Adinath Chalisa
जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांना भगवान आदिनाथ म्हणून संबोधले जाते. तीर्थकार म्हणजे तीर्थाची रचना करणारे, तसचं, जन्म मरणाच्या जाचातून मुक्त करून मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाणारे महान व्यक्ती. भगवान ऋषभदेव यांनी स्वत: आत्मज्ञान प्राप्त करून लोकांना मोक्ष मिळण्याच्या मार्गावर घेऊन गेले म्हणून त्यांना तीर्थकार म्हटलं जाते.
तीर्थकाराची ही प्रथा भगवान आदिनाथ यांनी जैन धर्मात रुजवून ती भगवान महावीर यांच्या पर्यंत जोपासली गेली आहे. भगवान आदिनाथ यांनी आपल्या प्रवचनातून मानवी जीवनाबद्दल उत्तम ज्ञान प्रकट केले असून, आपण त्याचा आपल्या जीवनांत अंगीकार केला पाहिजे.
भगवान ऋषभदेव यांनी जैन धर्माची स्थापना केल्यापासून मानव जातीला उद्देशून केलेल्या प्रवचना बाबत सर्व माहिती जैन ग्रंथांमध्ये स्थानबद्ध करण्यात आली आहे. आपण या ग्रंथांचे वाचन केल्यास आपणास भगवान आदिनाथ यांची महानता कळेल.
तसचं, भगवान आदिनाथ यांची आराधना करण्यासाठी पठण करण्यात येत असेलल्या आदिनाथ चालीसेचे आपण पठन केल्यास आपणास भगवान आदिनाथ यांची स्तुती करण्यासाठी वापरण्यात आलेल्या शब्दावरून त्यांची महानता कळून येईल. आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून भगवान आदिनाथ चालीसेचे लिखाण केलं असून आपण या लेखाचे महत्व समजून या चालीसेचे पठन करा.
भगवान आदिनाथ चालीसा – Adinath Chalisa
भगवान श्री आदिनाथ जी चालीसा
|| दोहा ||
शीश नवा अरिहंत को, सिद्धन को, करुं प्रणाम |
उपाध्याय आचार्य का ले सुखकारी नाम ||
सर्व साधु और सरस्वती जिन मन्दिर सुखकार |
आदिनाथ भगवान को मन मन्दिर में धार ||
|| चौपाई ||
जै जै आदिनाथ जिन स्वामी,
तीनकाल तिहूं जग में नामी |
वेष दिगम्बर धार रहे हो,
कर्मों को तुम मार रहे हो ||
हो सर्वज्ञ बात सब जानो
सारी दुनियां को पहचानो |
नगर अयोध्या जो कहलाये,
राजा नाभिराज बतलाये ||
मरुदेवी माता के उदर से,
चैत वदी नवमी को जन्मे |
तुमने जग को ज्ञान सिखाया,
कर्मभूमी का बीज उपाया ||
कल्पवृक्ष जब लगे बिछरने,
जनता आई दुखड़ा कहने |
सब का संशय तभी भगाया,
सूर्य चन्द्र का ज्ञान कराया ||
खेती करना भी सिखलाया,
न्याय दण्ड आदिक समझाया |
तुमने राज किया नीति का,
सबक आपसे जग ने सीखा ||
पुत्र आपका भरत बताया,
चक्रवर्ती जग में कहलाया |
बाहुबली जो पुत्र तुम्हारे,
भरत से पहले मोक्ष सिधारे ||
सुता आपकी दो बतलाई,
ब्राह्मी और सुन्दरी कहलाई |
उनको भी विद्या सिखलाई,
अक्षर और गिनती बतलाई ||
एक दिन राजसभा के अन्दर,
एक अप्सरा नाच रही थी |
आयु उसकी बहुत अल्प थी,
इसीलिए आगे नहीं नाच रही थी ||
विलय हो गया उसका सत्वर,
झट आया वैराग्य उमड़कर |
बेटों को झट पास बुलाया,
राज पाट सब में बंटवाया ||
छोड़ सभी झंझट संसारी,
वन जाने की करी तैयारी |
राव (राजा) हजारों साथ सिधाए,
राजपाट तज वन को धाये ||
लेकिन जब तुमने तप किना,
सबने अपना रस्ता लीना |
वेष दिगम्बर तजकर सबने,
छाल आदि के कपड़े पहने ||
भूख प्यास से जब घबराये,
फल आदिक खा भूख मिटाये |
तीन सौ त्रेसठ धर्म फैलाये,
जो अब दुनियां में दिखलाये ||
छैः महीने तक ध्यान लगाये,
फिर भोजन करने को धाये |
भोजन विधि जाने नहिं कोय,
कैसे प्रभु का भोजन होय ||
इसी तरह बस चलते चलते,
छः महीने भोजन बिन बीते |
नगर हस्तिनापुर में आये,
राजा सोम श्रेयांस बताए ||
याद तभी पिछला भव आया,
तुमको फौरन ही पड़धाया |
रस गन्ने का तुमने पाया,
दुनिया को उपदेश सुनाया ||
तप कर केवल ज्ञान पाया,
मोक्ष गए सब जग हर्षाया |
अतिशय युक्त तुम्हारा मन्दिर,
चांदखेड़ी भंवरे के अन्दर ||
उसका यह अतिशय बतलाया,
कष्ट क्लेश का होय सफाया |
मानतुंग पर दया दिखाई,
जंजीरें सब काट गिराई ||
राजसभा में मान बढ़ाया,
जैन धर्म जग में फैलाया |
मुझ पर भी महिमा दिखलाओ,
कष्ट भक्त का दूर भगाओ ||
|| सोरठा ||
पाठ करे चालीस दिन, नित चालीस ही बार |
चांदखेड़ी में आय के, खेवे धूप अपार ||
जन्म दरिद्री होय जो, ; होय कुबेर समान |
नाम वंश जग में चले, जिनके नहीं सन्तान ||
भगवान आदिनाथ यांचा जन्म चैत्र कृष्ण नवमीच्या दिवशी अयोध्या नगरीचे राजा महाराज नाभिराय यांची पत्नी महाराणी मारुदेवी यांच्या पोटी झाला होता.भगवान आदिनाथ यांना बालपणापासूनचं सर्व शास्त्रांचे ज्ञान होते. त्यामुळे त्यांना समस्थ शास्त्रांचे ज्ञाता म्हटल जाते. तसचं, भगवान आदिनाथ देवी सरस्वती मातेचे भक्त होते.
भगवान आदिनाथ मोठे झाल्यानंतर त्यांचा विवाह नंदा आणि सुनंदा नामक युवतींसोबत झाले. देवी नंदा यांना भरत नामक पुत्र प्राप्त झाले. जे चक्रवर्ती साम्राज्याचे पहिले सम्राट बनले. जैन अनुयायांनुसार देवी नंदा यांच्या पुत्राच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारत पडले आहे. तसचं, भगवान आदिनाथ यांचे दुसरे पुत्र बाहुबली हे सुद्धा एक महान योद्धा व राजा होते. त्यांना कामदेव पद भूषित करण्यात आलं होत.
या पुत्रांप्रमाणे भगवान आदिनाथ यांना वृषभसेन, अनन्तविजय, अनन्तवीर्य, अच्युत, वीर, वरवीर यांसारखे एकूण ९८ पुत्र होते, तर ब्राह्मी आणि सुंदरी नावाच्या दोन कन्या होत्या. पुत्र बाहुबली आणि कन्या सुंदरी यांच्या मातेचे नाव सुनंदा होते. तर भरत चक्रवर्ती, ब्रह्मी आणि अन्य ९८ पुत्रांच्या मातेचे नाव याशावती होते.
भगवान आदिनाथ यांनी आपल्या दोन कन्या ब्राह्मी आणि सुंदरी यांना सर्वप्रथम लीपिविद्या आणि अंकविद्येचे ज्ञान अर्जित केले होते. भगवान ऋषभदेव यांनी हजारो वर्ष राज्य केल्यानंतर त्यांनी आपले राज्य आपल्या पुत्रांमध्ये विभाजित केले. राज्याचे विभाजन करून भगवान आदिनाथ दिगंबर तपस्वी बनले. दिगंबर तपस्वी बनल्यानंतर ते भिक्षा मांगत असत.
भगवान आदिनाथ यांना पाहून राज्यातील प्रजा सुद्धा त्यांचे अनुकरण करू लागली. ऋषभदेव भिक्षा मागत असतांना लोक त्यांना भिक्षा म्हणून सोने, चांदी, हिरे,मोती यासारखे मौल्यवान रत्न देत असत. त्यामुळे त्यांना सुमारे एक वर्ष उपाशी राहाव लागल होत. जैन धर्माची अशी आख्यायिका आहे की, जैन धर्माची दीक्षा घेतल्यानंतर किमान एक वर्ष मौन पाळावे लागते. त्यामुळे भगवान ऋषभदेव एक वर्ष मौन होते.
भगवान ऋषभदेव यांनी आपल्या प्रवचनातून अनेक लोकांना आपले अनुयायी बनवले आणि जैन धर्माची प्रथा देशाच्या कानाकोपऱ्यात रुजवली. जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करून भगवान आदिनाथ यांनी माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी कैलाश पर्वतावर निर्वाण केलं.
यानंतर जैन धर्माचे एकूण २३ तीर्थकार झाले. त्यांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीत जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केला. वरील लेखातील संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून भगवान आदिनाथ चालीसेचे लिखाण केलं आहे.