Agra Kila
आपल्या भारतात बरीच इतिहासकालीन ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतात.
इतिहासात सर्वात जास्त काळ भरतात सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधाऱ्यांन पैकी एक मुघल होते.
मुघलांनी ज्या ज्या ठिकाणी आपली सत्ता स्थापण केली त्या त्या ठिकाणी त्यांनी आपले किल्ले बांधले होते. त्यांची सत्ता स्थापण करण्याची सुरवात झाली ती, दिल्ली पासून.
उत्तरप्रदेश मध्ये जेव्हा त्यांची सत्ता होती त्यावेळी मुघलांनी त्याठिकाणी एक किल्ला बांधला. तो किल्ला विशेष ओळखला जातो ते त्यावर केल्या असलेल्या खास प्रकारच्या वास्तुकलेसाठी आणि त्यावर केल्या गेल्या असलेल्या आश्चर्यकारक कारागिरीसाठी.
हा किल्ला मुघलकालीन काळात बनलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक मुख्य किल्ला आहे. या किल्ल्यावर केल्या गेलेल्या रेखीव व कोरीव स्वरूपातील विलक्षण नक्षीदार कामगिरीमुळे युनेस्कोने या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे.
आग्रा येथील हा किल्ला विश्वातील सात चमत्कारिक ठिकाणांपैकी सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या ताजमहाल पासून फक्त अडीच किलोमीटर अंतरावर यमुना नदीच्या किनारी बांधला आहे.
मुगलकालीन वास्तुशैली नुसार बांधल्या गेलेल्या या विशाल किल्ल्याची निर्मिती मुघल बादशहा अकबर याने केली आहे.
या किल्ल्याच्या निर्मितीसाठी लाल वाळूपासून बनवलेल्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. याच कारणामुळे आग्रा येथील किल्ल्याला “लाल किल्ला” म्हणून संबोधले जाते.
हा किल्ला प्रचंड प्रमाणात मोठा असून त्यावर केल्या असलेल्या कोरीव कामगिरीमुळे तो सर्वाना आपल्याकडे आकर्षित करीत असतो.
त्याच्या अंगी असलेल्या याच गुणांमुळे तो आज भारतात असणाऱ्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक प्रमुख स्थळ बनला आहे.
या विशाल स्वरूपात बांधल्या गेलेल्या किल्ल्याच्या आतमध्ये पर्ल मस्जिद, दिवान-ए-आम, जहागीर महल, मोती मस्जिद आणि पर्ल मस्जिद सोबतच मुघलांना राहण्यासाठी सुंदर सुंदर इमारती बांधलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे या लेखात आम्ही किल्ल्याच्या संबंधीत आणखी काही माहिती तसेच काही रंजक तथ्य आणि त्यांचा इतिहास आपणाला सांगणार आहोत.
इतिहास कालीन ऐतिहासिक आग्रा येथील लाल किल्ल्याचा इतिहास – Agra Fort Information in Marathi
आग्रा येथील विशाल स्वरूपात असलेल्या लाल किल्ल्याचे एका दृष्टीक्षेपात संक्षिप्त वर्णन – Agra Fort History
आग्रा येथील लाल किल्ला कुठे बांधला आहे? (Agra Killa Kuthe Aahe) | उत्तरप्रदेश मधील आग्रा या शहरात असलेल्या ताजमहल पासून अडीच किलोमीटर अंतरावर यमुनेच्या काठी बांधला आहे. |
किल्ल्याची निर्मिती कधी झाली? (Agra Killa Kadhi Banala) | ई. १५६५ ते ई १५७३ च्या दरम्यान( मुघलकालीन शासन असतांना) |
किल्ल्याचे निर्माण कोनी केले होते? (Agra Fort Was Built By) | मुघल बादशहा अकबर |
आग्रा येथील किल्ल्याची स्थापना – Agra Cha Lal Kila
उत्तरप्रदेश मधील आग्रा या शहरात यमुना नदीच्या काठी अस्तित्वात असलेल्या या महाकाय लाल किल्ल्याची स्थापना मुघल बादशहा अकबर कडून ई. १५६५ ते ई. १५७३ दरम्यान करण्यात आली होती.
असे असले तरी या किल्ल्याच्या प्रवेश द्वारावर असे लिहिले आहे की, जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आपले नाव नोद्ल्या गेलेल्या या किल्ल्याची निर्मिती मूळ रूपाने ई. पूर्व १००० च्या पहिले करण्यात आली आहे.
मुघल बादशहा अकबर याने फक्त त्या किल्ल्याचे नूतनीकरण केले आहे.
असे असले तरी जेव्हा जेव्हा मुघलांची राजगादी बदलत गेली त्यावेळेला अस्तित्वात असलेल्या मुघल बादशहाने या किल्ल्याचा स्वरुपात आपल्या मनाप्रमाणे बदल हे केलेच आहेत.
मुघल बादशहा अकबर याचा नातू आणि मुघल शासनाचा उत्तराधिकारी असलेल्या शहाजहां याने या किल्ल्याच्या आतमध्ये सुंदर अशा पांढऱ्याशुभ्र संगमरवरी दगडांपासून आकर्षक मस्जिद बांधून त्यामध्ये सुंदर नक्षीकाम करून तिला अधिकच प्रेक्षणीय रूप दिले.
सुरवातीला मुघलांची राजधानी ही आग्रा होती, कालांतराने ती बदली गेली.
ज्यावेळी राजधानी बदलण्यात आली होती त्यावेळेला शासकपदावर शहाजहां होता.
शहजहांने जेव्हा आपली राजधानी बदलण्याचे ठरवले त्यावेळी त्याने लाल किल्ल्याचा वापर राजवाड्याच्या स्वरुपात केला. या किल्ल्यातुनच तो आपले शासन चालवत असे.
शहाजहा नंतर त्याचा निर्दयी पुत्र औरंगजेब याने लाल किल्ल्याच्या बाहेरील बाह्य रक्षक बांधले होते.
ज्यावेळी मुघल शासनाचा उत्तराधिकारी हा औरंगजेब झाला होता, तेव्हा त्याने आपल्या वडीलांना शहाजहान याला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात आग्र्याच्या लाल किल्ल्यात कोंडून ठेवले होते. याच किल्ल्यात शहाजहान चा मृत्यू देखील झाला.
असे सुद्धा म्हटले जाते की, या किल्ल्यातून शहाजहा हा आपली पत्नी मुमताज च्या स्मरणार्थ बांधलेले जगातील सात चमत्कारांपैकी एक ताजमहाल पाहत असे.
आग्रा येथील किल्ल्याचा रोमहर्षक इतिहास – Lal Qila Agra History
या किल्ल्याची असलेली भव्य इमारत आणि त्यावर केले असलेले रेखीव असे नक्षीकाम यामुळे हा किल्ला लोकांना आपल्याकडे आकर्षित करीत असतो. याच कारणांमुळे या किल्ल्याची नोंद जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केली गेली आहे.
या किल्ल्याचा इतिहास राजपूत, मुघल आणि लोदी वंश यांच्याशी जोडलेला आहे.
आग्रा येथील या ऐतिहासिक स्थळामुळे आग्रा ही दिल्लीच्या मुघलांची सुरवातीची राजधानी होती. या किल्ल्याची निर्मिती ही ईसवी पूर्व १०८० च्या पहिले झाली असल्याचे प्रमाण मिळते.
महमूद गजनवी याचे सैन्य जेव्हा भारत जिंकण्याच्या विचाराने आले होते तेव्हा त्यांनी याच किल्ल्यावर आपला अधिकार स्थापित केला होता.
तसेच काही इतिहासकारांच्या मतानुसार आग्र्याच्या किल्ल्यावर वास्तविकरीत्या हा राजपूत घराण्यातील चौहान घराण्याचा होता.
ज्यावेळेला दिल्लीवरील सल्तनत राज्यकर्त्यानपूर्वी सुलतान आणि सिकंदर लोदी वंशाचे राज्यशासक राज्य करीत होते. त्यावेळेला लोदी याने आपली राजधानी दिल्लीवरून आग्रा येथे स्थलांतर केली होती.
जेव्हा लोदी याने आपली राजधानी दिल्लीहून आग्रा या ठिकाणी आणली त्यावेळेला त्याने या किल्ल्याची दुरुस्ती केली आणि तो या किल्ल्यात राहू लागला.
लोदी वंशाचा संस्थापक आणि शासक असलेल्या सिकंदर लोदी याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीम लोदी हा उत्तराधिकारी पदी आल्यानंतर त्याने किल्ल्यावर आपले वर्चस्व स्थापित केले.
ईसवी १५२६ मध्ये जेव्हा मुघल बादशहा बाबर हा भारतात आपली सत्ता स्थापण करण्यासाठी आला होता तेव्हा त्याने इब्राहीम लोदी यांच्या सोबत युद्ध पुकारले ज्याला आपण पानिपतचे पहिले युद्ध असे म्हणतो.
या पानिपतच्या युद्धात इब्राहीम लोदी याचा पराभव झाला. पानिपत हे ठिकाण आज हरियाणा राज्यात आहे.
या युद्धानंतर मघलांनी या किल्ल्यावर आपले वर्चस्व कायम स्वरूपी ठेवले.
मुघल वंशाचा संस्थापक बाबर याच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा हुमायू याने मुघल सत्तेचे उत्तरदायीक्त्व स्वीकारले होते.
हुमायू हा मुघलांचा उत्तराधिकारी झाला तेव्हा त्याने फक्त आग्र्याच्याच लाल किल्ल्यावर आपला अधिकार नाही मिळवला तर त्याने लोदी वंशाची असलेली अथांग संपत्ती आणि विशाल खजीनादेखील आपल्या ताब्यात घेतला होता.
लोदी वंशाच्या विशालरुपी या खजिन्यात भरतातील सर्वात मौल्यवान असलेल्या रत्नांपैकी एकमेव असा कोहिनूर हिरा देखील त्या खजिन्यात होता.
मुगलांच्या आग्र्याच्या किल्ल्यातील सत्तेचा अंत:
मुघल शासक हुमायू याचा मुघलांच्या उत्तराधिकार पदी राज्याभिषेक ईसवी १५३० मध्ये केला गेला होता. हुमायुचे शासन सुरु झाल्याच्या काही काळानंतर ईसवी १५४० मध्ये त्याचे युद्ध शेरशाह सुरु याच्यासोबत झाले होते.
शेरशाह सुरी सोबत झालेल्या युद्धात हुमायुचा पराभव झाला. या युद्धानंतर शेरशाह याने सुरी घराण्याची स्थापना केली.
युद्धात झालेल्या पराभवामुळे मुघलांची आग्र्याच्या किल्ल्यावरील असलेली सत्ता संपुष्टात आली.
शेरशहा सुरी याने आग्रा येथे आपली सत्ता १५ वर्षे सांभाळून ठेवली होती.
ईसवी १५५५ मध्ये मुघलांनचा आग्र्याच्या किल्ल्यावरील ताबा:
मुघल वंशाचा संस्थापक बाबर याचा मुलगा हुमायूचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याचा मुलगा अकबर हा केवळ १३ वर्षाचा होता.
हुमायुच्या मृत्यू झाल्याने त्याच्या जागी त्याचा १३ वर्षीय मुलगा अकबर हा मुघलांच्या उत्तराधिकारी आला होता.
आपली मुघल सत्ता मजबूत करण्याच्या उद्देशाने अकबर मुघलांची सत्ता वाढविण्यासाठी त्याने राजनैतिक प्रवास करायला सुरवात केली.
ईसवी १५५८ मध्ये अकबर प्रवास करीत असतांना आग्रा येथे पोहचला आणि त्यांनने त्या ठिकाणी आग्रा शहराचे ऐतिहासिक महत्व समजून घेतले.
आग्र्याचे ऐतिहासिक महत्व समजावून घेतल्यानंतर त्याने आग्र्याला आपली राजधानी बनवले.
इतिहासकारांच्या मतांनुसार, ज्यावेळी अकबर बादशहा याचे राज्य होते त्यावेळेला आग्रा येथिल किल्ला(बादलगढ किल्ला) ची अवस्था खूपच दयनीय आणि वाईट आश्या पडक्या अवस्थेत होती. त्यावेळेस किल्ला हा फक्त विटांपासून बांधलेला होता.
किल्ल्याची अशी अवस्था पाहून अकबर याने त्या किल्ल्याचे पुनर्रचना करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने बादलगढ च्या किल्ल्याचे अवशेष पुन्हा गोळा केले.
ईसवी १५६५ मध्ये राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातून लाल वाळूचा दगड मागवून या किल्ल्याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.
या किल्ल्याच्या निर्मितीसाठी हजारो कामगारांनी जवळपास आठ वर्ष सतत काम केले त्यानंतर ईसवी १५७३ साली या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले.
मुघल शासक शहाजहां याने का केला होता किल्ल्याचा काही भाग नष्ट:
काही इतिहासकारांच्या मतांननुसार, मुघल शासक अकबर याचा नातू शहाजहां
याने या किल्ल्यात त्याचे शासन असतांना किल्ल्याच्या आतमध्ये काही इमारतीचे तसेच काही मस्जिदीचे बांधकाम केले होते.
किल्ल्यातील इमारतीच्या बांधकामा करिता त्याने पांढऱ्याशुभ्र संगमरवरी दगडांचा वापर केला होता.
इमारतीचे बांधकाम करीत असतांना त्याने किल्ल्याच्या मागच्या बाजूने असलेल्या काही जुन्या इमारती पाडून टाकल्या होत्या.
किल्ल्याच्या आतमधील इमारती पाडून त्याने त्याठिकाणी पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांपासून मस्जिद आणि काही इमारतीचे बांधकाम केले होते.
मुघल शासक शहाजहां याने या किल्ल्यात बांधकाम करून त्या किल्ल्याला एका प्रकारचे वास्तविक रूप दिले होते.
आग्र्याच्या किल्ल्याला नविन रूप देणारा मुघल शासक हा शहाजहांच म्हणवे लागेल.
शहाजहां याला एक मुलगा होता त्याचे नाव औरंगजेब होते, हा त्याच्या नावाप्रमाणेच खूप क्रुर आणि निर्दयी वृत्तीचा मोघल शासक होता.
त्याने मुघल शासकांची सत्ता आपल्या हाती यावी याकरिता त्याने सत्तेवर असणाऱ्या आपल्या म्हाताऱ्या वडील शहाजहां यांना त्याच्या जीवनाच्या अंतिम क्षणाला आग्र्याच्या याच लाल किल्ल्यातील शाह्बुर्ज (मुसम्मन बुर्ज) या ठिकाणी बंदिस्त करून ठेवले होत.
शहाजहांन याला अशा ठिकाणी बंदिस्त केले होते जेथून ते आपल्या लाडक्या पत्नीसाठी बांधला असलेला मुमताज महल चा मकबरा आणि त्यांच्याच प्रेमाचे प्रतिक असलेली जगप्रसिद्ध इमारत म्हणजेच ताजमहल याचं तो दररोज दर्शन घेऊ शकेल.
आपल्या म्हाताऱ्या वडिल शहाजहां याला बंदिस्त केल्यानंतर त्याचा मुलगा औरंगजेब हा मुघलांच्या सत्तेच्या शासक पदी आला होता.
शहाजहां याचा मृत्यू त्याला औरंगजेबने बंदिस्त केल्या असलेल्या आग्रा येथील लाल किल्ल्याच्या ठिकाणीच झाला होता.
१८५७च्या भारतीय स्वतंत्र्य संग्रामाचा साक्षीदार आहे हा किल्ला:
१८ व्या शतकाच्या प्रारंभी मराठा साम्राज्याने या जागतिक वारसा असलेल्या लाल किल्ल्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली.
यानंतर सुद्धा या किल्ल्यावर बऱ्याच शासन असलेल्या सत्तांनी आपला ताबा मिळविला होता.
ईसवी १७६१ मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झाले ते मराठा आणि अहमद शह अब्दाली यांच्यात. पानिपतच्या या युद्धात मराठ्यांच्या तुलनेने अब्दालीची सेना खुप मोठी होती.
तसेच मराठ्यांच्या सेनेला दुसऱ्या कुठल्या प्रांताकडून मदत देखील मिळाली नव्हती. परिणामी मराठ्यांचा या लढाईत पराभव झाल्यानंतर अब्दालीने या लाल किल्ल्यावर आपले वर्चस्व स्थापित केले.
यानंतर अनेक सत्तांनी आपला अधिकार या किल्ल्यावर प्रस्थापित केला होता.
ईसवी १७८५ मध्ये पेशवाई घराण्याचे महादजी शिंदे यांनी या किल्ल्यावर आपले साम्राज्य विस्तारले होते.
यानंतर ईसवी १८०३ मध्ये झालेल्या दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी या महाकाय रुपी विस्तारलेल्या किल्ल्यावर आपले साम्राज्य जमविले.
इंग्रज या किल्ल्याचा वापर आपल्या खासगी कामांकरिता करीत असत.
भारताच्या स्वतंत्र्य संग्रामातील सर्वात पहिली लढाई म्हणजेच ईसवी १८५७ चा भारतीयांनी स्वतंत्र्यासाठी केलेला उठाव होय. या उठवादरम्यान त्यांनी लाल किल्ल्याला रणांगनाचे स्वरूप आणले होते.
१८५७ साली देशाच्या क्रांतीकारांनी केलेला हा उठाव इंग्रजांनी हाणून पाळला होता. त्यानंतर जवळपास सुमारे एका शतका पर्यंत इंग्रजांनी या किल्ल्यावर आपले शासन चालविले.
१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर तो किल्ला इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाला. या किल्ल्यावर केल्या असलेल्या विलक्षण वास्तुकलेसाठी या किल्ल्याला २००४ चा आगा खान पुरस्कार मिळाला होता.
आश्चर्यकारक आणि सूचीबद्ध स्वरुपात असलेली आग्र्याच्या किल्ल्याची वास्तुकला – Agra Fort Architecture
उत्तरप्रदेश मधील आग्रा या शहरातील यमुना नदीच्या किनारी स्थित असलेल्या या जागतिक वारसा स्थळाचा आकार अर्धवर्तुळाकार आहे.
हा विशालकायी किल्ला सुमारे ३,८०,००० चौसेमी म्हणजेच ९४ ऐकर आशा विस्तीर्ण क्षेत्रफळात पसरलेला आहे.
किल्ल्याचे बांधकाम खूपच भक्कम स्वरुपात केलेले आहे, किल्ल्याच्या चारीबाजूने उंचच्या उंच भिंतीचे आवरण घटले असून, या भिंतीची उंची सुमारे ७० फुट आहे.
या किल्ल्याच्या बांधकामासाठी विशेष प्रकारच्या लाल वाळूपासून बनवलेल्या दगडांचा वापर करण्यात आल्यामुळे या किल्ल्याचा रंग लाल दिसतो.
या लाल रंगमुळेच त्या किल्ल्याला “लाल किल्ला” म्हटले जाते.
जगात असणाऱ्या सात आश्चर्यान पैकी एक असलेल्या ताजमहल पासून लाल किल्ल्याचे अंतर जवळपास अडीच किलोमीट आहे. या विस्तीर्ण किल्ल्याच्या आतमध्ये आज वर्तमानात सुद्धा २४ पैक्षा जास्त स्मारक अस्तित्वात आहेत.
इतिहासकार अबुल फजल यांच्यामतानुसार भारताच्या या जगप्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक स्थळाच्या आतमध्ये सुंदर आणि आकर्षक स्वरूपाच्या बंगाली आणि गुजराती वास्तुशैलीतील पाचशे इमारतीचे बांधकाम केले गेले होते.
काही काळानंतर या किल्ल्यातील काही इमारतींना शहाजहां आणि इंग्रजांनी त्यांचे शासन असतांना नष्ट केले होते.
मुघल शासक शहाजहां याने आपली सत्ता असतांना आग्र्याच्या किल्ल्यात बांधकाम करण्यासाठी काही इमारती नष्ट केल्या होत्या. इमारती पाडल्यानंतर त्याने त्या ठिकणी पांढऱ्याशुभ्र संगमरवरी दगडांपासून इमारतींचे बांधकाम केले होते.
याच बरोबर त्याने किल्ल्याच्या आतमध्ये मशिदींचे बांधकाम देखील केले होते. मुघल शासक शहाजहां च्या मृत्यूनंतर त्या किल्ल्याचे आकर्षण कमी होत गेले.
विस्तीर्ण अशा ३ किमी च्या क्षेत्रफळात पसरलेल्या या विशाल किल्ल्यावर ज्यावेळेला इंग्रजांनी आपले अधिकार प्रस्थापित केले होते, त्यावेळी सुद्धा या किल्ल्याच्या मूळ रचनेत हस्तक्षेप हा केलाच होता. त्यांनी या किल्ल्यात बऱ्याच प्रकारचे बदल केले होते.
या किल्ल्याच्या आतमध्ये काही कारागृह बांधण्यासाठी इंग्रजांनी या किल्ल्याच्या आतील बऱ्याच इमारती नष्ट केल्या होत्या.
आग्रा किल्ल्याच्या अस्तित्वात असणाऱ्या वास्तून पैकी फक्त अकबरी गेट, दिल्ली गेट, आणि बंगाली महल आजरुपी अस्तित्वात आहेत.
या वास्तून मधून आपल्याला मुघलकालीन वास्तुकलेचे वास्तविक कौशल्य आणि त्यांची नैपुण्य रित्या केली असलेली कारागिरीचे दर्शन होते.
त्याचप्रमाणे या सुंदर रुपी रचनेला इंडो-इस्लामिक वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून देखील ओळखले जाते.
मुघलकालीन बांधलेल्या या महाविशाल किल्ल्याच्या आत चार प्रमुख प्रवेश द्वार आहेत. त्यांपैकी नदीच्या मुखाकडे उघडणाऱ्या प्रवेश द्वारास खिजडी गेट म्हणतात.
त्याचप्रकारे दिल्लीच्या दिशेने उघडणाऱ्या दरवाजाला “दिल्ली दरवाजा” किंवा “दिल्ली गेट” सुद्धा म्हणतात. यालाच मुघल शासक अकबर ची सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणून ओळखतात.
त्याचप्रमाणे लाहोरच्या दिशेने उघडणाऱ्या दरवाजाला “लाहोरी दरवाजा” किंवा “लाहोरी गेट”(अमरसिंह द्वार) म्हटले जाते. याशिवाय आणखी एक दरवाजा याच्या आतमध्ये आहे ज्याला हत्ती पोल म्हणून ओळखतात. या दरवाजाच्या दोन्ही बाजूने विशाल हत्तींची प्रतिकृती बनवण्यात आल्या आहेत.
आग्र्याचा लाल किल्ला हा हिंदू आणि मुघलकालीन स्थापत्य कलेचे एक अलौकिक उदाहरण आहे. या किल्ल्याच्या भिंतींवर करण्यात आलेल्या कोरीव नक्षीकामामुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व दिसून येते.
ऐतिहासिक अश्या जागतिक वारसा हक्क समजल्या जाणाऱ्या आग्रा किल्ल्यातील आतील खोल्या अश्या अदभूत तऱ्हेने बनविण्यात आल्या होत्या की जेणेकरून उन्हाळ्यात देखील त्या थंड राहतील.
किल्ल्याचे केले असलेले बांधकाम हे भक्कम आणि आकर्षक स्वरूपाचे असल्याने या किल्ल्याला १९८३ साली यूनेस्को द्वारा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बांधली असलेली महत्वपूर्ण इमारती:-
जगात असणाऱ्या सात अदभूत रहस्यमय स्थळांपैकी एक ताजमहल आहे.
ताजमहल पासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर हा लाल किल्ला स्थित आहे. आग्र्याच्या या ऐतिहासिक किल्ल्याच्या आत अनेक अदभूत रचना बनविण्यात आल्या आहेत ज्या अश्या आहेत.
जहांगीर महल – Jahangir Mahal Agra
उत्तरप्रदेश मधील आग्रा या ठिकाणी असलेल्या जागतिक वारसा स्थळाच्या आतमध्ये अप्रतिम आणि आकर्षक असे जहांगीर महल स्थित आहे.
या महालाकडे जाण्याचा मार्ग हा लाल किल्ल्याच्या आतमधील अमरसिंह दरवाजाच्या(अकबर दरवाजा) आत जाताच नजरेस पडते.
मुघल शासक अकबर याने या महालाची निर्मिती आपला मुलगा जहांगीर साठी बनवीले होते.
अंगुरी बगीचा – Anguri Bagicha
हा अंगुरी बाग आग्र्याच्या किल्ल्याच्या परिसरात पसरलेला असल्याने या किल्ल्याची शोभा आणखीनच वाढलेली आहे.
या बागेची किल्ल्याच्या परिसरातील लांबी जवळपास ८५ चौसेमी च्या क्षेत्रफळात पसरलेला आहे.
खास महल – Khas Mahal
ताजमहल या जगतिक वारसा स्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या आग्रा या शहरात महाकाय स्वरूपी लाल किल्ल्यादेखील बांधलेला आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये हे खास महल बांधलेले आहे.
हे महल देखील आपल्या विशेष शैल्लीकृती साठी प्रसिद्ध आहे. या महालाची प्रतिकृती बनविण्यासाठी पांढऱ्याशुभ्र संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आला आहे.
या खास महालाच्या निर्मितीतून आपल्याला हिंदू, इस्लामी आणि फारसी शैल्लींच्या विविधतेच्या रचनेचे दर्शन होते. या महालाचा वापर शासक विशेष करून आराम करण्याकरिता करत असत.
मुसम्मन बुर्ज – Musamman Burj
आग्र्याच्या किल्ल्याच्या आतमधील परिसरात हे मुसम्मन बुर्ज बांधलेले असून, हे महल खास महलाच्या डाव्या बाजूने स्थित आहे.
या महला बद्दल विशेष बाब म्हणजे हे महल अष्टकोनीय स्वरूपात बांधलेले असून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे छत नाही.
हा महल एका उघड्या मंडपां सारखा बांधलेला आहे. या मुसम्मन बुर्जाची निर्मिती मुघल शासक शहाजहां याने केली आहे.
या महलाबद्दल विशेष बाब म्हणजे, या महलाची निर्मिती करणारा मोघल शासक शहाजहां यालाच या मुसम्मन बुर्ज महालाच्या आतमध्ये त्याचा मुलगा औरंगजेब याने कैदी म्हणून बंदिस्त करून ठेवले होते.
या महालात शहाजहां हा बंदिस्त असतांना या मुसम्मन बुर्ज मध्ये बसून तो आपल्या प्रिय पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बाधण्यात आलेले, त्यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे मुमताजचे समाधी स्थळ म्हणजेच ताजमहल रोज न्याहाळत असे.
शीश महल – Sheesh Mahal Agra Fort
मुघलकालीन शैलीत बांधल्या असलेल्या या किल्ल्याच्या आतमध्ये अनेक प्रकारची महल बांधलेले आहेत. या महलांनपैकी एक महल म्हणजेच शीश महल हे होय.
या महलाच्या निर्मितीत काचेचा वापर केला असल्यामुळे या महलाला “शीश महल” किंवा “कांच का महल” म्हणून ओळखले जाते.
या शीश महलाचा वापर मुघल शासक कपडे बदलण्याकरिता किंवा ‘हरम’ म्हणून करीत असत. या महलाच्या सजावटीसाठी त्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या आकाराच्या काचेचा वापर करण्यात आलेला आहे.
आग्र्याच्या किल्ल्यात बाधण्यात आलेले हे शीश महल खूपच आकर्षक आहे.
या ठिकाणी सर्वसामान्य पर्यटकांना जाण्यास मनाई आहे.
दिवान-ए-खास- Diwan I Khas Agra Fort
मुघल कालीन शैलीत बांधलेला तसेच जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या आग्र्याच्या लाल किल्ल्याच्या आतमध्ये दिवान-ए-खास महल बांधलेले आहे.
हे महल किल्ल्याच्या परिसरात बांधल्या असलेल्या शीश महलाच्या उजव्या बाजूने आहे. मुघल शासक या महलाचा वापर विशेषतः मोठया अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी करीत असत.
या महालाचे खास वैशिष्ट्य म्हणजे खूप मौल्यवान दगडांचा वापर करून बनवण्यात आलेले जहांगीर चे सिंहासन या महालात ठेवण्यात आले होते.
दिवान-ए-आम- Diwan I Aam Agra Fort
आग्र्याच्या किल्ल्याच्या परिसरात असणाऱ्या महालांपैकी दिवान-ए-आम नावाच्या महालाची निर्मिती ही सर्वसामान्य लोकांसाठी करण्यात आली होती.
सर्वसामान्य जनतेसाठी असणाऱ्या या महालाचा वापर मुघल शासक जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्यांचे निवारण करण्याकरिता करत असत.
दिवान-ए-महलाच्या आतमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या “मयूर सिंहासनाची (तख्त-ए-हाउस)” स्थापना केली होती.
नगीना मस्जिद – Ngina Masjid Agra Fort
आग्रा येथील जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या लाल किल्ल्याच्या आतमध्ये नगीना मस्जीदीची निर्मिती मुघल शासक शहाजहां याने केली आहे.
नगीना मस्जीदी बद्दल विशेष सांगायचं म्हणजे ही मस्जिद विशेष करून फक्त महिलांसाठीच बांधण्यात आली होती.
मोती मस्जिद – Moti Masjid Agra
आग्र्याच्या किल्ल्यात बांधली असलेली मोती मशिदीची रचना खूपच आकर्षक आहे. या मशिदीची निर्मिती खास मुघल शासक शहाजहां याच्यासाठी करण्यात आली होती.
तो या मशिदीची जाऊन अल्लाची इबादत करत असे. आज या मस्जिद मध्ये पर्यटकांना जाण्यास मनाई आहे.
नौबत खाना – Naubat Khana
आग्र्याच्या किल्ल्यात मुघलकालीन शैलीत बांधल्या असलेल्या या महालाचा वापर मुघल शासक आपल्या संगीतकारांकडून संगीत आणि वाद्यांच्या लयात मंत्रमुग्ध होण्याकरिता करत असत.
आग्र्याच्या किल्ल्याशी जुडले असलेले काही रहस्यमय तथ्य – Agra Fort Facts
- जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आसनाऱ्या मुघलकालीन शैलीत बांधल्या असणाऱ्या या लाल किल्ल्याची निर्मिती विशेषतः सैन्याचे रक्षण करण्याकरिता केली होती.
- भारताच्या इतिहासातील आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या बांधकामाकरिता जवळपास आठ वर्षाचा कालावधी लागला होता.
- या किल्ल्याच्या निर्मिती करिता जवळपास ४००० कामगारांनी दिवस रात्र काम करून किल्ल्याची निर्मिती केली.
- जगात असणाऱ्या सात आश्चर्यकारक स्थळांपैकी एक असलेल्या या लाल किल्ल्याला पहिले “बाद्लागढ” या नवाने ओळखले जात होते.
- असे सांगण्यात येते की, या किल्ल्याची निर्मिती ईसवी १०८० च्या पूर्वी करण्यात आली होती. या किल्ल्यावर सर्वात पहिले राजपूत शासक बादलसिंग यांचे राज्य होते.
- इंडो-इस्लामिक यांच्या वास्तुशैलीत बांधल्या असलेल्या या किल्ल्यावर वेगवेगळ्या शासकांनी राज्य केले आहे.
- हा किल्ला मुघल, लोदी,राजपूत,गजनवी इत्यादी शासकांनी या किल्ल्यावर राज्य केले असल्याचा तो पुरावेदार बनला आहे.
- याचप्रमाणे या ठिकाणी १८५७ च्या वेळेस झालेल्या स्वतंत्र्य साग्रामाचे युद्ध देखील लढले गेले आहे.
- मुघल शासक अकबर याने जेव्हा आग्र्याच्या किल्ल्यावर आपला ताबा मिळवला त्यावेळेस त्या किल्ल्याची अवस्था खूपच दयनीय, जर्जर, आणि पडक्या स्वरुपात होती.
- अकबर याने या किल्ल्याची नव्याने भक्कम स्वरुपात निर्मिती करून त्याला विशालरूपी बनवले.
- मुघल शासक अकबर याने किल्ल्याच्या निर्मितीसाठी लाल दगडांचा वापर केला होता. याच करणामुळे या किल्ल्याला ”आग्र्याचा लाल किल्ला” म्हणून म्हटले जाते.
- हा किल्ल्या ताजमहल पासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये नऊ प्रकारचे विलासदार आणि सर्व सुविधान युक्त महल बांधण्यात आले आहेत.
- या किल्ल्यामध्ये बंगाली महल, अकबरी महल,जहांगीर महल, शाह जहांनी महल, मच्ची भवन, दिवान-ए-आम, दिवान-ए-खास, खास महाल आणि शीश महल इत्यादी महालांची निर्मिती करण्यात आली आहे.
- या ऐतिहासिक किल्ल्याचा वापर सिनेमा जगतात देखील केला गेला आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये मुघल-ए-आजम या सिनेमाच्या बऱ्याच दृष्यांचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे.
- त्याचप्रमाणे हिंदी सिनेमातील प्रसिद्ध असलेल ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याचे चित्रीकरण देखील केले गेले आहे.
- आग्रा येथील यमुना नदीच्या तीरावरती बाधण्यात आलेल्या या विशालरूपी लाल किल्ल्याच्या आतील परिसरात बाधण्यात आलेले शीश महालाला “भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआई)” च्या निगराणी मध्ये ठेवण्यात आले आहे.
- आपणास या बदल महिती असणे आवश्यक आहे की, या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या आत बाधण्यात आलेले शीश महल फक्त मोठ मोठया राजनीतिक नेत्यांसाठी आणि विशेष व्यक्तींच्या आगमना प्रसंगीच उघडले जाते.
- आग्र्याचा लाल किल्ला हा खुच भव्यदिव्य स्वरुपात विस्तारलेला असून यात पर्यटकांना पाहण्यासाठी खूप इमारती आहेत. असे असले तरी पर्यटक फक्त या किल्ल्याच्या आतील दोनच महाल पाहू शकतात.
- अशा या इतिहासकालीन ऐतिहासिक मुघल वास्तुकलेचे दर्शन घडवून आणणाऱ्या किल्ल्याला २००४ साली आगा खान पुरस्कार देण्यात आला आहे.
- याच पुरस्कारा निमित्य भारतीय डाक विभागाने या कर्यक्रमाचा उत्सव साजरा करण्यासाठी एक तिकीट सुरु केले होते.
आग्रा किल्ल्या (आग्रा फोर्ट) पर्यंत कसे जाल – Agra Fort Location
भारत देशातील उत्तरप्रदेश राज्यात असणारे आग्रा हे शहर आज सर्वच मार्गांनी जोडले गेले आहे जसे, वायु, सडक आणि रेल इत्यादी मार्गांनी जोडले गेले आहे.
आग्रा शहरात असणारे पंडित दीनदयाल उपाध्याय विमानतळ देखील सर्वच प्रमुख शहरांच्या विमानतळाशी जोडले गेले आहे. जसे मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली अशा काही प्रमुख शहरान सोबत ते जोडलेले आहे.
हे शहर विमानतळाशी जोडले असल्याने त्या ठिकाणी पर्यटक हे विमानाने सुद्धा येऊ शकतात. विमानतळावर पोहचल्यानंतर पर्यटक हे किल्ल्यापर्यंत पोहचण्यासाठी टैक्सी किंवा कैब चा वापर करू शकतात.
त्याचप्रमाणे जर एखाद्या पर्यटकाला रेल्वेच्या साह्याने आग्र्याला जायचे असेल तर हे शहर देशातील बऱ्याच मोठ्या मोठ्या शहरांना जोडलेले आहे.
पर्यटकांना रेल्वे स्टेशन पासून किल्ल्यापर्यंत जाण्याकरिता ऑटो, टैक्सी नाही तर कैब या साधनांचा वापर करून पोहचू शकतात.
अश्याचप्रकारे ज्या पर्यटकांना रस्त्याच्या मार्गाने जायचे असेल त्यांच्या करिता देशाच्या प्रमुख शहरातून चागल्या प्रकारची बसची सुविधा देखील उपलब्ध आहे.
बस स्टेशन पासून किल्ल्यापर्यंत पर्यटकांना जाण्याकरिता ऑटो, टैक्सी, नाहीतर कैब ची सुविधा उपलब्ध आहे.
आग्र्याचा किल्ला पाहण्याची वेळ – Agra Fort Timing
आग्रा या ठिकाणी लाल किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना या किल्ल्याचे दर्शन हप्त्यातून फक्त सहा दिवसच होते. हप्त्यातील सात दिवसांपैकी फक्त शुक्रवारीच हा किल्ला पर्यटकांसाठी बंद असतो.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी आग्रा किल्ला बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्