BBA Course Information in Marathi
आधुनिक शिक्षण क्षेत्रात व्यापक आणि सुधारणात्मक बदल होत आहे. प्रत्येक क्षेत्राशी संबंधित शिक्षण अभ्यासक्रम आजकाल आपल्याला पाहायला मिळतो. व्यवस्थापन आणि प्रशासन असे दोन महत्वाचे क्षेत्र आहेत ज्याची आवश्यकता हॉटेल, हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनी मध्ये तसेच इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. व्यवस्थापन आणि प्रशासन शिकवणारा परिपूर्ण कोर्स म्हणजे बी.बी.ए.
बी.बी.ए कोर्स केल्यानंतर तुमच्यासमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. बी.बी.ए केल्यानंतर तुम्हाला सहज कॉर्पोरेट सेक्टर मध्ये नौकरी मिळू शकते. तसेच तुम्ही कोणत्या पण स्पर्धा परीक्षाला आवेदन करू शकता ज्यासाठी किमान शैक्षणिक पात्रात फक्त कोणत्याही शाखेची पदवी आहे. या लेखा मध्ये आपण बी.बी.ए या कोर्सची संपूर्ण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही हा कोर्स करण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा
बी.बी.ए कोर्सची संपूर्ण माहिती – BBA Course Information in Marathi
बी.बी.ए चा फुल फॉर्म आणि अर्थ काय आहे? – What is the full form of BBA?
बी.बी.ए चा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन (Bachelor of Business Administration). व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे हे आपल्याला या अभ्यासक्रमात शिकवले जाते. व्यवसायाशी संबंधित मूलभूत गोष्टी जसेकी मार्केटिंग, हुमन रिसोर्स, अकाउंटिंग इत्यादी बदल आपल्याला शिक्षण दिले जाते.
जे विद्यार्थी कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी बी.बी.ए हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. इतक्यात या कोर्स कडे मुलींचा कल मुलांपेक्षा जास्त आहे कारण व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यासाठी शारीरिक श्रम पेक्षा बुद्धी कौशल्य जास्त लागते.
बी.बी.ए कोर्से करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो?- BBA course Fee
हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोन ते अडीच लाख खर्च येऊ शकतो. वेगवेगळ्या महाविद्यालयाची वेगवेगळे शुल्क आहेत. तुम्ही कोणत्या महाविद्यालयाची निवड करता त्यावर तुमचे खर्च अवलंबून आहे.
जर तुम्ही तुमचे शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बी.बी.ए कराल तर तुम्हाला हॉस्टेल शुल्क भरावा लागेल.
बी.बी. ए मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता – Eligibility for BBA course
- शिक्षा (Educational Qualification)
बी.बी ए मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. १२वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची किमान टक्केवारी ५०% असली पाहिजे. काही उच्च स्तरच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान टक्केवारी ६० % सुद्धा असू शकते.
- वय (Age)
बी.बी.ए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी खुल्या वर्गाला वयो मर्यादा १७ वर्ष ते २२ वर्ष आहे. तसेच आरक्षित वर्गासाठी वयो मर्यादा १७ ते २४ वर्ष आहे.
पात्रता परीक्षा – BBA Entrance Exam
या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी पात्रता परीक्षेला सामोरे जाणे अनिवार्य आहे. विविध शिक्षण संस्था त्यांच्या स्तरावर पात्रता परीक्षा आयोजित करतात. काही नामांकित संस्थानाचे पात्रता परीक्षा खाली दिले आहे.
१. सेट (SET-Symbiosis Entrance Test)– सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही BBA कोर्सेच्या प्रवेशासाठी सेट प्रवेश परीक्षा आयोजित करते.
२. आय.पी.यु .सी.इ.टी (IPU CET)– इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी ही BBA कोर्सच्या प्रवेशासाठी आय.पी.यु .सी.इ.टी (IPU CET) प्रवेश परीक्षा आयोजित करते.
या परीक्षा व्यतिरिक डीयु जेएटी ,एन.पी.ए.टी, यु.पी.एस.ई.ई, आय.पी.यु.सी.ई.टी, बी,एच.यु सी.ई.टी इत्यादी पात्रता परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा BBA या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
BBA कोर्सचा कालावधी – Duration of BBA Course
हा BBA कोर्स पूर्ण करायला आपल्याला ३ वर्ष लागतील यामध्ये एका वर्षांत दोन अशे एकूण ६ सेमिस्टर असतात. जर आपले विषय राहले तर हा कोर्स पूर्ण करायला आपल्याला ३ पेक्षा जास्त वर्ष लागू शकतात.
BBA कोर्सचे विषय -Subjects of BBA Course
- प्रिंसिपल्स ऑफ़ मैनेजमेंट
- स्टैटिस्टिक्स
- ऑपरेशनल रिसर्च
- मार्केटिंग
- फाइनेंस
- एकाउंटिंग
- बिज़नेस मैथमेटिक्स
BBA कोर्सचा अभ्यासक्रम- Syllabus of BBA course
हा कोर्स ३ वर्ष आणि ६ सेमिस्टरचा असतो एका वर्षांत तुम्हाला २ सेमिस्टर द्यावे लागतात.
प्रथम वर्ष
सेमिस्टर – १
- फाइनेंसियल एकाउंटिंग
- माइक्रो इकोनॉमिक्स
- प्रिंसिपल्स ऑफ़ मैनेजमेंट
- इंडिया सोशिओ पॉलिटिकल इकोनॉमिक्स
- क्वांटिटेटिव टेक्निक्स- १
- इसेंशिअल्स ऑफ आय.टी
सेमिस्टर- २
- मैक्रोइकॉनॉमिक्स
- क्वांटिटेटिव टेक्निक्स- २
- इफेक्टिव कम्युनिकेशन्स
- कॉस्ट अकाउंटिंग
- एनवायरनमेंट मैनेजमेंट
- प्रिंसिपल्स ऑफ़ मार्केटिंग
दुसरे वर्ष
सेमिस्टर- ३
- बैंकिंग अँड इन्शुरन्स
- इंडियन इकोनॉमिक्स इन ग्लोबल सिनेरियो
- ऑपरेशन्स रिसर्च
- डायरेक्ट टैक्स एंड इनडायरेक्ट टैक्स
- ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट
- कंस्यूमर बिहेवियर एंड सर्विसेस मार्केटिंग
सेमिस्टर- ४
- ह्यूमन बिहेवियर एंड एथिक्स ऍट वर्कप्लेस
- मैनेजमेंट एकाउंटिंग
- बिज़नेस एनालिटिक्स
- बिज़नेस लॉ
- फाइनेंसियल मैनेजमेंट
- कस्टमर रिलेशनशिप मैनेजमेंट
तिसरा साल
सेमिस्टर – ५
- स्ट्रेटेजिक मैनेजमेंट
- रिसर्च मेथोडोलॉजी
- फाइनेंस इलेक्टिव
- फाइनेंसियल स्टेटमेंट एनालिसिस
- एडवांस्ड फाइनेंशियल मैनेजमेंट
सेमिस्टर- ६
- इंटरनेशनल बिजनेस एंड एक्सिम
- फाइनेंस इलेक्टिव
- ऑपरेशन एंड सप्लाई चैन मैनेजमेंट
- मार्केटिंग इलेक्टिव
- इंटरप्रेनरशिप एंड बिजनेस प्लान
बी.बी.ए करण्यासाठी सर्वोत्कृष्ट महाविद्यालय -Top BBA Colleges
- नर्सी मोंजी इंस्टिट्यूट ऑफ़ मैनेजमेंट स्टडीज, मुंबई
- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ मैनेजमेंट,रोहतक- हरियाणा
- चंदिगढ विश्वविद्यालय, चंदिगढ
- आय.सी.एफ.ए.आय फाउंडेशन फॉर हायर स्टडीज, हैद्राबाद
- वोक्सेन विश्वविद्यालय, हैद्राबाद
- के.आय.आय.टी स्कूल ऑफ मैनेजमें, भुवनेश्वर
बी.बी.ए कोर्सचे स्पेशलायझशन – Types of BBA Courses
तुम्हाला आम्ही कळवत अहो की BBA का कोर्स वेगवेगळ्या स्पेशलायझशन सोबत तयार केला आहे. या कोर्स मध्ये तुम्ही तुमच्या इच्छे प्रमाणे विषय निवडून स्पेशलायझशन करू शकता. स्पेशलायझशन करण्यासाठी उपलब्ध असलेले विषय खाली दिले आहे.
- बैंकिंग एंड इन्शुरन्स
- टूर एंड ट्रेवल मैनेजमेंट
- कंप्यूटर एप्लीकेशन
- फाइनेंस
- फॉरेन ट्रेड
- मार्केटिंग
- हॉटेल मैनेजमेंट
- एकाउंटिंग
BBA नंतर रोजगाराच्या संधी – Job After BBA
बी.बी.ए पूर्ण केल्या नंतर तुम्हाला खालील क्षेत्र रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
१. एन्टरप्रेनुअरशिप (BBA Entrepreneurship): BBA केल्यावर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. व्यवसायाचे व्यवस्थापन कशे करावे हे तुम्ही BBA मध्ये शिकलेच आहेत त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत व्यवसायात होणारच.
२. फायनान्स अँड अकाउंट मेनेजमेंट (BBA Accounting and Finance): आजकाल लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्याजावर रक्कम देणाऱ्या बरेच फायनान्स कंपनी उपलब्ध आहे. या कंपनी मध्ये व्यवस्थापनाची विशेष गरज असते आणि येते BBA पदवीधर सहज नौकरीवर लागू शकतात. ३.
3. ह्युमन रिसोर्स मैनेजमेंट(BBA Human Resource Management): कंपनी मध्ये काम करण्यासाठी योग्य लोकांची निवड, त्यांच्या करून काम करून घेणे, त्याच्याशी संबंधित सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवणे, त्यांच्या कामाची पाहणी करणे आणि त्यांचा पगार करणे या सर्व गोष्टीचा व्यवस्थापन करणे म्हणजे ह्युमन रिसोर्स मेनेजमेंट आहे. या कामासाठी सुद्धा मोठं मोठ्या कंपनी मध्ये BBA पदवीधर तरुण काम करू शकतात.
४. मार्केटिंग मैनेजमेंट (BBA Marketing Management): बी.बी.ए मार्केटिंग करणारे विद्यार्थी बऱ्याच कंपनी मध्ये मार्केटिंगच काम करू शकतात.
या व्यतिरिक्त सप्लाई चैन मैनेजमेंट, टुरिझम मैनेजमेंट, बँक, शिक्षा संस्था, मार्केटिंग संस्था, व्यवसायिक संस्था, बहुराष्ट्रीय कंपनीया, वित्त संस्था किंवा निर्यात संस्था सारख्या क्षेत्रात सुद्धा बी.बी.ए चे विद्यार्थी सहज रोजगार मिळू शकते.
BBA झाल्या नंतरचा कोणते कोर्सस करू शकतात- Courses after BBA
बी.बी.ए हा पदवी स्तराचा अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्या नंतर विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण काळे जाऊ शकतो. बी.बी.ए हा अभ्यासक्रम पूर्ण केल्या नंतर आपण एम.बी.ए या मास्टर डिग्री कोर्स करण्यासाठी पात्र ठरतो. एम. बी. ए केल्यानंतर आपल्या समोर करिअरच्या अजून चांगल्या संधी आपल्यासमोर उपलब्ध होतात.
निष्कर्ष – (Conclusion)
बी.बी.ए हा पदवी स्तरचा अभ्यासक्रम आहे. व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे हे आपल्याला या मध्ये शिकवले जाते. ज्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी हा एक उत्तम कोर्स आहे. आम्ही अशा ठेवतो की BBA या कोर्स बदल तुम्हाला सर्व महत्त्वपूर्ण माहिती या लेखातून मिळाली असेल.
बी.बी.ए कोर्स बद्दल विचारले जाणारे प्रश्न – FAQ about BBA Course in Marathi
उत्तर: बॅचलर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन (Bachelor of business Administration).
उत्तर: ३ वर्ष.
उत्तर: सेमिस्टर पॅटर्न
उत्तर: होय, प्रतिष्ठित महाविद्यालय बी. बी.ए कोर्सेला प्रवेश देण्यासाठी एंट्रन्स exam घेतात.
उत्तर: १२ वी उत्तीर्ण कोणत्यापन शाखेतून