सध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग तसेच, गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तीनमुळे झालेली जीवित आणि वित्तहानी यावर नेहमीच चर्चा होत असते. परंतु अमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग आणि त्यांनतर ऑस्ट्रेलियामधील जंगलात लागलेल्या सर्वात मोठ्या आगीमुळे अब्जावधी प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्राण्यांच्या घटत जाणाऱ्या संख्येमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.
ऑस्ट्रेलियन जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळजवळ 3 अब्ज प्राणी प्रभावित
काही नामवंत वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांनुसार ऑस्ट्रेलियन आणि अमेझॉन या दोन्ही दुर्घटना ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच हवामान बदलाशी संबंधित आहेत. परंतु, त्यातील मुख्य फरक म्हणजे ऑस्ट्रेलियामधील आगीमुळे जीवित तसेच काही प्रमाणात वित्तहानी झाली. परंतु अमेझॉनमधल्या आगीत कित्येक नागरिकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधनच होरपळून गेले.
‘द गार्डियन’ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीमुळे अंदाजे १४३ मिलियन सस्तन प्राणी, १८० मिलियन पक्षी, ५१ मिलियन बेडूक आणि सुमारे २.५ मिलियन सरपटणारे प्राण्यांचा मृत्यू झाले आहेत. अर्थात हे सर्व प्राणी आगीमध्ये होरपळून मृत झालेले नाहीत. वैज्ञानिकांच्या मते उपासमार, इतर जंगली जनावरांनी केलेली शिकार अशा इतर काही कारणांमुळे यामधील काही प्राण्यांचा मृत्यू झाले आहेत.
कोआला या प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. कोआला हे ऑस्ट्रेलियाच्या जंगलात राहणारे. ते ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-मध्य न्यू साऊथ वेल्स भागात राहणारे कोआला हे शाकाहारी सस्तन प्राणी आहेत. हे प्राणी झाडांवर राहतात. मात्र, आगीमुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धानंतर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ वारंवार सांगत होते की वातावरणातील ग्रीनहाऊस गॅसेसच्या वाढत्या प्रमाणामुळे भविष्यात बुशफायरचा धोका वाढणार आहे. मार्चमध्ये झालेल्या विश्लेषणानुसार ऑस्ट्रेलियातील विनाशकारी आगीचे मुख्य कारण म्हणजे वातावरणात अति प्रमाणात निर्माण झालेली उष्ण आणि कोरडी परिस्थिती. या परिस्थितीचा धोका सन १९०० पासूनच वाढलेला होता त्यात भर पडली ती औद्योगिकीकरणाची.
‘The WWF’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जनावरांच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी अनेक तंत्रे वापरली गेली. सस्तन प्राणी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रत्येक प्रजातीच्या आकडेवारीवर आधारित होते. बर्डलाइफ ऑस्ट्रेलियाच्या डेटावरून जवळपास 104,000 प्रमाणित सर्वेक्षणांच्या आधारे पक्षी संख्या काढली गेली; सरीसृप अंदाज पर्यावरणविषयक परिस्थिती, शरीराचे आकार आणि सरपटणारे प्राणी घनतेच्या जागतिक डेटाबेसचे ज्ञान वापरून तयार केले गेले होते.