How to become an Accountant
आजच्या काळात पैश्याच्या व्यवहारात चोख असणे फार महत्वाचे आहे. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात पैश्याचा हिशोब असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामध्ये आपण सहज घेणे-देणे, बिल तयार करणे आणि पाठवणे तसेच प्रत्येक हिशोबाची पडताळणी करणे, टैक्स भरणे अश्या बऱ्याच कामांची कागदे पत्रे साभाळून ठेवणे, अश्या वेगवगळ्या वित्त व्यवहाराशी निगडीत असलेले कामे यात येतात.हा सर्व कारभार हा लेखापाल विभागाकडे (अकाऊंट विभाग) कडे असतो. हे सर्व कामे साभाळनाऱ्या व्यक्तीला “लेखापाल म्हणजेच अकाऊंटन्ट” म्हणतो.
विद्यार्थी वर्गाचा जास्तीत जास्त झुकाव वाणिज्य शिक्षण घेऊन अकाऊंटन्ट मध्ये करियर करावे या कडे असतो. तुम्हाला यात करियर बनवायचे असेल तर आमच्या लेखा मार्फत या सबंधित तुम्हाला महत्वाची माहिती मिळेल, जसे कि यासाठी कोणत्या परीक्षा दिल्या जातात, याचा अभ्यासक्रमा बद्दल माहिती, आवश्यक पात्रता तसेच वेतन कसे दिले जाते. याबद्दल आपण विस्तार मध्ये पाहूया.
अकाऊंटन्ट (Accountant) कसे बनाल? – Accountant Information in Marathi
“अकाऊंटन्ट” चा नेमका अर्थ काय ? – Accountant Meaning in Marathi
अकाऊंटन्ट ला शब्दाला मराठीत “लेखापाल” असे संबोधल्या जाते.कोणत्याही खाजगी संस्था किवा व्यावसायिक क्षेत्रातील कंपनीमध्ये, कारखान्यात अश्या वित्तीय(finanace) व्यवहारांचा हिशोब ठेवणे हे गरजेच असून त्यांची योग्य जबादारीने ते काम पूर्ण करणे हे देखील महत्वाचे असते.
यासोबत व्यावहारिक घेणे -देणे, बिल तयार करणे आणि पाठवणे, हिशोबाची पडताळणी करणे, टैक्स भरणे, सैलरी शीट बनवणे, वेगवेगळ्या पदावर असलेल्या लोकांची हजेरीचा रेकॉर्ड तयार करणे,तसेच बऱ्याच कामांची कागदे पत्रे साभाळून ठेवणे, हे सर्व कार्य अकाऊंटन्ट या पदावर नेमलेल्या व्यक्ती साठी असते.
अकाऊंटन्टचे प्रमुख प्रकार – Types of Accountant
अकाऊंटन्ट यात मुख्य तीन प्रकार पडतात.
- फाईनेंशीयल अकाऊंटन्ट (Financial Accountant)
- कॉस्ट अकाऊंटन्ट (Cost Accountant )
- मैनेजमेन्ट अकाऊंटन्ट (Management Accountant)
अकाऊंटन्ट च्या ह्या तीन प्रमुख विभागा मार्फत जास्तीत जास्त कार्य साभाळले जातात. या पदासाठी आवश्यक शिक्षण व बाकी पात्रता याबद्दल अधिक विस्तार पूर्वक माहिती बघूया.
1. फाईनेंशीयल अकाऊंटन्ट (Financial Accountant) :-
विध्यार्थ्यानचे वाणिज्य शिक्षण क्षेत्रातून डिग्री घेणे आवश्यक असते.
या क्षेत्रात सुरवातीला बुक कीपिंग असिस्टंट किवां जुनियर अकाऊंटन्ट या पदावर कार्य सुरु करावे लागते, ज्यामुळे त्या कामाचा अनुभव त्यांना प्राप्त होतो.
ज्या विध्यार्थीला फाईनेंशीयल अकाऊंटन्ट मध्ये आपले करियर बनवायचे असेल तर टॅली चे विविध कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे. उदा .ऍडव्हान्स टॅली, जी.एस.टी.टॅली तसेच यातील सॉफ्टवेअर शिकल्यास फार उपयुक्त ठरते.
यात विध्यार्थ्यानी अश्या शिक्षण संस्थेशी जुळून जसे कि शेअर मार्केट, जी.एस.टी,ऑडीटिंग, इ -पेमेंट, टी.डी.एस. गोष्टी चे आकलन केल्यास जास्त फायदेशीर ठरते.
विद्यार्थीचे आकलनशक्ती ची क्षमता चागली असली पाहिजे, अचानक आलेल्या प्रश्नाची उत्तरे शोधता आली पाहिजे, गणितात रुची असली पाहिजे अश्या बऱ्याच गोष्टीचा समावेश यात होतो.
2. कॉस्ट अकाऊंटन्ट – Cost Accountant
इथे आपण कॉस्ट अकाऊंटन्ट (Cost Accountant ) बद्दल संपूर्ण माहिती घेऊ या.
यामध्ये विध्यार्थी ला आपले करियर बनवायचे असेल तर भारतीय कॉस्ट एंड अकौंटंस संस्था मार्फत “कॉस्ट एंड अकौंटंन्सी” कोर्स करणे आवश्यक आहे.
“कॉस्ट एंड अकौंटंन्सी” चा कोर्स करण्यासाठी विध्यार्थी १२ वी कक्षा पास असणे गरजेचे असते तर वय वर्ष १७ असणे अनिवार्य असते. “कॉस्ट एंड अकौंटंन्सी” कोर्स हा तीन टप्प्यात विभागाला जातो, यातील पहिला टप्पा म्हणजे फाऊंडेशन हा ८ महिन्याचा असतो. यामध्ये चार पेपर असतात .
दुसरा टप्पा ला इंटरमिडीएट असे म्हणतो, ज्यात विध्यार्थीचे पहिला फाऊंडेशन कोर्से उत्तीर्ण असावे लागते किवा विद्यार्थी कोणतेही पदवी उत्तीर्ण असेल तर डायरेक्ट इंटरमिडीएट परीक्षे साठी पात्र होतो, विध्यार्थी चे वय १८ वर्षावरील असणे अनिवार्य आहे. याचा कालावधी हा १० महिन्याचा असतो. तर यात आठ पेपर असतात.
तिसऱ्या टप्प्यात फायनल परीक्षेसाठी पात्र होण्या साठी तुम्हाला इंटरमिडीएट उत्तीर्ण होणे व फायनल परीक्षेचा शेवटचा ग्रूप देण्या आधी १५ महिने आर्टिकल शिप पूर्ण करणे आवश्यक असते.
फायनल मध्ये दोन ग्रुप्स आणि प्रत्येक ग्रूप मध्ये चार पेपर असतात. या सर्व पेपरमध्ये उत्तीर्ण झाल्यावर विध्यर्थ्याला “कॉस्ट एंड अकाउंटेंसी”(CMA) या कोर्स ने प्रमाणित केल्या जाते.
जवळपास ४१,००० हजार याची कोर्से फी असते. या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास ,विध्यर्ध्याचा शिक्षानाचा अवधी वाढतो.
हा कोर्स घेतलेल्या विध्यार्थ्यांना प्रतिष्टीत पदावर नौकरी करण्याची संधी मिळते. जसे कॉस्ट कंट्रोलर, चीफ ऑडिटर, चीफ इंटरनल ऑडिटर तसेच भारत सरकार च्या कैग (CAG – कंट्रोलर एंड ऑडीट जनरल) विभागत सुद्धा नौकरी मिळू शकतो.
3. मैनेजमेन्ट अकाऊंटन्ट (Management Accountant) :-
मैनेजमेन्ट अकाऊंटन्ट (Management Accountant) हे पद राष्टीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या अकाऊंटन्ट विभागामध्ये फार महत्वाचे असते. यामध्ये फार कौशल्य पूर्ण कार्य करणे फार गरजेचे असते.
कॉर्पोरेट क्षेत्रात असलेल्या वेगवेगळ्या देश्यातील व्यवसाय करणाऱ्या कंपनीना अश्या व्यक्तीची अत्यंत आवश्यकता असते.
या साठी “चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मैनजेमेंट अकौंट्स (CIMA)”या कोर्से मधून प्रमाणित होणे गरजेचे असते.
शिक्षण पात्रता १२ वी पास किवा पदवीधर असणे गरजेचा आहे. याचा कालावधी २ वर्ष्याचा असून यात परीक्षाची चार लेवल उत्तीर्ण होणे अवक्श्यक असते.
मैनेजमेन्ट अकाऊंटन्ट म्हणजे एक प्रतिष्टीत पदाची नौकरी मानल्या जाते. यात राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे खूप मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण कार्य चालते.
तुम्हाला जर खरच या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग्य तो अभ्यासक्रम निवडून त्यात उत्तीर्ण होऊन आपले करियर घडवू शकता. यात वाणिज्य शिक्षण किवा इतर कोणत्याही क्षेत्रातून डिग्री घेतल्यानंतर काही सर्टीफिकेट कोर्सेस केल्याने तुम्ही यात सहजपणे नौकरी मिळवू शकता.
यात थोडाफार अर्थशास्त्राचा सुद्धा अभ्यास असणे गरजेचे आहे.
खालील दिलेले काही सर्टीफिकेट कोर्सेस – Certificate Cources
B.Com नंतर सर्वोत्तम करिअर पर्याय
- Master of Business Administration from Deakin Business School (MBA) डीकिन बिझनेस स्कूल (MBA) मधून व्यवसाय प्रशासनाचे मास्टर
- Chartered Accountancy/ चार्टर्ड अकाउंटन्सी (CA)
- Company Secretary /कंपनी सचिव (CS)
- Master of Commerce/ मास्टर ऑफ कॉम्मेर्स (M.Com)
- Chartered Financial Analyst /चार्टर्ड आर्थिक विश्लेषक (CFA)
MBA Courses:—
- Business Accounting and Taxation/व्यवसाय लेखा आणि कर (BAT)
- Certified Management Accountant / व्यवसाय लेखा आणि कर (CMA)
- US Certified Public Accounting /यूएस प्रमाणित सार्वजनिक लेखा (CPA)
- Financial Risk Manager /आर्थिक जोखीम व्यवस्थापक (FRM)
- Association of Chartered Certified Accountants/चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट असोसिएशन (ACCA)
- Certified Financial Planner/प्रमाणित आर्थिक नियोजक
- Certificate in Investment Banking /इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधील प्रमाणपत्र (CIB)
- Bachelor of Education /बॅचलर ऑफ एज्युकेशन (B.Ed)
- Digital Marketing /डिजिटल मार्केटिंग
तुम्ही वरील कोणत्याही कोर्स मध्ये उत्तीर्ण झाल्यावर एक चागल्या प्रकारे अकाऊंटन्ट क्षेत्रात आपले करियर बनवू शकता.
प्रत्येक कोर्सेचा कालावधी, शुल्क व पात्रता हि वेगवेगळी आहे.
तसेच काही खाली दिलेले डिग्री कोर्सेस – Degree Courses
- बॅचलर ऑफ कॉमर्स अकाउंटिंग (Bachelor of Commerce in Accounting)
- बैचलर ऑफ आर्ट्स इन अकाउंटिंग (Bachelor of Arts in Accounting)
- चार्टर्ड अकाउंटेंट (CA) – स्नातकोत्तर स्तर (Chartered Accountant)
- बैचलर ऑफ सायन्स इन अकाउंटिंग (Bachelor of Science in Accounting)
- बी .बी. ए.इन अकाउंटिंग (B.B.A in Accounting)
- एम.बी.ए इन अकाउंटिंग (M.B.A in Accounting)
- मास्टर ऑफ कॉमर्स- अकाउंटिंग (M. Com in Accounting), इत्यादि..
अकाउंटिंग पदाला दिले जाणारे वेतन/पगार – About salary
या क्षेत्रामध्ये खाजगी व सार्वजनिक अश्या लहान -मोठ्या स्वरूपाच्या बरायच कंपन्या किवा संस्थाच्या व्यावहारिक व्यापकते नुसार प्रत्येक पदासाठी वेगवेगळा पगार आकारण्यात येतो.
याची सुरवात वार्षिक उत्पन्न साधारणपणे ३ लाखापासून तर ७ लाख पर्यंतची असते पुढे काम व अनुभवानुसार यात वाढ होत राहते.
बरेच सीलेक्टेड कोर्स केल्यास, त्या त्या प्रतिष्टीत पदानुसार आपल्याला चागला पगाराचा टप्पा मिळवू शकतो.
आशा करतो कि आम्ही देलेली माहिती हि तुमच्या करियर साठी महत्वाची ठरेल. अश्याच नवीन माहिती साठी “माझी मराठी” ला जुळून राहा. धन्यवाद!
अकाउंटिंग विषयी विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Accounting
उत्तर: हो.
उत्तर: अकाऊंटन्ट पदाला सुरवातीला वार्षिक उत्पन्न जवळपास ३ लाख ते ५ लाखा पर्यंत दिले जाते.
कार्यानुसार वेतन वाढत जाते .
उत्तर: विध्यर्थी डिग्री उत्तीर्ण झाल्यावर अकाऊंट च्या संबधित कोर्से केल्यावर तो साधरपणे अकाऊंटन्ट च्या पदावर नौकरी करू शकतो ,परंतु चार्टर्ड अकाउंटेंट (CA)या पदावर काम करणारा व्यक्ती हा सी.ए कोर्सच्या संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण झालेला असून त्याचे आय.सी.ए. आय (ICAI) मध्ये चार्टर्ड अकाउंटेंट (CA) म्हणून नाव नमूद झालेले असते.
उत्तर: मुख्यता तीन प्रकारचे अकाऊंटन्ट असतात.
१. फाइनेंशियल अकाउंटेंट (Financial Accountant)
२. कॉस्ट अकाउंटेंट (Cost Accountant)
३. मैनेजमेंट अकाउंटेंट (Management Accountant)
उत्तर: टैली कोर्स करण्याची आवश्यकता नसते परंतु विद्यार्थी वर्गाला सहज नौकरी मिळण्यास या कोर्स ची सहायता मिळते.