Bhendwal Prediction
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये असणारे भेंडवळ हे गाव भाकीत करण्यासाठी ओळखल्या जाते. येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांच्या रासा मांडण्यात येतात आणि मधोमध एक मातीचे मडके आणि त्या मातीच्या मडक्यावर पुरी, पापड, करंजी, कुरडई,अश्या प्रकारच्या गोष्टी ठेवण्यात येतात आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी या सगळ्या गोष्टींची पाहणी केल्या जात असते.
गेल्या ३५० वर्षापेक्षा अधिक वर्ष पार केलेली ही परंपरा आणि या परंपरेची लोकांमध्ये असलेली लोकप्रियता पाहता या परंपरेला या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात येणार होते परंतु काही लोकांच्या मागणीवरून आणि ३५० वर्षापेक्षा जास्त झालेल्या या परंपरेला बंद न ठेवता लॉक डाऊन चे पूर्णपणे पालन करत यावर्षी सुध्दा ही मांडणी पार पडली.
भेंडवळच्या मांडणीत कोणते भाकीत सांगितल्या गेले – Buldhana Bhendwal Bhavishyavani 2020 in Marathi
यावर्षीच्या मांडणीचे भाकीत सांगताना स्वर्गवासी चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी सांगितले की मांडणीत असलेली करंजी ही तिच्या जागेवरून गायब आहे आणि करंजी हे देशाची आर्थिक स्थिती दर्शवते, आणि ती तिच्या जागेवरून गायब असल्यामुळे देशावर आर्थिक संकट येणार असल्याचे भाकीतात सांगण्यात आले. सोबतच आणखी माहिती सांगताना त्यांनी सांगितले की भादली नावाचे धान्य रोगराईला दर्शवते, आणि भादलीचे धान्य पसरलेलं आढळले आहे म्हणजेच देशावर रोगराईचे सावट येणार आहे असे समजते.
कुरडई, सांडोळी हे जनावरांच्या चारा-पाण्याविषयी माहिती देत असतात यावर्षीच्या मांडणीत कुरडई, सांडोळी यांचे बारीक तुकडे झाल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच जनावरांच्या चारा-पाण्याची कमतरता भासू शकते. घटावर पुरी ठेवण्यात आलेली असते आणि या पुरीला पृथ्वी समजल्या जाते, आणि या वर्षी त्या घटावरील पुरी गायब असल्याचे सांगण्यात येत आहे, म्हणजेच याचा अर्थ पृथ्वीवर संकटाचे सावट आहे.
पावसाचं भाकीत करताना भेंडवळच्या मांडणीमध्ये या वर्षी सांगण्यात आले की पावसाचा पहिला महिना साधारण असल्याचे सांगण्यात येत आहे, आणि जवळजवळ सर्वांची पेरणी ही मृग नक्षत्रात होईल असं मानल्या जात आहे. दुसरा आणि चौथ्या महिन्यात चांगला पाऊस पडण्याचं भाकीत समोर आले आहे आणि तिसऱ्या महिन्यात साधारण पाऊस पडणार हे सुध्दा सांगितल्या जात आहे.
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना या लेखाला शेयर करायला विसरू नका. आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!