Bhor Ghat Information in Marathi
मित्रांनो, आपल्या राज्यातील डोंगर माथ्यांमधून नागमोडी रस्ते तयार करून अनेक दूरवरच्या शहरांचे अंतर कमी केलं गेल आहे. या महामार्गावरून प्रवास करतांना आपणास विलोभनीय निसर्गाचे दर्शन होते. उंचच्या उंच उभे असलेले मोठ मोठाले डोंगर, त्यावरून कोसळणारे धबधबे, झाडांची गर्दा हे चित्र पाहून आपल मन अगदी प्रसन्न होवून जाते. आज आपण अश्याच प्रकारच्या एका निसर्गरम्य घाटा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
जाणुया भोर घाट विषयी खास माहिती – Bhor Ghat Information in Marathi
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस पसरलेला भल्या मोठ्या सहयाद्री पर्वतात अनेक प्रकारच्या लहान मोठ्या घाट रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नागमोडी वळणाकार असलेल्या या घाट रस्त्यांवर प्रवास करण्याची मज्याच काही वेगळी असते. भोरघाट हा देखील सहयाद्री पर्वतांच्या डोंगरात असलेला एक महत्वपूर्ण घाट आहे.
हा घाट कोकणातील रायगड जिल्ह्यात असून हा घाट पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहराशी जोडला गेलेला आहे. रायगड वरून लोणावळ्याला जाताना या घाटाचे दर्शन होते. हा घाट मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग ४ वर असून या घाटाला सामान्यतः खंडाळ्याचा घाट देखील म्हटलं जाते. या घाटात इतिहास काळात बांधल्या गेलेल्या राजमाची आणि नागफणी किल्ल्याचे सुंदर चित्र आपणास पाहायला मिळते.
नागमोडी वळणाचा रस्ता असल्याने या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची वृक्षे आढळतात. घनदाट जंगलाच्या स्वरूपात विखुरलेल्या या घाटात पर्यटकांची नेहमीच ये जा सुरु असते. या ठिकाणी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पर्यटकांची विशेष गर्दी असते. उंचच्या उंच डोंगर पोखरून या ठिकाणी रेल्वे मार्गाची निर्मिती केली गेली आहे.
दक्षिण भारतात बंगलोरला जाण्यासाठी रेल्वे या घाटाच्या पहाडी भागातून प्रवास करत असल्याने आपणास निसर्गाचे खरे दृश्य पहायला मिळते. तसचं, दक्षिण भारताला जोडणारा हा सहयाद्री पर्वतातील हा एकमेव घाट आहे. ज्या ठिकाणी या घाटाचा शेवट होतो त्याला खंडाला घाट असे म्हणतात. त्यामुळे जर आपण या घाटाच्या भेटीला गेलात तर आपणास भोर घाटासोबतच खंडाळा घाटाचे सुद्धा दर्शन होईल.
घनदाट जंगल आणि उंच उंच डोंगराळ प्रदेश असल्याने लोक या ठिकाणी छोटी छोटी खोरी करून त्या ठिकाणी शेती करतात. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथील लोक भात शेती पिकवण्यास जास्त भर देतात. डोंगराळ प्रदेशाच्या उतारी भागातून आपणास हे दृश्य पाहायला मिळते. भोरघाटातून वाट काढणारा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पावसाळ्यात प्रवास करणे देखील खूप अवघड काम आहे. कारण, या ठिकाणी पावसाळ्यात खूप दरडी कोसळतात.
पावसळ्यात हा घाट जणू पांढऱ्या शुभ्र धुक्याची अंगावर चादर ओढून घेतो. अशीच काही परिस्थिती हिवाळ्यात देखील पाहायला मिळते. हा देखावा पाहून मन कसं प्रफुलीत होऊन जाते. रेल्वे मार्गशी हा घाट जोडल्या गेला असल्याने या घाटात आपणास पळसदरी, ठाकूरवाडी, मंकी हिल आणि खंडाळा या सारखी महत्वपूर्ण रेल्वे स्थानके पाहायला मिळतात.
या ठिकाणी जाण्यासाठी सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मित्रानो, आपणास देखील निसर्गाचा आनंद घ्यायचा असल्यास आपण देखील या ठिकाणी नक्की भेट द्या. धन्यवाद.