Bhagat Singh Marathi Mahiti
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारक ज्यांनी “शहीद-ए-आजम” म्हणून पदवी धारण केली.
तसेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरता ज्यांनी आपले संपूर्ण जीवनाचे बलिदान दिले. असे थोर क्रांतिकारक म्हणजेच “भगत सिंह”.
देशाकरिता त्यांनी केलेला त्याग, तसेच जीवनात दिलेलं समर्पण आणि बलिदान हे खूप मोठ आहे.
या सर्व बाबींवर उजेड टाकण्याकरता आणि त्यांचे उच्च विचार आपल्या पर्यंत पोहोचण्याकरिता या लेखाचे लिखाण करण्यात आले आहे.
भगत सिंह यांचा परिचय – Bhagat Singh Information in Marathi
शहीदे-ए-आजम भगत सिंह यांच जीवन – Bhagat Singh History
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील थोर क्रांतिकारक भगत सिंह हे एक विख्यात स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी आपल्या उग्रवादी विचारांनी देशातील नवयुवकांच्या मनात इंग्रज सरकारच्या बद्दल आक्रोश निर्माण करण्याचं महत्वपूर्ण काम केलं होतं.
तसेच अनेक नवयुवकांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी प्रवृत्त देखील केलं होतं.
देशाचे हे महान क्रांतिकारक स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वात कमी वयाचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी होते.
आपल्या विद्या ग्रहण करण्याच्या वयातच त्यांच्या मनात देशाप्रती देशभक्ती जुळली होती.
आपले देशाला स्वातंत्र्य करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या उग्रवादी विचारातून देशातील नवयुकांच्या मनात देश भक्ती जागृत करण्याचे महत्वपूर्ण काम केलं.
लहान वयातच देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगलेल्या या महान क्रांतीकारक भगत सिंग यांनी इंग्रजांच्या मनात आपल्या प्रती भीती निर्माण केली.
परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रयत्नात त्यांना इंग्रज सरकारने यशस्वी होऊ दिले नाही त्यांना पकडून फाशी देण्यात आली.
भगत सिंह यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन – Bhagat Singh Biography
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक भगत सिंह यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ साली पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्याच्या बंगा गावात झाला.
त्यांचे संपूर्ण कुटुंब भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते. त्यामुळे त्यांचा जन्म एकाप्रकारे क्रांतिकारी कुटुंबातच झाला होता असे म्हणता येईल.
घरातील देशभक्तीमय वातावरणामुळे देशाच्या स्वातंत्र्या प्रती भाव भगत सिंग यांच्या मनात लहानपणा पासूनच होता.
भगत सिंग यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडिल सरदार किशन सिंग तुरुंगात कैद होते. तसेच, त्यांच्या आईचे नाव विद्यावती होतं.
भगत सिंह यांच्या परिवारातील काही व्यक्ती सरदार रणजितसिंग यांच्या सैन्यात होते. तर काही सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय होते.
About Bhagat Singh
त्यांचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हिंदू सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते.
आपल्या वयाच्या इतर शीख मुलांसोबत भगत सिंह कधीच शाळेत गेले नाहीत.
कारण त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील व्यक्तींची इंग्रज सरकार प्रती असणारी निष्ठा मान्य नव्हती.
भगत सिंह आपल्या परिवारातील लोकांन सोबत राहून देशाच्या स्वातंत्र्याकरिता होणाऱ्या घडामोडीकडे बारकाईने लक्ष देत असतं.
भगत सिंह हे लहानपणापासून आक्रमक स्वभावाचे होते. लहानपणी भगत सिंह सैन्य आणि युद्ध कलेचा अभ्यास करणारे खेळ खेळत असतं.
त्याचं प्रमाणे लहानपणी त्यांच्या जीवनात अनेक अश्या गोष्टी घडल्या ज्यामुळे भगत सिंग धाडसी, निडर, पराक्रमी बनले.
देशाच्या स्वातंत्र्या करता लढा देत असलेल्या क्रांतिकारी परिवारात भगत सिंह यांचा जन्म झाला होता.
त्यामुळे देशाप्रती प्रेम आणि स्वातंत्र्याचे बाळकडू त्यांना लहानपासूनच मिळाल होतं.
आपल्या परिवारातील व्यक्ती कश्याप्रकारे इंग्रज सरकार विरूद्ध चळवळीत भाग घेतात आणि त्यांच्याकडून होणाऱ्या प्रतिकाराला कश्या तऱ्हेने अंगिकारतात या सर्व गोष्टींकडे भगत सिंह बारकाईने लक्ष देत असतं.
भगत सिंह यांच्या जीवनात घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे त्यांच्या बालपणी घडलेले जालियानवाला बाग मधील हत्याकांड.
त्यांच्या जीवनातील ही घटना १३ एप्रिल १९१९ साली घडली.
जालियान बागेत इंग्रज सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेल्या हजारो लोकांनवर इंग्रज सरकारचे जनरल मेजर डायर यांनी आपल्या सैनिकांना गोळीबार करण्यास सांगितले आणि त्या हल्ल्यात तिथे जमलेल्या लोकांपैकी वास्तविकता अधिकृत सूत्राच्या हवाल्यातून या हत्याकांडामध्ये ३७९ लोकांचा मृत्यू झाला होता.
परंतु अनधिकृत सूत्रानुसार मृतांचा आकडा हा हजारो पेक्षा जास्त होता. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश होता.
या घटनेने भगत सिंह यांच्या मानत इंग्रज सरकारच्या बद्दल अधिकच द्वेष निर्माण झाला.
त्यांनी त्याचं क्षणी इंग्रज सरकारला देशाच्या बाहेर काढण्याची शपथ घेतली. तसेच आपले संपूर्ण जीवन हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करण्याचं ठरविलं.
या प्रकरणानंतर भगत सिंह या ठिकाणी वयाच्या १२ वर्षी गेले होते.
भगत सिंह यांनी आपल्या वयाच्या १४ वर्षी गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याच्याविरुद्ध आंदोलनात सामील झाले होते. तसेच महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ बंद केल्याने भगत सिंह यांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर भगत सिंह युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले, व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे समर्थक झाले.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील भगत सिंह यांचे योगदान आणि त्यांचे क्रांतीकारिक कार्य – Bhagat Singh’s Contribution to the Indian Freedom Struggle
भारताचे महान क्रांतिकारक भगत सिंह यांचे कुटुंब हे एक क्रांतिकारक कुटुंब असल्याने त्यांच्या प्रती देशभक्ती ही लहानपणीच जागृत झाली होती.
जालियनवाला बाग हत्याकांड भगत सिंह यांच्या लहानपणी घडल्यामुळे त्यांच्या मनात देशाच्या स्वातंत्र्याप्रती भावना मोठ्याप्रमाणात निर्माण झाली.
यानंतर भगत सिंह यांनी आपले शिक्षण मध्येचं सोडून स्वत:ला देशाच्या स्वातंत्र्या करता अर्पण केलं.
भगत सिंह यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला सुरवात केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या वयातील नवयुवकांच्या मनात देशाच्या स्वातंत्र्याप्रती भाव निर्माण करण्याचे महत्वपूर्ण काम केलं.
तसेच, इंग्रज सरकार कडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात अधिक प्रमाणात आक्रोश निर्माण करण्यासाठी त्यांनी किसान कीर्ती पक्षाद्वारे प्रकाशित नियतकालीकेत इंग्रज राज्यकर्त्यांविरूद्ध आक्षेपार्ह लेख लिहिले.
याचा परिणाम नवयुवकांवर झाला आणि यानंतर नवयुवकांनी मोठ्याप्रमाणात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला.
स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेला इंग्रज सरकारच्या देशातील हिंसात्मक घटना वाढतच होत्या.
त्या काही केल्याने कमी होत नसल्याने, आणि काकोरी येथील प्रकरणाबद्दल रामप्रसाद बिस्मिल यांच्यासोबतच चार क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा घोषित करण्यात आली होती.
यामुळे भगत सिंह यांच्या मानत देशाला स्वातंत्र्य करण्याकरता तळमळ सुरु झाली.
भगत सिंह यांनी चंद्रशेखर आजाद यांच्या सोबत मिळून ९ सप्टेंबर १९२५ साली “हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)” ची स्थापना केली. त्यांच्या या पार्टीत लाला लजपतराय यांचा देखील समावेश होता. या पार्टीचे मुख्य समन्वयक व मुख्य सेनापती हे चंद्रशेखर आजाद होते. तर भगत सिंह यांच्याकडे पक्षाचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपवण्यात आली होती. या संघटनेचे मुख्य उद्देश हे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज उलथून टाकून भारतीय संघराज्याची निर्मिती करणे.
Bhagat Singh Marathi Mahiti
सन १९२७ साली भारतात आलेल्या सायमन कमिशनला विरोध करत असतांना इंग्रजांकडून झालेल्या लाठीचारात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्युने भगत सिंह यांना खूप मोठा हादरा बसला कारण लाल लजपतराय एक महान क्रांतीकारक होते.
भगत सिंह यांनी आपल्या सहकारी मित्र सुखदेव आणि राजगुरू यांच्यासोबत मिळून लाला लजपतराय यांच्या हत्याचा बदला म्हणून सन १७ डिसेंबर १९२८ साली सॉंडर्सची हत्या घडवून आणली.
याशिवाय ज्यावेळी इंग्रज सरकार देशातील गरीब शेतकऱ्याना आपल्या जुलमी कायद्या अंतर्गत दडपण्याचा प्रयत्न करीत होते.
त्यावेळी भगत सिंह यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून इंग्रज सरकारच्या असेब्लीत (सांसद) बॉम्बस्फोट घडवून आणला.
बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर भगत सिंह यांनी स्वत:ला इंग्रजांच्या स्वाधीन केलं.
इंग्रजांच्या कैदीत असतांना सुद्धा त्यांनी तुरुंगात अनेक आंदोलन केली.
भगत सिंह यांचे तुरुंगात आंदोलन सुरु असतांनाच त्यांच्या जवळील सहकारी राजगुरू आणि सुखदेव यांना पकडण्यात आले. त्या सर्वांवर सॉंडर्सच्या हत्येचा आरोप लावण्यात आला. सन २३ मार्च १९३१ साली भारत देशाचे महान क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारकडून फाशी देण्यात आली.
अश्या थोर महान क्रांतीकारकाने आपल्या देशाप्रती दिलेले बलिदान खूप महान आहे. या थोर क्रांतीकारकाच्या पुण्यतिथी दिनाला शहीद दिन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. भगत सिंह, राजगुरू, सुखदेव या सारख्या क्रांतिकारकांनी देशाप्रती दिलेले बलिदान आपल्याला कायमच स्मरणात राहील. या क्रांतीकारकांना माझी मराठी कडून त्रिवार वंदन.
Check out: Bhagat Singh T shirt