Atal Bihari Vajpayee Information in Mmarathi
अटल बिहारी वाजपेयी एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारतीय राजकारणात आपली अविस्मरणीय छाप सोडली आहे. साधारणतः 50 वर्षांच्या संसद राजकारणामधे लोकांचे आयुष्य निघुन जाते, अटल बिहारी वाजपेयींनी तेवढी वर्ष राजकारण केलं आहे.
एक पार्टी बनवुन दोनाच्या आकडयाला 200 पर्यंत पोहोचवणे, लोकतांत्रिक व्यवस्थेत स्वतःची जमानत वाचवण्यापासुन मोडकळीस आलेल्या सरकारला वाचवणे आणि जनतेचे समर्थन मिळवुन पार्टी ला पुन्हा यशापर्यंत नेणे सोपे काम नव्हे. परंतु वाजपेयींनी लोकतंत्राच्या भाळावर यशाची कहाणी स्वतः लिहीली आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन चरित्र – Atal Bihari Vajpayee Information in Marathi
अटल बिहारी वाजपेयी यांचा अल्पपरिचय – Atal Bihari Vajpayee History in Marathi
नाव (Name): | अटल बिहारी वाजपेयी |
जन्म (Birthday): | 25 डिसेंबर 1924, ग्वालियर |
वडिल (Father Name): | कृष्णा बिहारी वाजपेयी (महान कवी आणि शिक्षक) |
आई (Mother Name): | कृष्णा देवी |
मृत्यु (Death): | 16 आॅगस्ट 2018 वयाच्या 93 व्या वर्षी |
अटल बिहारी वाजपेयी यांच्या विषयी संपूर्ण माहिती – Atal Bihari Vajpayee Biography in Marathi
अटल बिहारी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला ग्वालियर येथे झाला त्यांचे वडिल कृष्णा बिहारी वाजपेयी एक महान कवी आणि शाळेत शिक्षक होते.
अटल बिहारी वाजपेयी यांचे शिक्षण – Atal Bihari Vajpayee Education
अटलजींनी ग्वालियर च्या बारा गोरखी येथील गोरखी गावी सरकारी उच्चमाध्यमिक शाळेत प्राथमिक शिक्षण पुर्ण केले त्यानंतरचे शिक्षण घेण्याकरीता ग्वालियर मधील व्हिक्टोरिया काॅलेज (आताचे लक्ष्मीबाई काॅलेज) मधे प्रवेश घेतला. हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत विषयांमधे विशेष प्राविण्याने ते उत्तीर्ण झाले.
कानपुर च्या दयानंद एंग्लो वैदिक महाविद्यालयातुन राज्यशास्त्रात त्यांनी पद्व्युत्तर पदवी (एम.ए) मिळवली. या करीता त्यांना प्रथम श्रेणी मिळाल्याने सन्मानित देखील करण्यात आले होते.
ग्वालियर येथील आर्य कुमार सभेतुन त्यांनी राजकारणात काम करणे सुरू केले. अटल बिहारींना त्यावेळी आर्य समाजाची युवा शक्ती मानले जात असे. 1944 साली ते त्याचे जनरल सेक्रेटरी देखील बनले.
1939 साली स्वयंसेवक म्हणुन ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) प्रवेश घेते झाले. बाबासाहेब आपटेंमुळे प्रभावित होउन त्यांनी 1940.44 दरम्यान आरएसएस प्रशिक्षण शिबीरात प्रशिक्षण घेतले व 1947 मधे आरएसएसचे ते आजिवन स्वयंसेवक झाले.
फाळणीची बीजं पसरल्यामुळे त्यांनी वकिलीचे अध्ययन मधातच सोडले व प्रचारक म्हणुन त्यांना उत्तर प्रदेशात पाठवण्यात आले. अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी राष्ट्रधर्म (हिंदी मासिक), पंचजन्य (हिंदी साप्ताहिक) आणि दैनिक स्वदेश व वीर अर्जृन सारख्या वृत्तपत्रांकरता ते कार्य करू लागले.
अटल बिहारी वाजपेयी आयुष्यभर अविवाहीत राहीले. परंतु त्यांनी नमिता नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते. नमिताला भारतिय नृत्यात व संगीतात फार आवड आहे. तिला निसर्गाची देखील फार आवड आहे.
अटल बिहारी वाजपेयींचे निधन – Atal Bihari Vajpayee Death
वयाच्या 93 व्या वर्षी 16 आॅगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयींनी अखेरचा श्वास घेतला.
एक राजकारणी म्हणुन अटल बिहारी वाजपेयी – Atal Bihari Vajpayee Political Career
भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी स्वतंत्र भारताच्या राजकारणातील थोर व्यक्तिमत्व आहे. त्यांनी राजकारणाच्या प्रत्येक काळाला स्पर्श केला आहे.
ठतिहासात एक असा देखील काळ होउन गेला ज्यावेळी वाजपेयी बोलत असत आणि स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू मुग्ध होत त्यांना ऐकत असायचे. एक असा काळ आला ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भारताचे विदेश मंत्री बनले, भाजपाचे संसदेतील अस्तित्व जवळ-जवळ नामशेष होत आले होते तेव्हां वाजपेयींच्या नेर्तृत्वात भाजपाचे कमळ देशाच्या सिंहासनावर फडकले.
आपल्या 13 दिवसांच्या सरकारला वाचविण्याकरीता अटल बिहारींनी केलेले अयशस्वी प्रयत्न आजवर कुणीही विसरले नसेल. आज देखील संसद भवनात अटल बिहारींच्या आठवणी ताज्या आहेत. ते केवळ भारतिय राजकारणातील एक नेताच नाहीत… ते भारतिय लोकतंत्राचे केवळ एक प्रधानमंत्रीच नाहीत…
ते केवळ सरकारमधील एक व्यक्तिमत्वच नव्हे…. तर ते भारताचे असे रत्न आहेत ज्यांनी राजकारणातील इतिहासात एक न विसरता येणारी गोष्ट लिहीली आहे… वाजपेयी एक वारसा आहेत…एक असा वारसा ज्याच्या अवती-भवती भारतीय राजकारणाचा पुर्ण सारीपाट चालतो आहे…..
त्यांनी लिहीलेल्या गोष्टीची सुरूवात झाली 1957 या वर्षी… ज्या सुमारास त्यांनी पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला होता. तेव्हां स्वतंत्र भारताच्या दुस.या निवडणुका झाल्या, वाजपेयी तेव्हां भारतिय जनसंघाच्या तिकीटावर तीन जागांवरून उभे राहिले होते.
मथुराला तर डिपाॅझीटच जप्त झाले, लखनऊ मधुन देखील ते हरले परंतु बलरामपुर च्या जनतेने त्यांना आपला सांसद म्हणुन निवडले आणि येथुनच त्यांच्या पुढच्या 5 दशकांची संसदीय कारकिर्दीची सुरूवात होती
1968 ते 1973 पर्यंत ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. मोरारजी देसाईंच्या कॅबिनेट मधे ते एक्सटर्नल अफेयर (बाहय घडामोडी / विवाद) मंत्री देखील राहिले आहेत.
विरोधी पक्षातील आपल्या इतर सहका.यांप्रमाणेच त्यांना देखील आणीबाणी दरम्यान कारागृहात पाठवण्यात आले. 1977 साली जनता पार्टी च्या सत्तेत वाजपेयींना विदेश मंत्री करण्यात आले
या दरम्यान संयुक्त राष्ट्र अधिवेशनात त्यांनी हिंदीतुन भाषण दिले आणि या प्रसंगाला वाजपेयी आपल्या जीवनतील आतापर्यंतचा सर्वात सुखद क्षण मानतात. 1980 ला ते भाजपाचे संस्थापक सदस्य होते.
1980 ते 1986 पर्यंत वाजपेयी भारतिय जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि या दरम्यान ते भाजप संसदिय दलाचे नेता देखील होते. ते आतापर्यंत नऊ वेळा लोकसभेवर निवडुन आले आहेत.
1984 साली ग्वालियर येथे काॅंग्रेस चे माधवराव सिंधीयांनी वाजपेयींना हरविले. 1962 ते 1967 व 1986 ला ते राज्यसभेचे सदस्य देखील राहीले आहेत. 1996 साली भारतात परिवर्तनाची लाट आली व भाजप ला सर्वाधिक जागा मिळाल्या. अटलजींनी पहिल्यांदा देशाच्या प्रधानमंत्री पदाला सुशोभित केले.
परंतु वाजपेयी सरकार औटघटकेचे म्हणजेच केवळ 13 दिवसांचेच ठरले. पुन्हा 1998 ला निवडणुकांमधे वाजपेयींनी सहयोगी पक्षांसमवेत लोकसभेत आपल्या बहुमताला सिध्द केले आणि अश्या त.हेने पुन्हा एकदा ते प्रधानमंत्री पदावर विराजमान झाले.
अटलजींच्या कार्यकाळात भारत परमाणुशक्ति.संपन्न राष्ट्र बनले. त्यांनी पाकिस्तान समवेत काश्मिर विवाद सोडवण्याकरीता, आपापसातील व्यापार आणि बंधुभाव वाढविण्याकरीता अनेक प्रयत्न केले. परंतु 13 महिन्यांच्या कार्यकाला नंतर त्यांचे सरकार राजकारणातील षडयंत्रामुळे केवळ एका मताने अल्पमतात आले.
त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी राष्ट्रपतींकडे आपले त्यागपत्र सुपूर्द केले आणि आपल्या भाषणात म्हणाले…
“ज्या सरकार ला वाचविण्याकरीता असंवैधानिक पाऊले उचलावी लागतील त्या सरकारला चिमटयाने देखील स्पर्श करणे मला मान्य नाही”.
त्यानंतर 1999 च्या निवडणुकांपुर्वी कार्यवाहक प्रधानमंत्री म्हणुन कारगिल येथे पाकिस्तान ला त्याच्या गैरकृत्यांचे चांगलेच चोख प्रत्युत्तर दिले व भारत कारगिल युध्दात विजयी झाला… कालांतराने निवडणुका झाल्या आणि जनतेच्या समर्थनात अटलजींनी सरकार स्थापन केले. प्रधानमंत्री म्हणुन त्यांनी आपल्या क्षमतेचा मोठया प्रमाणात समर्थ परिचय सर्वांना करून दिला.
अटल बिहारी वाजपेयी सरकारचे काही महत्वाचे कार्य – Important Work Of Atal Bihari Vajpayee
11 आणि 13 मे 1998 ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले.
19 फेब्रुवारी 1999 ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदा.ए.सरहद नावाने दिल्ली ते लाहौर बस सेवा सुरू करण्यात आली.
स्वर्णिम चतुर्भुज परियोजना.
100 वर्षांपेक्षा अधिक जुना कावेरी जलविवाद सोडविला.
संरचनात्मक स्ट्रक्चर करीता मोठया प्रमाणात कार्यदल, विद्युतिकरणात प्रगति आणण्याकरीता केन्द्रीय विद्युत नियामक आयोग, साॅफ्टवेअर विकासाकरीता सुचना आणि प्रौद्योगिकी कार्यदलाची रचना करण्यात आली.
देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला: कोकण रेल्वे व नव्या टेलीकाॅम नितीची सुरूवात करून मुलभुत सरंचनात्मक स्ट्रक्चर ला मजबुत करण्याकरीता पाऊले उचलली.
आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली त्यामुळे कामांचा वेग वाढला.
अर्बन सिलींग अॅक्ट समाप्त करून आवास निर्माणाला प्रोत्साहन दिले.
वाजपेयींनी विमा योजनेची देखील सुरूवात केली ज्यामुळे ग्रामिण रोजगार वाढले व विदेशात वास्तव्याला असलेल्या मुळ भारतियांना (Nri) फायदा झाला.
अटल बिहारी वाजपेयींच्या राजकारणातील प्रवासावर एक दृष्टीक्षेप:
- जनसंघ आणि भाजप:
1951 ला अटलजींना भारतीय जन संघाचे संस्थापक सदस्य म्हणुन निवडण्यात आले
1968 ते 1973 पर्यंत ते भारतिय जनसंघाचे अध्यक्ष होते विरोधी पक्षातील आपल्या इतर सहका.यांप्रमाणेच त्यांना देखील आणीबाणी दरम्यान कारागृहात पाठवण्यात आले
1977 साली जनता पार्टी चे सरकार असतांना वाजपेयींना विदेश मंत्री बनविण्यात आले या दरम्यान संयुक्त राष्ट्र अधिवेशनात त्यांनी हिंदीतुन भाषण दिले आणि या प्रसंगाला वाजपेयी आपल्या जीवनतील आतापर्यंतचा सर्वात सुखद क्षण मानतात.
1980 ला ते भाजपा चे संस्थापक सदस्य होते. 1980 ते 1986 पर्यंत ते भारतिय जनता पक्षाचे अध्यक्ष होते व या दरम्यान ते भाजप संसदीय दलाचे नेता देखील होते.
- सांसद ते पंतप्रधान:
अटल बिहारी वाजपेयी आतापर्यंत 9 वेळा लोकसभेवर निवडुन आले आहेत.
1962 ते 1967 आणि 1986 मधे ते राज्यसभेचे सदस्य देखील होते.
16 मे 1996 ला प्रथमच ते प्रधानमंत्री झाले परंतु लोकसभेत बहुमत सिध्द न करू शकल्याने 31 मे 1996 ला त्यांना त्यागपत्र द्यावे लागले. त्यांचे हे सरकार 13 दिवसांचे औटघटकेचे ठरले.
त्यानंतर 1998 पर्यंत ते लोकसभेतील विरोधी पक्ष नेता होते
1998 च्या निवडणुकांमधे आपल्या सहकारी पक्षांसमवेत त्यांनी लोकसभेत आपले बहुमत सिध्द केले व पुन्हा पंतप्रधान झाले परंतु Aidmk ने समर्थन वापस घेतल्यामुळे भाजपाचे सरकार पडले व पुन्हा एकदा निवडणुका झाल्या.
1999 झालेल्या निवडणुकांमधे वाजपेयींच्या नेर्तृत्वाला एक प्रमुख मुद्दा बनविण्यात आला. बहुमत सिध्द झाले आणि वाजपेयी पुन्हा एकवार प्रधानमंत्री पदावर विराजमान झाले.
अटलजींच्या सरकारने आपला कार्यकाळ यशस्वीपणे पुर्ण केला आणि या माध्यमातुन त्यांनी देशात सहका.यांसमवेतच्या राजकारणाला नवा आयाम दिला. या पाच वर्षांत सरकार ने गरीबांकरीता, शेतक.यांकरीता आणि तरूणांकरता अनेक योजना अमलांत आणल्या.
अटल बिहारी वाजपेयी सरकार ने चारही कोप.यांना महामार्गांनी जोडण्याकरीता स्वर्णिम चतुर्भृज परियोजनेची सुरूवात केली व दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, व मुंबई ला राजमार्गांनी जोडले गेले. 2004 साली देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या व अटल बिहारी वाजपेयींच्या नेर्तृत्वात भाजपाने शायनिंग इंडिया चा नारा देत निवडणुका लढल्या.
या निवडणुकांमधे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. डाव्या पक्षाच्या समर्थनात काॅंगे्रस ने मनमोहन सिंह यांच्या नेर्तृत्वात केंद्रात सरकार स्थापन केले व भारतिय जनता पक्षाला विरोधी पक्षात बसावे लागले.
पुढे सतत प्रकृती अस्वास्थ्यामुळे अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणातुन सन्यांस घेतला. वाजपेयींनी भारतिय राजकारणाचे परिमाण स्थापित केले आहे जे कधीही विसरता येणार नाही
अटलजींना देश.विदेशातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
25 डिसेंबर 2014 ला राष्ट्रपती कार्यालयात अटल बिहारी वाजपेयींना भारताचा सर्वोच्च पुरस्कार ’’भारतरत्न’’ दिला गेला (घोषणा करण्यात आली). त्यांना सन्मान देत भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015 ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले.
25 डिसेंबर हा अटलजींचा जन्मदिवस ’’गुड गवर्नेंस डे’’( सुशासन दिवस) म्हणुन साजरा केला जातो.
वाजपेयी त्यांच्या कवितांबद्दल म्हणतात,
’’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल.’’
अटल बिहारी वाजपेयींचे पुरस्कार – Atal Bihari Vajpayee Awards
- 1992: पद्मविभूषण
- 1993: डी.लिट (साहित्यातील डाॅक्टरेट), कानपुर विश्वविद्यालय
- 1994: लोकमान्य टिळक पुरस्कार
- 1994: बेस्ट संसद व्यक्ती पुरस्कार
- 1994: भारत रत्न पंडित गोविंद वल्लभ पंत अवाॅर्ड
- 2015: भारतरत्न
- 2015: लिबरेशन वाॅर अवाॅर्ड (बांग्लादेश मुक्तिजुध्दो संमनोना)
अटल बिहारी वाजपेयींची पुस्तकं – Atal Bihari Vajpayee Books
- अटल बिहारी वाजपेयी मेम टीना दसका (1992)
- प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी: निवडक भाषणं (2000)
- व्हॅल्यु, व्हिजन अॅंण्ड व्हर्सेज आॅफ वाजपेयी: इंडिया मॅन आॅफ डेस्टिनी (2001)
- इंडियाज् फाॅरेन पाॅलिसी: न्यु डायमेंशन (1977)
- आसाम समस्या (1981)
अटल बिहारी वाजपेयी यांची पदं – Atal Bihari Vajpayee’s Post
- 1951: संस्थापक सदस्य भारतिय जन संघ (Bjs)
- 1957: दुस.या लोकसभेत नियुक्ती
- 1957.77: नेता, भारतिय जन संघ संसदिय पार्टी
- 1962: राज्यसभा सदस्य 5. 1966.67: अध्यक्ष, गव्र्हमेंट आश्वासन समिती
- 1967: चैथ्या लोकसभा निवडणुकीत पुर्ननियुक्ती (दुस.यांदा)
- 1967.70: अध्यक्ष, पब्लिक अकाउंट समिती
- 1968.73: अध्यक्ष, Bjs
- 1971: 5 व्या लोकसभा निवडणुकीत पुर्ननियुक्ती (तिस.यांदा)
- 1977: 6 व्या लोकसभा निवडणुकीत नियुक्ती (चैथ्यांदा)
- 1977.79: युनियन कॅबिनेट मिनिस्टर, एक्स्टर्नल अफेयर
- 1977.80: संस्थापक सदस्य, जनता पार्टी
- 1980: 7 व्या लोकसभा निवडणुकीत नियुक्ती (पाचव्यांदा)
- 1980.86: अध्यक्ष भारतिय जनता पार्टी (भाजप)
- 1980.84: 1986 आणि 1993.96: नेता, भाजप संसदीय पक्ष
- 1986: सदस्य, राज्यसभा, सदस्य, जनरल पर्पस समिती
- 1988.90: सदस्य, हाउस समिती, सदस्य, व्यापार सल्लागार समिती
- 1990.91: अध्यक्ष, याचिका समिती
- 1991: 10 व्या लोकसभा निवडणुकीत नियुक्ती (सहाव्यांदा)
- 1991.93: अध्यक्ष, पब्लिक अकाउंट समिती
- 1993.96: चेयरमॅन, एक्स्टर्नल अफेयर समिती, लोकसभा विरोधी नेता
- 1996: 11 व्या लोकसभा निवडणुकीत नियुक्ती (सातव्यांदा)
- 16 मे 1996.31 मे 1996: भारताचे प्रधानमंत्री
- 1966.97: विरोधी नेता, लोकसभा 25. 1997.98: चेयरमॅन, एक्स्टर्नल अफेयर समिती
- 1998: 12 व्या लोकसभा निवडणुकीत पुर्ननियुक्ती (आठव्यांदा)
- 1998.99: भारताचे प्रधानमंत्री, एक्स्टर्नल अफेयर मंत्री
- 1999: 13 व्या लोकसभा निवडणुकीत पुर्ननियुक्ती (नवव्यांदा)
- 13 आॅक्टो. 1999 ते 13 मे 2004: भारताचे प्रधानमंत्री
- 2004: 14 व्या लोकसभा निवडणुकीत पुर्ननियुक्ती (दहाव्यांदा)