Dharmveer Anand Dighe
महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. या पक्षांपैकीच एक म्हणजे शिवसेना. बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मुंबई येथे शिवसेनेची स्थापना केली.
मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे लवकरच हा पक्ष लोकांच्या पसंतीस उतरला. बाळासाहेब म्हणत शिवसेना सांभाळली ती सामान्य कार्यकर्त्यांनी. सामान्य कार्यकर्ता हाच शिवसेनचा कणा राहिला आहे. आणि याच कार्यकर्त्यांपैकी एक होते आनंद दिघे.
धर्मवीर आनंद दिघे – Dharmveer Anand Dighe in Marathi
पूर्ण नाव: | आनंद चिंतामणी दिघे |
जन्म (Birthday) | २७ जानेवारी १९५२, ठाणे |
वडिलांचे नाव (Father Name) | चिंतामणी |
मृत्यु (Death) | २६ ऑगस्ट २००१ |
ठाण्यातील टेंभी नाका येथे ते राहत असत. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे. सुरवातीच्या काळात शिवसेनेचे सामान्य कार्यकर्ता ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला.
आनंद दिघे यांचा जीवनप्रवास – Anand Dighe Information in Marathi
आनंद दिघे राहायचे त्या परिसरात बाळासाहेबांच्या सभा व्हायच्या आणि आनंद दिघे त्या सभांना जायचे. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाने आणि वक्तृत्वाने त्यांना भुरळ घातली आणि त्याच वेळी त्यांनी शिवसेनेत काम करायचं ठरवलं आणि ७०च्या दशकात त्यांनी शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरु केलं.
शिवसेनेचा जन्म जरी मुंबईत झाला असला तरी शिवसेनेला ठाणे जिल्ह्यात घरा घरात पोचविण्याचे काम केले ते आनंद दिघेंनी.
ठाण्यातील टेंभी नाक्यावरील त्यांचे घर म्हणजेच आनंदाश्रम. घरी आई, भाऊ, बहिण असा परिवार होता. त्यांच्या याच घरी नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे काम आनंद दिघे करायचे. जिल्ह्यातील त्यांचा जरबच तसा होता.
अनेकदा तक्रारींचा पाठपुरावा केल्यानंतरही निपटारा झाला नाही तर सर्वांसमक्ष संबंधित अधिकाऱ्याची खरडपट्टी निघत असे. त्यामुळे ठाण्यात आनंद दिघे नावाचा दरारा होता. सगळ्यांमध्ये त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती.
आनंद दिघे बाळासाहेबांचे अत्यंत निकटवर्ती होते. त्यामुळे आणि त्यांच्या कामामुळे ठाणेकर त्यांना ठाण्याचे बाळासाहेब देखील म्हणत. आध्यात्मिक असल्यामुळे त्यांनी टेंबी नाका परिसरात ‘जय अंबे संस्था’ करून नवरात्र उत्सवाची स्थापना केली या उत्सवाला एकदा लालकृष्ण अडवाणी भेट द्यायला आले होते तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारही भेट देत असत. यावरून दिघेंची लोकप्रियता आपल्या लक्षात येते. त्यांनी सुरु केलेला हा उत्सव अजूनही सुरु आहे. ते जसे आध्यात्मिक होते तसेच शिस्तीचे पालन करणारे होते म्हणूनच सर्वजण त्यांना धर्मवीर असे म्हणत असत.
Anand Dighe Story
एकदा महापौर निवडणुकीच्यावेळी शिवसेनेचा पराभव झाला. सेनेचे एक मत फुटल्यामुळे हा पराभव झाल्याचे म्हटले गेले आणि त्याचवेळी शिवसेना नगरसेवक श्रीधार खोपकर यांचा खून झाला. या प्रकरणी दिघे यांच्यावर आरोप करण्यात आले आणि त्यांना ‘टाडा’ अंतर्गत अटकही झाली.
त्यांच्या अटकेनंतर ठाणे जिल्हा तीन दिवस बंद होता असे म्हणतात. नंतर दिघेंची जामीनावर सुटका देखील झाली. त्यावेळी त्या प्रकरणाची फार चर्चा झाली होती.
नवरात्र उत्सव असो कि दहीहंडी प्रत्येक सण ते ठाण्यात मोठ्या जल्लोषात साजरे करत.या सणांना भव्य असं रूप त्यांनीच दिलं घरी असणारा कार्यकर्त्यांचा राबता, तक्रारींचा निपटारा आणि जिल्ह्याभरात फिरून विणलेले शिवसेनेचे जाळे यामुळे त्यांचा प्रवास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ते ‘धर्मवीर’ असा राहिला.
एकदा कामानिमित्त जात असतांना त्यांच्या जीपचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना सिंघानिया इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृतीही चिंताजनक होती. अनेक नेत्यांसह ठाण्यातील शिसैनिकांनी इस्पितळात गर्दी केली होती. कार्यकर्त्यांना त्यांना पाहता यावं अशा पद्धतीने त्यांचा बेड लावण्यात आला होता.
त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका येवून २६ ऑगस्ट २००१ रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली पण हि बातमी कार्यकर्त्यांना सांगण्याची हिम्मत कुणात होत नव्हती शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले कि, ‘आनंद दिघे आपल्यातून निघून गेले’ आणि शिवसैनिक सैर भैर झाले.
त्यांचा विश्वासच बसेना कि, धर्मवीर आपल्यातून गेले म्हनुन. रुग्णालयावर शंका उपस्थित करून त्यांनी सिंघानिया इस्पितळाला आग लावली.
आनंद दिघेंची राजकीय कारकीर्द बहरत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
मात्र त्यांचा सामान्य कार्यकर्ता ते धर्मवीर हा प्रवास शिवसैनिक कधीच विसरू शकणार नाही एवढं मात्र नक्की..!
आपणास हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जुळून रहा माझी मराठी सोबत.
धर्मवीर आनंद दिघे बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ About Anand Dighe
उ. आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला.
उ. आनंद दिघे शिवसेना पक्षाशी संबंधित होते.
उ. आनंद दिघेंना लोकांनी धर्मवीर हि उपाधी दिली होती.
उ. २६ ऑगस्ट २००१ रोजी ठाणे येथे झाला.
उ. ‘धर्मवीर’ हे नाव आनंद दिघेंच्या जीवनावर येऊ घातलेल्या चित्रपटाचे नाव आहे.