Arjun Puraskar Information in Marathi
आपल्या जीवनात खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे. आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात. या खेळांत काही खेळाडूंना प्राविण्य प्राप्त असते. मग या खेळाडूंचा सत्कार तर करावाच लागेल न. हाच सत्कार म्हणून आपल्या देशात खेळाडूंना अनेक पदक, पुरस्कार आणि सन्मान देऊन गौरविण्यात येते. आज आपण अशाच एका पुरस्काराबद्दल माहिती बघणार आहोत.
अर्जुन पुरस्काराबद्दल महत्वपूर्ण माहिती – Arjun Puraskar Information in Marathi
अर्जुन पुरस्कार इतिहास : Arjuna Award History
भारत देशात खेळ विश्वातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार हे आपण सर्वांना माहित असेलच. परंतु त्या अगोदर खेळाडूंसाठी सर्वोच्च पुरस्कार म्हणून ‘अर्जुन पुरस्कार’ देण्यात येत होता. १९६१ साली पहिला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार द्वारा प्रत्येक वर्षी दिला जातो.
अर्जुन पुरस्काराचे स्वरूप – Nature of the Arjun Award
खेळाडूंची त्यांच्या खेळातील निष्ठा आणि कामगिरी उत्कृष्ट व्हावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये :
- कांस्य धातुपाऊसन बनविलेली अर्जुनाची मूर्ती
- १५ लक्ष रुपये रोख रक्कम
- प्रमाणपत्र इ. प्रदान करण्यात येते.
अर्जुन पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी विविध खेळांतील एकूण २० खेळाडूंना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एखाद्या खेळाडूला अर्जुन पुरस्कार मिळणे, म्हणजे खूप मोठी उपलब्धी मानली जाते.
अर्जुन पुरस्कार कुणाला दिला जातो ? – Who is Awarded by Arjun Award
हा पुरस्कार अशा खेळाडूंना दिला जातो, जे आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावतात. परंतु एवढेच नव्हे तर, खेळाचा प्रचार आणि प्रसार करतात, आणि स्वतः खेळाडू म्हणून निवृत्त झाले तरी वैयक्तिक पातळीवर खेळामध्ये आपले अमूल्य योगदान प्रदान करतात.
अर्जुन पुरस्कार कुठल्या खेळांसाठी दिला जातो ? – Sports Associated With Arjun Award
आणि असे जवळपास २० ते ३० खेळामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
अर्जुन पुरस्काराबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Arjun Puraskar quiz questions and answers
१. अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली?
उत्तर: १९६१ साली.
२. खेळ विश्वातील सर्वोच्च पुरस्कार कुठला?
उत्तर: राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार.
३. अर्जुन पुरस्कार कुणामार्फत प्रदान केला जातो?
उत्तर: युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार.
४. १९६१ साली पहिला अर्जुन पुरस्कार एकूण किती खेळाडूंना प्रदान करण्यात आला होता?
उत्तर: एकूण २० खेळाडूंना.
५. अर्जुन पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
उत्तर: कांस्य धातूपासून तयार केलेली अर्जुनाची मूर्ती, १५ लक्ष रुपये रोख आणि प्रमाणपत्र.
६. अर्जुन पुरस्काराची घोषणा कुठल्या तारखेला करण्यात येते?
उत्तर: राष्ट्रीय खेळ दिन, २९ ऑगस्ट रोजी.