Basketball Chi Mahiti
सांघिक खेळाचं आपलं असं एक खास वैशिष्ट्य असतं.
अश्या खेळांमुळे सांघिक भावना वाढीस लागते, एकीचं महत्वं कळतं, अनुशासन आणि एकात्मतेचं महत्व लक्षात येतं.
इतकं महत्व जर सांघिक खेळाचं असेल तर सांघिक खेळ हे खेळायलाच हवेत. आणि असाच एक सांघिक भावना वाढीस लावणारा खेळ म्हणजे बास्केटबॉल.
विश्वातील सर्वात लोकप्रिय खेळ “बास्केटबॉल” – Basketball Information in Marathi
या खेळात 5 सक्रिय खेळाडु असलेले दोन संघ असतात जे एकमेकांविरोधात 10 फुट उंच अश्या वर्तुळात नियमांच्या चौकटीत राहात बॉल टाकुन अंक मिळविण्याचा प्रयत्न करतात.
बास्केटबॉल हा विश्वातील सर्वात लोकप्रिय खेळांमधला आणि व्यापक स्वरूपात बघीतला जाणारा एक खेळ आहे.
बॉल ला निर्धारीत केलेल्या वर्तुळात वरून फेकत अंक प्राप्त केल्या जातात.
अखेरीस सर्वाधिक अंक मिळविणारी टिम विजयी घोषित करण्यात येतें.
बॉल ला टप्प्याटप्प्याने किंवा सहकार्यानंसमवेत आदान-प्रदान करत वर्तुळाकडे नेले जाते या दरम्यान झालेला शारीरिक संपर्क हा फाउल ठरतो आणि त्याला दंडित केल्या जाते या व्यतिरीक्त बॉल ला कसे सांभाळायचे यावर देखील निर्बंध आहेत.
काळाच्या ओघात बास्केटबॉल या खेळात देखील अनेक बदल झालेत जसे शुटिंग, पासिंग आणि ड्रिब्लिंग या सारख्या सामान्य टेक्नोलॉजी समवेतच खेळाडुंच्या स्थिती, आक्रमक आणि रक्षात्मक संरचनांना देखील समाविष्ट करण्यात आले.
खेळतांना संघातील सर्वात उंच खेळाडु सेंटरला किंवा दोन फॉरवर्ड पोजिशन पैकी एका वर खेळतो आणि लहान उंचीचे वा जे बॉल सांभाळण्यात सर्वात चपळ आणि तरबेज आहेत ते गार्ड पोजिशन ला खेळतात.
बास्केटबॉल च्या अनेक नियमांना अधिकाधिक विकसीत करण्यात आले आहे. काही देशांमध्ये तर बास्केटबॉल हा सर्वाधिक पाहिल्या जाणारा खेळ आहे.
बास्केटबॉल हा खेळ तसं पाहाता इनडोअर गेम आहे त्याला बास्केटबॉल कोर्ट वर खेळण्यात येतं.
पण आउटडोअर खेळला जाणारा बास्केटबॉलचा गेम सुध्दा शहरी आणि ग्रामिण भागात वेगाने लोकप्रीय होतांना दिसतोय.
Read More:
- कबड्डी या खेळाची संपूर्ण माहिती
- क्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास
- खो-खो या खेळाबद्दल संपूर्ण माहिती
आशा आहे की आपणास “बास्केटबॉल या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास – Basketball Information in Marathi” याविषयी हा लेख उपयुक्त वाटेल.
जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कृपया फेसबुकवर शेअर करा.