भारतीय चित्रपटांमध्ये प्रसिध्द अभिनेता म्हणून Ajay Devgan – अजय देवगण यांची ख्याती आहे. चित्रपटसृष्टीतील एक बहूपरिचीत आणि सुंदर अभिनय व एक्शन हिरो अशी ओळख असलेले अजय देवगण यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
चला तर या लोकप्रिय अभिनेत्याविषयी जाणुन घेउया . . .
हिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण – Ajay Devgan Biography
अजय देवगण यांचा जन्म 2 एप्रिल 1969 मध्ये दिल्ली येथे देवगण या पंजाबी परिवारात झाला. त्यांचे जन्म नाव विशाल वीरू देवगण आहे. त्यांचे वडील वीरू देवगण भारतीय चित्रपटाचे एक दिग्गज एक्शन डायरेक्टर आणि फिल्म प्रोडयुसर आहेत. आई विणा देवगण हया चित्रपट निर्माती आहेत. अजय देवगण यांचे शिक्षण मुंबई येथे जूहू येथील सिल्वर बिच हायस्कूल आणि मिठीबाई काॅलेज मुंबई मधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री काजोल हिच्याशी सन् 1999 मध्ये त्यांनी महाराष्ट्रीय पध्दतीने लग्न केले. काजोल एक यशस्वी अभिनेत्री आहे. त्या सध्या देवगण प्राॅडक्शन चे काम पाहतात. अजय काजोल यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. 2009 मध्ये अजय यांनी त्याचे सरनेम क्मअहंद बदलून क्मअहद असे केले आहे. अजय देवगण हे बाॅलीवुड चित्रपटांचे पहिले व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे प्रायवेट जेट आहे. अजय यांना असा अभिनेता मानले जाते जो आपल्या डोळयांनीच सर्व काही सांगून टाकतो.
अजय देवगण हे अभिनेता, डायरेक्टर, आणि प्रोडयुसर ही आहेत. आपल्या सुंदर अभिनयाने त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. 2 राष्ट्रीय फिल्म अवाॅर्ड आणि 4 फिल्मफेेयर अवाॅर्ड त्यांच्या नावे आहेत. 2016 मध्ये भारत सरकारने त्यांना चैथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म श्री ने सन्मानीतही केले आहे.
अजय देवगण यांनी 1991 मध्ये चित्रपट फुल और काटे मधून आपले फिल्मी करियर सुरू केले. या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट डेब्यू अवाॅर्डही मिळाला. यानंतर जिगर (1992), दिलवाले (1994), सुहाग (1994), नाजायज (1995), दिलजले (1996) आणि इश्क (1997) चित्रपट फार यशस्वी ठरले.
सन् 1998 मध्ये निर्माता महेश भट्ट यांचा “जख्म” केला. या चित्रपटाकरता त्यांना अभिनयासाठी बेस्ट अॅक्टर चा राष्ट्रीय फिल्म फेयर चा अवाॅर्ड मिळाला. “हम दिल दे चुके सनम” (1999 ) चित्रपटात ऐश्वर्या राय आणि सलमान खान या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. चित्रपट सुपरहिट ठरला. त्यांच्या या चित्रपटातील अभिनयासाठी खुप प्रशंसा झाली.
2000 मध्ये चित्रपट दिवानगी मध्ये निगेटिव्ह रोल साठी त्यांना बेस्ट खलनायक चा फिल्मफेयर अवाॅर्ड मिळाला. 2003 मध्ये राजकुमार संतोषी यांच्या भगतसिंग यांच्या जिवनावर आधारीत चित्रपट दी लीजंड आॅफ भगतसिंग मधील भगतसिंगच्या भूमीकेसाठी त्यांना दुस-यांदा बेस्ट एक्टरचा राष्ट्रीय फिल्म फेयर अवाॅर्ड मिळाला. त्यानंतर त्यांची एक गंभीर अभिनेता अशीही ओळख निर्माण झाली.
त्यांची एक्शन हिरोची ओळख होती परंतु आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी विनोदी आणि गंभीर अभिनयातही आपला दर्जा दाखवून दिला, 2004 मधील रेनकोट, गंगाजल, 2006 मध्ये ओमकारा, 2007 मध्ये गोलमाल: फन अनलिमीटेड, गोलमाल रिटन्र्स (2008), आॅल दी बेस्ट: फन बिगेन्स (2009) , वन्स अपाॅन अ टाईम इन मुम्बई (2010) , गोलमाल 3 ( 2010 ), राजनिती (2010) , सिंघम (2011) , बोलबच्चन (2012) , सोनाक्षी सिन्हा सोबत सन आॅफ सरदार (2012) , सिंघम रिटन्र्स (2014) , आणि दृश्यम (2015) सारखे हिट चित्रपट त्यांनी दिले.
प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार आणि मि.कूल अशी त्यांची ओळख आहे. आजवर 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. बाॅलिवूडचे ते एक उत्तम अभिनेता मानले जातात.
अभिनयासोबत अजय निर्माता व निर्देशकांची भुमिकाही समर्थपणे सांभाळत आहेत.
हे पण नक्की वाचा –
लक्ष्य दया : तुमच्या जवळ अजय देवगण बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा अजय देवगण यांचे जीवन – Ajay Devgan Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुद्धा.
नोट : Ajay Devgan Biography – अजय देवगण यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.