Arokiaswamy Velumani
आपले लक्ष जर अर्जुनासारखे असेल तर आपल्याला कोणतीही समस्या आपले स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवू शकत नाही. आपण बऱ्याच मोटिवेशनल स्टोरी ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या असतील ज्यामध्ये एखादा व्यक्ती छोट्या स्तरावरून येऊन एका अश्या मोठ्या स्तरापर्यंत पोहचतो की तो दुसऱ्यांसाठी एक आदर्श बनून जातो. आजच्या लेखात आपण अशीच एक स्टोरी पाहणार आहोत जी आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल आणि संकटाच्या काळात धीर देण्यास मदत करेल. तर चला पाहूया आजची एक प्रेरणादायी स्टोरी.
ही स्टोरी आहे तामिळनाडू मधील कोईम्बूटूर च्या एका शेतकऱ्याच्या मुलाची. कुणी विचार हि केला नसेल की एक दिवस देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाचे नाव येईल. आपण त्यांच्या विषयी बोलत आहोत ज्यांचे देशात थायरोकेयर चे एक चांगले जाळे आहे. डॉ.वेलुमनी अरोक्यास्वामी.
डॉ.वेलुमनी अरोक्यास्वामी यांचा ५० ते ३३०० कोटी पर्यंतरचा प्रवास – Arokiaswamy Velumani Success Story in Marathi
डॉ.वेलुमनी यांचा जन्म एका सामान्य परिवारात झाला, त्यांचे वडील शेतकरी होते, आणि घरची परिस्थिती हलाकीची होती. पण घरखर्च आणि सर्व घराची जबाबदारी ही त्यांची आई पाहत होती, त्यांच्या कुटुंबात एकूण ४ भावंडे होती. वडिलांना कोणत्याही प्रकारच्या जबाबदारीचे भान नव्हते, म्हणून आईने घरखर्च सांभाळण्यासाठी दोन म्हशींना विकत घेतले. आणि त्या म्हशींचे दूध विकून येणाऱ्या पैशाने ते घरखर्च चालवत असत. या म्हशींचे दूध विकून त्यांना आठवड्याला ५० रुपये मिळत असत. असे करून त्यांनी त्यांचे घर १० वर्षांपर्यंत चालविले.
डॉ.वेलुमनी मोठे झाले होते तेव्हा यांना शिक्षणासाठी त्यांचे घर सोडावे लागले. १९ वर्षाचे असताना त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आणि त्यांनंतर ज्या प्रकारे प्रत्येक विधार्थ्यां समोर प्रश्न असतो तसा त्यांनाही नोकरी साठी प्रश्न पडला. पण त्यांनी हा प्रश्न सुध्दा एका फार्मसी च्या कंपनी मध्ये जॉब करून सोडवला. या जॉब च्या आधी त्यांना बरेच ठिकाणी मेहनत करावी लागली होती. त्यांना या जॉब चे १५० रुपये मिळत असत. आणि त्यापैकी १०० रुपये ते आपल्या घरी पाठवत असत. करण त्यांना त्यांची आई करत असलेले कष्ट माहिती होते.
पण ज्या कंपनी मध्ये ते जॉब ला होते ती कंपनी काही दिवसात बंद पडणार होती अश्या परिस्थिती मध्ये डॉ.वेलुमनी यांनी एका महिन्या आधीच त्या कंपनी मध्ये असलेला जॉब सोडून दिला आणि तेव्हाच मुंबई च्या भाभा आटोमॅटिक रिसर्च सेंटर मध्ये त्यांनी नोकरीसाठी आवेदन केले. आणि त्यामध्ये त्यांची निवड सुध्दा झाली, कुठे त्यांना केमिस्ट च्या पदावर १५० रुपये मिळायचे आता त्यांना ८०० रुपये मिळू लागले. या जॉब मध्ये त्यांना खूप कमी वेळ द्यावा लागायचा तुलनेत पहिल्या जॉब च्या त्यामुळे त्यांच्याजवळ वेळ वाचत होता, आणि त्यांनी या वेळेचा फायदा घेत तेथील काही मुलांची ट्युशन घेऊन कमाईचा आणखी एक मार्ग शोधून काढला.
आता त्यांची महिन्याची एकूण कमाई १६०० रुपये यायला लागली, ते त्यांच्या घरी त्यापैकी १२०० रुपये पाठवत असत. आणि त्यांनी आईला सांगितले की त्यांना २००० रुपयांची नोकरी मिळाली आहे कारण आईला हे वाटायला नको की एवढ्या दूर नोकरीला जाऊन एवढेच पैसे मिळत आहेत.
हे सर्व १५ वर्षांपर्यंत असेच चालत गेले. या दरम्यान वेलुमनी यांनी त्यांचे पीएचडी चे शिक्षण पूर्ण केले. आता ते डॉ.वेलुमनी झाले होते. पीएचडी च्या अभ्यासादरम्यान त्यांना हे चांगल्या प्रकारे कळले होते की थायरॉईड च्या फिल्ड मध्ये टेस्ट करून बरेच लोक पैसे कमवत होते. त्यांनी विचार केला की बाकी या फिल्ड मधून पैसे कमवत आहेत तर आपण का करू नये त्यांनी १९९५ मध्ये एक दिवस रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःजवळ जमा असलेली १ लाख रुपयांची रक्कम त्यांनी मुंबई मध्ये टेस्टिंग लॅब चे निर्माण करण्यात लावले.
त्यांनंतर त्यांनी देशभरात या टेस्टिंग लॅब च्या वेगवेगळ्या फ्रेंचायजी देत सॅम्पल लॅब निर्माण केल्या आणि मुख टेस्टिंग लॅबचे सेंटर मुंबई ला ठेवले. असे करत करता त्यांचा व्यवसाय वाढू लागला. २०११ मध्ये सीएक्स-पार्टनर्स कंपनीने डॉ.वेलुमनी यांच्या कंपनी मध्ये गुंतवणूक करता त्यांनी कंपनीचे ३०% शेयर्स विकत घेतले. ज्या शेयर्स ची किंमत १८८ करोड होती. आणि संपूर्ण कंपनी चे शेयर्स ६०० करोड होते.
याच प्रकारे बाकी कंपन्यांनी सुध्दा यामध्ये शेयर्स विकत घेतले. आज कंपनीची किमंत कोटी रुपयांमध्ये नाही तर अब्जो रुपयांमध्ये आहे. आज डॉ. वेलुमनी यांची संपत्ती जवळ जवळ ३३०० कोटींपेक्षा जास्त आहे. ही तीच व्यक्ती आहे जी एकेकाळी ५० रुपयांवर आपला जीवन खर्च चालवत होती. पण आज स्वतःच्या बुद्धीने आणि मेहनतीने त्यांना या उंचीवर पोहचवले.
या स्टोरी वरून आपल्याला एक शिकवण मिळते की जीवनात कितीही कठीण परिस्तिथी असली तरी हार मानून घ्यायची नाही. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी आणि प्रेरणादायी स्टोरींसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!