Amber Fort Information in Marathi
जयपूर शहरापासून सुमारे अकरा किमी अंतरावर असलेल्या अरावली पर्वत रांगेत वसलेला ऐतिहासिक कालीन अंबरचा किल्ला हा राजस्थान मध्ये असलेल्या विशाल किल्ल्यांपैकी एक आहे. किल्ल्याची असलेली सुरेख वास्तुशैली आणि भक्कम रचनेमुळे हा किल्ला जयपूर शहरात असणाऱ्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आकर्षक पर्यटन स्थळ बनल आहे.
राजस्थान राज्यांत असणाऱ्या अनेक आकर्षक पर्यटन स्थळांपैकी अंबर च्या किल्ल्याचा समावेश विश्व विरासत वास्तूंच्या यादीत करण्यात आला आहे. कारण, अंबर हा किल्ला प्रचंड मोठा असून त्यावर करण्यात आलेली हिंदू-राजपूत शैलीतील कलाकृती पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते. आपणास सुद्धा या किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्यासोबत जुडले असलेले काही रहस्यमय तथ्य माहिती करून घ्यायचे असल्यास या लेखाचे वाचन करावे.
अंबर किल्ला इतिहास – Amber Fort Information in Marathi
राजस्थान राज्यामधील गुलाबी शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूर शहराजवळील अरवली पर्वत रांगेत वसलेला अंबर हा किल्ला आमेर किंवा अंबर या नावाने ओळखला जातो. अंबर हा किल्ला अरवली पर्वत रांगेत वसला असल्याने या किल्ल्याचा समावेश पर्वतीय किल्ल्यांमध्ये केला जातो. शिवाय, हा किल्ला जयपूर शहरातील पर्यटन क्षेत्राचे आकर्षण केंद्र बनलं आहे.
अंबर किल्ल्याच्या स्थापणेबाबत अश्या प्रकारची ऐतिहासिक माहिती मिळते की, अंबर हा किल्ला पूर्वी सूर्यवंशी कुळातील मौर्य राजवंशाच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे या किल्ल्याची निर्मिती मूळ रूपाने स्थानिक मीनास नामक जनजाती द्वारा करण्यात आली होती.
इतिहासकारांच्या मतानुसार या किल्ल्याची निर्मिती सोळाव्या शताब्दीत राजपूत राजा मानसिंह प्रथम यांच्या द्वारा करण्यात आली होती. यानंतर राजा मानसिंह यांच्या उत्तराधिकाऱ्यानी सुमारे १५० वर्षापर्यंत या किल्ल्याचे विस्तारीकरण आणि नवीनीकरण करण्याचे काम सुरूच ठेवले.
इ.स. १७२७ साली सवाई मानसिंह द्वितीय यांनी त्यांच्या शासनकाळात आपली राजधानी आमेर येथून नवनिर्वांचीत जयपूर शहरात स्थानांतरीत केली होती. जयपूर या शहराची स्थापना होण्यापूर्वी मौर्य राजवंशाची राजधानी आमेर हीच होती. भारतातील अति प्राचीन काळीन असलेल्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या अंबर किल्ल्याला पहिले कदिमी महल म्हणून ओळखले जात असे. या किल्ल्याच्या आतमध्ये शीला मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे ज्याचे निर्माण राजा मान सिंह यांच्याद्वारे करण्यात आले होते.
काही लोकांच्या मतानुसार, या किल्ल्याचे अंबर हे नाव भगवान महादेव यांच्या अंबिकेश्वर या नावावरून ठेवले असावे. तर काही लोकांच्या मते माता दुर्गा यांच्या मा अंबा या नावावरून या किल्ल्याचे नाव अंबर असे ठेवण्यात आले असावे. अश्या प्रकारे विविध स्वरूपाचे तर्क लोक या किल्ल्याच्या नावाबाबत करीत असतात.
अंबर या किल्ल्याला प्रदीर्घ इतिहास लाभला असल्याने या किल्ल्यावर शासन करत असलेल्या शासकांनी आपआपल्या कारकिर्दीत किल्ल्यावरील स्थित अनेक ऐतिहासिक वस्तूंच्या संरचना नष्ट केल्या.
तसचं, त्याठिकाणी नवीन आकर्षक इमारतीची निर्मिती केली. अनेक प्रकारच्या संकटाचा सामना करीत आज सुद्धा अंबर हा किल्ला मोठ्या थाटात त्या ठिकाणी उभा आहे. किल्ल्यावर केल्या असलेल्या रचनेवरून किल्ल्याबाबत ऐतिहासिक माहिती मिळते.
जयपूर शहरापासून सुमारे अकरा किमी अंतरावर असलेल्या विशाल स्वरुपी अंबर किल्ल्याची निर्मिती हिंदू आणि राजपुतांना शैलीत करण्यात आलं आहे. परंतु, या किल्ल्याला बाहेरून पाहिल्यास किल्ल्यावर करण्यात आलेल्या कोरीव कामामुळे या किल्ल्याची निर्मिती मुघल शैलीत केली असल्याची जाणीव होते. परंतु, मुळात या किल्ल्याची निर्मिती राजपूत स्थापत्य शैलीत करण्यात आली आहे.
मुघल आणि हिंदू वास्तुशैलीचे उत्कृष्ट प्रतिक असलेल्या अंबर या किल्ल्याच्या आत प्राचीन वास्तुशैली आणि इतिहास कालीन धाडसी व साहसी राजपूत शासकांची चित्र लावण्यात आली आहेत. तसचं, किल्ल्याच्या आत बांधण्यात आलेली ऐतिहासिक महल, उद्यान, जलाशय आणि सुंदर इमारती किल्ल्याच्या सौंदर्यात आनखी भर टाकतात. किल्ल्याचे प्रवेश द्वार पूर्वेस असून त्यावर सूर्य चित्र रेखाटले आहे. त्यामुळे या प्रवेश द्वाराला सूरपोल किंवा सूर्य द्वार म्हटल जाते. त्याचप्रमाणे, किल्ल्याच्या आतमध्ये दक्षिण दिशेला एक भव्य द्वार बांधण्यात आले आहे. ज्याला चंद्र्पोल द्वार म्हणून संबोधण्यात येते. या किल्ल्याच्या अगदी समोर जलेब चौक आहे जेथून आपण सैलानी महलाच्या प्रांगणात प्रवेश करू शकतो.
इतिहास कारानुसार या चौकाची निर्मिती सेनाद्वारे युद्ध काळातील प्रसंगाची पुनरावृत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी केली गेली असावी. जेणेकरून महिला आपल्या खिडक्यांमधून ते प्रदर्शन पाहू शकतील. किल्ल्याच्या आत असलेल्या जलेब चौकातून पाहिल्यास दोन दिशेला शिड्या जात असल्याचे आपल्या नजरेत पडतात. त्यांपैकी एका बाजूच्या शिड्या ह्या राजपुतांची कुलदेवता असलेल्या शीला देवीच्या मंदिराकडे जातात. शीला देवीचे मंदिर तळ घरात स्थित आहे.
या मंदिराला ऐतिहासिक महत्व असण्याबरोबरच धार्मिक महत्व सुद्धा आहे. त्यामुळे जे काही पर्यटक या किल्ल्यावर भ्रमंतीसाठी येत असतात ते देवीचे दर्शन आवश्य घेतात. त्याचप्रमाणे जलेब चौकातून दुसऱ्या दिशेकडे जात असलेल्या शिड्या सिंहखांब द्वाराकडे जातात. या द्वाराच्या जवळच एक सुंदर आकर्षक संरचना असलेले दिवान-ए-आम महल उभे आहे. या महलाचा उपयोग पूर्वी शासकांद्वारे सामन्य जनतेसाठी आम सभेचे आयोजन करण्यासाठी केला जात असे. या महालात आम सभा भरून सामान्य लोकांच्या प्रश्नांची सरबराई केली जात असे.
वाळूपासून तयार करण्यात आलेल्या लाल आणि पिवळ्या रंगाच्या संगमरवरी दगडांपासून या भव्य किल्ल्याची निर्मिती केली असून या किल्ल्याच्या दक्षिणेस गणेश खांब द्वार स्थित आहे. जे या किल्ल्याचे आकर्षक केंद्र बिंदू आहे. या द्वारावर खुपचं सुंदर प्रकारची आकर्षक नक्षी काढण्यात आली असून, सुरेख कोरीव काम केलं आहे. तसचं, या किल्ल्याच्या वर कमानीवर भगवान गणेश यांची प्रतिमा रेखाटली असल्यामुळे या द्वाराचे नाव गणेश द्वार पडले आहे.
अरवली पर्वतावर प्रशिस्त स्वरुपात बांधल्या असलेल्या किल्ल्याच्या आत अनेक प्रकारची संगमरवरी महल व इमारती असून त्या पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करीत असतात. राजस्थान मधील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या अंबर या किल्ल्याच्या आत दिवान-ए-खास, सुख महल, शीश महल यांच्या सोबतच अनेक ऐतिहासिक वास्तूंची निर्मिती करण्यात आली आहे. याचबरोबर जागतिक वारसाहक्क स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेल्या अंबर किल्ल्याच्या आत चारबाग शैलीत बांधण्यात आलेले एक सुंदर उद्यान आहे. या उद्यानामुळे किल्ल्याची शोभा आणखीनच उठून दिसते.
राजस्थान मधील राजपुतांना अंबर या विरासते बाबत सांगायचं म्हणजे, अंबर हा किल्ला सुमारे दोन किमी लांब सुरांगाच्या माध्यमातून हा किल्ला जयगढ किल्ल्याशी जोडला गेला आहे. या सुरंगाची निर्मिती शासकांनी आपत्कालीन जन्य परिस्थितीत आपल्या परिवाराचा बचाव व्हावा याकरिता केली होती. अंबर किल्यावरून बाहेर पाहिल्यास जवळच असलेल्या जयगड किल्ल्याचे सौंदर्य खूपच सुंदर दिसते.
राजस्थान येथील हिंदू-राजपूत शैलीत बनलेल्या अंबर किल्ल्याच्या भेटीला विविध देशांतील पर्यटकांसोबत देशांतील पर्यटक सुद्धा येतात.
राजस्थान मधील जयपूर हे शहर सर्व प्रकारच्या मार्गाने जोडले गेले असल्याने या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. जयपूर या शहरात पोहोचल्यानंतर आपण बस, टॅक्सी किंवा ऑटो आदी साधनांचा वापर करून आपण याठिकाणी पोहचू शकता.