माय विज़न फॉर इंडिया – अब्दुल कलाम / apj abdul kalam – डॉ. कलम यांनी हैदराबादच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी (IIT) मध्ये 25 मे 2011 ला आपले सर्वोत्कृष्ट भाषण दिले होते, तेथे त्यांनी भारताविषयीचे आपला दृष्टीकोन सांगितला होता, चला तर मग अब्दुल कलाम यांचे पूर्ण भाषण वाचूया –
माय विज़न फॉर इंडिया -अब्दुल कलाम भाषण / apj abdul kalam speech
IIT टेक-फेस्ट उदघाटन भाषण –
हैदराबाद
मी भारतासाठी पुढील तीन स्वप्न पाहिले आहेत. आमच्या 3000 वर्षातील इतिहासात जगातील विविध कानाकोपरयातून लोक भारतात आले आणि आम्हाला लुटून निघून गेले , आमची जमीन काबीज केली, आमच्या बुद्धीला गुलाम बनविले.
एलेग्जेंडर पासून ग्रीक, तुर्क, मुघल, पुर्तगाल, ब्रिटिश, फ्रेंच, डच सर्वांनी आमच्या देशाला लुटले.
हे सर्व आमच्या देशात आले आणि आम्हाला लुटले आणि जे काही आमचे होते ते सर्व घेऊन गेले.
परंतु आजपर्यंत आम्ही दुसऱ्या देशासोबत असे केले नाही.
आम्ही कुणालाही आपले गुलाम नाही बनविले. आम्ही कोण्या देशाची जमीन काबीज केली नाही, कोणत्याही देशाच्या संस्कृतिला ठेच पोहोचविली नाही आणि कोण्या देशाची जीवनपद्धती बदलण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही असे का करतो? कारण कि आम्ही दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो.
यामुळे माझे पहिले स्वप्न स्वातंत्र्य आहे. मी हे मानतो को भारताने स्वातंत्र्याचे पहिले स्वप्न 1857 मध्येच पहिले होते. जेव्हा आम्ही स्वातंत्र्याची लढाई सुरु केली.
या स्वातंत्र्याला नंतर आम्ही सुरक्षित केले आणि त्याचे पालन पोषण करून पुढे स्वातंत्र्याची निर्मिती केली. जर आम्ही स्वतंत्र नसतो तर आज कोणी आमचा आदर केला नसता.
माझे दुसरे स्वप्न भारताच्या विकासाचे आहे. पन्नास वर्षापासून आपला देश विकसनशील देश आहे.
apj abdul kalam bhashan
परंतु हि वेळ देशाला विकसित बनविण्याची आहे. जीडीपी च्या दरानुसार पाहिल्यास आपण जगात सर्वोच्च ५ देशामध्ये एक आहोत.
बहुतेक क्षेत्रामध्ये विकास दर 10% आहे. आमचा गरिबीचा स्तर दिवसेंदिवस कमी होत आहे.
आज आमची उपलब्धता विश्वस्तरावर मोजल्या जाते. परंतु तरीसुद्धा आपल्या देशाला एका विकसित देशाच्या रुपात पहिल्या जात नाही.
याचे सर्वात मोठे कारण आत्मविश्वास, आत्मनिर्भरता और स्व-निश्चिततेमध्ये कमी असणे होय. हे चुकीचे नव्हे काय ?
माझे तिसरे सुद्धा स्वप्न आहे. भारत जगात सर्वात वर असावा. कारण माझे असे मत आहे की भारत जोपर्यंत जगात सर्वात वर होत नाही , तोपर्यंत आमचा कोणी सम्मान नाही करणार. कारण सामर्थ्य हे सामर्थ्याचा आदर करते.
आम्हाला केवळ सैन्य शक्तीने नाही तर आर्थिक शक्तीनेही मजबूत होण्याची आवश्यकता आहे. आम्हाला हातात हात घेऊन पुढे जायचे आहे. माझे भाग्य चांगले म्हणून की मी तीन महान बुद्धीवंतान्सोबत काम केले आहे.
स्पेस डिपार्टमेंट चे डॉ. विक्रम साराभाई, प्रोफेसर सतीश धवन और न्युक्लीअर मटेरियल चे जनक डॉ. ब्रह्म प्रकाश. मी लकी आहे की या तीन महाज्ञानीसोबत काम करण्याची मला संधी मिळाली. मी माझ्या करियरमध्ये चार मैलाचे दगड पाहिले :
20 वर्ष इसरो (ISRO) मध्ये घालविले. मला भारताचा पहिला सॅटॅलाइट लांच व्हीकल, SLV3 चा प्रोजेक्ट डायरेक्टर होण्याची संधी मिळाली. त्याचाच ज्याने आधी रोहिणीला लांच केले होते.
माझ्या वैज्ञानिक जीवनाने यामध्ये खूप महत्वाची भूमिका पार पाडली. इसरो च्या नंतर मी DRDO मध्ये सहभागी झालो तिथे मला भारताच्या मिसाईल प्रोग्रामचा भाग होण्याची संधी मिळाली.
1994 मध्ये जेव्हा जेव्हा अग्निच्या सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर त्याचा संबंध मौसम विभागाशी आला तो माझा दूसरा सर्वाधिक आनंदित क्षण होता.
APJ Abdul Kalam Speech for Students
11 आणि 13 मेला डिपार्टमेंट ऑफ़ एटॉमिक एनर्जी आणि DRDO ने न्युक्लिअर टेस्ट मध्ये महत्वपूर्ण भागीदारी केली होती. हा माझ्यासाठी तिसरा सर्वाधिक आनंदित क्षण होता.
न्युक्लिअर टेस्ट च्या टीममध्ये सहभाग घेतल्याचा आनंद आणि हे भारताने बनविले आहे जगाला हे सांगण्याचा आनंद, याचा परिणाम आपल्या देशाच्या विकासावर पडणार हे मला माहिती होते.
या वेळी मला भारतीय असण्याचा गर्व वाटत होता. आम्हाला माहित होते की आम्हाला अग्निला विकसित करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी आम्ही त्याला पुनर्स्थापित केले आहे, आणि नवीन मटेरियल चा उपयोग करून अग्निला विकसित केले.
ज्यामध्ये खूपच हल्के मटेरियल कार्बनचा उपयोग करण्यात आला.
एक दिवस निज़ाम इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिकल साइंस चे ओर्थपेडीक सर्जन माझी प्रयोगशाला बघावयास आले.
त्यांनी मटेरियल उचलले आणि त्यांना असे लक्ष्यात आले के ते खूप हलके आहे आणि ते मला आपल्या हॉस्पिटलमध्ये घेउन गेले मला एक पेशंट दाखवू लागले.
जिथे छोटी मुलगी आणि मुलगा तीन किलो च्या मेटलिक कैलिपर ला आपल्या पायाला बांधून पाय घासत होते.
ते मला म्हणाले : कृपया माझ्या पेशंट चा त्रास कमी करा. तीन हफ्त्यामध्येच आम्ही ओर्थोसिस 300 ग्राम चे कैलिपर तैयार केले आणि याला ओर्थपेडीक सेंटरला घेवून गेलो. तिथे मुलांना आपल्या डोळ्यावर विशासच बसत नव्हता.
आता ते सहज कुठेही ये जा करू शकत होते. त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात मुलांना पाहून आशु झळकत होते. हा माझा चौथा सर्वाधिक आनंदित क्षण होता.
इथे मीडिया एवढा नकारात्मक का आहे ? आपणास भारतात आपली ताकत और उपलब्धिस सांगायचि शरम का वाटते ? आमचा देश एक महान देश आहे आमच्या देशांच्या यशस्वितेच्या खूप कथा आहेत.
परंतु आम्ही कधी त्याला माहिती करून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. हो कि नाही?
- दुधाच्या उत्पादनात आमचा देश पहिला आहे.
- रिमोट सेंसिंग सॅटॅलाइट मध्ये आम्ही नंबर 1 वर आहोत.
- गव्हाच्या उत्पादनात आमचा देश दूसरा सर्वात मोठा देश आहे.
- तांदुळाचे उत्पादन कारणानं आमचा देश दूसरा सर्वात मोठा देश आहे.
डॉ. सुदर्शन यांनाच बघाना, त्यांनी एका जनजातीय गाँवाला आत्मननिर्भर, स्वचलित गाँवामध्ये परिवर्तित केलेले आहे.
apj abdul kalam motivational speech
अशा खूप उपलब्धि आमच्या देशाने मिळविल्या आहेत परंतु मिडिया आमच्या देशातील वाइट गोष्टी, आपत्ती, अयशस्वीता आणि अस्वच्छतेस प्रकाशीत करतात.
एक जेव्हा मी टेल अवीव मध्ये होतो तेव्हा मी इसरायली वर्तमान पत्र वाचत होतो. याच्या एक दिवस आधीच तिथे खूप अटैक आणि बॉम्बवर्षाव झालेला होता.
ज्यामध्ये खूप लोकांना आपला जीव गमवावा लागला.
परंतु तरी सुद्धा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एका यहूदी माणसाचा फोटो छापण्यात आला होता ज्याने वाळवंटातील जमिनीस पाँच वर्षात हिरव्यागार जमिनीमध्ये बदलुन टाकले.
हा एक प्रेरणादायी फोटो होता जो कितीतरी लोकांना जगवू शकत होता.
अटैक, बॉम्बवर्षाव, मृत लोकांची माहिती वर्तमानपत्राच्या आतील पानावर होती.
भारतात आम्ही फक्त आम्ही फक्त मृत्यू, दुख, आतंकवाद, क्राइम याविषयीच वाचतो आम्ही एवढे नकारात्मक का ?
एक आणखी प्रश्न : आम्ही एक राष्ट्र म्हणून आपल्या देशाला विदेशी वस्तूंनी का बर ग्रासून ठेवतो? आम्ही विदेशी टीवीचे चाहते आहोत, आम्हाला विदेशी शर्ट आवडते, आम्हाला विदेशी टेक्नोलॉजी आवडते, असे करणे आवश्यक आहे का ? आम्हाला हे माहित नाही काय कि आत्मसम्मान आत्मनिर्भरतेतूनच येते.
मी हैदराबादमध्ये जेव्हा आपले लेक्चर देत असताना एक 14 वर्षाची मुलीने मला ऑटोग्राफ साठी विचारले तेव्हा मी तिला विचारले की जीवनात तिचे ध्येय काय आहे?
तीने उत्तर दिले: मी विकसित भारतात राहू इच्छिते. त्यासाठी, तुम्ही आणि मला मिळून एक विकसित भारत का निर्माण करावयाचा आहे.
तुम्ही अशी घोषणा करायला हवी भारत एक विकसनशील देश नाही तर पूर्णतः विकसित आहे.
best motivational speech by apj abdul kalam
आपल्या जवळ 10 मिनिट आहेत काय? मला प्रतोशोधासाहित सोबत येण्याची आज्ञा द्यावी. आपणास आपल्या देशासाठी 10 मिनिट मिळाले आहेत ? जर हो असेल तर याला वाचावे, नाहीतर आपली इच्छा.
- तुम्ही म्हणता कि आमचे सरकार अयोग्य आहे.
- तुम्ही म्हणता कि आमचे कायदे जुने आहेत?
- तुम्ही म्हणता कि महानगरपालिका कचरा उचलत नाही?
- तुम्ही म्हणता कि फ़ोन काम नाही करत, रेल्वे एक विनोद आहे, आमची एयरलाइन जगात सर्वात वाईट आहे, गाडी कधी आपल्या निर्धारित स्थानापर्यंत पोहोचत नाही?
- तुम्ही म्हणता कि आपला देश कुत्र्यांनी भरलेला आहे, आणि देशात खड्डेच खड्डे आहेत.
- तुम्ही म्हणता कि, म्हणतच राहता आणि म्हणतच राहता.
- तुम्ही यासाठी काय केले ? या ठिकाणी में सिंगापूरच्या एका माणसाचे उदाहरण बघूया.
सिंगापुरमध्ये आपण सिगारेट रस्त्यावर फेकू नाही शकत आणि दुकानाच्या आतमध्येही सिगारेट चे सेवन करू शकत नाही. तुम्ही त्याचप्रकारे त्यांच्या जमीनीच्या आतील रस्त्यांचा गर्व कराल जशे ते लोक आहेत.
बगीच्या असलेल्या रस्त्यावर गाड़ी चालविण्यासाठी तुम्हाला तिथे 5$ द्यावे लागतील, ते सुद्धा तुम्ही 5 PM ते 8 PM पर्यंतच चालवू शकता.
गाडी पार्किंग साठी तुम्हाला तिकीट घ्यावे लागेल. जर कोण्या रेस्टोरेंटमध्ये राहायचे असेल तर तिथे सर्वात आधी ओळख दाखावावी लागेल.
सिंगापुरमध्ये तुम्ही कुठेही काहीही बोलू शकत नाही. दुबईमध्ये रमजानच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी काही खायची हिम्मतसुद्धा करू शकत नाही.
वाशिंगटन मध्ये तुम्ही 55 mph पेक्ष्या जास्त स्पीडने गाड़ी चालवू शकत नाही. आणि ट्रैफिक पोलिसाला हे म्हणू शकत नाही,
“माहिती आहे मी कोण आहे?” तुम्ही हे सुद्धा म्हणू शकत नाही कि मी याचा अमक्याचा मुलगा आहे.
ऑस्ट्रेलिया और न्यूज़ीलैण्ड मध्ये रिकाम्या नारळास तुम्ही कुठेही टाकू शकत नाही. आपल्याला त्यास कचऱ्याच्या डब्यातच टाकावे लागेल.
टोकियो मध्ये तुम्ही कुठेही पान खाऊन थुंकू शकत नाही.
बोस्टन मध्ये तुम्ही नकली दस्तावेज आणि सर्टिफिकेट बनविण्याचा प्रयत्न का करू शकत नाही?
आम्ही अजूनही तुमच्याशी बोलत आहोत.
तुम्ही आपल्या देशात विदेशी सिस्टम चा सम्मान करू शकता परंतु आपल्या देशामध्ये आपल्याच देशातील सिस्टम चा सम्मान करू शकत नाही.
famous speech by apj abdul kalam
भारतीय जमीनिवर पाय ठेवताच तुम्ही रस्त्यावर पेपर आणि सिगारेट फेकून देता.
जर विदेशात तुम्ही विदेशीसारखे राहता आणि त्यांच्या नियमाचे पालन करता तर आपल्या देशात आपल्या देशातील नियमांचे पालन का नाही करू शकत ?
एकदा इंटरव्यूमध्ये मुंबईचे प्रसिद्ध म्युनिसिपल कमिश्नर श्री. तिनैकर यांनी म्हटले होते की, “श्रीमंत लोकांचे कुत्रे रस्त्यावर फिरत राहतात आणि सर्व जागेवर अस्वच्छता करून निघून जातात.”
त्यानंतर बहुतेक लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि बहुतेक लोकांनी त्यांची आलोचना हि केली होती.
अमेरिकेमध्ये कुत्र्यांचा मालक स्वतः आपल्या कुत्राने घाण केल्यावर ती साफ करतो. असेच जापानमध्येही होते. परन्तु भारतीय नागरिक असे करतो काय? आम्ही अस्वच्छता पसरवण्यासाठी सरकारी पोलची निवड करतो आणि नंतर अस्वच्छतेसाठी त्याच सरकारला दोषी ठरवतो. हि आमची जवाबदारी नाही काय? प्रत्येक काम सरकारचे असते काय?, सरकारनेच आमचे घर, आजू-बाजूस आणि रस्त्यातील कचरा साफ़ करायला पाहिजे ? याचसाठीच आम्ही सरकार निवडतो? आम्ही सरकारकडून आशा ठेवतो कि त्यांनी रस्ते साफ ठेवायला पाहिजे.
परंतु त्यांचेद्वारा बनविलेल्या कचरापेटीत आम्हाला कधी कचरा टाकणे आवडत नाही.
आम्हाला रेल्वेमध्ये साफ़ बाथरूम पाहिजे परंतु आम्हाला रेल्वेच्या बाथरूमचा योग्य उपयोग कसा करावा हे माहिती नाही.
आम्हाला भारतीय एयरलाइन और एयर इंडिया यांच्याकडून चागले भोजन पाहिजे परंतु आम्ही त्यांची बदनामी करने और उद्धटपणे बोलणे सोडू शकत नाही.
जेव्हा सामाजिक मुद्द्याविषयी विशेषतः स्त्रियाशी संबधित जसे हुंडा, कन्या भ्रूण हत्या या इत्यादि तर अशा वेळी आम्ही मोठे पोस्टर बनवितो.
आणि रस्त्यावर घेराबंदी करून गोंधळ करतो. आणि सिस्टम बदलण्याची मागणी करतो.
best motivational speech by apj abdul kalam
जर आम्ही आपल्याच मुलाच्या लग्नात हुंडा घेण्यास मनाई केली तर कसे होणार ?
कोनाची या सिस्टमला बदलण्याची इच्छा ठेवेल? सिस्टममध्ये काय काय असते ?
तसे पाहिले तर सिस्टममध्ये आमचे शेजारी, घरातील सदस्य, शहर, दुसरे समुदाय आणि निवडलेले सरकार समाविष्ट आहे.
परंतु जसे कि आम्ही व्यवहार करतो त्याच्यानुसार सिस्टममध्ये सर्व समाविष्ट आहे. फक्त तुम्ही आणि मी सोडून.
जेव्हा सिस्टम बदलण्यासाठी सकारात्मक योगदान देण्याची वेळ येते तेव्हा आम्ही आपल्याला आपल्या कुटुंबाच्या आत बंद करून ठेवतो.
आणि इच्छा ठेवतो कि कुणी येणार आणि काही चमत्कार करून सर्वकाही बदलून टाकेल.
जेव्हा भारत चांगला वाटत नाही तेव्हा आम्ही न्यू यॉर्कला निघून जातो.
आणि जेव्हा न्यू यॉर्क असुरक्षित वाटते तेव्हा आम्ही इंग्लंडला निघून जातो.
जेव्हा इंग्लंडमध्ये आम्हाला बेरोजगारी दिसते तेव्हा आम्ही गल्फ देशांत निघून जातो.
आणि जेव्हा गल्फमध्ये आम्हाला युद्ध दिसते तेव्हा आपल्या कुटूम्बासोबत भारतात परत येतो.
आज प्रत्येकजन देशाच्या बाहेर जावून रहायची इच्छा ठेवतो. परंतु सिस्टमला स्वतःहून सुधारू शकत नाही.
Thank you
तर यावे आम्ही ते करूया जे डॉ. कलाम आमच्याकडून अपेक्षा ठेवतात. आणि देशाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करूया.