Arnala Fort Information in Marathi
तसे पाहता महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत. मग त्यात निसर्गरम्य ठिकाणे, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू आणि प्रगल्भ महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे किल्ले हे सर्वच सामील आहेत. महाराष्ट्रात जवळपास ३०० पेक्षा जास्त किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांपैकी एक विशिष्ट किल्ला म्हणजे अर्नाळा किल्ला.
वसई पासून अवघ्या १० ते १५ किमी. अंतरावर डौलाने उभा आहे हा अर्नाळा किल्ला. विशेष बाब म्हणजे या किल्ल्याची निर्मिती समुद्रात केलेली आहे. त्यामुळे या किल्ल्याला जलदुर्ग म्हणून सुद्धा ओळखतात. वैतरणा नदीच्या मुखावर या किल्ल्याची उभारणी केलेली आहे. मुंबई पासून जवळ असल्याने इथे लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात.
अर्नाळा किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास – Arnala Fort Information in Marathi
अर्नाळा किल्ल्याचा इतिहास – Arnala Fort History in Marathi
या किल्ल्याला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इ.स. १५१६ साली किल्ल्याची निर्मिती सुलतान महमूद बेगडा यांनी केली. हा किल्ला समुद्रातील बेटावर असल्याने व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो हे लक्षात आल्याने मुघल, मराठा, पोर्तुगीज इ. नी किल्ल्यावर चढाई आणि युद्ध केले.
अर्नाळा किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे – Tourist places Arnala Fort
किल्ल्याचे प्रचंड मोठे प्रवेशद्वार, त्या बाजूला असलेले भले मोठे बुरुज आणि भिंतीवरील हत्ती आणि वाघाचे कोरीव काम अतिशय विलोभनीय आहे. आयताकृती या किल्ल्यात अष्टकोनी पाण्याचा हौद आहे. तसेच किल्ल्यावर महादेव, भवानी आणि कालीमातेचे मंदिर आहे. अर्नाळा किल्ल्यावर एक मश्चिद सुद्धा आहे. याखेरीच किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत परिस्थितीत आहे.
किल्ला समुद्रात असल्याने मुंबईला भेट देणारे पर्यटक येथे आल्याशिवाय राहत नाहीत. शिवाय इतिहास आणि निसर्ग दोहोंचा योग्य या किल्ल्यावर पाहायला मिळतो. आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अरबी समुद्र. त्यामुळे अर्नाळा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वरदळ पाहायला मिळते.
अर्नाळा किल्ल्यावर कसे पोहोचायचे : How to reach Arnala Fort
स्वप्नांची नगरी मुंबई पासून अवघ्या ७० ते ७५ किमी वर हा किल्ला आहे. मुंबई पर्यंत विमान, रेल्वे किंवा बसने पोहोचल्यावर तेथून अर्नाळा किल्ल्यासाठी खाजगी किंवा एस.टी. बसने या किल्ल्यावर पोहोचता येते. रेल्वेने जायचे झाल्यास सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन विरार आहे. विरारहुन अवघ्या १० ते १२ किमी वर अर्नाळा किल्ला आहे.
अर्नाळा किल्ल्या जवळची पर्यटन स्थळे – Places to Visit Near Arnala Fort
- अर्नाळा बीच
- मुंबई
- अलिबाग
- मुंबईतील विविध बीच
- एलिफंटा गुफा इ.
अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठीचा सर्वोत्तम कालावधी – Best Time to Visit Arnala Fort
तसे पाहता या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची वरदळ पाहायला मिळते. ट्रेकिंग साठी येणाऱ्या प्रत्येकाला अर्नाळा आपल्याकडे खुणावत असतो. परंतु जर मुंबईतील पावसापासून दूर राहायचे असेल तर सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्याचा कालावधी उत्तम आहे.
अर्नाळा किल्ल्याबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Question about Arnala Fort Virar
उत्तर: सुलतान महमूद बेगडा यांनी (इस. १५१६ ).
उत्तर: पालघर.
उत्तर: जलदुर्ग किंवा जंजिरे अर्नाळा.
उत्तर: या किल्ल्याचे प्रवेशद्वार, बुरुज, किल्ल्याच्या भिंतीवरील कोरीवकाम, अष्टकोनी पाण्याचा हौद इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
उत्तर: इस. १७३७