Acharya Chanakya
भारताच्या इतिहास पूर्व कालखंडातील एक महान विद्वान म्हणून आचार्य चाणक्य हे विष्णुशास्त्री आणि कौटिल्य यासारख्या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. एक महान तत्वज्ञानी असण्याबरोबर ते अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी देखील होते.
अश्या या महान अर्थशास्त्रज्ञानी भारताचा महान राजनीतिक ग्रंथ, “द अर्थशास्त्र” लिहिला. या ग्रंथात त्यांनी त्यांच्या काळातील जवळजवळ सर्वच बाबींचा उल्लेख केला आहे, जसे की, मालमत्ता, अर्थशास्त्र, भौतिक यश इत्यादी.
इतिहासपूर्व काळात राजनीतिक विज्ञान आणि अर्थशास्त्र या सारख्या क्षेत्रांचा केलेला विकास आणि त्यासाठी दिलेलं आपलं महत्वपूर्ण योगदान याकरता आचार्य चाणक्य यांना आजसुद्धा या क्षेत्रातील विद्वान आणि आग्रणी मानलं जाते.
अश्या या महान विद्वानाचे थोर विचार जर आपण आपल्या जीवनात उतरविले तर आपले जीवन नक्कीच यशस्वी होणार. आचार्य चाणक्य यांनी आपल्या बुद्धिमान आणि कुशल विचारांनी मुत्सद्देगिरी आणि राजकारनाची सरळ साधी व्याख्या केली आहे. भारतवर्षामध्ये आचर्य चाणक्य यांना एक थोर समाजसेवक आणि अभ्यासक मानलं जाते.
चाणक्य यांच्या रणनीतीचा वापर करून अनेक विशाल साम्राज्यांची स्थापना करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया अश्या या महान विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञ असणारे आचार्य चाणक्य यांच्या जीवनाविषयी, त्यांचे महान विचार आणि त्यांच्या महानते बद्दल. कश्या प्रकारे त्यांनी स्वत:ला गरिबीतून सावरून एक महान विद्वान बनले.
आचार्य चाणक्य यांचे जीवन चरित्र – Acharya Chanakya in Marathi
आचार्य चाणक्य यांचा जीवन परिचय – Chanakya Information in Marathi
नाव (Name) | चाणक्य (Acharya Chanakya) |
जन्म (Birthday) | ३५० ईसा पूर्व (अंदाजे) |
आई (Mother Name) | चनेश्वरी (जैन ग्रंथा नुसार) |
वडिल (Father Name) | ऋषी कानाक किंवा चैनिन (जैन ग्रंथा नुसार) |
शिक्षण (Education) | समाजशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र, तत्वज्ञान इत्यादी विषयांचा अभ्यास केला |
विवाह स्थिती | विवाहित |
मृत्यु (Death) | २७५ ईसा पूर्व , पाटलीपुत्र, (वर्तमान आधुनिक पटना)भारत |
आचार्य चाणक्य यांचा जन्म – Chanakya History in Marathi
“भाग्य पण त्यांचीच साथ देते जे कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपल्या ध्येयांवर ठाम राहतात.”
या प्रकारचे थोर विचार असणारे महान विद्वान आचार्य चाणक्य यांच्या जन्मा बद्दल काही सप्ष्ट उल्लेख नाही आहे.
तरी सुद्धा त्यांचा जन्म बुद्ध धर्मानुसार ईसा पूर्व ३५० मध्ये तक्षशीला मधील कुटील नावाच्या एका ब्राह्मण अंशात झाला होता.
असं असलं तरी, आचार्य चाणक्य यांच्या जन्मा बद्दल विद्वानांमध्ये बरेच मतभेद आहेत. काही विद्वानांच्या मते त्यांचा जन्म कुटील अंशात झाला आहे.
म्हणूनच त्यांना कौटिल्य म्हणून ओळखले जाते.
तर काही विद्वानांच असं मत आहे की, ते आपल्या उग्र आणि मूळ स्वभावामुळे “कौटिल्य” म्हणून ओळखले जातात.
तसेच काही विद्वानांच्या विचारानुसार या थोर आणि बुद्धिमान अर्थशास्त्रज्ञांचा जन्म नेपाळच्या “तराई” मध्ये झाला होता.
तर जैन धर्मानुसार त्याचं जन्मस्थळ “मैसूर” (बंगळूर) मधील श्रावणबेलगोला मानल जाते.
याचं प्रमाणे त्यांच्या जन्म ठिकाणा बद्दल “मुद्राराक्षस” ग्रंथाची रचना करणारे विशाखा दत्त यांच्या मतानुसार त्यांच्या वडिलांना चमक म्हटलं जात असे. याच कारणामुळे त्यांच्या वडिलांच्या नावाच्या आधारे त्यांना चाणक्य म्हटलं जाऊ लागलं.
आचर्य चाणक्य यांचा जन्म खूपच गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला असल्याने त्यांना खूप कष्ट सहन करावं लागलं.
गरिबीमुळे त्यांना पोटभर जेवण पण मिळत नव्हतं, कधी कधी तर उपाशीच झोपावं लागत असे.
आचार्य चाणक्य लहानपणापासूनच खूप रागीट आणि जिद्दी स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांच्या उग्रवादी स्वभावाच्या वृत्तीमुळे त्यांनी नंद अंशाचा विनाश करण्याचा कठोर निर्णय घेतला. आचार्य चाणक्य यांना सुरवातीपासूनच साधे राहणीमान पसंद होते.
काही इतिहासकारांच्या मतानुसार आचार्य चाणक्य महामंत्री सारख्या मोठ्या पदावर आणि मोठया प्रमाणात राजेशाही थाटात वावरत असतांना त्यांनी कधीच आपल्या पदाचा गैर वापर केला नाही. त्यांना धन आणि यशाचा कधीच लोभ नव्हता.
चाणक्य (कौटिल्य) यांनी आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पहिले होते.
शिवाय त्यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांचे उच्च विचारांमुळे ते एक महान विद्वान बनले.
आचार्य चाणक्य यांची शिक्षा आणि दीक्षा – Chanakya Education
चाणक्य यांनी शिक्षा व दीक्षा नालंदा येथील विश्वविद्यालयातून ग्रहण केली होती. ते लहानपणापासूनच विलक्षण प्रतिभाचे धनी आणि विद्वान विदयार्थी होते.
तसेच त्यांना वाचनाची खूप आवड होती. काही ग्रंथात नमूद केल्यानुसार आचार्य चाणक्य आणि आपलं शिक्षण तक्षशीला मधून घेतलं.
प्राचीन काळात तक्षशीला हे उत्तर पश्चिम प्राचीन भारतातील शिक्षणाचे प्राचीन केंद्र होते.
ब्राह्मण कुटुंबात जन्मणारे महान विद्वान आचार्य चाणक्य यांना अर्थशास्त्र, राजकारण, युद्धाची रणनीती, औषध आणि ज्योतिष या सारख्या विषयांण बद्दल खूप खोलवर आणि चांगले ज्ञान होते. ते या सर्व विषयांत विद्वान होते.
काही तज्ञांच्या मते आचार्य चाणक्य यांना ग्रीक आणि फारसी विषयाचं ज्ञान होतं. याव्यतिरिक्त त्यांना वेद आणि साहित्य चांगल्याप्रकारे अवगत होते.
आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तक्षशीला मधील विश्वविद्यालयामध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केलं.
यानंतर चाणक्य चंद्रगुप्त यांचे विश्वासू सहयोगी बनले.
या घटनांनमुळे बदलले आचार्य चाणक्य यांचे जीवनमान – Chanakya Life Story
अर्थशास्त्रा सारख्या कठीण विषयाची रचना करणारे महान अर्थतज्ञ आचार्य चाणक्य एक कुशल आणि महान चारीत्रवान व्यक्ती होते.
त्यांनी आपल्या आयुष्यात एक महान शिक्षक रुपात ज्ञान देण्याचं काम केलं आहे.
त्यांच्या थोर विचार आणि महान धोरणांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले होते. त्यांची कीर्ती जणुकाही सातव्या आकाशापर्यंत पसरली होती.
त्यांच्या जीवनात इतका सुंदर काळ सुरु असतांना अचानकपणे त्यांच्या जीवनात अश्या काही दोन घटना घडल्या ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.
- पहिली घटना – भारतावरील सिकंदर यांचे आक्रमण आणि तत्कालीन लहान राज्यांची हार.
- दुसरी घटना – मगध च्या शासका द्वारे कौटिल्य यांचा करण्यात आलेला अपमान.
या दोन प्रमुख घटना कारणीभूत आहेत त्यांचे जीवनमान बदलण्यास ज्या त्यांच्या जीवनात अचानकपणे घडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्याचं बदलून गेल होतं.
अचानकपणे घडलेल्या या घटनांमुळे कौटिल्य यांनी देशाची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्याचा संकल्प केला.
आपला संकल्प साध्य करण्यासाठी त्यांनी एका शिक्षकाची भूमिका अंगिकारली आणि लहान मुलांना शिकविण्या व्यतिरिक्त त्यांनी देशातील राज्यकर्ते शासक यांना शिक्षित करणे योग्य समजले.
तसचं, शासकांना योग्य धोरणे शिकविण्याचा निर्णय घेऊन आचार्य चाणक्य आपल्या दृढ संकल्पा बरोबर घरून बाहेर पडले.
संपूर्ण पृथ्वीवर राज्य करणारे महान शासक सिकंदर आपल्या भारत देशावर देखील राज्य करण्याच्या हेतुने आले होते.
ज्यावेळी त्यांनी भारतावर आक्रमण केलं होतं, तेंव्हा कौटिल्य तक्षशीला येथील विश्वविद्यालयात प्राचार्य होते.
Acharya Chanakya Mahiti
ही घटना त्याकाळातील आहे जेंव्हा तक्षशीला आणि गंधार चे सम्राट अंबी यांनी सिकंदर(अलेक्झांडर) यांच्या सोबत करार केला होता.
चाणक्य यांना त्यांचा करार करणे योग्य वाटलं नाही, त्यांनी भारताताच्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरता देशातील सर्वच राजांना आग्रह केला परंतु, त्याकाळात सम्राट सिकंदर यांच्या सोबत युद्ध करण्यास कोणीच समोर आलं नाही.
सिकंदर शासकाची सेना खूपच विशाल होती. शिवाय, ते स्वत: देखील खूप शूरवीर योद्धा होते. त्यांच्या सोबत युद्ध करणे कोणालाच योग्य वाटले नाही.
पूर यांनी त्यांच्या सोबत युद्ध केले परंतु त्यांचा देखील सिकंदरने पराभव केला.
त्याकाळात मगध हे एक चांगले शक्तिशाली राज्य होते. त्या राज्याच्या शेजारील सर्वच राज्यांची नजर मगध राज्यावर होती.
सिकंदर यांच्या रूपाने भारत देशावर ओढून आलेल्या संकटाचे रक्षण करण्याकरता विष्णुगुप्त, तत्कालीन मगध चे शासक धनानंद यांच्याकडे मदत मागण्यासाठी आले.
परंतु, आपल्या भोग विलास आणि शक्तीच्या धुंदीत मग्न असणारे धनानंद यांनी चाणक्य यांचा प्रस्ताव परतावून लावला आणि त्यांना उद्देशून म्हटलं की,
“तुम्ही पंडित आहात त्यामुळे आपल्या शिखेची काळजी करा; युद्ध करणे हे राजा चे काम आहे तुम्ही पंडित आहात त्यामुळे तुम्ही फक्त पंडिताचे काम करा”
हे ऐकल्यानंतर चाणक्य यांनी नंद साम्राज्याचा विनाश करण्याची प्रतिज्ञा घेतली.
चाणक्य आणि चंद्रगुप्त- Chanaky And Chandrgupta
आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचे घनिष्ट संबंध होते. चाणक्य हे चंद्रगुप्त यांच्या साम्राज्याचे महामंत्री (सरचिटणीस) होते.
त्यांनीच चंद्रगुप्त यांना साम्राज्य स्थापण करण्यास मदत केली होती.
मगध राज्याचे शासक धनानंद यांच्या कडून आचार्य चाणक्य यांचा अपमान करण्यात आला होता.
यानंतर आपल्या अपमानाचा बदला घेण्याकरता त्यांनी नंद घराण्याचे साम्राज्य नष्ट करण्याचा संकल्प केला.
आपला संकल्प तडीस नेण्याकरता चाणक्य यांनी आपला प्रवास सुरु केला.
आचार्य चाणक्य यांनी सर्वप्रथम चंद्रगुप्त यांना आपले शिष्य बनविले.
चंद्रगुप्त यांच्या प्रती असणाऱ्या प्रतिभेला चाणक्य यांनी आधीच ओळखून घेतलं होतं. आपला संकल्प पूर्ण करण्याकरता त्यांनी चंद्रगुप्त यांची निवड केली होती.
चाणक्य यांची जेंव्हा चंद्रगुप्त सोबत भेट झाली होती त्यावेळेला चंद्रगुप्त केवळ नऊ वर्षाचे होते. यानंतर चाणक्यांनी आपल्या विलक्षण ज्ञानाच्या साह्याने चंद्रगुप्त यांना अप्राविधिक विषय आणि व्यावहारिक, प्रविधिक कलेचे शिक्षण दिले.
आचार्य चाणक्य यांनी आपला नंद साम्राज्य नष्ट करण्याचा संकल्प पूर्ण करण्याकरता चंद्रगुप्त यांची निवड करण्या मागील उद्देश असा होता की, त्या काळी शासकांच्या काही प्रमुख जाती होत्या ज्यात शाक्य व मोर्य घराण्यचा प्रभाव जास्त होता. चंद्रगुप्त हे मोर्य घराण्याच्या प्रमुखाचे पुत्र होते.
हे आचार्य चाणक्य यांना चांगलेच माहित होतं.
यानंतर आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त यांना आपले शिष्य बनविलं आणि त्यांच्या सोबत मिळून एक नविन साम्राज्याची स्थापना केली.
आचार्य चाणक्य यांच्या रणनीतीने नंद साम्राज्याचे पतन आणि मोर्य साम्राज्याची स्थापना:-
भारतावर ज्यावेळी सिकंदर राजाने आक्रमण केलं होतं त्यावेळी त्यांनी लहान लहान राज्यांवर आपला विजय मिळवला होता.
त्यावेळेला आचार्य चाणक्य हे तक्षशीला येथील विश्वविद्यालयात प्राचार्य होते.
त्यांनी आपल्या भारताच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासठी आपले प्रचार्याचे काम सोडून दिलं. त्यांनी देशातील सर्वच राजांना सिकंदर राजा विरुद्ध युद्ध करण्याची विनंती केली होती. परंतु त्यांकाळी सिकंदर राजाच्या विरोधात आक्रमण करायला कोणीच तयार झाल नाही.
सिकंदर हे खूप बलवान शासक होते. पूर राजाने त्यांच्या सोबत युद्ध पुकारले पण त्यांचा सुद्धा पराभव झाला.
त्यानंतर आचार्य चाणक्य त्याकाळातील शक्तिशाली असलेल्या मगध राज्याचे सम्राट धनानंद यांच्याकडे सिकंदर राजा सोबत युद्ध करण्याची विनंती करण्यासाठी गेले.
परंतु, त्यांनी चाणक्यांचा अपमान केला. तेव्हा चाणक्यांनी नंद साम्राज्याचे पतन करण्याचा संकल्प केला.
आपल्या शक्तीच्या गर्वाच्या धुंदीत मग्न असणारे मगध राज्याचे शासक राजा धनानंद आपल्या बळाचा गैर वापर करत असतं.
त्यांच्या डोळ्यावर आपल्या बळाची इतकी धुंद चढली होती की त्यांनी आचार्य चाणक्य यांचा अपमान केला.
त्यानंतर चाणक्य यांनी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी चंद्रगुप्त यांच्या सोबत मिळून नंद साम्राज्याचा सर्वनाश केला.
Chanakya Story
आचार्य चाणक्य व चंद्रगुप्त यांनी नंद साम्राज्याचा विनाश करण्याच्या उद्देशाने काही अन्य शक्तिशाली शासकांसोबत मिळून आपलं गठबंधन केलं.
विलक्षण प्रतिभाचे धनी असणारे आचार्य चाणक्य खूप बुद्धिमान आणि चतुर व्यक्ती होते.
त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर मगध क्षेत्रातील पाटलीपुत्रच्या नंद अंशाचा विनाश करण्याची योग्य रणनीती तयार केली आणि त्यांचा सर्वनाश केला.
पाटलीपुत्र मधील नंद अंशातील शेवटच्या सम्राटाचे पतन केल्यानंतर तेथील नंद अंश संपुष्टात आला.
त्यानंतर आचार्य चाणक्य यांनी पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्त यांच्या सोबत मिळून नविन “मोर्य साम्राज्य” स्थापण केले.
चन्द्र्गुप्त यांच्या या “मोर्य साम्राज्यात” आचार्य चाणक्य यांनी राजनीतिक सल्लागार म्हणून आपली सेवा दिली.
आचार्य चाणक्य यांची मोर्य साम्राज्याच्या विकासातील प्रमुख भूमिका:
आचार्य चाणक्य यांनी आपल्यला धोरणाखाली चंद्रगुप्त यांच्या सोबत मिळून नंद अंश संपुष्टात आणले आणि त्या ठिकाणी आपले नविन साम्राज्य स्थापण केलं.
चंद्र्गुप्तांचे हे नविन साम्राज्य म्हणजेच “मोर्य साम्राज्य’ होय. ते साम्राज्य त्यांनी गांधार येथे स्थापण केले होते.
“मोर्य साम्राज्याचे” शासक चंद्रगुप्त मोर्य यांनी अलेक्जेंडर द ग्रेट (सिकंदर) यांच्या सेनापत्यांचा पराभव करण्यासाठी वर्तमानातील अफगानिस्तान पर्यंत त्यांचा पाठलाग केला होता.
आपली चाणक्य बुद्धी आणि निर्दयी वृत्ती तसचं महान धोरणांच्या साह्याने आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त यांच्या मोर्य साम्राज्याला त्याकाळी सर्वात शक्तिशाली बनविण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
चाणक्य यांच्या रणनीतीच्या साह्याने चंद्रगुप्त मोर्य यांच्या मोर्य साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडील सिंधू नदीपासून पूर्वेकडील बंगालच्या खाडीपर्यंत करण्यात आला.
मोर्य साम्राज्याने पंजाब प्रांतावर देखील आपला ताबा मिळविला होता. अश्या प्रकारे मोर्य साम्राज्याचा विस्तार पूर्ण भारतभर करण्यात आला.
अनेक विषयात पारंगत असणारे आचार्य चाणक्य यांनी भारताचा राजनीतिक ग्रंथ “अर्थशास्त्र” चे लिखाण केलं आहे.
या ग्रंथात त्यांनी त्यांच्या काळातील आर्थिक, राजनीतिक आणि सामाजिक रणनिती आणि सामाजिक धोरणांच्या व्याख्यांसोबतच इतर महत्वपूर्ण विषयांची माहिती दिली आहे.
chanakya life story
आचार्य चाणक्य यांच “अर्थशास्त्र” ग्रंथ लिहिण्यामागील असा हेतू होता की, राज्याच्या शासन कर्त्यांना युद्ध, दुष्काळ आणि महामारी च्या वेळेला राज्याचे नियोजन कश्याप्रकारे करायला पाहिजे या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
जैन ग्रंथात वर्णीत एक लोकप्रिय आख्यायिकेनुसार (किंवदंती), आचार्य चाणक्य हे सम्राट चंद्रगुप्त यांच्या जेवणात एक चुटकी विष मिळवीत असतं, जेणेकरून त्यांना ते विष पचवण्याची सवय होईल.
आचार्य चाणक्य यांचा चंद्रगुप्त यांच्या जेवणात विष मिळविण्या मागील उद्देश असा होता की, चंद्रगुप्त मोर्य यांना त्यांच्या शत्रूंनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो सफल झाला नाही पाहिजे तसचं सम्राटांचे प्राण पण वाचले पाहिजे.
या बद्दल चंद्रगुप्त मोर्य यांना काहीच माहित नव्हतं, एके दिवशी चंद्रगुप्तानी आपले जेवण त्यांच्या पत्नी दुधा यांना जेवायला दिलं. त्यावेळेला त्यांच्या पत्नी गर्भवती होत्या.
काही दिवसानंतर त्या बाळाला जन्म देणार होत्या. परंतु, चंद्रगुप्त मोर्य यांनी त्यांना दिलेल्या जेवणात विष मिसळलेल असल्याने दुधा यांचा मृत्यू झाला.
जेंव्हा आचार्य चाणक्य यांना चंद्रगुप्त मोर्यांच्या पत्नी दुधा यांच्या मृत्यू ची बातमी कळाली तेंव्हा त्यांनी राणीच्या पोटात वाढत असलेल्या नवजात बाळाला वाचविण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर केला. त्यांनी राणीचे पोट फाडले व त्या नवजात बालकाला बाहेर काढून त्याला जीवन दान दिलं.
आचार्य चाणक्य यांनी या बाळाचे नाव बिंदुसार ठेवले काही वर्षानंतर चंद्र्गुप्तांच्या मृत्यू नंतर बिंदुसार यांना मोर्य साम्राज्याचे उत्तराधिकारी बनविण्यात आलं.
तसेच, आचार्य चाणक्य यांनी बिंदुसार यांच्या साम्राज्यात देखील काही काळापर्यंत सल्लागार म्हणून काम पाहिलं.
आचार्य चाणक्य यांचा मृत्यू – Chanakya Death
आतिशय प्रतीभावशाली शैलीचे धनी, बुद्धिमान तसेच भारतीय अर्थशास्त्र ग्रंथाचे रचना करणारे महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचा मृत्यू ईसा पूर्व २७५ मध्ये झाला.
त्यांच्या जन्मा प्रमाणे त्यांचा मृत्यू देखील अनेक प्रकारच्या रहस्यांनी वेढलेला आहे.
आचार्य चाणक्य यांनी आपले आयुष्य दीर्घकाळापर्यंत जगले.
परंतु, त्यांच्या मृत्यू बद्दल काहीच स्पष्ट सांगता येणार नाही, की त्यांचा मृत्यू हा झाला कसा?
एका पुराणिक कथेनुसार त्यांचा मृत्यू त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
तसेच, इतरकाही पुराणिक कथेनुसार, चंद्रगुप्त मोर्य यांचे पुत्र बिंदुसार यांच्या शासन काळात आपल्या राजनीतिक षडयंत्रामुळे त्यांचा मृत्यू झाला.
आचार्य चाणक्य सन्मान – Acharya Chanakya Award
विलक्षण प्रतिभाचे धनी आचार्य चाणक्य यांच्या सन्मानार्थ नवी दिल्ली मधील राजनीतिक क्षेत्रातील वेगवेगळ्या राज्यांनी वेढलेल्या प्रदेशाचे नाव चाणक्य यांच्या नावावरून चाणक्यपुरी ठेवण्यात आले.
याशिवाय इतर ठिकाणचे तसेच संस्थाचे नाव सुद्धा चाणक्य यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहेत.
आचार्य चाणक्य यांच्या जीवनावर आधारित दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम सुरु केले आहे. शालेय पुस्तकात देखील त्यांच्या विषयी धडे छापले आहेत.
आचार्य चाणक्य यांची राज्य विकसित करण्याबद्दलची संकल्पना:
महान तत्वज्ञानी तसेच बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध असणारे आचार्य चाणक्य यांनी विकसित राज्याची स्थापना करण्याकरता आपले विचार व्यक्त केले होते.
त्यांच्या अवधारणे नुसार एका विकसित राज्याच्या निर्मितीकरिता “राजा आणि प्रजा यांच्यात वडिल आणि मुलाचे नाते असायला पाहिजे”.
कौटिल्य यांनी राज्याच्या निती बद्दल असं म्हटलं आहे की, राज्याची निर्मिती त्यावेळेस झाली होती ज्यावेळेला “मत्स न्याय” च्या कायद्याला कंटाळून लोकांनी मनु यांना आपले राजा म्हणून निवडले आणि राजाला आपल्या राज्यातील शेतीचा सहावा भाग आणि अलकारातील दहावा भाग राजा ला देण्यास सांगितले.
याबद्दल राजा आपल्या राज्यातील प्रजेची सुरक्षा करीत असे. तसेच त्यांनी समजाच्या कल्याणाचे दायित्व स्वीकारली होते.
आचार्य चाणक्य यांचे राज्य शासनाला अनुसरून विचार:
आचार्य चाणक्य यांनी आपल्या महान बुद्धी आणि विचारांच्या जोरावर सांगत की, प्रजेच्या सुखातच राजाचे सुख असायला पाहिजे आणि प्रजेच्या हितातच राजाचे हित असायला पाहिजे.
याकरिता पहिले राज्यातील राजांना प्रशिक्षित करायला पाहिजे जेणेकरून ते चांगल्या राज्याची निर्मिती करू शकतील आणि त्याचा विकास करू शकतील.
चाणक्य यांची शासक पदाबद्दल अशी धारणा होती की, एक चांगला शासक बनायचं असेल तर त्याची सुरवात सर्वप्रथम मुंडण संस्कृतीने करायला पाहीजे.
शासकाने सर्वप्रथम वर्णमाला आणि अंकमाला याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या विषयाचे ज्ञान आल्यानंतर त्यांनी दंडनीतीचे शिक्षण घ्यायला पाहिजे.
तेंव्हाच ते एक कुशल शासक बनू शकतील. आचार्य चाणक्य यांनी आपल्या याच रणनीतीचा वापर करून चंद्रगुप्त मोर्य यांना बालपणापासून एका चांगल्या शासका प्रमाणे शिक्षित केलं.
आचार्य चाणक्य यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त यांनी सिकंदर राजाला पराजीतच नाही केले तर, आपल्या कार्यकौशल्य आणि बौद्धिक कुशलतेने एक महान शासक बनले होते.
चंद्रगुप्त मोर्य यांचा इतिहास सुद्धा लिहिण्यात आला आहे.
आचार्य चाणक्य यांचे कुशल शासका बद्दलचे विचार:
चाणक्य यांच्या मते, राज्याचा शासक हा कुळातील असायला पाहिजे, तेंव्हाच तो एका चांगल्या राज्याची निर्मिती करण्यात यशस्वी होऊ शकेल.
चांगल्या शासका शिवाय चांगल्या राज्यची निर्मिती होऊ शकणार नाही.
राज्याचा शासक हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. जर राज्याचा शासक शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असेल तरच तो आपल्या राज्यातील प्रजेकडे चांगल्याप्रकारे लक्ष ठेऊ शकेल.
चाणक्य यांच्या मतानुसार राज्याच्या शासकाने नेहमीच आपल्या राज्यातील प्रजेच्या हिताकडे लक्ष दयायला पाहिजे.
तसेच वेळ पाडली तर त्यांच्यासाठी युद्ध केलं पाहिजे.
राज्याच्या शासकाने काम, क्रोध, लोभ, मोह आणि माया यापासून दूर राहायला पाहिजे.
राज्याच्या शासकाने निडर आणि बलवान असायला पाहिजे.
आचार्य चाणक्य यांचे राज्या विषयी कथन:
“ज्याप्रमाणे लाकडाला लागलेल्या वाळवी मुळे लाकूड नष्ट होते, त्याच प्रमाणे राज्याचा शासक जर अशिक्षित असेल तर राज्याचे कल्याण कधीच होत नाही.”
आचार्य चाणक्य यांचे राजनीती बद्दलचे सात सूत्र:
चाणक्य यांनी राज्याचे चार भागात विभाजन केलं आहे.
- भूमी
- लोकसंख्या
- सरकार
- सार्वभौमत्व
आचार्य चाणक्य यांनी राज्याच्या गुणधर्मांची तुलना मानवी शरीरा सोबत केली आहे:
राजा: राजा हा राज्याचा प्रथम नागरिक असतो. शासक हा कुलीन, बुद्धिमान, बलवान आणि युद्ध कलेत नेहमीच प्रवीण असायला पाहिजे.
जेणेकरून तो राज्याचा विकास करू शकेल आणि प्रजेचे रक्षण करेल.
मंत्री: मंत्री हे शासकाच्या खूपच जवळचे व्यक्ती असतात. ते एका प्रकारे शासकाला दृष्टी देण्याचे काम करतात.
ज्याप्रमाणे दृष्टिहीन मानवी शरिर निष्क्रिय माणले जाते त्याप्रमाणे आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये मंत्र्याचे महत्व अधोरेखित केले आहे. ते पुढे म्हणतात की मंत्री चारीत्रवान आणि प्रामाणिक असावा.
“ज्या प्रमाणे एकचाकी वाहन कोणाच्या मदतीशिवाय चालविले जाऊ शकत नाही त्याप्रमाणे राजपाठ देखील इतरांच्या सहकार्याशिवाय चालविला जाऊ शकत नाही.
या करिता योग्य सहकाऱ्याची निवड करावी व त्यांच्या परमार्श्वादी नियमांचे पालन करावे.”
जनपद(जिल्हा): आचार्य चाणक्य यांनी आपल्या राज्यवादी धोरणामध्ये जिल्हाला विशेष महत्व दिले आहे.
त्यांनी जिल्हाचा उल्लेख शरीराचे तिसरे अंग म्हणून केलय. तसचं असं म्हटलं आहे की, जिल्हा हा राज्याच्या पाया असतो. ज्याच्या सह्यावर राज्याचं अस्तित्व टिकून राहते.
ज्याप्रमाणे पाया शिवाय मानवी शरीराची रचना अपूर्ण आहे तसेचं जिल्हाविना राज्याची निर्मिती देखील अपूर्णच आहे.
त्याकरिता राज्याच्या शासकाने जिल्हाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
चाणक्य यांच्या मतानुसार जिल्हाची स्थापना अश्या प्रकारची असावी जेणेकरून त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन झाले पाहिजे.
त्या जिल्हाच्या ठिकानचे शेतकरी हे मेहनती असावे, त्यांनी आपल्या मेहनतीने चागल्या प्रकारची धान्य उत्पादित केले पाहिजे. जिल्हातील लोक ही चांगल्या स्वभावाची असावी.
chanakya sutra
किल्ला: आपल्या राज्याची ओळख निर्माण व्हावी याकरिता शासक हे ऐतिहासिक किल्लाची निर्मिती करीत असतं.
आचर्य चाणक्य यांनी किल्ल्याच्या बद्दल असं म्हणतात की, किल्ला हा राज्याच्या दोन हाता समान असतो.
ज्याप्रमाणे आपण आपल्या हाताचा वापर आपला बचाव करण्यासाठी करतो. त्याचप्रमाणे किल्ला देखील आपल्या राज्याचा बचाव करीत असतो.
आचार्य चाणक्य यांनी यामध्ये पाणी,पहाड, जंगल, आणि वाळवंठ यांना समाविष्ट केलं आहे. यासोबतच त्यांनी चार प्रकारच्या किल्ल्यांची व्याख्या केली आहे.
- औदिक दुर्ग(किल्ला): हा किल्ला चारी बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो.
- पर्वतमाथ्यावरील किल्ला: या किल्ल्याच्या चारही बाजूने पर्वताच्या रांगा असतात.
- धान्वन किल्ला: या किल्लाच्या चारही बाजूने फक्त कोरड जमीन असते, त्याठिकाणी पाणी व गवत नसते.
- वन किल्ला: या किल्ल्याच्या चारही बाजूने दाट जंगल आणि दलदल आढळून येते.
राजकोष: आचार्य चाणक्य यांनी राजकोषाला शासकांच्या मुखाची उपमा दिली आहे.
त्यांच्या मते कोष म्हणजे शासकाची पुंजी (संपत्ती) असते त्याशिवाय राज्याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.
या पुंचीजा योग्य वापर हा राज्य चालविण्याकरता आणि दुसऱ्या राज्यांसोबत युद्ध करायला तसेच, राज्यावर एखादी नैसर्गिक आपत्ती ओढून आली तर त्यातून सुटका करून घेण्यासाठी या पुंजीचा वापर केला जातो. चाणक्य या बद्दल आपले महत्व पटवून देण्यासाठी असं म्हणतात की,
“धर्म, अर्थ आणि काम या तिघांपैकी धर्म हे सर्वात जास्त महत्वाचं आहे, आणि अर्थ हे दोघांचे आधारस्तंभ असते.”
सेना: आचर्य चाणक्य यांनी राज्याच्या सेनेला राज्याचे शिर संबोधलं आहे. राज्याचे रक्षण करण्यात बळ आणि सेना यांची महत्वाची भूमिका असते.
मित्र: राज्याची तुलना मानवी शरीरासोबत करतांना आचार्य चाणक्य म्हणतात की, दोस्त मित्र हे राज्याच्या काना सारखे असतात. ज्यावेळेला राज्याचा शासक दुसऱ्या राज्याविरुद्ध युद्ध करीत असतो त्यावेळी केवळ मित्र हाच मदतीला येत असतो.
याचबरोबर कौटिल्य यांनी राज्याच्या विकासाकरता मित्रांचे महत्व किती आवश्यक असते, याबद्दल व्याख्या केली आहे.
चाणक्य यांच्या मते मित्र हे, राजवंशाने पारंपारिक, तसेच उत्साही, बलवान आणि योग्य वेळी मदत करू शकणारे असायला पाहिजेत.
आचार्य चाणक्य यांचे राज्याच्या कामाबद्दल विचार:
महान तत्वज्ञानी, समाजसेवक, अर्थशास्त्र व समाजशास्त्र आदी विषयांचे विद्वान आचार्य चाणक्य यांनी सामाजिक जीवनात राज्याला सर्वोत्तम माणले.
त्यांच्यामते, राज्याचे काम केवळ राज्याचे रक्षण करणे आणि राज्यात शांती ठेवणे इतक्यापुर्तेच मर्यादित नाही,तर राज्याच्या विकासावर लक्ष देणे देखील तितकेच म्हत्वाचे आहे.
तसेच आचार्य चाणक्य असे म्हणतात की, राज्यात सुरक्षा संबंधित कामे, स्वधार्मांचे पालन आणि सामाजिक कामांसोबतच जनकल्याणासाठी काम होत राहली पाहिजेत जेणेकरून एका विकसित राज्याची निर्मिती होऊ शकेल आणि त्याचा फायदा तेथील जनतेला होऊ शकेलं.
कौटिल्य यांनी सांगितलं आहे की,
“बळ हीच खरी सत्ता आणि अधिकार आहे. याच्या माध्यमातून खरा आनंद मिळत असतो.”
चाणक्य यांचे परराष्ट्र धोरणः
विष्णुगुप्त या नावाने ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांचे परराष्ट्रीय धोरण याप्रमाणे आहेत:
संधी (करार): आचार्य चाणक्य यांनी आपल्या परराष्ट्रीय धोरणांमध्ये संधी (करार) ला विशेष महत्व दिले आहे.
संधीचा वापर करून आपण शत्रूला कमजोर करू शकतो, असं त्याचं मत होतं.
चाणक्य यांच्या मते, राज्य आणि प्रांतामध्ये शांती निर्माण करण्याकरता दुसऱ्या प्रांतातील बलवान राजा किंवा शासकाबरोबर संधी केली जाते.
म्हणजेच एकप्रकारे शत्रूला कमकुवत बनविले जाते.
विग्रह: आचार्य चाणक्य यांनी आपल्या विदेश नीतीत असं म्हटलं आहे की, विग्रह म्हणजे शत्रुंविरुद्ध एक प्रकारे रणनीती बनविणे होय.
यान (वाहन): आचार्य चाणक्य यांनी आपल्या परराष्ट्रीय धोरणात युद्ध निती बद्दल अश्याप्रकारे उल्लेख केला आहे की, युद्धाची घोषणा न करता देखील युद्धा करिता तयार राहायला पाहिजे.
आसन (तटस्थ): आचार्य चाणक्य यांनी आपली परराष्ट्रीय धोरणात तटस्थ नीतीचे पालन करण्या बाबत उल्लेख केला आहे.
आत्मरक्षा:आचार्य चाणक्य यांच्या परराष्ट्रीय धोरणांनुसार एखाद्या राज्याचा राजा हा आपली आत्मरक्षा करण्याकरता दुसऱ्या राज्याच्या राजाला मदत मागू शकतो.
द्वंद्व भाव: एका राजा सोबत शांततेची संधी करून इतर राजांन सोबत युद्ध करण्याची निती होय.
जीवन सफल बनविणारे आचार्य चाणक्य यांचे अनमोल विचार – Chanakya Quotes in Marathi
- “ऋण(कर्ज), शत्रू आणि रोग यांना कधीच छोट समजलं नाही पाहिजे, शक्य होत असेल तर या पासून नेहमीच दूर राहायला पाहिजे.”
- “आळशी माणसांचे ना वर्तमानात कुठल्या प्रकारे अस्तित्व असते, येणाऱ्या भविष्यात ना त्यांचा कुठल्या प्रकारचा ठावठिकाणा असतो.”
- “भाग्य पण त्यांचेच साथ देत असते जे कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपल्या ध्येया प्रती कायम अटळ राहतात.”
- “नशिबाच्या भरोशावर चालत राहणे म्हणजेच आपल्या पायावर कुराड मारण्या सारखे आहे, अश्या लोकांची कधीच प्रगती होत नाही.”
- “जी माणसे मेहनती असतात ती कधीच गरीब असू शकत नाहीत, आणि ज्या माणसांची देवावर श्रद्धा आहे त्यांच्या कडून कधीच पाप घडू शकत नाही.
- कारण, डोक्याने जागलेले मनुष्य नेहमीच निडर असतात.”
- “आचरण चांगले असल्यास दु:खापासून मुक्ती मिळते. विवेक बुद्धीने अज्ञान नष्ट करता येते आणि महिती ग्रहण करत राहिल्याने भीती दूर केली जाऊ शकतो.”
- “संकट काळी नेहमीच आपल्या बुद्धीची परीक्षा होत असते, आणि आपली बुद्धीच आपल्या कमी येत असते.”
- “अन्ना पेक्षा मोठ दुसरे कोणतेचं धन असू शकत नाही,तसचं उपासमारी इतका मोठा शत्रू दुसरा कोणताच असू शकत नाही.”
- “विद्या हेच निर्धन व्यक्तीचे खरे धन आहे आणि हे धन अश्या स्वरुपात असते की त्या धनाची कोनी चोरी सुद्धा करू शकत नाही.
- शिवाय, या धनाचा जितका वाटप केला जातो तितकीच त्या धनाची वाढ होत जाते.”
- “कोणतेही कार्य करण्याआधी हे तीन प्रश्न स्वत:ला आवश्य विचार:-
- मी हे कार्य का करीत आहे?
- या कार्याचा काय परिणाम होणार?
- काय मी या कार्यात यशस्वी होणार?
या तीन प्रश्नांचे योग्य उत्तर जर तुम्हाला मिळाले तर समजायचं की आपली वाटचाल ही योग्य दिशेने सुरु आहे.
Quotes by Chanakya
11. फुलांचा सुगंध सुद्धा त्याचं दिशेला दरवळत असतो ज्या दिशेने हवा वाहत असते. परंतु माणसांच्या अंगी असणाऱ्या चांगल्या गुणांचा सुगंध चारही दिशेने पसरत असतो.
12. ज्या ठिकाणी तुमचा आदर केला जात नाही, तसेच ज्या ठिकाणी तुम्ही आपले म्हणने मांडू शकत नाही.
ज्या ठिकाणी आपला कोनी मित्र नसतो,आणि ज्या ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी होता नाहीत, अश्या ठिकानी कधीच थांबू नका.
13. जो व्यक्ती श्रेष्ठ असतो तो सर्वाना आपल्या समान मानतो.
14. शिक्षा हाच आपला खरा मित्र आहे, शिक्षित व्यक्तीच प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळवू शकतो.
15. दुसऱ्या व्यक्तीच्या धनाची लालसा करणे म्हणजे आपण स्वत:च्या नाश करण्यास कारणीभूत ठरतो.
16. माणसे ही आपल्या चांगल्या गुणांमुळे मोठे होत असतात. मोठ्या पदावर बसल्याने कोनी कधीच मोठ होत नसते.
17. नेहमी आनंदीत राहणे म्हणजेच शत्रूंच्या दुःखाला कारणीभूत होण्यासारखे आहे, आपण आनंदी राहणे हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी सजा आहे.
18. आपल्या वयक्तिक बाबी कधीच कोणाला सांगू नये, कारण वेळ आल्यावर आपली सर्व वयक्तिक माहिती तो समोरच्या व्यक्तीला सांगू शकतो.
19. एक वडिल म्हणून लहान मुलांना नेहमीच चांगल्या आणि वाईट गोष्टीन बद्दल शिकवण दयायला पाहिजे.
कारण प्रत्येक बाबीत समजदार असणाऱ्या व्यक्तीचाच समजात सन्मान केला जातो.
20. बुद्धिमान व्यक्तीने एखाद्या मूर्ख माणसाला समजविण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच त्या व्यक्तीने स्वत:हून स्वत: ला त्रास करून घेण्यासारखं आहे.
महान तत्वज्ञानी आणि विलक्षण प्रतिभाचे धनी आचार्य चाणक्य एक विख्यात विद्वान, दूरदर्शी तसेच दृढनिश्चय, अर्थशास्त्र, राजनीतिज्ञ असण्याबरोबर भारतीय इतिहासाचे कुटनीतीज्ञ (मुत्सद्दी) माणले जातात.
महान रुपी मोर्य वंशाची स्थापना करण्याचे वास्तविक श्रेय आचार्य चाणक्य यांनाच दिले जाते.
आचर्य चाणक्य यांचे नाव राजकारण,राष्ट्रभक्ती आणि समाजकार्यासाठी इतिहासामध्ये नेहमीच अमर राहील. भारताच्या इतिहासातील ते एक अत्यंत सबल आणि अदभूत व्यक्ती आहेत.