Prernatmak Poems
जीवनाला मार्ग दाखवणारी एक आगळीवेगळी प्रेरणात्मक कविता,जेव्हा आपल्याला वाटेल कि आता आयुष्यात काही उररलेले नाही, अश्या वेळेला आपल्या जीवनाला एक वेगळे वळण देणारी कविता (Marathi Poems on Life)…
…
“जगुन पहावे त्या पक्षांप्रमाणे” कविता – Best Marathi Poems on Life
आयुष्यातील समस्यांना कसे सामोरे जावे हे या कवितेद्वारे आपण जाणून घेऊ,
जगून पहावे त्या पक्ष्यांप्रमाणे
ज्यांना भीती नसते उंचीची ।
जगता जगता कळून जाते
लांबी आपल्या आयुष्याची ।
आराम करुनी लाभ नाही
आयुष्याच्या या शाळेला ।
कष्ट असती आवश्यक
यशाच्या त्या नाळेला ।
घे पुढाकार हो मोठा
जिंकण्याच्या या धावेत ।
कसुनी कंबर ये अव्वल तू
आयुष्याच्या या नावेत।
जीवनाची ही शाळा
तुला शिकविण चांगले धडे ।
भर तू तूझ्या यशाचा घडा
टाकुनी चांगले खडे।
आयुष्य जात राहील
उद्या करता करता ।
घे निर्णय तू आजच
तुझ्या यशा करता ।
–युवाकवी
वैभव कैलास भारंबे.
कविता अशी जी जगण्याची प्रेरणा देऊन जाईल.
आयुष्याने शिकवलेल्या गोष्टींपासून माझ्या लेखणीतून निघालेल्या काही ओळी,
आशा करतो तुम्हाला सुद्धा हि कविता वाचून प्रेरणा मिळाली असेल, कविता आवडल्यास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना प्रेरणा देण्यासाठी या कवितेला त्यांच्याशी शेयर करायला विसरू नका.
मी आणखी अश्याच कविता आणि लेख आपल्यासाठी घेऊन येत राहील,
धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आमच्यावर असेच प्रेम करत रहा. आणि अश्याच नवनवीन कविता जाणून घेण्यासाठी जुळून रहा आंमच्या माझीमराठी सोबत.