Agricultural Business Ideas
संपूर्ण जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. देशात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती सोबत जोडधंदा करून आपल्या उत्पन्नात वाढ करत आहेत, आपणही शेतकरी आहात का? तर हा लेख आपल्यासाठीच आहे. पारंपारिक पद्धतीने शेती करत असल्याने उत्पन्नात वाढ होत नसेल तर शेतीसोबत जोडधंदा सुरू करून आपल्या उत्पन्नात वृद्धी व्हावी यासाठी आजच्या या लेखात आम्ही आपल्याला काही शेतीसोबत करता येणाऱ्या जोडधंद्यांविषयी सांगणार आहोत, जे कि आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदतगार ठरतील. आणि याच व्यवसायात आपण लाखो रुपयांची कमाई सुध्दा करू शकता. तर चला पाहूया. असे काही जोडधंदे.
अशे काही व्यवसाय जे तुम्ही पारंपारिक शेती सोबत करू शकता – Agriculture Business Ideas in Marathi
१) फुलांचा व्यवसाय – Flower Business
आजकाल फुलांचे उत्पादन करणे आणि विक्री करणे हा मोठ्या प्रमाणात वाढणारा व्यवसाय आहे. बाजारात आपल्याला रंगीबेरंगी फुलांची मागणी नेहमीच पाहायला मिळते. आपण जर शेतीसोबत ह्या व्यवसायाला प्राधान्य दिले तर आपण या व्यवसायात बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळू शकते . आणि हा व्यवसाय आपण शेती सोबत सुध्दा करू शकता. बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. कारण कोणत्याही कार्यक्रमाला हार, फुले, पुष्पगुच्छ, या फुलांनी निर्मित असलेल्या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
२) सेंद्रिय शेती – Organic Farming
संपूर्ण देशात सेंद्रिय शेतीला महत्व येत आहे, कारण केमिकल्स चा वापर करून केलेल्या शेतीमध्ये उत्पन्न जरी भरपूर होत असलं तरी त्या पिकाला मागणी कमी असते. पण तेच त्या विरुध्द आपण जर सेंद्रिय शेतीचा वापर करून पिक घेतलं आणि त्या पिकांपासून उत्पादन काढून त्याला बाजारात विकल्यास आपल्याला त्या मालाची केमिकल्स ने पिकवलेल्या मालापेक्षा मोठ्या प्रमाणात किंमत मिळणार हे नक्की.
३) मशरूम ची शेती – Mushroom cultivation/ Farming
हा व्यवसाय सुध्दा आपल्याला भरगोच उत्पन्न देऊ शकतो. आपण या व्यवसायाला खूप कमी जागेत सुध्दा करू शकता आणि आपण या व्यवसायाला योग्य मार्गदर्शन घेऊन केल्यास हा व्यवसाय आपल्याला कमी दिवसात लखपती बनवू शकतो. आपण या व्यवसायाची माहिती इंटरनेट वरून सुध्दा मिळवू शकता. आपण तयार केलेल्या मशरूम ला देशातूनच नाही तर विदेशातून सुध्दा मागणी येऊ शकते, कारण हॉटेल्स मध्ये मशरूम ची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
४) पोल्ट्री फार्मिंग – Poultry Farming
शेतीसोबत सर्वात उत्तम जोडधंदा म्हणजे पोल्ट्री फार्म. यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडीशी गुंतवणूक करावी लागेल, पण ती गुंतवणूक आपल्याला खुप कमी दिवसात परत मिळणार कारण हा व्यवसायात सुध्दा आपल्याला कमी वेळात बऱ्यापैकी उत्पन्न देऊन जाईल. आपण या व्यवसायांकडे वळल्यास काही गोष्टींची काळजी घ्यावी जसे कि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छता असणार कारण ज्या पिल्लांना आपण फार्मिंग साठी पाळणार त्या पिल्लांना आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वच्छतेला प्राथमिकता देणे खूप आवश्यक आहे.
५) दुग्ध व्यवसाय – Dairy Business
शेती सोबत साईड इन्कम म्हणून आपण हा व्यवसाय करू शकता, देशात आजकाल बरेच ठिकाणी भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत आहे, आपण जर यावर समाधान काढत काही म्हशींचे किंवा गायीचे पालन करून त्यांच्या पासून मिळालेल्या दुधाला मोठ्या डेअरी मध्ये किंवा स्वतःची डेअरी सुरू करून विकल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. आणि या व्यवसायाला कोणत्याही प्रकारचा थांबा नाही, कारण दूध हे जीवनावश्यक गोष्टींमध्ये समाविष्ट आहे फक्त थोडीशी मेहनत आणि प्रयत्न आपल्याला कमी वेळात जास्त उत्पन्न देऊ शकतात.
वरील प्रत्येक व्यवसायाचे योग्य रित्या मार्गदर्शन घेऊनच त्यामध्ये आपली गुंतवणूक करा. कोणत्याही व्यवसायाचा अभ्यास न करता त्यामध्ये गुंतवणूक करणे म्हणजे योग्य ठरत नसते. म्हणून इंटरनेट किंवा युट्युब च्या माध्यमातून या व्यवसायाला चांगल्या पद्धतीने कश्या प्रकारे करता येईल, याविषयी जाणून घ्या.
आशा करतो वरील लेखात लिहिलेले शेतीसोबत करता येणारे जोडधंदे आपल्याला आवडले असतील आपल्याला सांगितलेले हे जोडधंदे आवडल्यास या लेखाला आपल्या शेतकरी मित्रांना शेयर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना मदत होईल, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!