधारांमुळे त्यांना “स्वातंत्र्य चळवळीतील” क्रांतिकारक विचाराचे जनक म्हंटले जाते. या लेखात आम्ही आपणास याच महान क्रांतिकारकाच्या जीवनाविषयी माहिती सांगणार आहोत-
बिपिनचंद्र पाल एक महान क्रांतिकारक… – Bipin Chandra Pal Information in Marathi
बिपिनचंद्र पाल यांच्या बद्दल संपूर्ण माहिती- Bipin Chandra Pal in Marathi
नाव (Name) | बिपिनचंद्र पाल (Bipin Chandra Pal) |
जन्म (Birthday) | ७ नोव्हेंबर १८५८ |
जन्मस्थान (Birthplace) | हबीबगंज जिल्हा, (वर्तमान बांगलादेश) |
आई (Mother Name) | नारायणी देवी |
वडिल (Father Name) | रामचंद्र |
शिक्षण (Education) | मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी समाजसुधारणेकडे वाटचाल सुरु केली |
विवाह (Wife Name) | दोन वेळा पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसरा विवाह विधवेबरोबर केला. |
मृत्यु (Death) | २० मे १९३२ |
बिपिनचंद्र पाल यांचे सुरवातीचे जीवन – Bipin Chandra Pal in Marathi
भारताचे महान क्रांतिकारक बिपिनचंद्र पाल यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८५८ साली अविभाजित भारतातील हबीबगंज जिल्हाच्या पोईल गावात झाला होता. हा जिल्हा आता बांगलादेशात येतो.
त्यांचा जन्म एका समृद्ध आणि संपन्न हिंदू वैष्णव कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र पाल असून ते एक फारसी विद्वान होते.
तसेच, छोटेशे जमीनदार देखील होते. बिपिनचंद्र पाल यांनी लहानपणीच ब्राह्मण धर्म स्वीकारला होता.
यानंतर, सन १८७६ साली शिवनाथ शास्त्री यांनी त्यांना ब्राह्मण समाजाची दीक्षा दिली.
ब्राह्मण धर्माची दीक्षा घेतल्यानंतर बिपिनचंद्र पाल सुद्धा ब्रह्मण समाजातील इतर सदस्यांप्रमाणे सामाजातील वाईट चालीरीती आणि रूढीवादी परंपरांचा ते विरोध करू लागले.
ते सुरवातीपासूनच जातिगत भेदभावाच्या विरोधात होते, म्हणूनच त्यांनी खूप लहान वयापासून समाजात सुरु असलेल्या या जातीभेद परंपरेच्या विरुद्ध आवाज उठविला.
इतकेच नाही तर देशात विधवा विवाह प्रथा बंद असतांना त्यांनी एका विधवेशी विवाह करून ही प्रथा मोडून काढली होती.
About Bipin Chandra Pal
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात विधवा स्त्रियांना समाजात स्वीकारले जात नसे.
अश्या कठीण वेळेला विधवा विवाह प्रथा मोडून काढण्याकरता त्यांनी समाजातील एका विधवेशी विवाह केला.
त्यामुळे बिपिनचंद्र पाल यांना आपल्या परिवारासोबत संबंध तोडावे लागले होते.
बिपिनचंद्र पाल यांना सुरवातीपासूनच एक सवय होती की, कुठलाही निर्णय एकदा घेतला की त्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहत असतं.
म्हणूनच, बिपिनचंद्र पाल यांना आपल्या परीवारापासूण वेगळ व्हावं लागलं असलं तरी सुद्धा त्यांनी घेतलेला विधवा विवाहाचा आपला निर्णय बदला नाही. यानंतर त्यांच्यावर सामाजिक दबाव सुद्धा खूप वाढला होता.
परंतु ते कधीच डगमगले नाहीत किंवा कोणत्या प्रकारचा समजोताही केला नाही.
बिपिनचंद्र पाल यांचे शिक्षण- Bipin Chandra Pal Education
महान स्वातंत्र्य सेनानी बिपिनचंद्र पाल यांनी आपले शिक्षण कलकत्ता येथे पूर्ण केले. कलकत्ता मधील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले.
बिपिनचंद्र पाल यांना काही कारणास्तव आपले शिक्षण मध्येचं सोडावं लागलं होतं.
खर म्हणजे त्यांची सुरवातीपासूनच शिक्षणात काही विशेष रुची नव्हती. परंतु त्यांनी वेगवेगळया पुस्तकांचा बारकाईने अभ्यास केला होता.
बिपिनचंद्र चंद्र पाल यांनी मुख्याध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती.
यानंतर त्यांनी कलकत्या मधील सार्वजनिक पुस्तकालयात एक ग्रंथपाल म्हणून काम केलं. त्या ठिकाणी त्यांची भेट शिवनाथ शास्त्री, एस.एन. बॅनर्जी आणि बी. गोस्वामी यांच्या सारख्या अनेक राजकीय नेत्यांसोबत झाली.
यांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांची शिक्षणाप्रती गोडी कमी झाली.
परिणामी त्यांनी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. आपले महाविद्यालयीन शिक्षण मध्यंतरीच सोडून ते राजनीतीमध्ये येण्यास सक्रीय झाले.
राजनीतीत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिपिनचंद्र पाल लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि अरविंद यासारख्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात आले.
या नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर ते त्यांच्या उग्रवादी आणि राष्ट्रवादी देशभक्तीने खूपच प्रभावित झाले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील बिपिनचंद्र पाल यांची महत्व पूर्ण भूमिका- Indian Independence Movement
“लाल- बाल-पाल” या त्रीमुतींपैकी लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल होय. या तिन नेत्यांच्या एकत्रित समूहाला लाल-बाल-पाल असे म्हटलं जाते.
या त्रीमुतींपैकी एक म्हणजेच बिपिनचंद्र पाल हे स्वदेशी चळवळीचे प्रमुख शिल्पकार होते.
ते देशाच्या सुरक्षा करता नेहमीच तत्पर राहत असतं. बिपिनचंद्र पाल यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन अर्पित केलं होतं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या अनेक चळवळीत त्यांनी आपले योगदान दिलं होतं.
सन १८८७ साली झालेल्या कॉग्रेस च्या अधिवेशनात आर्म्स एक्टचा (कायद्याचा) त्यांनी तीव्र निषेध केला.
तसेच, सन १९०५ साली झालेल्या बंगालच्या फाळणीच्या वेळी बिपिनचंद्र पाल यांनी ब्रिटीश शासनाच्या अनौपचारिक धोरनांविरूढ सक्रीय भूमिका निभावली.
याव्यतिरिक्त त्यांनी देशाच्या अनेक भागातील सभांना संबोधित केलं होतं.
विदेशी मालाविरुद्ध आपला आवाज उठवून विदेशी माल देशातील नागरिकांनी वापरू नये अश्या प्रकारचा संदेश देशच्या नागरिकांना देऊन त्यांनी विदेशी मालाचा पूर्णपणे बहिष्कार केला.
सन १९०७ साली बिपिनचंद्र पाल यांनी आपल्या “वंदेमातरम्’ या मासिकाच्या माध्यमातून इंग्रजांन विरुद्ध लोकांचे जनमत तयार केलं.
त्यांनी आपल्या मासिकातून इंग्रजांन विरुद्ध तयार केलेल्या जनमता करता त्यांच्यावर इंग्रज सरकारने राजद्रोहाचा गुन्हा लावून त्यांना तुरुंगात डांबले.
तसचं, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपले आंदोलन अजून जोमाने सुरु केले.
Bipin Chandra Pal Mahiti
ज्यावेळेस इंग्लंड सरकार भारतात आपल्या दडपणाच्या कायद्या अंतर्गत कुठल्याही नागरिकाला पकडून तुरुंगात टाकत होते.
त्यावेळी बिपीनचंद्र पाल इंग्लंडला गेले, त्याठिकाणी त्यांनी सन १९०८ साली “स्वराज पत्रिकेची”(मासिक) स्थापना केली.
या पत्रिकेच्या माध्यमातून आपले क्रांतिकारक विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
परंतु, त्यांच्या या पत्रिकेवर प्रतिबंध लावला गेल्यामुळे ते पुन्हा भारतात परत आले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी “हिंदू रिव्यू” नावाचे पत्र (वर्तमानपत्र) सुरु केले. परंतु, सन १९०९ साली कर्जन वायली यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर देशात झालेल्या राजकीय परीणामांमुळे सरकारने पत्रिकेच्या प्रकाशने बंद करायाल सुरवात केली. यामुळे भारतातील महान क्रांतिकारक नेता बिपिनचंद्र पाल यांचे भारतातील प्रकाशन बंद पडले.
परिणामी लंडन मध्ये बिपिनचंद्र पाल यांचे गरिबी आणि मानसिक परिस्थितीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप वाईट झाली.
काही काळानंतर बिपीनचंद्र पाल यांनी स्वत:ला जहाल चळवळी आणि राष्ट्रावादापासून दूर केलं.
जहाल चळवळी आणि राष्ट्रावादापासून दूर जाऊन त्यांनी आपल्या महान संघीय विचारांच्या माध्यमांतून स्वातंत्र्य राष्ट्रांचा एक संघ तयार केला.
देशाच्या स्वराज्याचा मुद्दा उठविणारे बिपिनचंद्र पाल हे “महात्मा गांधी” किंवा “गांधी पंथ” ची आलोचना करणारे पहिले व्यक्ती होते. याच कारणामुळे त्यांनी गांधीजींच्या असहयोग चळवळीला विरोध केला होता. महात्मा गांधी यांचे भारतात येण्याआधीपासूनच बिपिनचंद्र पाल यांनी त्यांची निंदा करण्यास सुरवात केली होती.
सन १९२१ साली झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात हे पूर्णपणे दिसून आलं होतं.
बिपिनचंद्र पाल यानी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी असतांना त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महात्मा गांधी यांच्या तर्क विचारानं व्यतिरिक्त त्यांच्या काल्पनिक विचारांनची निंदा केली होती.
बिपिनचंद्र पाल यांनी सन १९२० साली स्वता:हून राजनीतितून सन्यास घेतला.
राजनीतिक सन्यास घेतल्यानंतर सुद्धा राष्ट्रीय समस्यांविषयी असलेले आपले मत त्यांनी आयुष्यभर व्यक्त करत राहिले.
त्याच्या क्रांतिकारी विचारधारे समोर इंग्रज सरकारदेखील धास्ती खात असे.
बिपिन चन्द्र पाल यांची पूस्तके – Bipin Chandra Pal Books
सन १८९८ साली धर्मशास्त्राच्या अभ्यासाकरिता बिपिनचंद्र पाल इंग्लंड ला गेले होते.
परंतु, एका वर्षानंतर ते भारतात वापस आले आणि असहकार चळवळीतील इतर नेत्यांसमवेत मिळून त्यांनी लोकांमध्ये स्वराज्याची भावना निर्माण केली.
लोकांच्या मनात स्वातंत्र्यांची भावना निर्माण करण्याकरिता आणि सामाजिक जागरुकता जागरूक करण्यासाठी अनेक लेख लिहिले होते.
बिपिनचंद्र पाल हे देशातील लोकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणारे खरेखुरे देशभक्त होते.
लोकांच्या मानता स्वातंत्र्याप्रती भावना निर्माण व्हावी याकरता त्यांनी आपला आवडता पत्रकारी व्यवसाय सुरु केला.
त्यांनी स्वराज्याच्या प्रचार आणि प्रसार करण्याकरता अनेक वर्तमानपत्रे, साप्ताहिक आणि पुस्तकांचे प्रकाशन केलं.
बिपिनचंद्र पाल हे केवळ एक महान क्रांतिकारक आणि लेखकच नव्हते, तर ते एक चांगले संपादक देखील होते. त्यांनी अनेक रचना केल्या.
तसेच, मासिक आणि वर्तमानपत्रांचे संपादन पण केलं होतं. त्यापैकी त्यांनी रचलेल्या काही रचनांचे खाली वर्णन केलं आहे, ते पुढील प्रमाणे-
- इंडियन नेस्नलिज्म
- नैस्नल्टी एंड एम्पायर
- स्वराज एंड द प्रेजेंट सिचुएशन
- द बेसिस ऑफ़ रिफार्म
- द सोल ऑफ़ इंडिया
- द न्यू स्पिरिट
- स्टडीज इन हिन्दुइस्म
- क्वीन विक्टोरिया – बायोग्राफी
संपादन:- बिपिनचंद्र पाल यांनी एक चांगल्या लेखक आणि पत्रकाराच्या रुपात खूप वर्षांपर्यंत काम केलं आहे.
About Bipin Chandra Pal
- परिदर्शक (1880)
- बंगाल पब्लिक ओपिनियन ( 1882)
- लाहौर ट्रिब्यून (1887)
- द न्यू इंडिया (1892)
- द इंडिपेंडेंट, इंडिया (1901)
- बन्देमातरम (1906, 1907)
- स्वराज (1908 -1911)
- द हिन्दू रिव्यु (1913)
- द डैमोक्रैट (1919, 1920)
- बंगाली (1924, 1925)
लाल-बाल-पाल यांची प्रसिद्ध त्रिमूर्ती – Lal Bal Pal
लाला लाजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीन चंद्र पाल या तिघांनीही मूलभूत अधिकारांची बाजू परखडपणे मांडली.
उदाहरणार्थ मँचेस्टर किंवा स्वदेशी गिरण्यांमध्ये बनविण्यात आलेले पश्चिमी कपडे जाळणे, इंग्लंडमध्ये निर्मित मालावर बहिष्कार करणे, आणि इंग्रजांच्या मालकीच्या व्यापार आणि उद्योगांला पूर्णपणे बंद करणे यासारखे अनेक प्रकारचे संदेश इंग्रजांन पर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केलं.
वंदेमातरम् प्रकरणा बद्दल बिपीन चंद्र पाल यांनी श्री अरबिंदो यांच्या विरुद्ध साक्ष देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना सहा महिन्याचा तुरुंगवास झाला होता. अश्या या थोर क्रांतीकारकाणे सन १९०४ साली मुंबई मध्ये झालेल्यला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सत्रात, तसचं सन १९०५ साली बंगालच्या विभाजनाच्या वेळेला, स्वदेशी आंदोलन, असहयोग आंदोलन आणि सन १९२३ सालच्या बंगाल करारा सारख्या अनेक चळवळी तसेच आंदोलनांमध्ये भाग घेतला होता. बिपिनचंद्र पाल यांनी सन १८८६ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोकांमध्ये भेदभाव करणाऱ्या आणि निसर्गाची हानी करून प्रदूषण करणारा शस्त्रास्त्रांचा कायदा हाणून पाडण्यासाठी त्यांनी सन १८८७ साली त्यांनी या कायद्याविरुद्ध एक भक्कम स्वरुपाची याचिका दाखल केली.
देशात पसरलेल्या सामाजिक वाईट प्रथा दूर करण्यासाठी आणि राष्ट्रीय टीकेच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रवादाच्या भावनेला पुढाकार देण्याकरता बिपीनचंद्र पाल यांनी भाग घेतला होता.
बिपिनचंद्र पाल यांचे विध्वंसक विचार – Bipin Chandra Pal Quotes
भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी बिपिनचंद्र पाल हे उग्रवादी राष्ट्रीयतेचे सक्रीय कार्यकर्ते होते. या बाबीनवरूनच आपल्याला अंदाज लावू शकतो की, निडरपणा त्यांच्या विचारांमध्ये बारकाईने भरलेला होता.
तसचं सन १९०७ साली अरबिंदो यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालविला जात होता तेंव्हा बिपिनचंद्र पाल यांना त्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याकरता बोलविण्यात आलं होतं.
त्यावेळी त्यांनी साक्ष न देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. बिपिनचंद्र पाल यांचे असं मत होतं की,
“गुलामगिरी ही मानवी आताम्या विरूद्ध आहे, परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला स्वातंत्र्य बहाल केलंय.”
नेहमीच राष्ट्रच्याहिताचा विचार करणारे बिपिनचंद्र पाल यांनी अनुभवलं होतं की, विदेशी उत्पादनामुळेच आपल्या देशाची अर्थव्यवस्था लयास चाली आहे.
विदेशातून येणारा माल हा यंत्राच्या साह्याने साह्याने बनविण्यात येत असल्यामुळे आपल्या देशातील लोकांच्या हाताला काम मिळत नाही, त्यामुळे भरपूर लोक बेरोजगार होतं चाले आहेत.
शिवाय आपल्या देशातील उत्पादित मला पेक्षा त्यांचा माल उत्कृष्ट दर्जाचा असल्याने देशातील मालाला जास्त भाव पण मिळत नव्हता. परिणामी देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे तळास गेली होती.
यानंतर बिपिनचंद्र पाल यांनी स्वदेशी माल वापरण्यावर जास्त भर दिला शिवाय देशातील नागरिकांना सुद्धा स्वदेशी माल वापरण्यासाठी प्रेरित केलं.
बिपिनचंद्र पाल हे ब्राह्मण विचारांशी खूपच प्रभावित होते. त्यांनी विधवा विवाहा करिता उघडपणे समर्थन दिलं.
इतकेच नाही तर त्यांनी स्वत: एका विधवा महिले सोबत विवाह करून लोकांकरता ते एक आदर्श बनले.
भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी बिपिनचंद्र पाल हे जातीवादाच्या कट्टर विरोधी होते. म्हणूनच, त्यांनी वर्ग,धर्म,समुदाय विरहीत अशा समाजाची कल्पना केली होती, जो सर्व नागरिकांना समान हक्क व सुविधा देऊ शकेल.
याव्यतिरिक्त राष्ट्रीय आंदोलनाच्या दरम्यान निर्माण झालेली दुफळी महत्वपूर्ण मानली जाते. या दुफळीमुळे या चळवळीला एक नविन वळण मिळालं आणि भारतातील जनमानसात जागरुकता वाढली.
बिपिनचंद्र पाल यांचे निधन – Bipin Chandra Pal Death
बिपिनचंद्र पाल आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात, स्वत: हून कॉंग्रेसपासून वेगळे झाले आणि एकाकी आयुष्य जगू लागले.
भारत देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणारे महान राष्ट्रीय क्रांतिकारक बिपिंचान्द्र पाल एकाकी जीवन जगत असतांना सन २० मे १९३२ साली त्यांचे निधन झाले.
अश्या प्रकारे भारत देशाने आपला एक महान आणि लढाऊ स्वातंत्र्य सेनानी गमावला.
भारताच्या स्वातंत्र्याकरता त्यांनी दिलेलं बलिदान आणि त्याग आपण कधीच विसरु शकणार नाही.
तसचं, स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी केलेल्या संघार्षाला देश कधीही विसरू शकणार नाही. भारत बिपिनचंद्र पाल यांचा कायम ऋणी राहील.
इंग्रज सरकारच्या विरुद्ध आपल्या देशाच्या संपूर्ण स्वराज्य आणि राष्ट्रवादासाठी त्यांनी प्रचंड लढा दिला.
भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी बिपिनचंद्र पाल यांनी आपल्या क्रांतिकारक विचारसरणीसह, स्वातंत्र्याचे आवाहन देखील केलं होतं.
इंग्रज सरकारला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी विनंती करणे बिपिनचंद्र पाल यांना कधीच मान्य नव्हतं.
देशाच्या स्वातंत्र्या बद्दल त्यांचे असं मत होत की, आपल्याला स्वातंत्र्य पहिजे असेल तर ते इंग्रज सरकारला विनंती करून आपल्याला सहजपणे कधीच मिळणार नाही. देशाला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर, त्याकरता आपण इंग्रजांन विरुद्ध लढा दिला पाहिजे.
स्वातंत्र्यसेनानी बिपिनचंद्र पाल निर्भयपणे आपल्या धोरणांचे पालन करत असतं. त्यांच्या उग्र विचारधारांचा देशातील युवापिढीवर खूप मोठ प्रभाव पडला.
बिपिनचंद्र पाल यांच्या विचारधारणेपासून प्रेरणा घेऊन देशातील नवयुवकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत मोठ्या जोमाने भाग घेतला.
बिपिनचंद्र पाल यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत देशाला एक संपन्न, निरोगी आणि स्वातंत्र्य राष्ट्र बनविण्याकरता अर्पण केलं होतं.
त्यांनी दिलेल्या बलिदानाला भारत देश कधीच विसरणार नाही.
आमच्या माझी मराठी ला अवश्य भेट दया.