Anti Alcohol Slogans
समाजातील बऱ्याच समस्यांपैकी सर्वात मोठी समस्या म्हणजे मद्यपान आहे. आज समाजातील बऱ्याच परिवारामध्ये मद्यपाणामुळे भांडणे होत आहेत. आणि त्यामुळेच बऱ्याच परिवारांच्या नात्यांमध्ये भेग पडत चालली आहे. एका सर्वेत समोर आले आहे कि तरुण वर्ग तणावापासून वाचण्यासाठी मद्यपानाचा सहारा घेतल्या जात आहे,
पण त्या तरुण वर्गाला मी सांगू इच्छितो मद्यपान केल्याने फक्त काही काळच आपण तणावाला दूर ठेवू शकता, त्यासाठी तणाव हा त्यावर इलाज नसून आपण आपल्या मित्रांच्या सहवासात रहा, जेणेकरून आपल्याला तणावापासून दूर राहण्यास मदत मिळेल.
आपण आजच्या लेखात मद्यपानावर काही घोषवाक्ये पाहणार आहोत. जे आपल्याला समाजामध्ये जागरुकता पसरविण्यास मदत करतील.
“मद्यपान विरोधी काही घोषवाक्ये” – Anti Alcohol Slogans in Marathi
मद्यपान विरोधी घोषवाक्ये – Anti Alcohol Slogans
तर चला पाहूया काही विशेष घोषवाक्ये!
- काय राव तुम्ही भलतच कमवाल, अन बाटलीच्या नादान सार दारूत गमावलं!
- मद्य करते बुद्धी भ्रष्ट, त्यापेक्षा दुध कधीही श्रेष्ठ.
- मातीशी मिळाल, जर बाटलीशी खेळाल.
- दारूची मागणी करू नका, आरोग्य खराब करून घेऊ नका.
- मद्य सेवनाचा पाश, करी संसाराचा सत्यानाश.
- दारूच्याच पायी, संसार घाईतच जाई.
- मआपले घर अधोगती कडे नेता.
- कौतुक नको मदिरेचे, स्वप्न भंगेल भविष्याचे.
- भविष्य आपल्या हाती असेल, जर दारू आपल्या सोबत नसेल.
- कराल जर मद्यपान, नसेल तुम्हाला जीवनदान.
- बाटलीशी खेळाल, मातीशी मिळाल.
- मद्यपान करून मिळेल मजा, पण अनारोग्याची होईल सजा.
- मद्यपान करशील, जीवाने जाशील.
- दारू च्या नादात पडू नका, आरोग्य खराब करू नका.
- दारू सोडली तर नाही कोणती हरकत, तुमच्या जीवनातच होईल चांगली बरकत.
- त्वरित थांबवा मद्यपान, पदरात पडेल जीवनदान.
- आज नाही आत्ता, दारू करा बेपत्ता.
मद्यपानामुळे आपल्या शरीरालाच धोखा होत नाही तर समाजामध्ये मद्यपान करणाऱ्या व्यक्तीचा मान-सन्मान सुद्धा होत नाही, त्यामुळे आपण तसेच आपल्या आजूबाजूला मद्यपान करण्यापासून समाजामध्ये जागरुकता पसरविणे आवश्यक आहे.
तर आशा करतो या लेखामुळे समाजामध्ये जागरुकता पसरविण्यासाठी मदत होईल. तर आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका. अशाच प्रकारचे लेख पाहण्यासाठी आमच्या माझी मराठी भेट दया.
Thank You So Much And Keep Loving Us!