Bankim Chandra Chatterjee
बंकिमचंद्र चटर्जी हे बंगाल साहित्याचे एक महान कवि आणि कादंबरीकार असण्याबरोबरच एक प्रसिद्ध पत्रकार देखील होते. बंकिमचंद्र चटर्जींनी आधुनिक साहित्याची सुरवात बंगाली भाषेतच केली नाही तर त्या बंगाली भाषेतील साहित्याला विशिष्ट दर्जा मिळावा याकरता त्यांनी त्या साहित्याला उंच ठिकाणी नेण्याचं महत्वपूर्ण काम केलं आहे.
बंकिमचंद्र चटर्जी विशेष करून ओळखले जातात ते, त्यांनी लिहिलेलं देशाचं राष्ट्रगीत “वंदेमातरम्” या करता. त्यांनी लिहिलेलं हे राष्ट्रगीत आजपण लोकांच्या मनात देशाप्रती प्रेमाची भावना विकसित करते. चला तर जाणून घेऊया असे महान देशप्रेमी असणारे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या बाबतीत जुडलेल्या काही महत्वाच्या गोष्टी.-
देशाच्या राष्ट्रगीताचे “वंदेमातरम्” चे रचनाकार………….बंकिमचंद्र चटर्जी – Bankim Chandra Chatterjee in Marathi
बंकिमचंद्र चटर्जी यांची थोडक्यात माहिती- Bankim Chandra Chatterjee Information in Marathi
नाव(Name) | बंकिमचंद्र चट्टोपाध्याय |
जन्म (Birthday) | २७ जून १८३८ |
जन्मस्थान (Birthplace) | कांठ्ला पाडा परगणा जिल्हा, पश्चिम बंगाल |
माता (Mother Name) | दुर्गा देवी |
पिता (Father Name) | यादव (जाधव) चंद्र चट्टोपाध्याय |
भाऊ (Brother Name) | संजीव चंद्र चट्टोपाध्याय |
पत्नी (Wife Name) | पहिला विवाह-१८४९, दसरा विवाह-राजलक्ष्मी देवी |
मुले (Childrens) | तीन मुली |
प्रसिद्ध रचना(पुस्तके) (Books) | आनंदमठ, मुणालिनी कपाल कुंडली |
मृत्यु (Death) | ८ एप्रिल १८९४,कलकत्ता, बंगाल |
बंकिमचंद्र चटर्जी यांचा जन्म आणि सुरवाती जीवन व शिक्षा – Bankim Chandra Chatterjee Biography in Marathi
भारतातील महान साहित्यकार बंकिमचंद्र चटर्जी यांचा जन्म २७ जून १८३८ साली पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील कंठाला पाडा नावाच्या एका छोट्याशा गावात झाला होता. त्यांच कुटुंब एक समृद्ध आणि संपन्न कुटुंब होत. बंकिमचंद्र यांचे वडिल यादव(जाधव) चट्टोपाध्याय एक सरकारी अधिकारी होते.
तसचं, त्यांच्या वडिलांनी पश्चिम बंगाल मधील मिदनापूर शहराच्या उपजिल्हाधिकारी पदावर आपली सेवा देली होती. बंकिमचंद्र चटर्जी यांची आई दुर्गादेवी या एक गृहिणी होत्या, त्या घर काम करत, आणि आपल्या परिवाराची काळजी घेत असतं. बंकिमचंद्र चटर्जी यांना दोन भाऊ होते.
त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण मिदनापूर मधील एका सरकारी शाळेत आपल्या भावंडानसोब घेतलं होतं.
भारताचे ‘अलेक्झांडर ड्यूमा’ म्हणून ओळखले जाणारे बंकिमचंद्र चटर्जी सुरवातीपासूनच एक हुशार विध्यार्थी होते.
लहान पणापासूनच त्यांचे मन लिहण्या वाचण्यात रमत असे. अशी महान बुद्धि असणारे बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या शालेय जीवनातच एक कविता लिहून आपल्या लिखाणातून सर्वाना अचंबित करून टाकल होतं.
तसेच, त्यांना संस्कृत भाषे प्रती खूपच आकर्षण होत. शिक्षणा बरोबरच खेळामध्येही त्यांची खूप आवड होती. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात ते मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतं. आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्या नंतर बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपले पुढील शिक्षण “मोहसीन” महाविद्यालयात पूर्ण केले.
सण १८५८ साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या वयाच्या विसाव्या वर्षी “प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून” आपली आर्ट्स (कला) विषयाची पदवी पूर्ण केली.
याचबरोबर सन १८५७ च्या पूर्वी स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळेला “कलकत्ता विद्यापीठातून” पदवी ग्रहण करणारे ते पहिले भारतीय नागरिक आहेत. यानंतर त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केलं.
बंकिमचंद्र चटर्जी यांचा विवाह – Bankim Chandra Chatterjee Life History
बंकिमचंद्र चटर्जी यांचा विवाह ज्यावेळी झाला होता, त्यावेळेला भारतात बालविवाह प्रथा सुरु होती.
याच बालविवाह प्रथेनुसार त्यांचा विवाह केवळ वयाच्या अकराव्या वर्षी सन १८४९ साली करण्यात आला.
विवाहाच्या केवळ अकरावर्षा नंतरच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. यानंतर सन १८६० साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी राजलक्ष्मी नावाच्या महिले सोबत आपला दुसरा विवाह केला. त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून त्यांना तीन मुली झाल्या होत्या.
दंडाधिकारी (मजिस्ट्रेट) म्हणून बंकिमचंद्र चटर्जी – Bankim Chandra Chatterjee as Majistret
बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्रिटीश शासनाच्या राजवटीत सरकारी सेवेत दंडाधिकारी(मजिस्ट्रेट) म्हणून रुजू झाले.
दंडाधिकारी म्हणून बंकिमचंद्र चटर्जी यांनी ब्रिटीश शासनाच्या राजवटीतील सरकारमध्ये जवळपास ३० वर्ष सेवा दिली.
यानंतर, सन १८९१ साली त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
बंकिमचंद्र चटर्जी यांनी सुरवातीला ब्रिटीश सरकारच्या अधिकाराखाली काम केलं होतं. यानंतर, सन १८५७ साली क्रांतीकारांनी केलेल्या स्वतंत्र्याच्या उठावामुळे त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. यानंतर त्यांनी कुठल्याच सार्वजनिक आंदोलनामध्ये भाग घेतला नाही.
परंतु, आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांच्या कार्यप्रणाली विरुद्ध आपला राग व्यक्त केला.
बंकिमचंद्र चटर्जी यांची साहित्यिक प्रतिभा – Bankim Chandra Chattrjee Books
एकोणिसाव्या शतकात बंकिमचंद्र चटर्जी यांनी बंगाली साहित्याला एक नवीन दिशा दिली होती. त्यांच्या मुळेच बंगाली साहित्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.
असे महान साहित्यिक असणारे बंकिम चंद्र चटर्जी स्वत:ला ईश्वरचंद्र गुप्ता यांना आपले आदर्श मानत असतं.
त्यांच्याच आदर्शांवर चालून बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या साहित्यिक क्षेत्राची सुरवात केली.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी इंग्रजीत लिहिलेली प्रथम प्रकाशित कादंबरी ‘रायमोहन्स वाईफ” ही होय. त्यांची ही कादंबरी इंग्रजी भाषेत असल्याने त्या कादंबरीला जास्त प्रसिद्धी मिळू शकली नाही. कारण, त्यावेळेस इंग्रजी भाषेचं ज्ञान भारतातील कमीत कमी लोकांना अवगत होतं.
यानंतर त्यांनी आपल्या क्षेत्रातील बंगाली भाषेत साहित्य लिहायला सुरवातच नाही केली तर, त्या साहित्याला नव्या पातळीवर आणण्यात महत्वाची भूमिका देखील बजावली. बंकिमचंद्र चटर्जी यांची प्रेम कथेवर आधारित बंगाली भाषेतील पहिली कादंबरी ‘दुर्गेशनंदिनी’ सन १८६५ साली प्रकाशित झाली होती.
तसचं, सन १८६६ साली त्यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या कपालकुंडला रचनेची मोठया प्रमाणात प्रशंसा करण्यात आली होती.
या रचनेपासूनच ते एक प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जाऊ लागले. बंकिमचंद्र चटर्जी यांनी ऐतिहासिक संदर्भात सर्वात पहिले सन १८६९ साली “मृणालिनी” नावाची कादंबरी लहिली.
यानंतर, बंकिमचंद्र चटर्जी यांनी सन १८७२ साली आपले ‘बांगदर्शन’ नावाचे मासिक पत्रिकेचे प्रकाशन सुरु केले होते. त्यांचे हे मासिक पत्रिका चार वर्षांपर्यंत प्रकाशित होत राहिले.
Bankim Chandra Chatterjee Mahiti
याव्यतिरिक्त, सन १८७३ साली त्यांनी विषवृक्ष, सन १८७७ साली ‘चंद्रशेखर’, सन १८८१ साली राजसिंग, सन १८८२ साली त्यांनी “आनंदमठ” कादंबरी लिहिली होती. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या “आनंदमठ” नावाच्या कादंबरी मधून भारताचे प्रसिद्ध राष्ट्रगीत “वंदेमातरम्” घेण्यात आले आहे.
त्यांच्या द्वारे रचण्यात आलेली ही कादंबरी एक राजनीतिक स्वरुपाची कादंबरी असुन, ती हिंदी आणि ब्रिटीश राष्ट्रा संबंधी होती.
या कादंबरी मध्ये त्यांनी “ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध” आपल्या पगारा करता लढणाऱ्या भारतीय मुस्लीम आणि संन्यासी ब्राह्मण सेना यांच्या बद्दल उत्तम वर्णन केलं आहे.
बंकिमचंद्र चटर्जी यांची ही कादंबरी हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील एकी दर्शविते. आनंदमठ या कादंबरी मधून सन १९३७ साली घेण्यात आलेल्या “वंदेमातरम्” गीताला राष्ट्र गीताचा दर्जा देण्यात आला आहे.
या गीताची लोकप्रियता इतकी होती की या गीताचे गायन स्वत: गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी केलं होतं.
याशिवाय बंकिमचंद्र चटर्जी यांनी देवी चौधराणी, “सीताराम”, ‘कमला कांतेर दप्तर’, ‘कृष्ण कांतेर विल’, ‘विज्ञान रहस्य’, ‘लोकरहस्य’, ‘धर्मतत्व’ अश्या प्रकारच्या अनेक ग्रंथाची त्यांनी रचना केली होती.
ग्रंथ संपत्ती:
- कपालकुंडला
- मृणालिनी
- विषवृक्ष
- चंद्रशेखर
- कृष्ण कांतेर विल
- आनंदमठ
- देवी चौधुराणी
- सीताराम
- कमला कांतेर दप्तर
- विज्ञान रहस्य
- लोकरहस्य
- धर्मतत्व
बंकिमचंद्र चटर्जी यांच्याशी संबंधित महत्त्वाचे आणि मनोरंजक तथ्य- Bankim Chandr Chatterjee
- आधुनिक बंगला साहित्यातील राष्ट्रगीताचे जनक बंकिमचंद्र चटर्जी द्वारा रचित कादंबरी चे जवळजवळ सर्वच भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं आहे.
- बंकिमचंद्र चटर्जी द्वारा सन १८८२ साली रचित कादंबरी आनंदमठ सर्वात जास्त प्रसिद्ध कादंबरी आहे.
- त्यांच्या या कादंबरी मधून “वंदेमातरम्” हे राष्ट्रगीत घेण्यात आलं आहे.
- राष्ट्रगीत “वंदेमातरम्” चे सर्वात पहिले गायन सन १८९६ साली कलकत्ता येथे झालेल्या
- कॉंग्रेसच्या अधिवेशनात करण्यात आलं.
बंकिमचंद्र चटर्जी यांचे निधन – Bankim Chandra Chatterjee Death
बंगालचे महान अभ्यासक, कवि आणि राष्ट्रगीताचे निर्माता बंकिमचंद्र चटर्जी यांनी ८ एप्रिल १८९४ साली वयाच्या अवघ्या ५५ वर्षीच शेवटचा श्वास घेतला.
बंगाली भाषेत आधुनिक साहित्याला सुरवात करणारे महान लेखक म्हणून प्रसिद्ध असणारे बंकिमचंद्र चटर्जी आज जरी आपल्यात नसले, तरी सुद्धा त्यांच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या अनेक रचना, राष्ट्रगीत आणि कविता यांच्या माध्यमातून ते आज सुद्धा भारतीयांच्या मनात जिवंत आहेत.
तसचं, भारताच्या राष्ट्रगीताचे निर्माते म्हणून त्यांची आज देखील आठवण काढली जाते.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ बंकिमचंद्र चटर्जी बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा देशाच्या राष्ट्रगीताचे “वंदेमातरम्” चे रचनाकार………….बंकिमचंद्र चटर्जी – Bankim Chandra Chatterjee in Marathi हा लेख आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुधा.