अनुपम खेर / Anupam Kher हे एक सुप्रसिद्ध भारतीय अभिनेता आहेत. त्यांनी सुमारे आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेले आहे.
बहुतांश हिंदी चित्रपटासोबत त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्येहि काम केले आहे. ज्यामध्ये बेकनहम, लस्ट सारख्या लोकप्रिय चित्रपटाचा समावेश आहे.
अनुपम यांना ५ वेळा बेस्ट कॉमिक रोल साठी फिल्मफेयर चा अवार्ड मिळालेला आहे.
चित्रपट विजय साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅकटर चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला आहे.
अभिनेता अनुपम खेर यांचे जीवनचरित्र – Anupam Kher Biography In Marathi
एक अभिनेता असण्यासोबत ते भारतीय सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन नेशनल स्कूल ऑफ ड्रामा इंडिया चे अध्यक्ष पण राहिले आहेत.
हिंदी सिनेमा आणि कला क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने २००४ मध्ये त्यांना पदमश्री व वर्ष २०१६ मधेच पद्मभूषण देवून सन्मानित केले आहे.
त्यांचे संपूर्ण परिवार अभिनय क्षेत्रात आहे. त्यांची पत्नी एक उत्कृष्ट अभिनेत्री व चंदिगढ येथून संसद सदस्य आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा हिंदी सिनेमात अभिनेता आहे.
अनुपम खेर यांचे प्रारंभिक जीवन अनुपम खेर हे मूलतः एक काश्मिरी पंडित वंशीय आहेत. अनुपम खेर यांचा जन्म शिमला येथे ७ मार्च १९५५ साली झाला.
त्याचे पिता सरकारी क्लार्क होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिमला येथे झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून केले.
कलेची आवड असल्यामुळे नाटक व रंगमंचाची आवड त्यांना होती. अभिनयात करियर करण्या हेतू ते मुंबईला आले.
संघर्ष करताना ते बरेचदा रोड बाजूच्या प्ल्याटफार्मवरच झोपायचे त्यांच्या अशाच इच्छाशक्तीने त्यांना अभिनय क्षेत्रांच्या शिखरावर नेले.
विद्यापीठातील वार्षिक कलामहोत्सवातील त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळेच सर्वांचे लक्ष त्यांच्या कडे वेधले गेले.
१९८२ साली “आगमन” या चित्रपटाने त्यांचे फिल्मी करियर रुडावर आले.
१९८४ मधील “सारांश” मधील अभिनयाची खूप प्रशंसा झाली यावेळी अनुपम चांगलेच सुपरिचित झाले होते.
२८ वर्षीय अनुपमने ६५ वर्षीय म्हातारयाचा रोल अत्यंत सहजतेने केला यासाठी त्यांना फिल्मफेयरचा बेस्ट परफोरमस अवार्ड मिळाला.
त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले. त्यांचे हास्य अभिनेता म्हणून बरेच अभिनय लोकांच्या मनात चिरकाळ घर करून आहेत.
त्यांनी विलन म्हणून “कर्मा” (१९८६) आणि डॅडी (१९८९) मधील अभिनयासाठी बेस्ट पेरफोर्मंस चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला होता. त्यांचा सद्याचा टॉक शो –अनुपम खेर टॉक शो – कुछभी हो सकता है फारच लोकप्रिय आहे. त्यांचे सुपरस्टार शाहरुख सोबत बरेच चित्रपट आहेत.
जसे
- डर (१९९३),
- दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५)
- चाहत(१९९६)
- कूछ कुछ होता है (१९९८)
- मोहब्बते (२०००)
- वीर जारा (२००४)
- हँपी न्यू इयर (२०१५)
About Anupam Kher
त्यांनी २००२ मधे आलेली हित फिल्म “ओम जय जगदीश” डायरेक्ट आणि प्रोडूस केली आहे.
मैंने गांधी को नहीं मारा (२००५) ही एक आणखी त्यांच्या द्वारा प्रोडूस केलेली फिल्म आहे. त्यात त्याची मुख्य भूमिका होती.याच्या अभिनायाबद्द्ल त्यांची फार प्रशंसा झाली होती.
त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेकनहम (२००२) ब्राईड एंड प्रेजुडिस (२००४) स्पीडी सिंग (२०११) चित्रपट सुपरहिट ठरले. सोबतच त्यांनी अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक टॉक शो मधे भाग घेतला आहे.
अनुपम खेर भारतीय फिल्म सेंसर बोर्ड चे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. ते भारतीय नेशनल स्कूल ऑफ ड्रामा चे अध्यक्ष सुद्धा होते. १९७८ मध्ये याचे ते विद्यार्थी सुद्धा होते.
२००७ मध्ये अनुपम खेर यांचे प्रिय मीटर सतीश यांच्या सोबत मिळून करोल बाग फिल्म प्रोडक्शन कंपनी स्थापन केली. या प्रोडक्शन खाली तेरे संग हि पहिली फिल्म होती.
२०११ मध्ये मल्याळम अभिनेता मोहनलाल आणि अभिनेत्री जयाप्रदा सोबत मल्याळम भाषी रोमांटिक ड्रामा प्राणायाम चित्रपट सुरु केला होता. त्यांच्या मते ह त्यांच्या ७ उत्तम चित्रपटापैकी एक आह्रे.
२०१० मध्ये सामाजिक संस्था प्रथम एजुकेशन फौन्डेशन ने त्यांना आपला गुडविल अम्बेसेडर घोषित केले आहे.
आताही ते या फौन्डेशन साठी काम करतात. याचे मुख्य उद्देश लहान बालकांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे हि आहे.
त्यांनी मराठीतही अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. याशिवाय पंजाबी, कश्मीरी, मल्याळम भाषांच्या विविध अंगाने अभिनय केला आहे.
२००९ मध्ये कार्ल फ्रेड्रिंकसन यांच्यासाठी उडी मधील अनिमेशन मधील बांगलादेश निर्मिती वरील ड्रामा फिल्मसाठी करारबद्ध केले गेले आहे.
२०१६ मध्ये ABP न्यूज च्यानल वरील भारताच्या इतिहासाची ओळख सांगणाऱ्या डॉक्युमेंटरीचे सूत्र संचालन केले आहे.
प्रधानमंत्री मोडीचे ते फार मोठे फैन आहेत. मोदिबद्द्ल लोकांना प्रसार माध्यमांवर प्रेरित करतात.
एक सुदर अभिनय साकारणारा नट जो कोणत्याही प्रकारात आपली भूमिका सुस्पष्ट्पणे मांडतो.
अशा अभिनेत्याचा रुबाब ते अंगी बाळगतात तेही गर्व न करता.